Monday, 31 May 2021

Zoom मिटींग्स: 10 "हटके" युक्त्या ....

Zoom मिटींग्स : एक वास्तव !


कधी आपण zoom मीटिंग attend करतो किंवा कधी १-२-१ करतो. नेहमीची सूत्रे अनेक ठिकाणी तुम्ही ऐकले असतीलच : कि झूम ला जाताना formal रहा, वगैरे. पण मी इथे वस्तुस्थितीला धरून काही गोष्टी शेअर करणार आहे.

काही गोष्टी अपरिहार्यपणे स्वीकाराव्याच लागतील. व्यवसाय करताना किंवा जगताना सुद्धा आपण प्रिय + अप्रिय असं एकत्रच जगात असतो. कारण आपलं लक्ष असतं अंतिम साध्याकडे. उदा. कधीकधी कुणीतरी लेन वगैरे कटिंग केली, तरी मनातल्या मनात आपण शिव्यांची लाखोली वाहतो; पण शेवटी मनाला स्थिर, शांत वगैरे करतो, कारण नाहीतर पोहोचायच्या कामात विघ्न निर्माण होईल. किंवा कधी कधी कर्मचारी अथवा ग्राहक किंवा कुणीही व्यावसायिक सहकारी एखाद प्रसंगी अगदी Xत्या😠 सारखं वागला किंवा वागली तरी खोटं खोटं हसून परिस्थिती स्वीकारतोच ना आपण ! 

असंच आहे हे : "वैताग आलाय नुसता ह्या zoom चा "  किंवा "आपल्याला नाय जमत भाऊ " असले विचार करत नको बसायला; नाहीतर गंतव्य स्थान अशक्य होईल मिळणं ! zoom स्वीकारावं लागेल, मनाने. कारण हा मार्ग आता वापरावा लागणार आहे आपल्याला. आपण जरी नाही म्हटलं तरी इतर सर्व वापरताहेत म्हटल्यावर वापरावा लागेल मास्तर ! आणि चांगला व्यवसाय करावा, इतकंच माझं साध्य आणि साधन सुद्धा आहे. 

त्यामुळे Sorted Boss ! 👦

छोट्या युक्त्या :-


  1. १-2-१ करत असाल, तर खूप करूच नका : आठवड्यात मी १-2 च करतो. कारण पुढचा follow अप असतो ना ! एका १-2-१ मधून अनेक संदर्भ निघत असतात. प्रत्येक संदर्भावर काम करता येतं. कधी short तर कधी long टर्म. 
  2. zoom च्या रेकॉर्डिंग सेटिंग मधून Audio सुरु करून घ्यायचा. म्हणजे मीटिंग नंतर आपल्याला हे ऐकता येतं. महत्वाच्या Points वर मनन करून, हे नातं कसं वृद्धिंगत करता येईल हे ठरवता येतं. Saturday क्लब किंवा इतर बिझनेस नेटवर्क मध्ये परत परत ह्या १-2-१ होत राहतील, सतत, निरंतर. ह्यांतून पुढचा धंदा होतो, होत राहतो. 
  3. अजून एक करा: म्हणजे ZOHO चे CRM वापरा. बेसिक Version वापरून follow Up हा स्वयंचलित म्हणजे Automate करा, म्हणजे पुढचं काम ZOHOच करेल.
  4. Google चे कॅलेंडर वापरा, सोबत टास्क सुद्धा वापरा, त्याला एक तारीख द्या, झाले कि tick करा.
  5. zoom मीटिंग च्या वेळी Virtual Background बदलायची, बघा काही रंजक करता येतीये का ! Canva मध्ये फक्त "Zoom Virtual Backgrounds" असं शोधलं तरीही हे झटकन सापडेल. zoom मध्ये अजून पर्याय म्हणजे "immersed view" मधून झटक्यात सर्व मीटिंग ची पार्श्वभूमी बदलता येते.
  6. Break-Out Rooms वापरून पहा कधी रूम चे संयोजक म्हणजे होस्ट असाल तर. ह्या break आउट रूम्स द्वारे आपल्याला अनेक Attendees वेगवेगळ्या खोल्यांत विभागून टाकता येतात. शिवाय ह्या रूम्स कधी बंद होतील हे देखील ठरवता येतं. अगदी इकडचे तिकडे घालणे, अदलाबदल हे देखील करता येतं. शिवाय मध्येच आपण जॉईन सुद्धा होता येत.
  7. पिन व spotlight वापरा : zoom ला प्रेक्षक असाल आणि एखाद्याला जवळून पहायचं असेल, सादर कर्त्याला वगैरे, तर "पिन" हा पर्याय; तर आयोजक असाल, तर spotlight हा पर्याय वापरा.
  8. मीटिंग रेकॉर्ड करत असाल, तर शक्यतो "Cloud" वर केल्यास उत्तम. मीटिंग झाल्यावर आपल्याला इमेल येते. पेड account ला हि सोय आहे. विनामुल्य ला नसावी. आठवत नाहीये मला.
  9. Speaker View हा पर्याय वापरलात, तर सादर कर्त्याला प्राधान्य मिळतं, gallery वापरलं तर सर्वांना. तुमच्या कार्यक्रमानुसार ठरवा. 
  10. मीटिंग नंतर हे रेकॉर्डिंग youtube ला upload करा आणि लिंक share करा. zoom वरच लगेच delete करा. zoom च्या cloud ला 2 GB ची मर्यादा आहे.

शिवाय झूम ची नेहमीची settingsआता बहुतेकांना ठाऊक असतीलच. अजून एक म्हणजे : १-2-१ आणि कस्टमर meetings मध्ये फरक आहे. १-2-१ ह्या एखाद-दोन करा असं म्हटलं आहे मी. कस्टमर मिटींग्स जशा लागतील तशा कराव्या लागतीलच !


Saturday, 29 May 2021

भाग ८ - Mental Heuristics and Biases - part II

 मागील पोस्टमधील ठळक वैशिष्ट्ये - 

1. Mental Heuristics म्हणजे काय आणि त्याची उदाहरणे आपण पहिली 

2. Biases - (पूर्वग्रह) ची व्याख्यादेखील अभ्यासली, आजच्या भागात आपण विविध 'पूर्वग्रह' उदाहरणासकट पाहणार आहोत, 'पूर्वग्रह' बरेच असतात, आपण विशिष्ठ असे 10 पूर्वग्रह 2 भागात विभागून अभ्यासूया.

वि.सू. - Mental Heuristics and Biases हे आपल्या निर्णयक्षमतेशी निगडीत विषय आहेत. गुतंवणूक ही सोपी प्रक्रिया आहे पण चुकीच्या निर्णयांमुळे संपत्तीनिर्मितीत अडथळे निर्माण होतात आणि गुंतवणुकीच्या परीप्रेष्यातूंनच आपण त्याकडे पाहणार आहोत ======================================================================

👉 The Confirmation Bias - हा एक असा पूर्वग्रहदोष आहे जेथे आपल्या विध्यमान विचारधारेला बळकट करणारी माहिती ऐकण्याकडेच आपली प्रवृत्ती असते. ह्या पूर्वाग्रहाद्वारे आपले विचार आणि श्रद्धा प्रबलित होणाऱ्या माहीतीला अनुकूलता दर्शवण्याकडेच आपला कल असतो

उदा: 1.समाजमाध्यमांवर आपली विचारधारा शेअर करणाऱ्यांनाच आपण फॉलो करतो

2. वेगळा किंवा विरुद्ध विचार मांडणाऱ्यांचे किमान ऐकून  घेण्यास देखील आपण अनूत्सूक असतो

👉 The Hindsight Bias - हा पूर्वग्रहदोष प्रकार म्हणजे अनियमित आणि कुठल्याही हेतुपुरस्सर न घडलेल्या गोष्टींचादेखील अचूक अंदाज बांधता येतो असा दावा करणे. ह्याला 'मला हे कायमच माहीत होतं' असं मानण्याचा अतर्क्यवाद म्हणूनही संबोधलं जातं

उदा: 1. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर अमुक एक उमेदवार जिंकणार हे मला आधीपासूनच माहीत होतं असं वक्तव्य करणं

2.कुठल्या कंपनीच्या समभागातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल हे आपण आधीच सांगू शकलो असतो असा दावा करण

👉 The Anchoring Bias - ह्या पूर्वग्रहदोष प्रवृत्तीत आपल्या कानावर पडणाऱ्या पहिल्या माहितीने किंवा महितीसंचाने आपण वाजवीपेक्षा अधिक प्रभावित होतो आणि आपल्या पुढील निर्णयप्रक्रियेत त्याला संदर्भ बिंदू मानून चालतो

उदा: 1.वाटाघाटीच्या सुरुवातीला ज्या आकड्याने सुरुवात होईल तो संदर्भ मानूनच पुढील वाटाघाटी पार पडतात 

2.एखादा शर्ट विकत घेताना पहिला नजरेस पडणाऱ्या शर्टाची किंमत रु.2000/- , दुसऱ्याची रु.1000/- आणि तिसऱ्याची रु.800/- असल्यास आपल्याला तिसरा शर्ट दर्जाहीन वाटतो

👉 The Halo Effect- हा पूर्वग्रहदोष प्रकार म्हणजे एखाद्या व्यक्ती, कंपनी, ब्रँडच्या एखादयाच गुणवैशिष्ट्यानुसार त्याच्या एकूणच व्यक्तित्वाबद्दल मत बनविणे

उदा: 1.देखणी व्यक्ती ही उच्च नैतिकता जपणारी, दयाळू आणि हुशार देखील असते असा सहसा समज करून घेतला जातो

2.आकर्षक व्यक्तीने विपणन केलेली उत्पादने दर्जेदार असतात असा समज करून घेणे 

👉 The Recency Bias- हा पूर्वग्रहदोष प्रकार म्हणजे नजीकच्या कालावधीत घडलेल्या घटनांना, काही वर्षांपूर्वी किंवा इतिहासात घडलेल्या घटनांपेक्षा अधिक महत्व किंवा त्यावर अधिक भर दिला जातो

उदा: 1.तुम्ही पाहिलेल्या 20 चित्रपटांची नावे सांगा असं विचारल्यास, 5 - 7 वर्षापूर्वी पाहिलेल्या चित्रपटांपेक्षा गेल्या 1 - 2 वर्षात पाहिलेल्या चित्रपटांची नावं चटकन आठवतील

2. गेल्या 5 वर्षातील गुंतवणुकीच्या परताव्याचा सरासरी दर उत्तम असूनदेखील फक्त मागील वर्षभरात काही दखलपात्र अनुकूल बदल न झाल्यामुळे संपूर्ण गुंतवणूक काढून घ्यावंसं वाटणे

=====================================================================

पुढील भागात - अजून काही Biases बद्दल पाहू , Part III

धन्यवाद 🙏, Happy Investing 💐

"Unsubscribe" चे महत्त्व ....

इमेल द्वारे येणारा स्पॅम

असे काही काही मेसेजेस email मधून उगाचच , आपल्या मनाविरुद्ध येतंच राहतात. कळतंच नाही काय करावं ! आपण फक्त neglect करत राहतो , आणि आपला inbox फुल होतो. मग कधी आपल्याला कळतं कि आपल्याला मेल येवू शकत नाहीत. मग developer कडे जायचं, धावपळ आणि काय अन काय ! 


आधी ह्या मेसेजेस मधून unsubscribe करा. सांगायचं त्यांना कि भाऊ, कृपा कर, थांबव हे ! सगळे लगेच शहाण्या मुलासारखे थांबले नाहीत तर चक्क प्रत्यक्ष निवडायला लावतात आपल्याला. मग काय करायचं ? तर निवडायचं :-


आणि काम फत्ते करायचं ! अजून एक उपाय म्हणजे : gmail वापरत असाल तर "फिल्टर" हा पर्याय वापरणे व हे यायचेच बंद करून टाकणे.

Whatsapp चे विनाकारण येणारे मेसेजेस 


लोकांच्या लिस्ट वरून पाठवलेल्या अनंत मेसेजेस ना आपण फुकट बळी का पडायचं ? आधी सांगायचं :-
"मला या लिस्ट वरून कृपया बाजूला ठेवाल का" (समजूतदार, माहितीची व्यक्ती असेल तर)

समजूतदार नसेल, किंवा उगाच कशाला दुखवा Category तले असतील,तर चक्क सांगावं ...
"काही दिवस मी जरा एकांतात राहतोय, परत आलो कि सांगेन " किंवा काहीही 😆

आपणही नाही स्पॅम करायचा 


email किंवा whatsapp वरून लिस्ट करा तयार; पण मेसेजेस चा भडीमार नको. जे आपल्याला नाही भावत, ते दुसऱ्यांना कसं बऱ आवडेल ? मुळात हा "सतत, खूप करावं लागतं" हा mindset , मानसिकता बदलायला हवी. योग्यता वाढवू हे ठसवायला हवं.

