Thursday 30 December 2021

कामावर फोकस

नुकतंच मी माझं visiting कार्ड re design करून घेतलं, हे होतं आधीचं 👇
ह्यात फ्रंट ला माझा फोटो ( लोकांच्या लक्षात राहावं म्हणून ), आणि मी कोणत्या संस्थांशी जोडलेला आहे ह्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होता अर्थात व्यावसायिक उद्देश. आणि मागे मी काय करतो ह्याबद्दल होतं. ह्यामुळे मी कोण आहे, आणि मग माझ्या सेवा असा approach होता. हा झाला ब्रँडिंग approach

नवीन कार्ड 

हे कार्ड करताना थोडा approach बदलला. Conversion कडे आणला. 👇

फ्रंट ला फोटो + QR कोड टाकला. शिवाय खाली माझा व्यवसाय सांगितला. मागच्या बाजूला मी संलग्न असलेल्या संस्था फक्त mention केल्या, त्यांचे लोगो सुद्धा नाही टाकले. 

आता लक्ष फक्त माझ्या व्यवसायाकडे राहील, शिवाय QR कोड स्कॅन केल्यावर तो माझ्या Whatsapp बिझनेस ला जातो, म्हणजे Mass Marketing मधून filtration करून leads यायला सुरुवात व्हायची एक शक्यता मी निर्माण केली !

Wednesday 29 December 2021

प्रेरणा हरवली आहे ? एक फोन : कात्रे ह्यांना : बस्स !


कात्रे नावाची Revolution

म्हणायला प्रसाद कात्रे ह्यांचं प्रिंटिंग चं युनिट आहे पुण्यात, मेहेंदळे garage जवळ, पण ही एक प्रेरणेचे वर्कशॉप आहे जणू. आमचे एक मित्र परवाच म्हणाले - संध्याकाळी 7 वाजता कातरेंना फोन केला, कुठे आहेत म्हणून, तर उत्तर " ठिकाणी " अर्थात कारखान्यात. 

प्रचंड क्रयशक्ती

अनेक प्रकारच्या झुंजी हा मनुष्य एकाच वेळी देतोय, आता 61 वय झालंय, पण प्रचंड काम तर करतोच, शिवाय एखादा कधीच घळपटून जाईल इतके प्रचंड मोठे प्रश्न हाताळत असताना देखील ही व्यक्ती प्रचंड म्हणजे प्रचंड सकारात्मक राहते. मला तर पानिपत मधल्या सदाशिवराव ह्यांचाच भास होतो, फक्त हा सदाशिव पाय रोवून भक्कम उभा आहे !

वर फोटोत दिसताहेत प्रसाद आणि त्याचे revolution मधील सहकारी !

हे "चितळे बंधू" आहेत बरं !


म्हात्रे पुलावर ही जाहिरात अगदी ठळकपणे दिसत्ये. ठराविक बाकरवडी, चकली, चिवडा साच्यातून चितळे सुद्धा आता बाहेर पडत आहेत.

बदल स्वागतार्ह 

"बार" format मध्ये आणलेत पदार्थ ! चक्क भेळ वगैरे. अगदी पुणेरी,पेठी असा असलेला चितळे हा नामांकित ब्रँड कालानुरूप काही नव्या गोष्टी करू पाहत आहे हे नक्कीच स्वीकारार्ह आहे !

Sunday 26 December 2021

प्रत्येकाचा "segment" निराळा .....

