Thursday 28 July 2022

Dan Kennedy ह्यांच्या My Unfinished Business पुस्तकातील महत्त्वाचा आशय

Dan Kennedy हा इंग्रजीतील एक प्रतिथयश लेखक आहे. मार्केटिंग मधील एक दादा माणूस आहे. त्याचं हे आत्मचरित्र स्वरूप लेखांचा संग्रह असलेलं पुस्तक. My Unfinished Business मला त्यात भावलेले काही भाग :-

( निवडक उद्यमी मध्ये ह्या पुस्तकातील काही भाग आम्ही चर्चेला घेतला होता. त्याचे video recording)

पान 17.  पहिल्याच पानावर त्याने आयुषातल्या घटनांची केलेली उजळणी : 


काय असेल पुढे ह्याची लख्ख कल्पना आली, आणि तसेच आहेही. बिनधास्त पणे अनेक लोकांची नावासकट करून टाकली आहे, आभार सुद्धा मानलेत. अपराधी भावना पासंगाला सुद्धा नाहीये.

पान ४५ ते ५० : कौटुंबिक वाईट आर्थिक परिस्थितीचा झालेला खोलवर परिणाम त्याने ४ ते ५ मुद्द्यांत छान मांडला आहे. त्यातला त्याच्या आईचा " Negative Anticipation" हा मुद्दा खासकरून अगदी पटला. याचा त्याला  इतका फायदा झाला, कि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाताना एक सामर्थ्य प्राप्त झाले. 

पान ५३ : एखादी तात्पुरती भीती ला सामोरे न गेल्याने कसे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते ह्याचे एका अनुभवाद्वारे कथन 

पान ६४ : आपल्या शिक्षणपद्धतीत " संधी न दाखविणे" हि मोठी त्रुटी 

पान ८१-८३ : कोणत्या वातावरणात आपण स्वत: यशस्वी ठरू शकतो, म्हणजे घरातले तसेच कार्यालयातील सभोवताल ह्याबद्दल केलेले सखोल भाष्य. ह्याला त्याने Success Environment हा शब्दप्रयोग वापरलाय.

पान १३९ : कोणते ग्राहक घ्या ? बहुमुल्य सल्ला.

पान १५५ : पर्याय निवडून तेथेच फक्त क्रयशक्ती चा विनियोग करण्याची पद्धत 

पान १८२-१८८ : स्वत:च्या लेखन-व्यवसायाबद्दल विस्तृत लिहिलंय 

पान १८९-१९० : वाचनाचा शिस्तबद्ध कार्यक्रम राबविणे ह्याबद्दल.

पान १९६ - १९८ : स्वत: किती व कसे पैसे मिळवितो 

पान २२१ : Psycho-Cybernetics बद्दल 

पान २५० : स्वत:चे व्यवसाय विकले 

पान ३०१ - ३०२ : pricing बद्दल महत्त्वाचे विचार 

पान ३२९ : कुणाचे ऐकावे 

पान ३८४ - ३८८ : एका plumbing agency ची क्लासिक मार्केटिंग स्टोरी 

सदर पुस्तक amazon वर उपलब्ध आहे : ही लिंक वापरू शकता 



Sunday 17 July 2022

प्रथम तुज पाहता ......

 घाबरू नका, एकदम गाण्या बिण्या बद्दल लिहिण्याचा मानस नाहीये माझा. फक्त एक फंडा म्हणून वापरतोय.

बरीच मेहनत करून, Finally जेव्हा एखादा आपल्याला संपर्क करतो, त्यानंतर आपला Autoresponder जर असा मेसेज सेंड करत असेल , तर बिघडणार काहीच नाही, पण सुधारणार मात्र नक्कीच नाही. 


अगदीच "नोकरदार" किंवा "सरकारी" मेसेज वाटतो की नाही ? आपल्या प्रत्येक संवादातून आपण आपल्या ग्राहकाला आपण त्याच्यासोबत आहोत, किंबहुना, त्याच्यासोबत व्यवसाय करायला उत्सुक आहोत, हे सांगायला हवं.

प्रत्येक वेळी एखाद्या Research ची जोड हवीच का ?


***प्रत्येक वेळी गुगल असे म्हणते, किंवा अमुक विद्यापीठातल्या तमुक प्राध्यापकाने असे म्हटले आहे असे आधार लागत नाहीत. आपली बुद्धी, आपली समज ह्यावर विश्वास ठेवून जगायला लागलं कि, जाणवेल, कि वरील Autoresponder बदलून जरा बदलला कि ग्राहक आपल्याला लगेच orders ची थाळी घेऊन हजर होईल असं नाही, तरी शक्यता  प्रकारात तरी नक्की येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सतत एक सकारात्मक, उत्तम संवाद साधायची सवय लागेल, ज्यातून मग आश्चर्यकारक असे Results मिळू शकतील.

प्रत्येक संपर्क महत्त्वाचा ! मौल्यवान 

saturday club चे संस्थापक भिडे सर ह्यांच्याकडे सुमारे १२ हजार व्यावसायिक मंडळींचा data प्रिंटेड, वर्गवारी करून , Filing करून कपाटात नीट राखून ठेवला होता. हे मला सांगितलं त्यामानाने तरुण व्यावसायिक हर्षवर्धन भुर्के ( आज ४५ असतील ). ते जेव्हा भिडे सरांना २०१६ मध्ये भेटले तेव्हा, भिडे सर वय वर्ष ८३. 

आलेल्या संधीचं सोनं करणे म्हणजे हेच छोटे-छोटे बदल लगेच अंमलात आणणे, नाही का ?