Tuesday, 25 May 2021

एका बीजापोटी, तरु कोटी, जन्म घेती सुमने फळे I आधी बीज एकले - स्मिता सोवनी यांची मुलाखत

बचपन से बडा कोई स्कूल नही, क्युरिओसिटी से बडी कोई टीचर नही - पार्लेजी बिस्किटाच्या जाहीरातीतील हि 'Tagline' डॉ स्मिता सोवनी ह्यांची मुलाखत ऐकताना सतत आठवत राहीली

महाविद्यालयात सुरुवातीला हुशार नसतानाही वाणीज्ज्य शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात मानांकन प्राप्त विद्यार्थिनी आणि त्याच दरम्यान वित्त विषयाची गोडी निर्माण झाल्यामुळे पुढे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन २००२ साली डॉ स्मिता सोवनी विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे येथे वित्त विषयाच्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या 

व्यवसायात काही ठराविक लोकंच यशस्वी का होतात? पिढीजात व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवसाय पद्धती आणि पैशा विषयीचा विशिष्ट दृष्टीकोन इत्यादी मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पुढे त्याच विषयांवर प्रबंध लिहून २००७ साली Ph. D (डॉक्टर ऑफ फिलोसोफी) ची पदवी मिळवली. (Ph D करतांनाची त्यांची निरिक्षणे आणि त्याचं त्यांनी केलेलं विश्लेषण प्रत्यक्ष मुलाखतीत ऐकण्याची संधी कुठल्याही उद्यमीने दवडू नये अशीच)

महाविद्यालयात व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना शिकवताना डॉ स्मिता सोवनी यांना जाणवलं कि, प्लेसमेंट कंपन्या आपल्याला कुठे घेऊन जाणार ह्यावर विद्यार्थी अवलंबून आहेत आणि एकंदरच आयुष्यात काय करायचं ह्याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे. त्यावर उपाय म्हणून त्यांनी स्वत: काही गोष्टी आधी शिकून आत्मसात केल्या आणि व्हिजन बोर्ड ची संकल्पना जन्माला घातली. 'व्हिजन बोर्ड' म्हणजे आपल्या आयुष्याची ब्लू प्रिंट - (ती कशी काम करते ते प्रत्यक्ष मुलाखतीतच ऐका)

विद्यार्थ्यांना 'व्हिजन बोर्ड' द्वारे करिअर संदर्भात मार्गदर्शन केल्यामुळे महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतरही विद्यार्थी डॉ सोवनी च्या संपर्कात रहात आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं कि विद्यार्थ्यांना एका मेंटरची गरज आहे. विद्यार्थी त्यांच्याशी अडचणीचे, सुख दुखाचे प्रसंग शेअर करत, कधी कुठलं अपयश पदरी पडलं, अपमान झाला तर ते ही सांगायचे, पण डॉ सोवनी यांची पार्श्वभूमी 'वित्त' विषयाशी संबंधित असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्याच्या त्या वेळच्या मानसिकतेचं नीटसं आकलन होत नसे आणि त्यांना असं जाणवलं कि आपण विद्यार्थ्यांना समजून घेण्यात कुठे तरी कमी पडतोय आणि म्हणून मग त्यांनी Landmark, Stress Management Professional, Silva UltraMind वगैरे मानसशास्त्राशी संबंधित विषयांचा अभ्यास करून प्राविण्य मिळविलं आणि त्याचा आपल्या समुपदेशनात उपयोग करू लागल्या 

Healing संदर्भात डॉ सोवनींच्या वाचनात काही आलं होत आणि सुरुवातीला त्यांचा त्याच्यावर विश्वास ही नव्हता पण हा सगळा खोटेपणा आहे कि खरच ह्यात काही तथ्य आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हे करून बघितलं पाहिजे आणि करायचं तर पूर्ण लक्ष केंद्रित करूनच अशी घरची शिकवणच असल्यामुळे त्या रेकी शिकल्या. ते त्यांना आवडू लागलं, जमू लागलं, म्हणून मग पहिली पायरी, दुसरी पायरी असं करत त्यांनी मास्टर्स ची पदवीदेखील मिळविली पण 'रेकी' काही त्यांनी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून निवडलं नाही. 'रेकी' चा समुपदेशन करतांना फार उपयोग होतो अस त्या सांगतात कारण दुखावलेल्या मनाच्या खुणा शरीरात कुठे तरी त्याचं अस्तित्व दाखवत असतात, उदा; वाढलेला रक्तदाब, केस गळणे, आम्लपित्त इत्यादी. अशा व्यक्तींना त्यांचे हे मानसिक आजार बरे करण्यासाठी स्वत:च्या शरीरातच अस्तित्वात असणाऱ्या 'रेकी' नामक एका शक्तीची डॉ सोवनी ओळख करून देतात व त्या शेत्रातील तज्ञांकडून सल्ला घेण्याचं सुचवतात

योग ह्या जीवनशास्त्राशी योगायोगानेच संबंध जुळला असं त्या सांगतात. घरी कुणा 'कोल्हटकर' नामक लेखकांचं असलेलं जाडजूड पुस्तक डॉ सोवनींच्या वाचनात आलं, ते ही आवडलं, मग अजून काही लेखकांची योगसूत्र वाचली, मग ते शिकवण्यासाठी काही व्यक्ती भेटल्या, वाचन घडलं आणि योगाभ्यास ही त्यांनी पूर्ण केला. डॉ सोवनींना जाणवलं कि योगामुळे आपली तब्येत उत्तम राहतेय, आपलं मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहतंय, सकारात्मकता आणि आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणे हे योगामुळे चांगल्या प्रकारे जमतंय, तसेच काही उपाय नसल्यास आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करण्याची मानसिकताही रुजतेय

संगीताची आवड डॉ सोवनी ह्यांना लहानपणापासून होती, गम्मत म्हणून शाळेत असतांना गाण्याचा क्लास लावला होता पण सुरुवातीला ह्याच्याही परीक्षा द्याव्या लागतील म्हणून त्यांनी नाक मुरडलं होतं. शेवटी परीक्षा दिल्या, मग पुढच्या वर्गात गेल्या आणि कालांतराने त्याचीही गोडी लागली. सूर, ताल, राग, वाद्य वाजवणे अशी ती आवड वाढत गेली आणि पुढे संगीत विशारद पूर्ण केली. नाद आणि ध्वनी ह्यांच्याबद्दल 'सामवेदात' उल्लेख आहेत हे ऐकून माहित होतं, आयुर्वेदात 'संगीतातून मनस्वास्थ्य' अशी शाखा आहे हे ही वाचलं होतं आणि आयुष्यात जेव्हा उसंत मिळेल तेव्हा ह्या शाखेकडे वळायचं असं तेव्हाच डॉ सोवनींनी ठरवलं होत असं त्या सांगतात आणि तशा त्या आज वळल्यादेखील आहेत

नाद म्हणजे ध्वनी आणि योग म्हणजे जुळणे. आवाजांच्या दुनियेचं भान आपल्या पंचेन्द्रीयांमार्फत जोडून घेणे ह्याला नादयोग म्हणता येईल. नादयोगाची दोन महत्वाची इंद्रिय म्हणजे आपला घसा आणि कान पण त्याकडे आपण जागरूकपणे पहात नाही अस त्या म्हणतात. आपल्या घशातून निघणारा ध्वनी, वाणी आणि भाषा ह्यांच्या वापरातून आपण आयुष्यभरासाठी कुणाशी तरी नातं जोडून घेऊ शकतो किवा त्यात वितूष्ट ही येऊ देऊ शकतो (ह्याबद्दल डॉ सोवनी यांनी दिलेलं उदाहरण प्रत्यक्ष मुलाखतीतच ऐका)

गीत - संगीत हे सगळे नादयोगाचेच प्रकार. आपल्या शरीरातील सात चक्र आणि सात सुरांचा देखील संबंध आहे. 
घरात डॉ सोवनींना एक प्राचीन उपनिषिद सापडलं, त्याचा त्यांनी अधिक अभ्यास केला, पुढे गुरूंकडे जाऊन साधनाही केली आणि त्यातून मग Stress management through Nadyoga हा सुंदर कार्यक्रम तयार झाला. ह्या ध्वनींचा उपयोग करून आपल्यावर आलेला ताण कसा विसर्जित करून टाकता येईल असा तो कार्यक्रम आहे

Stress आला असल्यास राग दरबारी हा फार परिणामकारक ठरतो आणि त्याबद्दल डॉ सोवनींनी मुलाखतीत दिलेलं उदाहरण जरूर ऐका. तसा हा संपूर्ण कोर्स ५ दिवसांचा असतो पण कोर्पोरेट मध्ये कार्यक्रम करतांना मुख्यत्वे करून Stress Management वर भर असल्यामुळे ४ तासांचा वर्कशॉप आयोजित केला जातो. 

'व्हिजन बोर्ड' आणि 'करिअर' ह्यात मुलता: फरक आहे. करिअर हे अतिशय महत्वाचं असलं तरी 'व्हिजन बोर्ड' तुमच्या आयुष्याच्या इतर पैलूंवरही प्रकाश टाकतो. वास्तववादी 'व्हिजन बोर्ड' तयार केला असेल तर त्याला नक्की यश येत असं डॉ सोवनी सांगतात. त्यातही काय धरून ठेवायचं आणि कधी आहे त्या प्रवाहाबरोबर पुढे जायचं हे आपलं आपण ठरवायचं असत. करिअर आणि पैशाच्या मागे पळताना तुमच्या आवडी निवडी, कुटुंबासोबत वेळ घालवणं, उतारवयात आई वडिलांसाठी वेळ असणं, मित्र मंडळींबरोबर मजामस्ती इत्यादी गोष्टी राहून गेल्याची खंत वाटू नये ह्यासाठी 'व्हिजन बोर्ड' ही संकल्पना अतिशय प्रभावी आहे आणि ते पटवून देण्यासाठी डॉ सोवनी आपल्याला सौ सुधा मूर्ती ह्याचं उदाहरण देतात. 

सुधा मूर्ती ह्या इंजिनियर आणि एक अतिशय उत्तम करिअर डोळ्यासमोर असतांना, घरातील २ लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी स्वत:हून घेतली, कारण हा त्यांनी तयार केलेल्या 'व्हीजन बोर्ड' मधून आलेला निर्णय होता.म्हणजे कुटुंबासाठी करतांना एखादी गोष्ट तुम्ही आवडीने करता की मारुनमुटकून जबाबदारीचं कुणीतरी ओझं टाकलंय म्हणून करता हे ठरविता यायला हवं आणि आयुष्यात वेळेतच प्राधान्यक्रम '' ठरविल्याने हि निराशा पदरी पडते, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डॉ स्मिता सोवनी व्हिजन बोर्डवर घेतायत 

संगीत हे कंटाळवाणं नाही, त्यात एक सहजता आहे, झाडाला कशी फुलं, फळ लगडतात तसं आयुष्य भरभरून असावं, ओढून ताणून काही असू नये किंवा करू नये असं त्या सांगतात. संगीत हे फक्त मनोरंजन नाही तर ते आपलं आयुष्य अंतर्बाह्य बदलू शकतं आणि त्यामुळेच 'नादयोग' आणि 'संगीत साधना' जनमानसात रुजेल ह्यालाच आपल्या पुढील आयुष्यात प्राधान्य राहील असं त्या सांगतात 

'कुतूहल' म्हणून वेगवेगळ्या गोष्टी शिकून पदव्या मिळविताना आपल्याबरोबर इतरांनादेखील त्याचा उपयोग होईल हे डॉक्टर स्मिता सोवनी ह्यांच्या आयुष्याचं श्रेयस आणि प्रेयस बनून गेलंय जणू 

अन्यथा महविद्यालयातील सुरुवातीच्या काळात स्वतः हुशार नसतानाही आजच्या पिढीला महाविद्यालयीन काळात संभ्रमावस्थेतून मार्ग दाखवण्यासाठी 'व्हिजन बोर्ड' सारखी अभिनव कल्पना त्या राबवित्या ना 

मुलाखतीत तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी केवळ उद्धृतंच केलेला नाही तर तसं त्या शब्दशः जगतायत. आधी स्वत: शिकतायत आणि मग इतरांनाही शिकवतायत. फक्त करिअर मध्ये गुंतून न पडता एक परिपूर्ण आणि भरभरून आयुष्य जगण्यासाठी 'व्हिजन बोर्ड' ची संकल्पना आणि तुकाराम महराजांच्या अभंगातील विचार बेमालूमपणे एकजीव झाल्यासारखे 

आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले |
एका बीजापोटी, तरु कोटी, जन्म घेती सुमने, फळे ||
आधी बीज एकले , आधी बीज एकले |

'नादयोग' आणि 'संगीत साधना' जनमानसात रुजविण्याच्या तुमच्या पुढील वाटचालीस 'निवडक उद्यमी' तर्फे अनेक शुभेच्छा 💐आणि 'व्हिजन बोर्ड' ही संकल्पना 'निवडक' साठी ही राबवावी अशी नम्र विनंती 🙏

Saturday, 22 May 2021

भाग ७ - Mental Heuristics and Biases - Part I

मागील पोस्टमधील ठळक वैशिष्ट्ये : 

Power of Compounding चं तत्व समजणं आणि मान्य करणं हे व्यवहारज्ञान सोपं आहे पण निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण ठेवणं सहजसाध्य नाही. म्हणूनच फार कमी गुंतवणूकदार संपत्तीनिर्मितीत यशस्वी झाल्याचं दिसतं

ह्या निर्णयक्षमतेतील गोंधळ आणि त्यामागील कारणे हेच आजच्या भागात आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी पुन्हा एकदा वाचकांना नमूद करू इच्छितो, मागील आठवड्यातील, Delayed Gratification आणि आजचा Mental Heuristics and Biases ह्या विषयांची संपूर्ण व्याख्या मानसशास्त्राच्या अभ्यासातूनच होऊ शकते. Power of compounding च्या संकल्पनेद्वारे संपत्तिनिर्मिती साधतांना आपल्या सदोष निर्णयक्षमतेमुळे त्यात अडथळे निर्माण होतात आणि म्हणूनच मी ह्या विषयांची किमान तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे

========================================================================

'Mental Heuristics and Biases' -

आपला मेंदू दिवसभरात प्रचंड माहितीसाठ्याची नोंद घेत असतो, परंतु आपल्या मेंदूचा जागरूक भाग एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत असल्यामुळे बऱ्याच वेळेला पटकन निर्णय घेताना शॉर्ट कट मारले जातात. एखाद्या समस्येवर उपाय शोधताना आपला मेंदू असा वागतो खरा आणि ह्या नकळतपणे मारल्या जाणाऱ्या शॉर्टकट्सना 'Heuristics' असं म्हणतात.