आजच घडलेले 2 प्रसंग :-

प्रसंग १ : आमच्या बिझनेस नेट्वर्किंग क्लब मधील एक चर्चा 

" खूपच कच्चे आहेत यार आपले मेम्बर्स "

" असं कसं , इतकं कसं कळत नाही यार ! "

" अमुक-अमुक सारखं व्हायचं तर खूपच पल्ला गाठायला  लागेल "

प्रसंग २ : फोन वरील एक चर्चा, विषय : आंतरराष्ट्रीय प्रदर्शन 


" त्या mahabiz बद्दल काय अनुभव आहे ? "

" काहीच फरक पडत नाही , म्हणजे आपण व्यवसाय मिळवायला म्हणून गेलो, तर काहीच घडत नाही तसं "

" का बरं ? "

" म्हणजे आपल्यात आणि त्यांच्यात इतकं अंतर जाणवतं ! आपली लायकी च नाही त्यांना Match होण्याची ! सर्वच बाबतीत अत्यंत पुढे आहेत ते आपल्या. आपण कुठे कमी आहोत हे कळायला जावं फार तर ! "

ह्यातल्या दोन्ही Highlighted प्रतिक्रिया तपासल्या तर त्यात कुठेतरी कमी पणाची किंवा कुणासारखे तरी होण्याची किंवा आपण तसे नसण्याची खंत किंवा सल प्रामुख्याने दिसते आहे. Milestones असतातच. तरी त्या पासून फक्त प्रेरणा घेवून, तरीही आपला वेगळा प्रवास जाणून, स्वत:ला समजून घेण्याची आणि ते वेगळेपण जपण्याची, कसोशीने जपण्याची नितांत आवश्यकता असते, आहे. 

Segmentation : एक सुटसुटीत तंत्र !


ढिगाने Videos सापडतील ह्या विषयावर इंग्रजी मध्ये youtube वर. मी अगदी सोप्प्या पद्धतीने समजावून द्यायचा प्रयत्न करतो. तर हे कळायला हवं कि मी कोणत्या प्रकारच्या ग्राहक वर्गाशी deal करण्यासाठी Comfortable आहे, कुणाशी मला सहज, ताणरहित संवाद करता येतोय ते. 

ह्याकरता आधी हे समजून घ्यावं लागेल, की जे मी माझं Deliverable म्हणून समोर आणतोय, म्हणजेच जे मी समोरच्याला देवून त्याबदल्यात अर्थार्जन करू इच्छितोय, त्याची खरी उपयुक्तता कोणत्या प्रकारच्या गरजा असलेल्या कोणत्या प्रकारच्या ग्राहकाला आहे. 

चला, एक उदाहरण घेऊ : माझंच !


तर माझं Deliverable काय आहे ? तर डिजिटल मार्केटिंग सल्ला | सेवा | प्रशिक्षण 
का बरं मी हे देतोय ? माझ्या स्वत:च्या अनुभवाचा बेस.

आता यात मी " कोणत्या प्रकारच्या ग्राहक वर्गाशी deal करू" हे कसं ठरवता येईल ? 

मी जेव्हा स्वत: च्या अनुभवाचा बेस  असं म्हणतो, तेव्हा मला बाहेर माझ्या स्वत: सारखेच ग्राहक शोधावे लागतील. म्हणजे माझ्या स्वत: सारखेच प्रश्न पडू शकलेले, शकणारे. म्हणजेच :-

Manufacturing करणारे तेही पोर्टल्स वर जाहिरात करणारे, मशिनरी विकणारे. म्हणजेच हाच 💪 माझा टार्गेट segment झाला. पुन्हा size केवढा ? तर MSME segment. 

एकदा का हे कळलं कि आतली मळमळ बंद व्हायला हवी !


आता मला नको वाटत राहायला कि "अर्रर, मी त्या अमुक सारखं नाही काम करत !" प्रत्येकाचा segment वेगळा आहे. त्यात कमी, लहान, छोटं असं काहीच नाही. सगळे तसे सो called मोठ्ठेच होत राहिले, तर छोट्या गरजा कुणी भागवायच्या ? त्यामुळेच तर सर्व प्रकारचे, सर्व व्यावसायिक नांदत असतात, ह्याच जगात. 



Friday 24 December 2021

व्यवसायावर आधारित Genuine चित्रपटांचं दुर्भिक्ष्य

आम्ही निऊ च्या मीटिंग साठी एक आठवडाभर जंग जंग पछाडल तरी "मेड इन चायना" "गुरु" "बदमाश कंपनी" "हरीश्चन्द्राची factory" ह्यापलीकडे गाडीच जाईना ! इंग्रजीतही फार नाहीत काही. तरी त्यातल्या त्यात आम्ही Rocket Sing निवडला ह्यावेळी चर्चेला.