तर जर whatsapp ला autoresponder सेट केला असेल, तर तो लगेच ग्राहकाभिमुख करा आणि स्वत: ला बदल. माझा एक mentor , गोपालकृष्णन एक शब्द छान वापरतो : Prospect Empathy. Empathy ला मराठी शब्द सहानुभूती असा आहे, पण मला आस्था हा शब्द जास्त योग्य वाटतो. 

ही आस्था विकसित करणे म्हणजे कायम ह्याचं स्मरण राखणे की आपल्या सेवा ग्राहकाला काय Value Add करतील ? ह्याबद्दल पुन्हा कधीतरी. सध्या आपला Autoresponder गरज असल्यास नीट करून घेऊ. 

*** इंटरनेट वरून अनेक महान वक्ते आपल्याला विनामुल्य ऐकायला / वाचायला मिळतात. त्यातील निवडक असे भाष्य निवडून चर्चा असा एक सुरेख प्रवास आम्ही निवडक उद्यमी ह्या आमच्या साप्ताहिक ग्रुप मध्ये करत असतो. शुक्रवारी रात्री online मिटींग्स असतात. मीटिंग विनामूल्य attend करता येते.


Tuesday 5 July 2022

फोटो पोस्ट केल्याने धंद्यात वाढ ?

आज मला एक इमेल आला गुगल मधून :-


विशेष म्हणजे बऱ्याच अलीकडे पोस्ट केलेल्या माझ्या फोटोज ना बरेच views दिसले. त्यात सुद्धा home awaits ह्या ठिकाणी माझे जे जे फोटो मी पोस्ट केले, ते बरेच पाहिले गेलेत. अर्थात हे व्यवसायात परावर्तीत झाले असतीलच.




स्वत:चे insights जरी पाहिले तरी ध्यानात येतं कि सर्वात प्रिय म्हणजे फोटोज च असतात.

काही आयडीयाज :-

  1. आपण आपल्या कोणत्याही व्यावसायिकाकडे गेलो, तर तिथले फोटोज त्यांच्या Google business profile वर आवर्जून पोस्ट करायचे. ( पूर्वी यालाच GMB म्हणायचे )
  2. आपण स्वत: आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकाना किंवा मित्र मंडळीना फोटो काढायला प्रेरित करायचे.
  3. एखादा खास Selfie-Point ठेवू शकतो ; बदल्यात एखादी Five Star देवू शकता !
  4. आपला जर का SAB प्रकारचा म्हणजे ग्राहकाकडे जाऊन सेवा देण्याचा व्यवसाय असेल, तर तिथून ग्राहकाना फोटोज पोस्ट करायला सुचवू शकता.
  5. ट्रेनिंग घेत असलात तर प्रत्येक ट्रेनी ला एखादा सेल्फि आपल्या profile वर पोस्ट करायला सांगू शकतो 
  6. बिझनेस क्लब असेल, तर award winner मेंबर च्या गुगल profile वर त्याचा award घेतानाचा फोटो पोस्ट करू शकता.
अजून काही आयडीयाज सुचतायेत का ? जरूर share करा !

एक अपडेट : (ऑक्टोबर २०२२ ) :-

माधवी जाधव ( Atharv Eco Friendly ) ह्यांच्या दुकानात मी १५ ऑगस्ट ला जाऊन फोटो पोस्ट केले होते, त्यांना ३,५०० + views आलेले आहेत. मान्य की Views हे सर्वस्व नव्हे; परंतु Views म्हणजे search ---> Traffic. मग एकदा का customer झाला कि Reviews येतातच !

Monday 4 July 2022

Https : Conversion मधील लहानसा परंतु महत्त्वाचा भाग !

आज सकाळी एक चांगला माहितीपूर्ण इमेल आला :-


उत्सुकतेने मी लिंक क्लिक केल्यावर काय घडलं 🔽

पुढे advance वर मी क्लिक केलं 🔽


मी पुढे गेलो नाही ( जाऊ शकलो नाही ) कारण रिस्क वाटलं. माहितीपूर्ण लेख होता, परंतु Unsecured वेबसाईट वरून असल्याने पुढे जाता आले नाही. असं आपल्याही बाबतीत होऊ शकेल. तेव्हा ही एक लहानशी परंतु अवश्यक बाब आपल्या web developer कडून लगेच अमलात आणा. 

थोडी गुंतवणूक आहे, परंतु आवश्यक अशी आहे.का ? 

  1. ज्याने मला मेल धाडली आहे, त्याला मी हे कळवणार आहे; तरी असे माझ्यासारखे सगळे थोडीच असणार आहेत ? शिवाय मलाही कायम असा वेळ थोडीच असणार आहे ?
  2. इंटरनेट च्या फायद्या सोबत येणारे हे धोकेही आहेत. हे secure करण्याला पर्याय नाही.
  3. मेडिकल insurance सारखे आहे हे. करायलाहवे.
  4. ही मेल धाडणारा माझ्या सुमारे ७ वर्षे संपर्कात आहे. अनोळखी. हे असेच स्लो convert होतात. पण एकदा झाले कि फक्त upsell करणे इतकेच काम राहते. त्यामुळे हा एक Reputation Point आहे हे विसरू नका.
  5. मूळ मेल च उघडला गेलेला नाही त्यामुळे "Buy" वगैरे चा प्रश्नच उरत नाही. 
  6. पुढचेही मेल कदाचित मी उघडणार नाही.
आजच आपल्या web developer ला संपर्क करा. मदत हवी असेल तर ह्याच इमेल ला respond करा. पण ही स्टेप आवर्जून, लगेच घ्या.