ह्या Heuristics मूळे दैनंदिन जीवनात कार्यक्षमतेने निर्णय घेण्यास आपल्याला मदत होते पण ती 'पुरावासिद्ध' (Full Proof) प्रक्रिया नाही, त्यात बऱ्याच वेळेला तर्कविसंगत त्रुटी राहतात आणि त्याचाच परिणाम स्वरूप आपल्या मेंदूत एखाद्या विषयाच्या आकलना विषयी पूर्वग्रह/दु:षाग्रह तयार होतात ज्याला Cognitive Biases असं म्हणतात

वेळेचं बंधन, एखादया समस्येचा जटिलपणा किंवा संदिग्धता ह्याचा आपल्या निर्णयक्षमतेवर प्रभाव असतो. मानवी मेंदू ह्या शॉर्ट कटस् (Heuristics) वर अवलंबून असण्याचे, मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले काही सिद्धांत आपण खाली पाहूया

1.पर्यायी संबंध लावणे - जटिल आणि अवघड प्रश्नाला सोप्या आणि मिळत्या जुळत्या प्रष्णांशी सांगड घालून चट्कन निर्णयाप्रत येणे

2.प्रयत्न कपात - उपलब्ध पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडतांना प्रत्येकाचे फायदे-तोटे तोलूनमापून घेण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या बौद्धिक कष्टाचा संज्ञानात्मक आळस (Cognitive Laziness) असल्यामुळे आपण हे शॉर्टकटस् मारत असतो

3.जलद आणि काटकसर - बऱ्याच संदर्भांमध्ये काटकसरीने आणि जलद निर्णय घेतानाही मानवी मेंदू ह्या शॉर्ट कटस्चा वापर करतो

Mental Heuristics (शॉर्ट कट्स) चे काही मर्यादित प्रकार खाली पाहूया,

1.Availability Heuristics - (उपलब्धता शॉर्ट कट) - एखादी गोष्ट चुटकी सरशी आठवल्या जाण्याच्या क्षमतेचा ह्या निर्णयप्रकारात अंतर्भाव होतो.निर्णय घेताना एखाद्या गोष्टीशी साधर्म्य सांगणारी काही उदाहरणे आपल्याला चटकन आठवतात.अशी उदाहरणं आपल्या स्मरणशक्तीत सहज उपलब्ध असल्यामुळे त्याच्या परिणामस्वरूप म्हणून घडलेल्या गोष्टीं सार्वजनिक आयुष्यात वारंवार घडतात अशीच आपली समजूत होऊन जाते

उदा: तुम्ही विमानाने कुठे जाणार असाल आणि अचानक तुम्हांला नजीकच्या काळात घडलेले विमानअपघात आठवले की तुम्ही विमानप्रवासा टाळून आगगाडीने जाण्याचा निर्णय घेता, विमानअपघाता बद्दलचे विचार सहज तुमच्या स्मरणशक्तीत उपलब्ध असल्यामुळे वास्तवापेक्षा विमान अपघात वारंवार घडतात असं तुमचा मेंदू मानू लागतो

2. Representativeness - (प्रातिनिधिक/निदर्शक) - ह्या निर्णयप्रकारात वर्तमानात घडणारा एखादा प्रसंग किंवा घटना ह्याची मेंदूतील एखाद्या प्रातिनिधिक मानसिक नमुन्या बरोबर तुलना केली जाते.एखाद्या व्यक्तीची विश्वासार्हता ठरविताना तुम्ही त्याच्या पैलूंविषयी नकळतपणे तुमच्या मनातल्या ठराविक मानसिक नमुन्या बरोबर तुलना करून पाहता

उदा: एखाद्या कनवाळू वृद्ध महिलेला पाहिल्यावर तुम्हांला तुमच्या आजीची आठवण येते आणि चट्कन ती महिला तुम्हांला दयाळू, सौम्य आणि विश्वासार्ह वाटू लागते

3.Affect - परिणाम - ह्या शॉर्टकट प्रकारात सध्याच्या घडीला (चालू वर्तमानात) तुमच्या भावनांवर कुठल्या गोष्टींचा प्रभाव आहे त्याअनुषंगाने निर्णय घेतले जातात 

उदा: संशोधनाने हे दाखवून देण्यात आलं आहे की तुम्ही सकारात्मक मूडमध्ये असताना जेव्हा निर्णय घेता तेव्हा जोखीम कमी आणि फायदे अधिक असंच चित्र दिसतं पण विरुद्धार्थाने जेव्हा तुम्ही नकारात्मक भावनेच्या प्रभावाखाली असता तेव्हा फायद्यांऐवजी एखाद्या निर्णयाच्या संभाव्य जोखमींकडे आणि वाईट परिणामांकडेच लक्ष केंद्रित केलं जातं

======================================================================

पुढील भागात : ह्याच विषयातील 'Biases' - (पूर्वग्रहदूषित) बद्दल तपशिलात जाणून घेऊ 

धन्यवाद 🙏, 

Happy Investing💐

Wednesday, 19 May 2021

नेटवर्क मिटिंग ला व्यवस्थित वेळ हातात ठेवून जा !

वेगवेगळे क्लब्स वेगवेगळ्या वेळांना मिटींग्स ठेवतात. आमची निऊ ची मीटिंग असते दर शुक्रवारी संध्याकाळी ८ ते ९ दरम्यान, तर Saturday Club तसेच BNI च्या मीट्स सकाळी असतात. एकदा सुरु झाल्या,की या मिटींग्स एका साच्याने चालतात. साधारण एक ते दीड तास लक्षपूर्वक राहावं लागत. मीटिंग मध्ये काही मंडळी तुम्ही हेरलीत, तर त्यांच्याशी जरा निवांत बोलता येतं ते अधिकृत मीटिंग संपल्यावर , प्रत्यक्ष मिटींग्स मध्ये तर ब्रेकफास्ट हा उत्तम पर्याय असतो. डिजिटल मध्ये मात्र हे असतच असं नाही.

वेळेच्या आत , १५-२० मिनिटे ......

त्यामुळे, मीटिंग च्या आधी वेळेत पोहोचा, साधारण १५ मिनिटे लोक zoom login करतात. तेव्हाच आपणही व्हावं login. फक्त बदाबद कधी संधी न मिळाल्यासारख आपल्या धंद्याचं प्रमोशन करत नाही सुटायचं. तर उलट करा. पहा, चाणाक्ष पणे, ऐका इतर मंडळी काय बोलतायेत ते. हेरून ठेवा, महत्त्वाचे key connects. प्रत्यक्ष मीटिंग मध्ये त्याचं बोलणं जरा जास्त लक्ष देवून ऐका. संधी मिळेल तेव्हा त्यांच्या बोलण्यातून तपशील टिपून ठेवा. contact details घेवून ठेवा. 

ह्या सगळ्याला वेळ ठेवा. back to back मिटींग्स नको. हा योग्य नाती बांधण्याचा वेळ असतो. ह्यात जाणारा वेळ हा गुंतवणूक समजा. खर्च नाही. 

मानसिकता बदलुयात.

Tuesday, 18 May 2021

मोठ्ठा मेसेज : ब्लॉग चा पर्याय वापरा : Long Term उपयोगी पडणारी कृती

कधी कधी whatsapp किंवा telegram वर आपण मोठे मोठे मेसेजेस पोस्ट करतो. वाचले जात असतीलही, तरी ते जर blog वर पोस्ट केले ना, तर जास्त उपयुक्त ठरू शकत. ह्या मोठ्या मेसेज चा एक छोटा मेसेज तयार करायचा : म्हणजे नक्की वाचकांना त्याचा काय उपयोग होईल वाचून हे त्या short मेसेज मध्ये लिहायचं, आणि त्याची लिंक पोस्ट करायची सोबत. 

फायदा कसा होतो ?

  • आपल्याला नेमकं शोधायची आणि बोलायची सवय लागायला लागते.
  • त्या मेसेज मधलं "नेमकं" ते share केल्याने ज्याला उपयुक्त ठरू शकतं , त्याच्या नजरेस हि पोस्ट यायची अधिक शक्यता असते; त्यामुळे तुमचा वाचक वर्गही वाढेल. आणि तोही नेमका. नुसताच 👌किंवा 👍 करणारा नाही. 
  • blog ला एक "लिंक" असते, त्यामुळे तुमचं लेखन हे पटकन वितरीत करता येतं, परत परत वापरता येतं.
  • blog पोस्ट म्हणजे एक जास्त काळ नेटवर राहणारा ऐवज असतो. दीर्घकाळ स्मरणात राहतो, राहू शकेल.

कधी करताय पोस्टिंग ?



Monday, 17 May 2021

अडथळ्यांची शर्यत - रेवथी पाटील ह्यांची मुलाखत

 "अडथळ्यांची शर्यत" - 

1.तीन वर्षे पाळणाघरात राहिल्यानंतर मुलाने हट्ट धरला की आता तू घरूनच काम करायचं, मी पाळणाघरात जाणार नाही,

2.घरची आघाडी सांभाळून अजून काय करता येईल असा विचार करता रेवथीला जाणवलं की आपलं पाककौशल्य उत्तम आहे, त्यामुळे त्यालाच समांतर असे 'बेकरी प्रॉडक्टस्' जर आपण बनवायला शिकलो तर ? 'केक' हा सगळ्याच आनंदी सोहळ्यांचा अविभाज्य भाग आहे आणि 'कुकीज' लहानांपासून - मोठ्यांपर्यंय सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे नक्कीच त्यातून एक व्यवसाय उभा करता येऊ शकेल

3.म्हणून मग वर्षभर कोर्स वगैरे करून ते कौशल्य रेवथीने शिकून घेतलं खरं पण तिला व्यवसाय जमेल का ह्याबद्दल सुरुवातीला घरची मंडळी थोडी साशंकच होती, त्यात व्यवसाय करणार कुठून? साधनसामग्री, गुंतवणूक वाया गेली तर असा विचार करून रेवथीला व्यवसाच्या विचारापासून परावृत्त करण्याचादेखील प्रयत्न झाला

4.रेवथी तिच्या निर्णयावर ठाम होती त्यामुळे हळूहळू 'तो' विरोध मावळला आणि 'स्पार्कल बेकर्स' ची सुरुवात झाली पण घरून काम करताना लोकांपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत होते, 

5.सुरुवातीला जवळच्या ओळखीतून, मित्रमंडळींच्या शिफारसीतून ऑर्डर मिळत गेल्या आणि घराच्या खालीच असलेल्या छोटयाशा जागेतून व्यवसाय पुढे चालू राहिला खरा पण एका स्त्री मालकीणीबरोबर जुळवून घेण्यात हाताखालच्या माणसांना सुरुवातीला अवघड गेलं

6.पाच किलोचा केक एकदा 'डिलिव्हरी बॉय' कडून गहाळ झाला. अर्थात रेवथी ने पुन्हा नवीन केक बनवून दिला खरा पण कच्चा माल आणि कष्ट वाया गेले, त्यात केक वेळेत न पोहोचल्यास एखाद्याचा हिरमोड होऊ शकतो त्यामूळे 'डिलिव्हरी' विषयाकडे रेवथी कटाक्षाने लक्ष देऊ लागली

7.मागच्या वर्षी लॉकडाउनमध्ये तर रेवथीच्या व्यवसायाला घरघर लागेल असाच सगळ्यांचा कयास होता पण वेळेत केक बनवून देत असल्यामूळे काही हॉटेलमालकांनी आपल्या हॉटेलातच काही केक ठेवण्याचा आग्रह धरला

8.चोखंदळ ग्राहक बऱ्याच वेळेला स्पर्धकाचा दर्जा आणि किंमतीची तूलना करतात तेव्हा रेवथी चतुरपणे 'हरकत हाताळणी' करते. आपण वापरत असलेल्या कच्च्या मालाचा ब्रँड आणि दर्जा ती ग्राहकांना दाखवते, आपण फक्त 'एगलेस' केकच बनवतो हे सिद्ध करून दाखवते, आपल्या कामाला ग्राहकांकडून मिळालेले रिव्ह्यूज आणि शिफारसी ती ग्राहकांना दाखवून त्यांचं मत वळवण्याचा प्रयत्न करते. तसेच स्पर्धकाच्या दुकानात जाऊन ते काय किमतीत काय देऊ करतायत ह्याचाही आढावा घेते, तसंच महिन्यातून एकदा तरी नवीन फ्लेवर्स बनवून त्याची ग्राहकांना माहिती देत असते

व्यवसाय सुरू केल्यापासून आलेल्या अडथळ्यांचे असे अनेक किस्से सांगता येथील

व्यवसायाचं पाहिलं वर्ष कसं गेलं, फूड डिलिव्हरी ऍप आणि वेबसाईट मुळे कसा व्यवसाय वाढत गेला, व्यवसायाचं बाळकडू कधी आणि कुणाकडून मिळालं, ग्राहकांची टीका आणि स्तुती दोन्ही लक्षात का आणि कशी राहते, प्रोक्युरमेन्ट आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं चोख तंत्र, केकमधील रेवथीची स्पेशालिटी, व्यवसाय वाढवण्याचे तिचे प्लॅन काय, नेट्वर्किंचे महत्व, पहिला गुगल रिव्ह्यू आणि सॅटर्डे क्लबच्या 'वूमन्स् डे' च्या दिवशी घडलेला किस्सा ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष ऐकण्यातली मजा दवडू नका

'आयुष्यात अडचणी आल्या का'? ह्या प्रश्नाचं उत्तर देताना रेवथी म्हणते - मुलगा सकाळी 7.30 वाजता शाळेत जातो त्यामुळे त्याआधी स्वयंपाक, शाळेची तयारी, घरच्या वडीलधाऱ्या मंडळींना काही हवं - नको हे सगळं पाहून आणि कामं उरकून 8.30 - 9 च्या आसपास मी दुकानात हजर असते. किंबहुना व्यवसाय आणि घर जवळ असल्यामुळे मुलाकडे व्यवस्थित लक्ष देता आलं, त्याला शाळेत सोडणं, परत आणणं, त्याच्या आवडी निवडी जोपासणं, अभ्यास आणि इतर गोष्टीसाठी वेळ देणं आणि व्यवसाय ही सांभाळणं जमलं त्यामुळे फारशी काही अडचण जाणवली नाही - म्हणजे 😳?

त्यासाठी दररोज सकाळी पाच वाजता उठून ते दिवस संपेपर्यंत घरच्या मंडळींपासून ग्राहकांपर्यंत सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जातीने लक्ष घालणं हे काही दखलपात्र आव्हान नाहीच मूळी एवढया सहजतेने रेवथी बोलून गेली.