रेकॉर्डेड मीटिंग पाहता येण्यासाठी लिंक : https://www.facebook.com/795309869/videos/346318493520370/

निऊ चा फेसबुक ग्रुप विनामुल्य असतो, त्याची लिंक :- https://www.facebook.com/groups/nupune/

व्यवसाय म्हणजे "मनोरंजन नाहीच" असं कसं समजतात कुणास ठाऊक ? म्हणजे ती लफडी, प्रेम-फिम, डान्स, कमी कपड्यातील अभिनेत्र्या, झाडांमागे पळापळी हे हवच का ? कधी जाणार याच्या पल्याड, कुणास ठाऊक !

Thursday 23 December 2021

Franchise देण्याची घाई ...


हल्ली असंख्य अशा नव कल्पना उदयाला येताना दिसतात. ठीक आहे. पण कल्पना आणि व्यवसाय टिकवणे are different things boss. उत्साहावर विरजण टाकायचं नाहीये कुणाच्याच, पण सुचलेली बिझनेस आयडिया वैध ठरेल की नाही, ठरली आहे हे कसे ओळखायचे ?

सिद्ध तत्त्वे आहेत त्रिकालाबाधित 

एखादा व्यवसाय निदान 3 वर्षे तरी टाकलाय का, नफा कमावतोय का आणि निदान 25 टक्के ROI म्हणजे गुंतवणुकीवर परतावा देतोय का हे पाहायलाच हवं. प्रस्तावित उद्योगाबद्दल विचार करताना पुढचे financials ह्याच एका गोष्टीवर बेतलेले असतात, ह्याचेच अनुमापन करण्याचे ratios असतात.

अत्यंत उथळ अशा franchise ऑफर्स

मी स्वतः अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत,पाहत असतो, ज्यांनी एक वर्षही व्हायच्या आत franchise दिले, 
आणि त्यांना घेणारेही मिळाले ! अर्थातच ते चालले नाहीत, आणि प्रत्यक्ष franchisee ला प्रश्न पडले,तर ह्यांनी म्हणजे franchisors नी सरळ हात वरती केले ! 

व्यावसायिक बांधिलकी चा अभाव

पैसे कमावणे ह्या एकमेव संकल्पनेवर आधारित स्वतः च चुकीची स्वप्ने पाहणे आणि दुसऱ्यांना दाखविणे ह्यामुळे हे घडतं. आपला व्यवसाय प्रथम ग्राहकाला अमुक value देण्यास बांधील आहे ही मूळ संकल्पना लक्षात घ्यायला हवी. अर्थात जो माझ्या कडून franchisee घेणार, त्याचे विविध टप्प्यावर पडलेले प्रश्न मला सोडवता यायला हवेत ना ! मुळात मीच 3 वर्षेही धंदा चालविलेला नाही ( दुसरीकडे नोकरी नाही ) तर दुसऱ्याला काय सांगणार, कप्पाळ ! 

B2C हे न टाळता येणारे मॉडेल

ग्राहकांच्या बदलत्या गरजा ....

कोविड पश्चात खास करून खूपच जास्त कस्टमाईज झाल्या आहेत ग्राहकांच्या गरजा, का ते फिर कभी. पण झालेल्या आहेत हे खरं ! 

मोठ्ठ्या कंपन्यासुद्धा नाकारू शकत नाहीयेत

बिसलेरी सारखे दादा लोक ( बाटलीबंद पाण्याचे 60 टक्के मार्केट ह्यांच्याकडे आहे ) सुद्धा अपवाद नाहीयेत. एकेकाळी फक्त वितरकांद्वारे उपलब्ध असलेले बिसलेरी आता थेट B2C मिळतंय.

कोविड काळातलं शहाणपण किंवा काही, ठाऊक नाही, पण चक्क आता app वगैरे, म्हणजे मोठीच क्रांती म्हणायची !