मातृत्वाच्या जबाबदरीमुळे घरची आघाडी आणि एकंदरच प्राधान्यक्रमात झालेले बदल स्वीकारताना करावी लागणारी तारेवरची कसरत, त्यासाठी प्रसंगी आपल्या करिअरमध्ये घ्यावी लागणारी माघार आणि पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याच्या इर्ष्येने व्यावसायिक कामात स्वतःला झोकून देणाऱ्या 'निवडक महिला उद्योजिका' गायत्री, शलाका, दीप, अनिता कासोदेकर,ज्योत्स्ना गोडबोले, आदिती कुलकर्णी आणि आज 'रेवथी पाटील' सगळ्यांनाच मानाचा मुजरा🙏आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा 💐

Saturday, 15 May 2021

भाग 6 - 'The Marshmallow Test' - Delayed Gratification'


मागील पोस्टमधील ठळक वैशिष्ट्ये :- 

1.चक्रवाढ व्याजाची ताकत (Power of Compounding) आणि त्याच्या समीकरणातील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे वेळ - आणि त्याची काही उदाहरणे आपण पहिली. 

2.Power of compounding चा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असल्यास दीर्घकाळ गुंतवणूक करणे आणि त्यासाठी शक्य तितक्या लवकर सुरुवात करणे इतकं ते सोपं आहे
=========================================================================
सोपं आहे 🤔? 
पण मग हा फॉर्म्युला यशस्वी करून दाखवणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या इतकी कमी कशी काय?

आकडेमोड तर पटण्यासारखी आहे आणि फार काही रॉकेट सायन्सही नाही त्यात मग नक्की कठीण किंवा असाध्य असं काय आहे? 

वॉरन बफेट म्हणालेयत - 'Investing is simple however not easy'

म्हणजे गुंतवणूक ही तशी सोपी प्रक्रिया आहे पण सहजसाध्य नाही - का ? त्याचं उत्तर आहे ,

'Delayed Gratification'
अर्थात, 'उस्फुर्त कृतीमूळे ताबडतोब मिळणारी बक्षिसी टाळण्याचं मानसिक कसब' (ह्यापेक्षा कमी शब्दात योग्य अर्थ पोहोचवण्याचं कसब मी ही अजून शिकतोय - त्याबद्दल क्षमस्व 😔) - 

एक व्हिडिओ पोस्टमध्ये जोडला आहे तो पहा

म्हणजे काही गोष्टींना निसर्गतःच वेळ लागतो. आज पेरलं आणि उद्या उगवलं असं सहसा होत नाही. काही जटील प्रश्नांची चटकन उत्तरे शोधण्याच्या आपल्या सवयीमुळे बऱ्याच वेळेला 'शॉर्ट कट' मारले जातात. म्हणजे थोड्या वेळ थांबल्यास अजून एक मार्शमेलो मिळणार हे आगाऊ माहीत असून सुद्धा मुलांना तो मोह आवरत नाही. बऱ्याच अंशी प्रौढांच्या बाबतीतही हे सत्य आहे. इथे आपल्या भावना आपल्या मेंदूवर मात करतात आणि बहुतांशी ही एक सवय आपलं आयुष्य किंवा एकंदरीतच आपलं जगणं नियंत्रित करत असते.

Delayed Gratification  हा मानसशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे त्यामुळे 'अर्थसाक्षरता आणि गुंतवणूक' ह्या आपल्या ब्लॉग च्या मूळ विषयाच्या चौकटीतच राहूनच मी भाष्य करतो. 

इथे वॉरन बफेट ह्यांचं अजून एक वाक्य मी उद्धृत करतो

'In short term stock markets are voting machines however in long term they are weighing machine' - अर्थात अल्प कालावधीचा विचार करता भांडवली बाजारातील चढउतार हे भावनांच्या कल्लोळामुळे होत असतात. त्याआधारे एखाद्या कंपनीत किंवा व्यवसायात केलेली गुंतवणूक योग्य किंवा अयोग्य ठरविता येत नाही. भांडवली बाजार हा पुढे किंवा वर जाण्यासाठीच जन्माला आलाय हे तत्व मान्य केल्यास योग्य व्यवसायात केलेली गुंतवणूक दीर्घकालावधीत संपत्तीनिर्मिती साध्य करते.

मागील एका पोस्टमध्ये मी महिनाभर दरदिवशी दुप्पट रक्कम देण्याचं एक काल्पनिक उदाहरण दिलं होतं. दररोज दुप्पट परतावा देणारं कुठलंही उत्पादन ह्या जगात अस्तित्वात नाही. त्या उदाहरणातील 30 दिवस म्हणजे प्रत्यक्षात 30 वर्षे समजावी

गुंतवणूक हा बराचसा 'पॅसिव्ह' असा विषय आहे. इथे सामान्य व्यवहाराज्ञानाबरोबरच भावनांवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. रोज बाजाराकडे लक्ष देत राहिल्यास काही तरी कृती करण्याचा मोह होतो, दोन - पाच टक्के आपल्या गुंतवणुकीचे मूल्य वाढल्यास नफ्यासकट मूळ मुद्दल काढून घेण्याचा मोह होतो आणि हीच ती ताबडतोब मिळणारी 'बक्षिसी' आपल्याला प्रचंड अशा संपत्तीनिर्मिती पासून दूर ठेवते 

Power of Compounding चं तत्व समजणं आणि मान्य करणं हे व्यवहारज्ञान सोपं आहे पण निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण ठेवणं सहजसाध्य नाही. म्हणूनच फार कमी गुंतवणूकदार संपत्तीनिर्मितीत यशस्वी झाल्याचं दिसतं

पण तज्ज्ञांच्या मते सरावाने बऱ्याच अंशी भावनांवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे.

Delayed Gratification is an important personality trait

पुढील भागात - "Mental Heuristics and Biases"

धन्यवाद 🙏 Happy Investing 💐

Friday, 14 May 2021

सहकाऱ्यांना आशा दाखवा , भीती नाही !

उद्योग समूहांवर सतत कसे पैसे "ओढतात" अशा सुराने स्तुतिसुमने उधळली जात असतात. करतही असतील अवास्तव नफेखोरी कधी कधी.त्याची तरफदारी नको करायला. तरी पडत्या काळात, कठीण काळात, जेव्हा अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असते,तेव्हा हे मोठे मोठे पसारे सांभाळणे हे सुद्धा खूप कठीण आव्हान असतं. ह्याबद्दल विशेष बोललं जात नाही. जणू काही नफा किंवा संपत्ती निर्माण करणे ही एक वाईट कृती असावी. 

सध्या आपण अत्यंत आव्हानात्मक अशा परिस्थितीतून जात आहोत, त्यात परत आपल्या देशाबद्दल प्रतिमा भरपूर मलीन करण्याचे प्रयत्न होत असताना दिसत आहेत, ज्यात आपलेही बंधू - भगिनी हो मध्ये हो मिसळून मस्त सहभाग देत आहेत, वगैरे वगैरे. ह्या अशा वातावरणात अशा मोठ्या कंपन्या कसा मार्ग काढत असतील ? आपल्या सहकाऱ्यांना, संबंधितांना कसं बरं प्रेरित, आशादायी ठेवत असतील ? उत्तर आहे : ह्यांचे नेतृत्त्व!

नेत्याने नेहमी मार्ग दाखवावा 

हे आज वाचण्यात आलं. संघाच्या निराश खेळाडूंना बात्रा एक मार्ग दाखवत आहेत, अडचण मान्य करून. इथे उद्दामपणा नाही;तर संघासाठी, त्या खेळाडूंसाठी सर्व काही करण्याची मानसिकता,उगाच भांडत न बसता.

असाच Optimism IPL च्या वेळी दिसला 

एक तर प्रत्यक्ष स्पर्धा सुरु केली, काही सामने झाले, नेहमीच्या रंजकतेने. प्रेक्षकांविना. किती येत असेल खर्च वगैरे तर सोडाच;अंतर्गत किती तरी विरोध असू शकतो असे निर्णय घेताना. तरीही खेळाडूंना उत्तमोत्तम सुविधा देवून, त्यांच्या सुरक्षिततेची हमी घेवून हे सामने खेळविले गेलेत.      

अमिरातीत जाण्याची तयारी दर्शविली गेली, तिथे अडचण;तर आता उरलेला सिझन इंग्लंड मध्ये खेळवण्यात येणार आहे. इतकी मानसिक तयारी आहे. आम्ही करणारच अशी जिद्दच दर्शवितो हि कृती!

सोडून द्यायला काय लागतं !

नकोच करायला म्हटलं; कि संघर्षच संपला. मग बसा आमटी भाकरी आणि काकडीची कोशिंबीर खात, आणि घरी बसून TV serials वर चविष्ट चर्चा करीत. हे TV serials चे लोक सुद्धा पहा : गोव्यात गेलेत, सर्व संच घेवून. किती fast करत असतील काम वगैरे तर झालंच, तरीही ह्याला गती देणारे नेतृत्त्व असते, म्हणून हे घडते. सोडून द्यायला काहीच लागत नाही. 

असाच optimism आपण आपल्या व्यवसायात, संघात, ग्रुप मध्ये आणू, इतकं तर आपण नक्कीच करू शकतो ना यार !

आपल्याला खरा विश्वास वाटायला हवा - आतून !

  1. "हो जायेगा भाय" हा मंत्र जपुयात. थोडं बसुयात. पाहूयात. जाणवेल, दिसेल, कि माझ्या स्वत:च्या आयुष्यात असे कितीतरी ह्यापेक्षाही आव्हानात्मक प्रसंग येवून गेलेले आहेत. त्यातून मार्ग निघत गेलाय. कधी माझ्या कर्तुत्त्वाने; तर कधी कुणाच्या तरी;अथवा परिस्थितीने. मार्ग हा निघतोच. कारण मुळात जीवन हे प्रवाही आहे, उर्जेचा खेळ. त्यामुळे हे बदलेल. ह्यावर पक्का विश्वास असू द्या.

  2. लागणारा वेळ त्याला देवू
    . Parallely, स्वत:ला सक्रीय कामात बुडवून घेऊ. माझ्या ८४ वर्षाच्या आईचं उदाहरण मी देईन इथे: तसं काय काम आहे तिला सध्या ? शिवाय सध्या थोडं थोडकं सुद्धा बाहेर जाता येत नाहीये. तरी तिने तिचं तिचं एक छानसं रुटीन लावून घेतलंय. त्यात संध्याकाळच्या सिरियल्स अविभाज्य घटक आहे. negative वगैरे वाटतात: त्या 😒मला. तिला नव्हे. तिने त्याला एका "रुटीन" चं स्थान दिलंय. सकाळी उठल्यापासून सर्व शारीरिक कामे देखील ती अजूनही करते. स्वैपाक सुद्धा करू शकते सगळा, करतेही. मी सुद्धा थांबवत नाही. कारण हीच तर आहे साधना, तपश्चर्या. आजूबाजूला प्रेरक घडो, न घडो. मी माझ्या कामात मग्न. आत्ता सुद्धा तिची भाज्यांची निवडणूक सुरूच आहे बाजूला. शिवाय मला प्रश्नही विचारतीये कि twitter म्हणजे काय ? smart phone वापरायला शिकली आहे ती, शिवाय तिला नवीन गाणीही खूप आवडतात, आवडून घ्यायची वृत्ती ठेवलीये. कालच गुणगुणत होती : मै तो रस्ते से जा रहा था 😄 
  3. कदाचित यांत्रिक वाटेल हे. तरीसुद्धा उगाचच ती ना निराशेच्या लाटेवर स्वार होते, ना आनंदात प्रचंड मशगुलता दाखवते! तर थोडक्यात काय : तर बदललेलं रुटीन पटकन स्वीकारा, उगाच "झूम मिटींग्स चा वैताग येतो" नका म्हणत बसू. नुकसान आपलंच.
  4. बातम्या टाळता येणार नाहीत, प्रमाण टाळता येईल, परिणाम टाळता येईल. कमी वेळा updates चेक करा. परिणाम कसा टाळता येईल ? आत्ताचा विचार केलात तर असे साठीचे रोग अनेक वेळा आले,गेले. हा सुद्धा येईल,जाईल. मी माझं रुटीन सुरु ठेवीन. हा स्वार्थ वाटतो का ? असेल, तर हा खरा स्वार्थ आहे. आपण उत्तम राहिलो, आनंदी राहिलो, आशावादी राहिलो, तर चार लोक राहतील ना, आजूबाजूचे ! नाहीतर आपलं खत्रूड थोबाड पाहण्यात रस नाही कुणाला. त्यामुळे : "दिल जवॉ, तो दुनिया हंसी" हे लक्षात ठेवून आनंद, आश्वासकता पसरवू सभोवताली. हाच परमार्थ. 
  5. नेट्वर्किंग meetings मध्ये सहभागी व्हा ! Saturday क्लब च्या meetings मध्ये सहभागी व्हा. उत्साही वाटतच ! सध्या झूम वर असतात, मेंबर असाल तर कोणत्याही क्लब ची मीटिंग विनामुल्य ! नसाल, तर एखाद-दुसरी मीटिंग जरूर attend करा, जमल्यास सभासद व्हा, अनेक उद्योजकांचा सहभाग, सहवास लाभेलच, शिवाय धंदा मिळण्याची आशा ! इतकं टोनिक व्यावसायिकाला पुरेसं आहे.अशीच मीटिंग मराठी connect किंवा BNI ची सुद्धा असते. तीही करा attend, Point काय : विश्वास बळकट करा. असेच इतरही अनेक क्लब्स, ग्रुप्स असतात. आम्ही निवडक उद्यमिच्या whatsapp ग्रुप वर ह्या आजूबाजूच्या मिटींग्स बद्दल आवर्जून सांगतो लोकांना.

करून पहा, अवश्य, आणि कळवा अभिप्राय! प्रेरित रहा, उत्साही रहा, उद्योग धंद्याची कास धरा !