आपल्यालाही चालणार नाही आता !

अपल्यालासुद्धा आता विविध सेगमेंट चे ग्राहक ठेवायला लागतील आपल्या ग्राहक पोर्टफोलिओ मध्ये !


Wednesday 22 December 2021

जीर्णोद्धार अर्थात व्यावसायिक Model पुनर्विकसन


देवळांचे जीर्णोद्धार होत असतात. म्हणजे काय तर नूतनीकरण. अर्थात मोडकळीस आलेल्या भागाचे दुरुस्तीकरण किंवा चक्क अगदी जुन्या झालेल्या वास्तूला  नवीन स्वरूप देणे. 

आपल्या व्यवसायाचा जीर्णोद्धार कधी ?

आपल्या व्यवसायाची सुद्धा अशी डागडुजी, जीर्णोद्धार करावा लागेल, तर नवं गिऱ्हाईक येईल. काळापरतत्वे बदल घडवायला हवेत. खासकरुन कोविड नंतर कोणत्या वेगळ्या सवयी ग्राहकांना लागल्या आहेत ते ओळखून नवनवीन product किंवा सेवा मॉडेल विकसित करायला हवीत.

BUSINESS MODEL CANVAS

हे एक अत्यंत सुरेख असं tool आहे ज्याद्वारे आपण आपले बिझनेस मॉडेल छान पद्धतीने तयार करू शकतो आणि नव्या पद्धतीने छान नफा सुद्धा कमवू शकतो. पाण्याच्या व्यवसायात हे कसं वापरता येईल ह्याचे मी काही व्हिडिओस तयार केलेले आहेत. ह्या लिंक वरून ते पाहता येतील, व आपल्या व्यवसायात सुद्धा त्याचा वापर करता येईल.

Saturday 18 December 2021

माय बिझनेस चे Attributes

गुगल माय बिझनेस वर Attributes नावाचा एक पर्याय आहे. खूप छान पद्धतीने वापर करता येतो. मुळातच आपल्या अपरोक्ष होत असणारा हा गुगल सर्च म्हणजे प्रत्यक्ष मार्केट किंवा विभागात न जाता केली जाणारी एक शोध मोहीमच की. ह्या अनुषंगानेच गुगल आपली ही मोहीम लवकरात लवकर आणि अधिकाधिक अचूक करण्यासाठी सदैव उत्तमोत्तम features आणत असते. Attributes हा त्यातलाच एक प्रकार.

Attribute म्हणजे आपल्या उत्पादनाचे किंवा सेवाप्रकाराचे वैशिष्ट्य नव्हे, तर आपल्या व्यवसायानुसार आपल्या जागेचे  वैशिष्ट्य. म्हणजे तुमच्या व्यावसायिक जागेत असलेल्या सोयी सुविधांचे मेंशन.

उदाहरणा दाखल खाली एकाच इमारतीत असलेल्या दोन अभ्यासिका पाहू :-

ह्यातून हे अगदी स्पष्ट होते, साहजिकच ग्राहकाला निवड करायला सोपे होते.

दुकानाच्या जागेवर आपल्याला वाट्टेल ते लिहायला स्वातंत्र्य आहे, माय बिझनेस वर मात्र गुगल ने ठरवलेलेच attributes वापरता येतात. 

जागरूकपणे वापरलेत,तर आपल्या online viewer ला साहजिकच निवड करायला सोपे जाते.

प्रसंगानुरूप पोस्टिंग !

आपल्या सोशल मीडिया पोस्ट्स कशा वैविध्यपूर्ण असायला हव्यात ! हे विषय निवडताना सभोवताल निरखला तर लगेच हिंट्स मिळू लागतात.


सध्या मार्गाशीष गुरुवार आणि लगोलग दत्तजयंती !
रस्त्यावर दुकान थाटणारे लोक ह्या संधी अगदी लगेच उचलतात, सणवार आले की ही दुकाने सज्ज !