Thursday, 13 May 2021

सर्वोत्तम मार्केटिंग tool : निऊ केस स्टडीज

आपण दर शुक्रवारी निवडक उद्यमी ग्रुप वर members ना केस स्टडी सादर करायला देतो. ह्या केस स्टडीज म्हणजे त्यांच्या स्वत:च्या व्यवसायालाच केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या असतात. ज्यातून त्यांच्या व्यवसायातील सर्वात महत्त्वाचं असं प्रतिपादन आपल्या समोर येतं. ह्याला मी थोड्या पुस्तकी भाषेत "व्यावसायिक तत्त्वज्ञान" असं म्हणेन. ज्या प्रमुख तत्त्वावर सदर व्यावसायिक त्याचा किंवा तिचा व्यवसाय चालवितो, तेच हे. 

उदाहरणादाखल महेश दोशी ह्यांचं उत्कृष्ट असं Industrial आणि Counter सेल चं Combination; अथवा वाकडे ह्यांची Customer Service ची Policy; ज्योत्स्ना गोडबोले ह्यांचं उत्कृष्ट networking & बेडर Attitude, निशांत आवळे ह्यांची अभ्यासपूर्णता वगैरे वगैरे....

तर हे असतात, केस स्टडीज चे विषय. म्हणजे आपण स्वत:च आपल्या व्यवसायाच्या अंतरंगात उतरून तो फक्त विखरून सांगणे, त्यातलं एखादं प्रमुख तत्त्व. विशेष म्हणजे निशांत आवळे हे स्वत: ह्यात व्यक्तिगत रस घेवून, त्यातले "तत्त्व" शोधायला members ना मदत करतात. मला खात्री आहे, आपल्यातल्या अनेकांना याचा अनुभव आहेच. 

सांगायचा मुद्दा हा : कि हे केस स्टडी म्हणजे आपल्याला जड वाटायला नको, तर ते उपकारकच ठरेल व्यवसाय मिळायला. कसं ते आता सांगतो.

नुकतीच डॉ तेलंग ह्यांनी केस स्टडी सदर केली. अपेक्षेप्रमाणे अत्यंत उत्तम तयारीने डॉ आले होते. वेळेत त्यांनी कार्यक्रम उरकला देखील. पाठोपाठ जी मेंबर ची मुलाखत असते; तीही त्यांनी उत्तम रीतीने पार पाडली. ह्या मुलाखतीत मेंबर ना वेळ मिळतो आपला उद्योजकीय प्रवास कसा झाला, ह्याबद्दल बोलण्यासाठी. ह्यातून आपण व्यक्ती, व्यावसायिक म्हणून वाचक किंवा श्रोते ह्यांच्या अधिक जवळ येतो.

मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर ....

माझ्या मते डॉ तेलंग ह्यांनी निशांत ने तयार केलेली blog summary काही ठिकाणी स्वत:हून share देखील केली असणार आहे. आणि करायलाच हवी. हेच तर Reputation. परिणाम स्वरूप, आता पर्यंत सर्वाधिक वाचली गेलेली पोस्ट म्हणजे डॉ तेलंग ह्यांच्या मुलाखतीची summary! डॉक्टरांचे तसेच निशांत ह्यांचेही खूप अभिनंदन!

तात्पर्य : 


आपला व्यवसाय/ धंदा हा आपलाच असतो; आणि त्याच्याबद्दल लोकांना आपणच प्रेमाने, आनंदाने सांगावं कि! आपल्याला निऊ कडून मिळणारी ही बहुमोल अशी संधी आहे. हिचा छान वापर करा. फक्त whatsapp ग्रुप वर आलेल्या किंवा न आलेल्या प्रतिसादावरून judge करू नका.

सतत कार्यरत रहा. अगदी खूप वाचने झाली नसतीलही तुमच्या बद्दल च्या लेखाची; तरी active रहा. Alert रहा. मला नक्की खात्री आहे, काही व्यवसायावर प्रेम करणारे members उदा. गायत्री , रेवती, वाकडे सर ही मंडळी आपापल्या मुलाखती नक्कीच एक कायमस्वरूपी "आपल्या विषयीचे काही" असं आपापल्या वर्तुळात share करतील. आपल्या विशेष पानावरून ह्या पाहता येतील.




Wednesday, 12 May 2021

Tag Line : अत्यंत महत्त्वाचा घटक

 Saturday Club च्या मिटींग्स मध्ये माझे मित्र श्री सुहास फडणीस हे या प्रकारातले एकदम मास्टर समजता येतील; अनेकांना ते सतत ह्यात सुचवत असतात. मी अगदी आत्ता आत्ता पर्यंत इतकं महत्त्व देत नव्हतो याला. पण माझे डोळे अगदी खाडकन उघडले नुकतेच ! 

नुकतंच मराठी connect च्या मीटिंग ला आमच्या प्रत्यक्ष मीटिंग नंतर गप्पागोष्टी सुरु असताना,एक सदस्य म्हणाले:-

"आपल्याकडे त्या वीज बिल कमी करून देणाऱ्या एक गेस्ट आल्या होत्या ना काही दिवसांपूर्वी .."

वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच दोघांनी ( मी आणि कात्रे ) नाव सुचविलं : गायत्री अकोलकर. यथावकाश, गायत्री चा त्यांच्याशी संपर्क होवून पुढे संधींची देवाण घेवाण होईलच. पण ह्या प्रसंगाने आणि नंतर गायत्री शी पुन्हा एकदा ह्या संदर्भात बोलल्याने मला दोन-तीन गोष्टींचा उलगडा झाला :-

  • नेटवर्क मिटिंग मध्ये सुरुवातीची ५ ते १० सेकंदच लोकांचं आपल्याकडे लक्ष असतं.
  • तेवढ्यात त्यांच्या लक्षात राहील असं काहीतरी करायचं 
  • Tagline हा ह्याकरीता उत्तम पर्याय.
  • Tagline सुलभ , सोप्पी असावी.

लहानशीच असावी : छोटीशीच आहे : ५ सेकंदात संपते.

"आम्ही तुमचे वीज बिल कमी करून देतो

फक्त ७ शब्दांत खेळ खल्लास. ते सुद्धा जास्तीत जास्त 2-३ अक्षरांचे. पहिल्या १० सेकंदात आणि संपायच्या आधी बरोब्बर योग्य त्या व्यक्तींच्या Attention स्पेस मध्ये घुसते.

Service Piched : Energy Audits, मुख्य व्यवसाय : Electrical Contracter.

 Effect , परिणाम काय साध्य होईल हे बोलणे अपेक्षित :

ह्यात प्रमुख व्यवसाय Electrical Contracter, ,किंवा Pitch करत असलेल्या service Energy Audits बद्दल उल्लेख नाही , तर मिळणाऱ्या उपयुक्त परिणामा बद्दल बोलले गेले आहे.

मिळणारा परिणाम हा बरोब्बर समस्येवर बोट ठेवणारा आहे, तोही रोजच्या जीवनातील :

"Energy Audits" म्हणलं तर फार कमी लोक connect होतील. पण वीज बिल कमी करून देतो म्हटलं कि खूप लोकांना कळतं , आणि प्रत्यक्ष reference मिळू शकतात.

शब्दही अलंकारिक वगैरे नाहीत :

अलंकारिक किंवा शब्दच्छल करून वगैरे लिहिलं कि तुमच्याबद्दल दबदबा निर्माण होईल, कौतुक देखील होईल. तरी त्यातून व्यवसायासाठी Reference मिळतील असं नाही. हे टाळलेल दिसतंय.

तात्पर्य :-

अगदी गणित करून नको करायला, तरीही Tagline सुरुवातीलाच येवू द्या,आणि Effect वर फोकस ठेवायचा इतकं मात्र माझ्या पक्कं लक्षात राहिलंय. मीसुद्धा लागलोय ह्या कामाला आता. 

Tuesday, 11 May 2021

विद्या विनयेन शोभते - डॉक्टर गिरीश तेलंग ह्यांची मुलाखत

वयाच्या विशी - पंचविशीत पोटापाण्यापूरतं शिक्षण घेऊन एकदा का आपण कामाधंद्याला लागलो की पुन्हा शिक्षणाकडे वळणं कठीण.पैशाचं आकर्षण, नोकरीधंदा व संसारामुळे बदललेले प्राधान्यक्रम आणि शिक्षणासाठी लागणारी मानसिक शिस्त, ऊर्जा गमावल्यामुळे असं होत असावं पण डॉ गिरीश तेलंग ह्यांनी हा समज खोटा ठरवण्याचा जणू पण केला असावा असंच त्यांची मुलाखत घेताना जाणवलं.1983 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून ते मागच्या वर्षी (नोव्हेंबर 2020) मध्ये वकिलीची (L.L.B.)परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत डॉक्टरांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेल्या पदव्या ऐकल्या आणि श्रीकांत जीचकारांची आठवण झाली.

डॉ.तेलंग मूळचे 'जालन्या'चे.1985 साली डिप्लोमा इन फार्मसी ची पदवी त्यांनी मिळविली.पुढे 1990 साली डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवीदेखील मिळवली पण अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचं मन रमलं नाही आणि ते मेडिकल रेप्रेझेन्टेटिव्ह म्हणून एका कंपनीत रुजू झाले.1990 ते 2000 ह्या दहा वर्षाच्या कालावधीत, वयाच्या 27 व्या वर्षीच सर्वात 'तरुण रिजनल हेड' म्हणून ते नावाजले गेले. ह्याच दरम्यान म्हणजे 1995 च्या आसपास अनौपचारिकरित्या लोकांना फार्मा क्षेत्रात नोकरी मिळवून देण्यासाठी ते मदत करत होते आणि त्याच सुमारास पुढेमागे आपलंही स्वतःचं केबिन/ऑफिस, कन्सल्टन्सी असावी असे विचार त्यांच्या मनात रुजू लागले असं ते सांगतात.'रिक्रूटमेंट कन्सल्टंट' ह्या व्यवसायातली संधी आणि पुढे जाऊन पी.एच.डी. करण्यासाठी उत्तम मार्गदर्शन मिळेल ह्या हेतूने 3 जानेवारी 2000 साली डॉक्टर पुण्यात आले.सकाळी 10 ते 6 तुमच्या ऑफिसात काम आणि संध्याकाळनंतर मला माझ्या कन्सल्टन्सीच्या कामासाठी वेळ मिळावा ह्या अटीवर डॉक्टरांनी एका कंपनीत काही काळ नोकरी केली आणि 2001 साली फार्माफोकस ह्या नावाने पुण्यातील कर्वे रोड येथे स्वतःची रिक्रूटमेंट कन्सल्टन्सी सुरू केली. पुढे 2004 साली त्यांनी सदाशिव पेठेत ऑफिस थाटलं आणि आजपर्यंत तेथूनच ते आपला व्यवसाय चालवतायत

फार्मा क्षेत्रातच काम करायचं ह्याचा आडाखा मनात पक्का असल्यामुळे 2001 सालीच डॉक्टरांनी 'फार्माफोकस' ह्या नावाचं ट्रेडमार्क करून घेतलं.

रिक्रूटमेंट क्षेत्राशी संबंध असला तरी वृत्तपत्रात जाहिराती देण्यापासून ते कंपन्यांबरोबर कंत्राट करतांना कुठले मुद्दे विचारात घ्यावे इत्यादी गोष्टी शिकण्यात 2 ते 3 वर्षे लागल्याचं डॉक्टर नमूद करतात. मेडिकल रेप्रेझेन्टेटिव्हज् ना तेव्हा मागणी असल्यामुळे आणि फार्माफोकसची जाहिरातदेखील होईल ह्या उद्देशाने डॉक्टर 'How to become MR ?' ह्या विषयावर ट्रेंनिग वर्कशॉप देखील घेत. कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग हे दोन्ही विषय हातात हात घालून जात असल्यामुळे 2004 ते 2011 ह्या 7 वर्षात दर रविवारी डॉक्टर वेगवेगळ्या विषयांवर ट्रेनिंग घेत असंत.कंपन्यांची नोकरभरतीची जाहिरात पाहिल्यावर वृत्तपत्रातील त्याची कात्रणं डॉक्टर कापून ठेवत पण पत्रव्यवहार मात्र 8 ते 10 दिवसांनंतर करत (त्यामागील कारण मुलाखतीतच ऐका)

सलग 4 वर्षे एकाच कॉलेजमध्ये 'फार्मा क्षेत्रातील करिअरच्या संधी' ह्या विषयावर व्याख्यान देण्यासाठी डॉक्टरांना आमंत्रित केलं जात होतं

डॉक्टरांना स्वतः त्या क्षेत्रात अनुभव असल्या कारणाने फार्मा क्षेत्रातदेखील 'सेल्स आणि मार्केटिंग' ह्याच विभागात ते प्राधान्याने नोकरभरती करत आणि त्याअनुषंगाने त्यांनी स्वतःची टीम देखील तयार केली आहे. फार्माफोकस साठी कर्मचारी नेमताना उमेदवाराला दहावीला किमान 75 टक्के गुण मिळालेले असावेत, ती व्यक्ती 7 किलोमीटरच्या परिघातच वास्तव्यास हवी जेणेकरून येण्याजाण्यात अधिकचा वेळ जाणार नाही आणि क्रयशक्ती टिकून राहील तसेच फार्मा क्षेत्रातील तज्ञ हवी असे निकष ते लावतात.कंपनीच्या यशात सहकाऱ्यांचा वाटा मोठा आहे असं डॉक्टर मानतात आणि आपल्या सहकाऱ्यांच्या व्यावसायिक वाढीसाठी जातीने प्रयत्न केल्यामुळे बरेचसे जुने सहकारी आजही फार्माफोकस सोबत असल्याचं ते आवर्जून नमूद करतात.

कंपन्यांकडून कशा प्रकारचा उमेदवार हवाय हे तपशिलात समजून घेतल्यामुळे व प्राथमिक फेरीच्या मुलाखतीत एखाद्या पदासाठी आवश्यक ते शिक्षण व उमेदवाराच्या जमेच्या बाजू पारखून शक्य तितका योग्य उमेदवार पुरविल्यामुळे सगळ्या व्यावसायिक कंपन्यांशी फार्माफॉकसचे उत्तम संबंध आहेत.ही कामाची संस्कृती रुजवण्यासाठी डॉक्टरांनी प्रचंड बौद्धिक मेहनत घेतलीये.'गुणवत्ता व्यवस्थापन' ह्या विषयाचं शिक्षण घेतलं असल्याने कामाचा दर्जा राखायचा तर त्यात सातत्य हवं आणि हे सातत्य राखायचं तर कामाच्या पद्धतींचं प्रमाणिकरण आवश्यक आहे हे उमजल्यामुळे त्यांनी त्याच्या लिखित स्वरूपात नोंदी करून ठेवल्या आहेत. कामाची एक चौकट आखून ठेवलीयेय. नवीन कर्मचारी फार्माफोकसमध्ये रुजू झाल्यास त्याला ह्या लिखित स्वरुपातल्या नोंदी वाचण्यासाठी दिल्या जातात ज्याने त्या व्यक्तीस आपल्या कामाचा आवाका समजतो.पुढील 3 ते 4 महिने त्याला प्रत्येक कामात सहकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन केलं जातं. उमेदवारांचे अर्ज पोर्टलवरून कसे शोधायचे, त्यांना कुठले प्रश्न विचारायचे, कंपन्यांबरोबरचं संभाषण कसं असावं, मुलाखतीचे पत्र कसे लिहावे इत्यादीबद्दल सराव करून घेतला जातो. ह्यानंतरही एखादा कर्मचाऱ्याला यशस्वीरीत्या उमेदवार कंपन्यांमध्ये दाखल करून द्यायला 3 - 4 महिने लागू शकतात हे डॉक्टरांनी गृहीत धरलेलं आहे आणि त्यासाठीच कुठलाही व्यक्ती कर्मचारी म्हणून रुजू करून घेण्याआधी त्याच्या किमान 6 महिन्याच्या एकूण खर्चाची (Cost to company) डॉक्टर तजवीज करून ठेवतात. ही सगळी प्रक्रिया कमालीची व्यावसायिक आणि दर्जेदार असल्यामुळे ह्यातून प्रत्येक व्यावसायिकाला घेण्यासारखं बरंच आहे.

2009 - 2010 मध्ये एक काळ अडचणींचा असा आला होता की 4 कर्मचारी मिळून 4 महिन्यात एकही उमेदवार रिक्रुट करू शकले नाही, अर्थात संयम राखल्यामुळे पुढे ती व्यवसाय पोकळी भरून काढता आली. मुदलात रिक्रूटमेंट ह्या व्यवसायाचं प्रारूपंच असं आहे की आज केलेल्या कामाचा मोबदला हा 3 ते 4 महिन्यांनी मिळतो. उमेदवार 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ कंपनीत 'टिकला' तरच 'रिक्रूटमेंट कन्सल्टंट' ना त्यांची व्यावसायिक फी दिली जाते आणि ह्या 3 महिन्यात बऱ्याच गोष्टींवर आपलं पूर्णतः नियंत्रण नसल्यामुळे संयम राखणं आवश्यक आहे असं डॉक्टर सांगतात.

मागच्या वर्षी (2020) मध्ये वकिलीची (L.L.B.) पदवी मिळवल्यानंतर इच्छापत्र किंवा मृत्युपत्र ह्या विषयावर आपल्या समाजात बरेच गैरसमज आहेत असं डॉक्टरांना जाणवलं आणि त्यांनी ह्या विषयावर जनजागृती करण्याचं मनावर घेतलंय. त्यासाठी आजवर त्यांनी जवळपास 8 वेबिनार्सही घेतली आहेत. 

आयुष्यभर आपण कष्टाने मिळवलेला पैसा किंवा स्थावर/जंगम मालमत्तेचा आपल्या पश्चात योग्य विनियोग व्हावा आणि आपल्या वारसदारांना कसलाच मनस्ताप होऊ नये ह्यासाठी चालढकल न करता आपण धडधाकट असतांनाच प्रत्येकाने मृत्युपत्र करून घेण्याचा ते सल्ला देतात. 

नेटवर्किंगचं महत्व अधोरेखित करतांना उत्तम संबंध प्रस्थापित करण्याला ते प्राधान्य देतात. व्यावसायिक परताव्याचा उद्देश आपोआप साधला जातो असं ते म्हणतात

निवडक उद्यमी हे उद्यमींचे डिजीपीठ आहे, इथे होणाऱ्या चर्चांमुळे विचारांचे आणि माहितीचे आदानप्रदान होते ज्याचा व्यवसायात प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे प्रचंड उपयोग होतो असं ते नमूद करतात. 

बिझिनेस मॅनेजमेंट, रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव्ह, हॉस्पिटल रिसेप्शनिस्ट, आणि मृत्युपत्र ह्या आणि इतर बऱ्याच विषयावर डॉक्टर वर्कशॉप देखील घेतात.

डॉक्टर गिरीश तेलंग ह्यांनी आजवर मिळवलेल्या पदव्या खालीलप्रमाणे,

1. सन 1985 - डिप्लोमा इन फार्मसी

2.1990 - डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरिंग

3.1993 - बॅचलर ऑफ आर्टस्

4.1994 - डिप्लोमा इन बिझिनेस मॅनेजमेंट

5.1995 - मास्टर्स ऑफ मॅनेजमेंट सायन्स

6.2005 - मास्टर ऑफ फिलॉसॉफी - M Phil (ह्युमन रिसोर्स)

7.2015 - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी - Ph.D - (ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट)

8. 2020 - L.L.B

इतर शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षणाचा गाढा अभ्यास असल्यामुळे तो डॉक्टरांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीत  वागण्या - बोलण्यात स्पष्ट जाणवतो. वेळेत प्रतिसाद देणं, योग्य तयारीनिशी विषय मांडणं, इतरांच्या वेळेचा आदर राखणं आणि मुख्य म्हणजे नम्रपणा हे इतक्या दिवसांत डॉक्टरांबरोबर झालेल्या संभाषणातून भावलेले गुण. 

डॉक्टर गिरीश तेलंग यांनी त्यांच्या व्यावसायिक प्रवासातून दिलेल्या प्रेरणेस निवडक उद्यमी तर्फे मानाचा मुजरा आणि त्यांच्या पुढील व्यावसायिक आणि शैक्षणिक कारकिर्दीस अनेक शुभेच्छा 💐

विद्या विनयेन शोभते 💐

Sunday, 9 May 2021

Joint Ventures partners शोधा !

आपलं आपलं काम तर उत्तम, आणि उत्तरोत्तर अधिकाधिक उत्तम करत जायचंच, शिवाय ते लोकांपर्यंत पोहचवीत जाणे हे सुद्धा अधिकाधिक उत्तम करत जायचं; म्हणजे मग आपल्याकडे योग्य ते Leads किंवा Enquiries "येवू" लागतात. ह्या आलेल्या leads वगैरे आपण Convert करण्यात पारंगत असतो. प्रश्न येतो, तो हे सगळं बरोब्बर वेळेच्या कोष्टकात बांधत जाताना.

Teams तयार करणे : उत्तम उपाय !

हातात कामे आली, कि तो पूर्तता करण्यात बराच वेळ खर्च होत असतो. ह्यात जर Project Partners घेता आले तर जरूर पहा. म्हणजे आपल्या मिळकतीचा हिस्सा वाटला जाईल हे जरी खरं असलं, तरी Execution करण्याच्या वेळात आणि व्यवधानात प्रचंड बचत होऊ शकते. 

आपल्या नेट्वर्किंग ग्रुप मध्ये हे practice करा.

मी आमच्या Saturday क्लब च्या ग्रुप मध्ये Focus Teams ही संकल्पना राबविली. ह्यात media team तयार केली. ह्यात मला लागणारे खालील सदस्य add केले :-

  • Web Designer
  • Photographer
  • Branding 
  • Video Creater 
  • Content Writer
नियमित पणे भेटायला सुरुवात केली. कल्पना अशी, कि प्रत्येकाने इतर सदस्या करिता आपल्या वर्तमान तसेच भविष्यात येवू शकणाऱ्या ग्राहकाला ह्या सेवा गृहीत धरून सांगायचं आणि त्या सेवा आपल्या बास्केट मध्ये include करायच्या. प्रोजेक्ट प्रमाणे ठरविता येईल, कि प्रत्यक्ष मिळणारा नफा वाटायचा, कि काम मिळवून दिल्याबद्दल मोबदला स्वरूपात अर्थव्यवहार. आपण घेतलेल्या कष्ट, प्रयत्न ह्यांचा रास्त विनियोग !
 

हे रेफरल्स पेक्षा वेगळं आहे थोडं

रेफरल मध्ये बऱ्याचदा आपण फक्त संपर्क देतो. पण इथे जास्त जबाबदारीने देतोय. कारण त्यात आपलं नाव stake ला लागलेलं असतं, शिवाय केलेल्या मेहनतीचा मोबदलाही मिळणार असतो. त्यामुळे ह्यात जास्त Value Addition आहे. एक तर ग्राहकाला उत्तम काम करून मिळतं , शिवाय करून देणाऱ्या प्रत्येकाला योग्य मोबदला मिळतो.कामाचा स्कोप वाढतो, हा खरं तर सर्वात मोठ्ठा फायदा.

ही संधी नेट्वर्किंग ग्रुप्स मध्ये जास्त मिळते. आम्ही नुकतेच असे एक काम पूर्ण केले, Saturday Club मधून; शिवाय आपल्या निऊ ह्या तशा सेकंडरी नेटवर्क मध्ये सुद्धा भक्ती घाटे व वृंदा आंबेकर ह्यांनी एकत्र येवून काही शिबिरे सुरु केली आहेत.

अशा प्रकारची Joint Ventures हि नेट्वर्किंग ची खरी ताकद म्हणता येईल !


Saturday, 8 May 2021

भाग ५ - "Magic of Compounding"- Part II

 मागील पोस्टमधील ठळक वैशिष्ट्ये 

1.नगण्य भासणारी व्याजरूपी रक्कम दिर्घकालावधीसाठी मूळ रक्कमेत भर घालून मुद्दल वाढवत नेल्यास प्रचंड संपत्तीनिर्मिती साधता येते

2. त्यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे शिस्त आणि आयुष्यात शक्य तितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात करणे जेणेकरून Compounding साठी आपल्याला जास्तीत जास्त कालावधी मिळेल

=============================================================

खालील समीकरण तुमचं आयुष्य बदलू शकतं,

 F = P (1 + R)^t  

ज्यात,

F - म्हणजे भविष्यातील रक्कम,

P - म्हणजे आजची रक्कम

R - म्हणजे सरासरी व्याज दर

T - गुंतवणूक कालावधी

वरील समीकरणातील सगळ्यात महत्वाचा घटक कोणता? विचार करा 🤔

खालील काही उदाहरणे पाहू,

1.एकरक्कमी 100 रुपयांचे , 20 टक्के सरासरी व्याजदाराने 50 वर्षांनी 8 लाख रुपये होतात

2.दरमहा 5000 रुपये, 20 टक्के सरासरी व्याज दराने 30 वर्षासाठी गुंतवल्यास, तूम्ही गुंतवलेली एकूण रक्कम असते 18 लाख रुपये पण तिसाव्या वर्षअखेर तुम्हांला मिळणारी रक्कम असते जवळपास 11 कोटी 60 लाख

3.एकाच वयाचे 2 मित्र अमर आणि प्रेम - 

अमर वयाच्या अठराव्या वर्षी प्रतिवर्षी 2000/- रुपयांची गुंतवणूक करायला सुरुवात करून पंचवीसाव्या वर्षी थांबतो. 

प्रेम मात्र खुशाल चेंडू वयाच्या पंचविसाव्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात करून प्रतिवर्षी रु.2000 प्रमाणे वयाच्या पासष्ठ वर्षे वयापर्यंत गुंतवणूक करतो. 

18 ते 25 ह्या सात वर्षात अमरने एकूण 14 हजार रु.गुंतवलेले असतात तर 25 ते 65 ह्या चाळीस वर्षात प्रेम एकूण 80 हजार रुपये गुंतवतो.

वयाच्या 65 व्या वर्षी प्रेम कढील एकूण रक्कम होते 1 कोटी 40 लाख आणि अमर कढील एकूण रक्कम होते 

3 कोटी 70 लाख.

ह्याचाच अर्थ मी किती रुपयांनी सुरुवात करू? दरमहा मी किती रुपये गुंतवले पाहिजेत? किती वर्षे गुंतवले पाहिजेत? अमुक एका गुंतवणुक प्रकारात मला किती व्याजदर मिळेल ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम आणि तुमच्या - माझ्या नियंत्रणा बाहेरच्या आहेत.......

सगळ्याच्या मुळाशी एकच - गुंतवणुकीचा कालावधी जितका जास्त तितकी जास्त संपत्ती निर्मिती साधता येते आणि त्यासाठी आयुष्यात लवकरात लवकर सुरुवात करणे महत्वाचे.

ही पोस्ट वाचून तुम्हांला ह्याचं महत्व पटलं असेल आणि कदाचित असं वाटत असेल कि आता तेवढा वेळ उरला नाही हातात तर निदान तुमच्या मुलांच्या नावे तरी आतापासून गुंतवणूक सुरू करा. 

"There is never a wrong time to to do the right thing" 😀

अजून एक गंमत सांगतो,

समजा माझ्याकडे रु.50 लाख आहेत गुंतवणूक करायला, माझं आजचं वय वर्ष 40 आणि माझा मागच्या दहा वर्षातील परताव्याचा दर आहे साधारण 18 ते 19 टक्के. म्हणजे 'Rule of 72' च्या हिशोबाने मी साधारण दर चार वर्षांनी माझी संपत्ती दुप्पट करतोय तर पुढील काही वर्षातील आकडेवारी साधारण खालीलप्रमाणे असेल👇,

40 व्या वर्षी - 50 लाख

44 व्या वर्षी - 1 कोटी

48 व्या वर्षी - 2 कोटी

52 व्या वर्षी - 4 कोटी

56 व्या वर्षी - 8 कोटी

60 व्या वर्षी - 16 कोटी

64 व्या वर्षी - 32 कोटी

68 व्या वर्षी - 64 कोटी आणि चुकून माकून अजून 4 वर्ष जगलो तर,

72 व्या वर्षी - 128 कोटी 

ह्याचाच 50 लाखाचे 64 कोटी करायला 28 वर्षे लागली (वय वर्ष 40 ते 68), पण त्यानंतरचे 64 कोटी त्यापुढील चारंच वर्षात वाढणार आहेत आणि हे सगळ आडवी काठी उभी न करता 😁

That's nothing but Power/Magic of compounding  

आता कळला का Compounding च्या समिकरणातील सगळ्यात महत्वाचा घटक?