आपला सोशल content येईल का उचलता इथून ?

ह्यांना गुगल वर add करता येत नाही !


ह्यांचा बिझनेस मात्र गुगल वर नाही add करता यायचा, कारण ह्यांचा तसा पत्ता असला,तरी गुगल च्या दृष्टीने लापता च !

ह्यांचं जाऊद्या, पण बरेच चावी वाले गुगल वर आहेत बरका !

तुमचा व्यवसाय आहे की नाही ?

Friday 17 December 2021

तुमचं वेगळेपण...

डिजिटल ला यायचं असलं तरीही आपलं खास पण ,किंवा इतरांच्या पेक्षा असलेलं वेगळे पण आपल्याला प्रथम समजून मग ते दाखवून व समजावून सुद्धा द्यायला लागतं

आता ह्या बेकऱ्या बघा - एकाच भागातल्या,अर्थात एकमेकांना स्पर्धक आहेतच !

रॉयल बेकरी


साद बेकरी

सागर बेकरी

अगदी जवळ जवळ. तरी सागर बेकरी ने स्वतः चं वैशिष्ट्य जपलेलं आहे, आणि सांगत सुद्धा आहेत : शुद्ध शाकाहारी बेकरी मालाचे उत्पादक, असं.

त्यामुळे कमी असतील,परंतु एका ठराविक choice ठेवणारे ग्राहक हे attract करत राहतात.

हेच आता डिजिटल माध्यमांवर जास्त ठळकपणे सांगायला हवं कारण google, फेसबुक, इंस्टा, इत्यादी ला शब्दरूप कंटेंट व्यवस्थित कळतो, बोर्ड वर लिहिलेला कंटेंट हा इमेज मध्ये जातो.



Wednesday 15 December 2021

अधिक शक्तिशाली असे लोकल मार्केटिंग

कोविड पश्चात घडलेली प्रमुख गोष्ट म्हणजे : लोकल चं समजून आलेलं महत्त्व ! आता बिल्डर्स सुद्धा हे छान वापरू लागले आहेत : एक होर्डिंग सध्या मी पाहतोय सेनादत्त पोलीस चौकी पाशी :-


डोमेन चे details तपासले तर ते मित्तल ग्रुप चे आढळले, वेबसाईट सुद्धा ह्याच करिता बनविली गेलेली दिसतीये. 

काहीही असो, लोकल strong होत आहे, हे निश्चित !

True Caller Premium : खरंच आहे का उपयुक्त ?

True Caller ही App बरीच मंडळी वापरतात. छानच आहे. त्यात एक premium version असतं. त्याबद्दल जरा विस्तृत चर्चा झाली होती, मराठी connect च्या मीटिंग पश्चात. त्याचं बद्दल हे पुढे थोडं.




ह्यात मला महत्त्वाचे असू शकणारे features आहेत ते म्हणजे :-
  • Who Viewed My Profile : हे चांगलं आहे 
  • More Contact Requests : साधारण 30 request पाठवता येतील महिन्याला 
  • premium Badge : आपला call घेण्याची शक्यता वाढते.
Gold मध्ये अगदी भारी काही नाही दिसल. 

किती Cost ह्याची ?

पहिला महिना : रु १५ 
त्रैमासिक : रु १७९ 
वार्षिक : रु. ५२९ 

Is it Worth ?

वार्षिक cost धरली तर साधारण ४५ रु येते महिन्याला, म्हणजे १.५० रुपया एका दिवसाला. ह्यात वरचे features : नक्कीच Worth आहे कि !

अधिक तपशीलवार माहिती : https://www.truecaller.com/premium

शिवाय मोठ्या व्यवसायांसाठी ह्यांचे बिझनेस version सुद्धा आहे : https://business.truecaller.com/pricing

Saturday 11 December 2021

दुसऱ्या वर्षपूर्ती च्या निमित्ताने ....