F = P (1 + R)^T 

पुढील भागात ,"The Marshmallow Test"

धन्यवाद 🙏 - Happy Investing 💐

कसं राहायचं "OK" ?

कुणीही भावनावश होवून काही सांगू लागलं हल्ली, कि पटकन म्हणतो आपण "होईल ठीक सगळं, Everything will be alright,OK !" आणि बहुतेक वेळा,हे ताबडतोब , तिथल्या तिथे सांगितलं जातं. समोरच्याला पूर्ण व्यक्त  देखील होऊ न देता. जणू काही ती व्यक्ती नैराश्याने प्रचंड खचून गेली आहे आणि लगेच कोसळेल वगैरे !

तर सर्वात आधी : त्या व्यक्तीच ऐकून तर घेऊ

होऊ शकतंय,कि त्यांच्या बोलण्यात अतिरिक्त नकारत्मक भाव व्यक्त होत असतील. तरीही आधी ऐकुयात. लगेच नको सांत्वन. थोडा दम खाऊ. 

थोडा विचार बदलून पाहू :-

सध्याच्या (कोरोना) काळाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास; मृत्यू, इस्पितळ, बंद पडणारे व्यवसाय, HRCT, अशाच बातम्या यायच्या कानावर.काळच मुळी आहे तसा. युद्धाच्या काळात युद्धाच्या बातम्या; मृत्युच्या बातम्या येतात, अगदी तस्सच. त्यामुळे ठीकच.

उगाच media ला दोषी नको धरायला. त्यांच्यामुळे आपल्या पर्यंत बातम्या पोचतात; म्हणजे ते दोषी नाही ठरत. ते आपले काम करताहेत. त्यांना काय, बातमी हि बातमी , बास. काय सकारात्मक, काय नकारात्मक : हे आपण ठरवतो. आपल्या सोयीनुसार. युद्धात पाकिस्तानी मारला जाणं हि सकारात्मक बातमी आपल्यासाठी, तर नकारात्मक ठरते त्या पाकिस्तानी लोकांसाठी. आपण नाही का आपलं काम करत ! तसेच त्यांचेही ते कामच. 

सरकारलाही नको दोषी धरायला. तेही त्याचं काम करताहेत. कुठलं इकडचं तिकडचं ऐकून आपली whatsapp पत्रकारिता बुद्धी नको झळकवायला. सरकार म्हणजे.... लोक प्रतिनिधींचा समूह, जर आपल्याला एखाद्या तरी समूहाच्या नेतृत्वा बद्दल काही अनुभव नसेल , तर खरंच अधिकार देखील नाहीये टीकेचा. कुतूहल वेगळं आणि नावे ठेवणं वेगळं.

अगदी अध्यात्मिक जरी वाटलं , तरी जसा जन्म, तसा मृत्यू. पान नाही का ? झाडावर फुटतं, हिरवं गार होतं, पिवळं होतं, गळून पडतं, तसच आपलं. क्वचित प्रसंगी कीड लागली तर मध्येच जातं. असेच हे अकाली मृत्यू. 

चिंता , काळजी वाटते ती "मला, माझ्या कुटुंबियाना काही होईल" ह्या विचाराने फक्त. मी मध्येच गेलो, तर काय होईल वगैरे ह्या विचारांनी. अनाठायी आहेत का हे विचार ? नाही. तरी आवरायला मात्र हवेत. कारण नेहमी येत नाहीत हे. ह्या काळामुळे येताहेत. त्यामुळे निरर्थक ठरतात. हे छोटं तंत्र वापरून पहा. मुळात, माझं जीवन मरण हे काही इतकं महत्त्वाचं नाही हे समजून घ्यायला हवं. आणि माझ्या पश्चात काय हा सुद्धा विचार नको. मुळात मीच नसेन, तर ह्या सगळ्याचा मतलबच काय ,नाही का ! होतात तयार माणसे. 

इनामदार blouse च्या सौ. श्वेता इनामदार ह्यांची मुलाखत मला प्रकर्षाने आठवते. त्यांच्या आजच्या धडाडीच्या स्वभावाचं बरचसं श्रेय; मी त्यांच्या वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्यावर आलेल्या जबाबदारी ला देईन. तात्पर्य : मी अचानक गेलो/गेले तर ह्यांचं कसं होणार हि काळजी अनाठायी . "कर्तव्य" हे जगण्याचा आधार असते, त्यामुळे, अचानक जाऊ त्याच्या आधी हे व्हायलाच हवं आणि नाही झालं तर कसे वगैरे विचार नका करू. मै पल  दो पल का शायर हुं  ह्यात एक ओळ आहे : मुझसे  बेहतर  कहने वाले ,तुमसे  बेहतर  सुनने वाले .तेव्हा चिंता नको. 

"हे सगळ कधी संपायच " .....असही वाटत राहत ! कुणालाच ठाऊक नाही; तरी संपणार हे मात्र निश्चित ठाऊक आहे. ह्या साथीच्या रोगांची मानवजातीला चांगलीच माहिती आहे. अगदी इसवीसनाच्या आधीपासून हे चालूच आहे. अगदी अलीकडच्या वर्षांतले सांगायचे तर १९१८-२१ उद्भवलेला spanish फ्लू ह्यात ५ कोटी मृत्यू , त्यातले १/३ भारतीय (१.५ ते 2 कोटी)होते. शिवाय इतिहासात आपल्याला अनेक उदाहरणे सापडतील ज्यात अनेक वेळा मोठी मोठी लोकसंख्या बळी पडली आहे. त्यामुळे हे पहिल्यांदाच नाहीये घडत , आणि तसा सृष्टीकरता हा एक नियमित प्रकार आहे, आपल्या पेस्ट कंट्रोल सारखा 🤣

वस्तुनिष्ठ व्हावं आणि समोरचं काम करत राहणे हा उपाय छान work होतो. असे विचार कधी मधी छळत राहतील. विशेष करून एखादी जवळची व्यक्ती वगैरे गेली / Hospitalized झाली की. तर मित्रांनो , एक अशी सवय लाऊन घ्या : शक्यतो एखादी लकब : जसं कि चुकीच बोलल्यावर जीभ चावणे. तर करायचं असं, कि आपल्या  मनात असे विचार येवू लागताच आपण हि लकब वापरायची. सराव केल्याने जमायला लागतं. आता अचानक आलेली घटना काही आपल्याला सांगून येत नाही. त्यामुळे ताबडतोब आपली एक सवयीने प्रतिक्रिया येते. परंतु इतर वेळी ठरवून आपण हाच सराव छोट्या छोट्या घटनांबाबत केला तर आपल्या मनाला नवं Behaviour कळतं आणि आपण भावना बदलू शकतो.

परंतु इतर वेळी मात्र ह्या पासून दूर राहण्यासाठी "समोरचे काम" हा उत्तम उपाय आहे. काम आपल्याला विचार करायला लावणारे असायला हवे. ज्यात, मेंदू -बुद्धी खर्च व्हायला हवी.  कामामुळे तो थकला तरी चालेल, पण मोकळा नको शक्यतो. अगदी Pack बंद करून टाका schedule. कडक पहारा. आणि हे सगळं "खेळा" सारखं घ्या. त्यात स्ट्रेस नको. IPL बघितल्या सारखं. 

आदित्य बिर्ला हे मोठे उद्योगपती शेवटचे वर्षभर कर्करोगाने रुग्णालयात होते. अगदी जाण्याच्या दिवसापर्यंत नवनव्या प्रकल्पांची कागदपत्रे हाताळत होते. हाच तो वस्तुनिष्ठ पणा. हाच गीतेतला कर्मयोग. हळू हळू ह्याचा सराव होतो, आणि मग "Business As Usual" हे कौशल्य आत्मसात होऊ लागेल.

Tuesday, 4 May 2021

Reputation म्हणजे reviews आणि इतर बरंच काही !

विविध प्रकारे Analysis* करून माझ्या असं पाहण्यात आलं , माझ्या संकेत स्थळा वरून (मी जेथे संकेत करेन ते स्थळ, ही माझी वेबसाईट च हवी असं काही नाही बर का; फक्त लिंक्ड इन profile सुद्धा असू शकेल, जर मी एखादा वैयक्तिक व्यावसायिक असेन तर.) मला जी कृती एखाद्या पाहुण्याकडून अपेक्षित असते, ती म्हणजे माझ्या वेबसाईट वरचा Contact Form भरून आमच्या कंपनीच्या अधिकृत इमेल ला त्याने किंवा तिने व्यावसायिक विचारणा करणे. किंवा फोन करणे (अधिक चांगलं ).

ही  प्रक्रिया होते कशी, हे पाहणे जरा संयुक्तिक ठरेल. पाहूयात जरा :-

  1. कुठून तरी कळून** आपल्या विकायला ठेवलेल्या जिन्नसा करिता किंवा सेवे करता पाहुणा आपल्या संकेतस्थळावर येतो, सर्वात आधी त्याचा तपशील तपासते.हा तपशील त्याला झटकन, शक्य तितका नेमका, अचूक मिळायला हवा. इथेच Product Reviews वगैरेही तपासून घेते.
  2. ह्यानंतर "कंपनी" बद्दल , किंवा ज्या संस्थे बद्दल तपासलं जातं. कधीपासून आहे अस्तित्त्वात, त्यांनी संपादित केलेली नामांकने, कर्मचारी वर्ग, एकूण team size, कंपनी च्या नोंदण्या, सरकार दरबारी कागदपत्रे इत्यादी. स्वत:च सर्व देत असाल, तर शैक्षणिक अर्हता, अनुभव हे पाहिले जाईल.
  3. हे झाल्यावर "तुमच्या स्टोरी" ने हि केस अजून बळकट होऊ शकेल. ही स्टोरी स्वत:च्याच आवाजात असेल तर उत्तमच, नसेल, तर एखाद्या animated Video द्वारे किंवा मुलाखती ***, किंवा Podcast वगैरे मार्ग वापरता येतात. शिवाय Text स्वरूपातही हवेच. 

एकदा हे सर्व झालं कि पूर्णत्वाला येतो आपल्या पाहुण्याचा आपल्या संकेतस्थळावर केलेला तात्पुरता प्रवास.

ह्यानंतर लगेच आपल्याला Leads मिळेल असे काही नाही. अजूनही बरेच काही करता येते , आणि करावे. सर्वात प्रभावी म्हणजे : आपल्या कंपनीचे अधिकाराच्या विषयाचे बातमीपत्र प्रसिद्ध करणे , आणि त्याला Subscribe करण्याचे आवाहन करणे. शक्यतो हे email द्वारे असावे. ह्याच्या मार्फत आपण आपल्या विषयातील एक मासिक तयार करून त्याना महिन्याला एक किंवा दोन, ह्या प्रकारे उत्तम मजकूर पाठवू शकतो. ज्यातून आपलं एक वेगळ्या प्रकारचं "Reputation" तयार होतं.

अजून एक मार्ग म्हणजे फेस बुक , linked इन अथवा whatsapp ला त्यांना add करून घेणे. तरीही हे मार्ग म्हणजे जरा "Low Hanging Fruit" म्हणता येईल. बातमी पत्र जास्त प्रभावी आहे.

तर आता "आपल्या बद्दल" सांगताना हे इतरही विषय येवू द्यात !

* तुम्ही उगाचच गुगल analytics वगैरे वापरत बसू नका, भयंकर वेळ जातो, आणि गरज सुद्धा नाही.  