आज ११ डिसेंबर २०२१ , अर्थात "निवडक उद्यमि"चे दुसरे वर्ष संपले. त्यानिमित्ताने हे अगदी मुक्त विचारमंथन. काहीही न योजून केलेले. कोणताही ठराविक परिणाम न अपेक्षिता केलेले. त्यातून माझे कच्चे-पक्के दुवे देखील उघडे पडतील कदाचित. पण म्हटलं ना ... कोणताही "अमुक एक परिणाम न अपेक्षिता केलेले" ...!

खरं तर निऊ सुरु करताना बिझनेस नेट्वर्किंग मधले व्यावसायिक मेम्बर्सच डोळ्यासमोर होते. त्यांचं ( त्यात मीही आलोच ) ते थोडसं उथळ वागणं, कधी कधी अती स्वार्थी होत आपल्यापुरता विचार करणं तर कधी अधिकार-लालसेपोटी अंध होणं, कधी गटबाजी तर कधी प्रांतवादी होणं वगैरे अनेक कंगोरे लक्षात आले, येत राहतात.

वाटत राहतं ... "ये तो धंदा नहीं है boss". जास्त खोल जाऊन, अधिक प्रगल्भ विचार करत राहून एक दीर्घ पल्ल्याची उपाय-योजना करता येईल का काही ! हाच विचार करता करता अनेक व्यक्तींशी संबंध येत गेला, आणि मग अचानक पणे एक गोष्ट लक्षात आली... की अरे... शिकायला काहीच लागणार नाही ! एक यु ट्यूब Video भी काफी है यार !

एकलव्य चा जन्म !

ह्या वर्षातली माझ्यासाठी खूपच मोठी उपलब्धी म्हणता येईल ही. म्हणजे आपण प्रत्येक मीटिंग ला निवडून निवडून Video आणतो, त्यातले जे Speaker असतात, ते होतात आपले द्रोणाचार्य ! हा सगळा मामला अगदी विनामुल्य ! कित्ती भारी. ना तो speaker शोध , ना त्याला आवश्यक असा प्रेक्षक गोळा करा ना अजून काही ! मला तर हे खूप म्हणजे खूपच भारी वाटतं.

कारण मला मुळात उगाचच  Crowd नकोच आहे. ग्रुप ची निष्कारण संख्या वाढविणे, मग ते पीच करत राहणे, मग त्या physical मिटींगा, फोलच आहे असं मला वाटू लागलंय आता. त्यापेक्षा ज्यांना वाटतं त्यांनी भेटावं खुश्शाल !

फेसबुक live आहेच कि शिवाय !

फेसबुक ने इतकी मस्त सोय करून ठेवलीये, कुणालाही पाहता येतं ! ग्रुप जॉईन व्हायचं बंधन नाही ! किती मस्त आहे. ज्यांना हवं ते येतात आत, बाकीचे बांधावर ! 

येते काही महिने तरी हाच राहील आपला परिपाठ 

म्हणजे एक सत्र एकलव्य , एक सत्र ओळखी आणि बाकी गप्पा असंच ठेवू schedule मिटींग्स चं. आता ग्रुप पोस्ट सुद्धा बदलाव्या म्हणतो ! पाहूया. 

Tuesday 7 December 2021

कठीण काळाचे आभार !

कोविड आणि पाठोपाठ ओमिक्रोन ह्या दोन राहू-केतूंनी सर्व मानव जातीला अगदी त्राही भगवान करून सोडले आहे जणू. जो-तो हल्ली समस्येत आकंठ बुडालेला आहे. आजूबाजूला चर्चा सुद्धा "टिकणे" ह्याविषयाचीच चाललेली दिसते , ऐकू येते. व्यवसायांची बऱ्या पैकी वाताहत झालेली दिसत आहे, आणि जो-तो आधी माझं भागू देत, मग जगाचं बघू  ह्या अगदी अस्तित्त्वाच्या लढ्यात गुंगलेला दिसतोय. यातून जाणवलेल्या काही गोष्टी ज्या पुढची दिशा ठरवायला मदत करतील :-

जुनी गृहीतके बाद करूयात 


कोविड पूर्वी जर आपलं एकच एक model असेल, तर ते सोडायला लागेल, विविध, Customized Models तयार करावी लागतील. उदा. एकाच कंपनीला supply, एकाच प्रकारच्या business segment ला supply करणे; शाळा-college मध्ये परत पूर्वीसारखी खोगीर भरती, एकाच प्रकारचे ट्रेनिंग कोर्सेस, फक्त "अमुकच" करेन असा तोरा, हे सगळं जर तुम्ही "जरा कोविड संपू दे" ह्या आशेवर रहात असाल , तर कठीण आहे.

कारण मुळात जगाला कळून चुकलं आहे, की अनंत प्रकारे त्यांच्या प्रश्नाला जगभरातून उत्तरे मिळू शकतात. इंटरनेट ह्या महान माहितीसागराचा पुरवठा आपल्या घरात आहे, आणि प्रत्येक जण ह्या कोविड च्या नाका बंदीमुळे त्याला उत्तम ओळखू लागलाय. त्यामुळे आपण देतो ते लय भारी आणि कोण नाही आपल्याशिवाय हा विचार असेल, तर तो फेकून द्या. कल्पक व्हावं लागेल.

कल्पकता ही काही दैवी देणगी नव्हे !


कल्पक = Artist ही एक चुकीची समजूत आहे. वर समजून घेतलेले एक नव-सत्य मान्य केलं कि कोणालाही याची उत्तरे सापडतील. एकाच ट्रेनिंग ऐवजी भाग पाडून कमी किंमतीची काही छोटी छोटी ट्रेनिंग, किंवा केक सारख्या उत्पादना ला प्रसंगारूप सजवून वेगवेगळी models करणे, भाजी घरपोच देता देता त्यासोबत इतर नवीन काही सप्लाय करणे, एखाद्या मोठ्या कंपनीला सप्लाय करता करता एखादे B2C model उभे करणे, असे अनेक प्रकार सुचणे, करणे हा देखील कल्पकतेचा भागच आहे.

Quantity Based विचारसरणी ला छेद 


Data ह्या प्रकाराला अ-वास्तव  अति महत्त्व दिलं जातंय. तो मुकेश अंबानी म्हणतो म्हणे "Data हे नावं खनिज तेल आहे" म्हणून आपणही निर्बुद्ध होवून त्याच्या मागे लागणं चूक आहे. तो का म्हणतो, ते सोडून देवू. मला तर जगायला माझं काम आणि त्याच्याशी माझं असलेलं सखोल नातं हेच कामाला येईल. मग Data कुठे गंडवतो ? Data गंडवत नाही, Data म्हणजे सर्वस्व ह्या मध्यवर्ती कल्पनेला धरून व्यवसाय उभा राहिला तर गंडलो समजा

कालच एका whatsapp chat वर मला एकाच प्रकारे सतत मेसेज करणाऱ्या एकाला मी हेच सांगत होतो, कि तू चुकीच्या व्यक्तीला Target करण्यात तुझा (म्हणजे मालकाचा 😇) वेळ, पैसा (म्हणजे मालकाचा 😇) आणि उर्जा (म्हणजे कंपनीची ) वाया दवडत आहेस. हे होतं, कारण निर्बुद्ध पणे data विकत घेतला जातो, एकदा विकत घेतला कि तो "वसूल" केला पाहिजे म्हणून कर्मचारी ठेवले जातात आणि त्यांना CRM सारखी softwares लावून पुन्हा निर्बुद्ध follow अप केला जातो. 

CRM Softwares वाईट आहेत का ? नाही. पण मुळातच software म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणावरचा Quantity based approach.त्यामुळे आलंच बाकी सगळं मागोमाग. अशीच परिस्थिती सर्व सोशल मिडिया टूल्स ची सुद्धा. असो.

तरीही आपल्याकरिता रस्ता असतोच !


आपण एक ठरवायचं : निर्बुद्ध पणे स्वीकारणार नाही. आधी तर मूल्याधारित विचारसरणी विकसित करेन. ही मूल्य मग माझ्या कामाला जोडेन, आणि मग सतत सतर्क राहीन.