** नेटवर्क, सांगोपांगी, जाहिरात किंवा इतर मार्गाने. 

*** निऊ वर मेम्बर्स च्या खास मुलाखती होत असतात.


Monday, 3 May 2021

आवाज कि दुनिया के दोस्तो - मै आदिती कुलकर्णी

 आवाज' हेच आदितीचं मुख्य प्रॉडक्ट असल्यामुळे तिच्या कामाचा परीघ मोठा असणार ह्याची प्रचीती केस स्टडी दरम्यान आलीच होती पण तिचा व्यावसायिक प्रवास मुलाखतीतून ऐकतांना जाणवलं की तो परीघ मोठाच नाही तर लांब आणि प्रशस्तदेखील आहे आणि तसा तो  असण्यामागे कालानुरूप होणारे बदल डोळसपणे स्वीकारत स्वतःला अध्ययावत ठेवण्यासाठी आदिती ने घेतलेली मेहनत आहे

'आवाज' हे मुख्य अस्त्र असलं तरी कार्यक्रमाचा बाज आणि मागणी ह्याप्रमाणे सादरीकरण करतांना विषय, कथा, पटकथा, आवाजातील चढ-उतार, अविर्भाव, ह्या आणि अजून बऱ्याच गोष्टींवर काम करावं लागतं जे आदितीच्या मुलाखतीतून स्पष्ट जाणवलं आणि जसं सौमित्र सर म्हणाले तसं केस स्टडीसाठी 'बदल आणि ते स्वीकारण्याची मानसिकता' हाच विषय आदितीने का निवडला ह्यामागील मर्म उलगडलं

व्हॉइस आर्टिस्ट, सूत्रसंचालन, स्पीच आणि व्हॉइस वर्कशॉप ट्रेनर, हास्यनीती हा एकपात्री कार्यक्रम आणि "आदि एंटरटेनमेंट" हे स्वतःचे यु ट्यूब चॅनेल असे तिचे कामाचे मुख्य प्रकार असले तरी त्याच्या अलीकडे आणि पलीकडेही आदीतीने केलेल्या कामाची यादी लिहायला गेल्यास रकाने भरतील त्यामुळे प्रत्यक्ष मुलाखतीतच ऐका

2002 ते 2006 ह्या कालावधीत पुणे आकाशवाणी केंद्रावर व्हॉइस आर्टीस्ट म्हणून काम पण ह्या कामातून फारसं उत्पन्न नसल्यामुळे मनाविरुद्ध 2006 ते 11 ह्या कालावधीत कॉर्पोरेट कंपन्यात मॅनेजमेंट इनफॉर्मेशन सिस्टम (MIS) ह्या क्षेत्रात अगदी रिजनल हेड (प्रादेशिक प्रमुख) पदापर्यंत मजल (तिथे काम करताना ट्रेनिंग, प्रेझेन्टेशन,संभाषण कौशल्य ह्या अनुभवाचा पुढे सुत्रसंचालनात उपयोग झाल्याचं आदिती नमूद करते)

2011 साली 'सुत्रसंचालनात' परतताना एकूणच लोकांच्या ऐकण्याच्या सवयीत आणि चवीत  झालेले बदल आदितीने अचूक हेरले आणि त्यानुसार स्वतःत बदल घडवायला सुरुवात केली

2011 च्या आसपास खाजगीतली व्हॉइस आर्टिस्ट ना मिळणारी बरीच कामं रेडिओवरील (FM) च्या चॅनेलवर सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध झालेल्या काही रेडिओ जॉकीजकडे जाऊ लागल्याचं निरीक्षण ती नोंदवते

त्यावेळची कामं म्हणजे, गाण्यांच्या कार्यक्रमात 25 ते 30 गाण्यांची प्रस्तावना लिहून सुत्रसंचालन करणे पण आपल्याकडे Resources नसल्यामुळे आपली तयारी नाही आणि त्यामुळे सुरवातीचे काही दिवस तसली कामं टाळण्याकडेच आपला कल होता असं आदिती प्रामाणिकपणे कबूल करते

पुढे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आत्मसात करत ओळखीतल्या लोकांकडून किंवा मित्रमैत्रिणींनी शिफारस केल्यामुळे कामं मिळत गेली आणि आदिती एकेक पायरी पुढे चढत गेली.काही कार्यक्रमाच्या जाहिराती सकाळ ह्या वृत्तपत्रात छापून येत आणि बऱ्याच वेळा आयोजक मंडळी नवीन चेहऱ्यांच्या शोधार्थ अशा कार्यक्रमांना हजेरी लावत असल्यामुळे कामं मिळण्यास त्याचा हातभार लागल्याचं आदिती सांगते

ह्या सगळ्या प्रकारात स्वतःच्या आदि एंटरटेनमेंट ह्या "यु ट्यूब" चॅनेलवर 'एक पाऊल एक्स्ट्राँ' ह्या कार्यक्रमात नुसतंच व्यवसाय एके व्यवसाय न करता समाजाप्रति भान असणाऱ्या लोकांच्या मुलाखती ती घेतेय.(तिच्या चॅनेल ला सबस्क्राईब करून मुलाखती पाहता/ऐकता येतील)
कोविडकाळात तिने आपलं ट्रेनिंग वर्कशॉप आणि हास्यनीती हा एकपात्री कार्यक्रम ऑनलाइन आणलाय

काही प्रथितयश कलाकार मंडळी कोविडकाळात फेसबुक लाईव्ह वर सहज उपलब्ध झाल्यामुळे ज्युनिअर आर्टिस्टच्या हातचं काम गेलं असा आक्षेप आदिती नोंदवते पण त्याच बरोबर ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे स्वतःही एका वेळी देशा परदेशात पोहोचू शकले ह्याचा आनंदही ती व्यक्त करते

नेटवर्किंग म्हणजे गुडविल तयार करणे असं ती मानते आणि आपल्याला रेफरन्स मिळाल्यास अपेक्षेपेक्षा अधिक देण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते

एवढं काम करूनही आदीतीचे पाय अजूनही जमिनीवर आहे.ती ज्या क्षेत्रात काम करते तिथे लोकप्रियतेचा सोस भल्याभल्यांना आवरत नाही पण एकदा का लोकप्रियतेला झुकतं माप दिलं की आपली साधना, आपला व्यासंग, ह्याकडे दुर्लक्ष होत असं ती मानते. सुदैवाने ह्या सगळ्याचा नैतिक पातळीवर विचार करत असल्याने आदिती ह्या प्रलोभनांपासून दूर आहे 😀(ह्याबद्दल सौमित्र सरांनी सांगितलेली गोष्टही जरूर ऐका), आदीतीच्या मते स्वतःचं ह्या क्षेत्रात येण्यामागचं प्रयोजन काय हा विचार म्हणजे एक प्रकारचा रियाजच आहे, कोविडकाळात मिळालेल्या वेळेचा स्वतःची कौशल्ये वाढवण्यासाठी उपयोग करण्याचा ती सल्ला देते.

अशा या 'आवाज की दुनिये'तल्या बहुआयामी आदितीला तिच्या कारकिर्दीच्या पुढील वाटचालीस निवडक उद्यमी तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा 💐

Sunday, 2 May 2021

रेफरल जनरेशन ची युक्ती १ : Digging Deep ....

Saturday Club  किंवा मराठी connect , जिथे मी स्वत: मेंबर आहे, तिथे व अनेक इतर नेटवर्क्स मध्ये मेम्बर्स नी एकमेकांशी १-2-१ म्हणजेच एकमेकाना भेटून, ओळख करून घेवून , व्यवसाय संधी (रेफारल्स) देण्याची अपेक्षा असते. एकमेकांचा संबंध नसलेले व्यवसाय व ते व्यावसायिक कसे Referrals देवू शकतील ? त्याची एक युक्ती : खोलात जाणे.

उदा. पाहू , की एखाद्या Fashion Designer ला reference द्यायचा आहे 

टीप : स्वत:चे किंवा आपल्या कुटुंबाचे सोडून, चांगले भरभक्कम रेफरल द्यायचेत, ह्यातून एक तर एकाच deal ची किंमत जोरदार होईल किंवा तिला एखादा असा संपर्क द्यायचा कि ज्यातून तिला वारंवार, नियमित बिझनेस मिळतच राहील.

अडचण अशी आहे कि आपला व्यवसाय ह्याला totally असंबद्ध असू शकतो. उदा. संगणक पुरवठा. अरे, मग कसे देणार असे संपर्क ? पहा वापरून " Dig Deep" तंत्र वापरून...

स्टेप १ : प्रथम Event Organizer पाहणे स्वत:च्या संपर्कातून :-

Fashion Designer ला व्यवसाय कसा , कुणाकडून येतो जास्त प्रमाणात, ते जाणून घ्या. उदा. एखादा Event Organizer : हि व्यक्ती तिला जास्तीत जास्त व्यवसाय देवू शकेल. तर आधी पाहू कि माझ्या थेट संपर्कात अशी कुणी व्यक्ती आहे का, ते ! 

स्टेप 2 : Event शी connected ज्या सेवा सुविधा येतात, त्यापैकी देणारे कुणी ? जसे कि :

  1. Caterer
  2. Makeup Artist
  3. Wedding Hall Owners
  4. गुरुजी / भटजी 
  5. Marriage Bureaus / लग्न जमविणारे 
  6. साड्यांची विक्री करणारे 
  7. छाया चित्रकार (Photographers)
  8. Florists, Cake Supply करणारे  

स्टेप ३. करा संपर्क, झालं कि !


हे तुलनेने सोप्पे असते. तरी एक सोप्पी युक्ती, म्हणजे आपणच आपल्या network मध्ये डोकावणे, आपला funnel अभ्यासून घेणे, तपासणे आणि कोणते रेफरल हवेत, हे समोरच्याला सांगणे. 

कधी करताय तुमचा फनेल तयार ?


Saturday, 1 May 2021

भाग 4 - 'Magic of Compounding' - Part I

 मागील पोस्टमधील ठळक वैशिष्ट्ये

1.'Rule of 72' - परताव्याच्या व्याजाचा दर माहीत असल्यास मूळ रक्कम दुप्पट होण्यास किती कालावधी लागेल ह्याचा बऱ्यापैकी अचूक अंदाज बांधता येतो

2.काही म्युच्युअल फंडांनी गेल्या जवळपास 30 वर्षात 12 ते 15 टक्के परतावा दिलेला आहे

3.त्यामुळे भारतीयांच्या सरासरी आयुर्मानाच्या हिशोबाने (76 वर्षे), आपण साधारण किती संपत्ती निर्माण करू शकतो ह्याचाही अंदाज बांधता येऊ शकतो
===================================================================

खालील काल्पनिक 2 पर्यायांपैकी  तुम्ही कुठला निवडाल,

 पर्याय पहिला- आजपासून पुढील 30 दिवस मी तुम्हांला दररोज एक लाख रुपये देणार 😱 😋

 पर्याय दुसरा - पहिल्या दिवशी 10 पैशांपासून सुरुवात करून प्रत्येक पुढल्या दिवशी आदल्या दिवसापेक्षा दुप्पट रक्कम देत जाईन आणि हे ही सत्र 30 दिवस चालेल, तर तुम्ही कुठला पर्याय निवडाल 🤔

केलात विचात ? 🙂 असो,

पहिल्या पर्यायाचं उत्तर सोपं आहे - 30 लाख

दुसऱ्या पर्यायाचं?- 53687091 म्हणजे किती 👇 

पाच कोटी छत्तीस लाख सत्याऐंशी हजार एक्क्यांणव रुपये

हो तुम्ही बरोबर ऐकलंत - कसं? करून बघा कॅलक्युलेटर वर

आता वर जी सांगितली ती झाली आकडेमोड पण हे होतं कसं आणि त्यासाठी आवश्यक काय?
 

चक्रवाढ व्याज - अर्थात मूळ रक्कमेवर मिळालेलं व्याज काढून न घेता पुन्हा मूळ रक्कमेत भर घालून भांडवल वाढवत नेण्याची प्रक्रिया खंड पडू न देता अव्याहतपणे चालू ठेवणे

वरील उदाहरणातील एक गंमत दाखवू 👇

पहिल्या दिवशी - 10 पैसे
दहाव्या दिवशी - 51.20 रु.
विसाव्या दिवशी - 52428.80 रु.
तिसाव्या दिवशी - 53687091.20रु
 

However whats the actual magic of compounding in above equation ? 👇

They say, 'Small unnoticeable changes done over a long period of time, makes humongous difference' 😊

अर्थात,नगण्य भासणारी व्याजरूपी रक्कम दिर्घकालावधीसाठी मूळ रक्कमेत भर घालून वाढवत नेल्यास प्रचंड संपत्तीनिर्मिती साधता येते

त्यासाठी आवश्यक काय ?

1.अभिनव व्यवसाय कल्पना - नाही
2.बुध्यांक - 150 च्या आसपास - नाही
3.तंत्रशिक्षण, व्यवस्थापनातील पदवी - नाही
4.White hat junior वर कोडिंग शिकून ऍप तयार करणे - अजिबातच नाही

आवश्यक आहे ती फक्त - 'शिस्त' आणि आयुष्यात शक्य तितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात करणे जेणेकरून Compounding साठी आपल्याला जास्तीत जास्त कालावधी मिळेल.

 पुढील भागात - काही उदाहरणांनी वरील संकल्पना तपशिलात समजून घेऊ

धन्यवाद 🙏 - Happy Investing 💐

मेबर्स ना इतर व्यावसयिक घडामोडींची माहिती द्या !

नेट्वर्किंग का बरे करतो आपण ?

Mouth Publicity वाढावी , आपल्याबद्दल अधिक समजावे members ना. आणि त्यांनी वेळ येताच किंवा त्यांना समजताच आपल्याला एखादा referral द्यावा. referral म्हणजे एखादा उपयुक्त असा वाटणारा संपर्क. तो एक Lead असतो, किंवा एखादी सरळ सरळ Enquiry सुद्धा असू शकेल. 

हे फक्त प्रत्यक्ष मीटिंग मध्ये होतं असं नाही !

इतरही अनेक संधी असतात. ज्यामध्ये आपला whatsapp किंवा telegram ग्रुप , ज्याच्यावर network चे सर्व मेम्बर्स जातीने बहुतेक सर्व मेसेजेस पाहतात आणि त्यांची दाखल घेतात. इथे आपण विविध प्रकारे active राहून आपली योग्यता, व्यावसयिक म्हणून आपले इतर समाजातील स्थान हे नक्कीच लोकांना आपल्या पोस्टिंग द्वारे समजावून सांगू शकतो. अर्थात हे करीत असताना फोकस आपला व्यवसाय वाढावा इकडेच राहू द्यावा.

इतर updates : उत्तम संधी !

आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. त्या share करीत राहणे हा एक उत्तम मार्ग आहे ह्यातला. फक्त त्या व्यावसायिक असू द्याव्यात. "रक्तदान शिबीर" नको. निऊ वर आपण खास एक शनिवार ह्याकरीता राखून ठेवलाय "Events Day" असा : शनिवार आहे हा. काय काय करतो आपण ह्या दिवशी ?

इतर बिझनेस नेटवर्क्स च्या meetings बद्दल माहिती ( प्रमोशन नाही ) : अगदी सर्व नेटवर्क्स. ह्या नेटवर्क ना मेम्बर्स जातात, क्वचित जॉईन देखील होतात. त्यातून त्यांचा व्यवसाय तर वाढतोच, शिवाय व्यावसायिक कौशल्ये सुद्धा विकसित व्हायला निश्चित मदत होते. 

  1. इतर कुठली webinars वगैरे ... आपल्या क्षेत्रातील किंवा उपयुक्त अशी 
  2. स्वत: चीच, परंतु नवीन सुरु होणाऱ्या batches वगैरे !

ह्यातून नक्की कसा होतो फायदा ?

तुमचं Reputation वाढू लागतं , लोकांना एक कुतूहल निर्माण होतं : की कोण आहे बाबा ही व्यक्ती म्हणून ! आणि members तुमच्याशी आपणहून संपर्क साधू लागतात.