पोकळ "Passion" उपयोगी नाही 


Passion ची सुद्धा खूपच उथळ रूपे आपल्या समोर आणली जातात. कुठेतरी अवकाश सफरीला निघालेला तो बेझोस किंवा ४५० कोटींचा बंगला बांधणारा अंबानी, किंवा अजून काही. त्यामुळे कुणालाही "तुझं स्वप्न काय" असं विचारलं, की माझं Chartered Helicopter असेल, किंवा माझ्या factory मध्ये १००० कर्मचारी असतील, किंवा हल्लीची style म्हणजे : "म्हणे मी २०२४ पर्यंत १००० उद्योजक घडवेन" ! सगळं फोल, पोकळ, उथळ. एक वेळ येते कि तुमच्याकडे जगातलं सर्वस्व असतं तरीही करमत नाही, कारण ह्या ह्या Passion ला कुठेही लोकांची खरी गरज जोडलेली नसते. तुझ्या helicopter शी किंवा factory शी किंवा संकल्पाशी फक्त तुझा संबंध आहे रे बाबा, तू कोण उद्योजक घडवणार ? तू फक्त दुकान लावलंस. 

कालच "शहा" नामक एका व्यक्तीला मी भेटलो. वय असेल ७० ते ७५. व्यवसाय ? Stamp-Vendor. आमच्या saturday क्लबच्या उरुळी कांचन च्या मीटिंग ला हे गृहस्थ आले होते. पिढीजात व्यावसायिक, पण ना कुठे माज, ना दिखावा. त्यांना ते Give-Ask काहीही कळलं नसावं. ओळख देताना म्हणाले " मी Stamp विकतो, कधीही या, २४ तासात कधीही". त्यांच्या दुकानात गेल्यावर कळतं कि ते अगदी सत्य आहे. "उरुळी कांचन मधलं सर्वात छोटं दुकान असेल माझं" असं म्हणणाऱ्या शहा ह्यांच्या पूर्ण इमारत मालकीची आहे आणि ती पूर्णपणे भाड्याने दिलेली आहे. म्हणजे बिझनेस किंवा आर्थिक साक्षरते बद्दल बोलायला नको. मुद्दा : लोकांच्या खऱ्या गरजेशी नातं हवं , Passion सापडेल आपोआप.

विचार करावा लागेल 


होय, आणि तो आपला आपणच करायचा आहे. बाहेरून काय करायला लागेल ? तर प्रथम मान्य करावं लागेल, कि जुन्या संकल्पना कदाचित चालतील किंवा नाही, पण नव नवीन models मात्र नक्कीच उभी करावी लागतील. दुसरं म्हणजे हा विचार करायला मोकळा वेळ स्वत: सोबत द्यायला लागेल. Multi Tasking कमी करावं लागेल, आणि जे जे करतो त्यात एकरूप होऊन करावं लागेल. आपलं काम हे आपलं आयुष्य संपन्न करायला आहे, बँकेत पैसे ठेवून त्यावर उर्वरीत आयुष्य काढू म्हटलं तर नाही चालणार. ते पैसे असतील तरी ठीक, नसतील तरीही ठीक. थोडी लाचारता (हे सुद्धा मनाचे खेळ) वगैरे येईल; पण काम करता यायलाच हवे, आणि कोणतेही. कारण ते उपयुक्त तर ठरायला हवं ना !

आभार : कठीण काळा, तुझेच फक्त !


"पैसाच शेवटी कामाला येतो" हे गृहीतक मनात धरलं असेल, तर ते खरंच काढून टाका. पैशाच्या विरुद्ध आहे ही विचारसरणी असाही चुकीचा अर्थ घेवू नका. आपण करीत असलेली विविध प्रकारची काम आपल्याला मरेपर्यंत साथ देतील का , म्हणजेच करता येतील ना ? हा प्रश्न ह्याच काळाने आपल्याला विचारायला भाग पाडलेल आहे.