Wednesday 16 March 2022

हातातली कामे ही सर्वात महत्त्वाची ....

जे जे बिझनेस ग्रुप्स मी पाहतो, तिथे एक-कलमी कार्यक्रम चालू असतो, तो म्हणजे प्रमोशन. चर्चा सुद्धा ह्याच्याच की किती नवीन orders मिळाल्या, यश सुद्धा किती नवीन ग्राहक मिळविले वगैरे ह्याच्याच. इतकंच काय, तर त्या त्या खुद्द नेटवर्क चं यश सुद्धा असंच मोजलं जातं. किती नवीन members जॉईन झाले वगैरे. 

हे महत्त्वाचं आहे, तरीही फक्त हेच महत्त्वाचं नाहीये. किंबहुना, माझ्या मते तर हे दुय्यम आहे, म्हणजे अगदी मार्केटिंग च्या दृष्टीने पाहिलं तरीही. कसं ते जरा सांगायचा प्रयत्न करतो ...

आपण एखादं काम , व्यवसाय सुरु करतो, ते अर्थार्जनासाठी. म्हणजे आपण एखादा product किंवा सेवा विकतो म्हणजे पैशाच्या बदल्यात देवू करतो. त्या त्या product किंवा सेवेचा समोरच्याला ( ग्राहक, जो ग्रहण करतो तो ) काहीतरी उपयोग होतो. कोणत्यातरी purpose म्हणजे हेतू करिता. अर्थात आपण त्याचा तो हेतू साध्य करतो. आपले उत्पादन अथवा सेवा त्याच्या हेतू साध्य करण्याच्या उपयोगी पडली. ही सेवा घेताना किंवा product वापरताना, जर तो ग्राहक समाधानी झाले, तर ते शक्यतो पुढे दुसरीकडे कुठे जात नाही. आणि आपल्याला एक विश्वासू ग्राहक मिळतो. असा ग्राहक आपल्याला पुढेही इतर ग्राहक देवू शकतो. 

काही काही उत्पादने हि किंवा सेवा ह्या पुन्हा पुन्हा लागणाऱ्या असतात, किंवा एखाद्या प्रकल्पाचा भाग असतात. त्यातही पुन्हा हेच तत्त्व लागू पडतं. एखादेवेळी एखादं नवीन उत्पादन/प्रक्रिया वगैरे विकसित करायची असते, तिथेही आपण पुरवठादार ह्या भूमिकेत असलो तरी ग्राहकाच्या सोबत रहावं लागतं. ती साथ ठेवली तर आपल्याला एक कायम स्वरूपी ग्राहक मिळाल्याचं समाधान मिळेल, शिवाय आपण निवडलेल्या व्यवसायाला एक अधिष्ठान प्राप्त होईल. 

म्हणजेच दिवसाची, महिन्याची समय सारिणी ठरवताना सर्वात आधी आपला Focus हवा आपल्या Exisiting Customers वर, त्यानंतर Admin वर आणि शेवटी भविष्यातील संधींवर : ह्यातच पुढच्या orders वगैरे येईल. आधी हातातलं सांभाळणे हे सर्वात महत्त्वाचं.

हा विषय निघाला कारण मला माझं Presentation द्यायचं आहे एके ठिकाणी. त्यात ग्राहक कोण सांगू ? उथळ पणाने २ - ४ परिचित नावे लोकांसमोर फेकू शकतो (खरोखर कस्टमर असलेली) , तरीही माझ्या दृष्टीने तेच महत्त्वाचे ज्यांनी मला त्यांच्या डिजिटल मार्केटिंग च्या प्रवासात मला सोबत ठेवलं आहे. ह्यातल्या सर्वात जुन्या ग्राहकाने तर मला एकदाही, छोटासा review देखील दिलेला नाहीये. पण २०१४ पासून सोबत आहोत ह्यापेक्षा काय अधिक review असायला हवा ? 

जुन्या आठवणी शिकवतात ...

मला आठवतंय ... मला एका कस्टमर ने मशिनरीची order देताना सांगितलं होतं ... संपूर्ण होईपर्यंत आमच्या सोबत रहा ! त्यातून हेच शिकलोय, कि ग्राहकाला त्यांचे सप्लायर्स सोबत हवे असतात. हाच आपला स्वधर्म !


Thursday 10 March 2022

तेरे नाम से शुरू, तेरे नाम पे खतम

मार्केटिंग बाबत हे अगदी चपखल लागू पडतं. 

आजच एका उद्योजकाशी बोलताना मी म्हटलं की अरे तुमच्या team कडून पुढे काहीच संपर्क होत नाही म्हणून. त्यावर त्याने उलटपक्षी मलाच सांगितलं की तुम्हाला कोटेशन दिलं होतं, तुमचा काही कॉल नाही आला !

दुसरा प्रसंग लेटेस्ट. आमच्या ओळखीच्या नेटवर्क मधील एका उद्योजकांच्या ऑफिस मधून मला एक फोन आला, आणि त्या बोलणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितलं की मी तुम्हाला एक pdf पाठविली आहे, ती जरा तुमच्या नेटवर्क मध्ये शेअर करा. त्याला आगा पिछा काही नाही

अशीच गंमत काही मित्र करतात, म्हणे आज तुमच्या स्टेटस वर हे ठेवा ! का बाबा ? काही कारण त्याला ? एकाच नेटवर्क मध्ये असू आपण एखादे वेळेस, तर आम्ही कधी असा एकत्र ठरवून call घेत असतो, पण ही आगळीक ?

रिलेशन्स ही बनवावी लागतात !

व्यवसायात नाती ही तयार करावी लागतात. त्यांच्याशी संबंध जपावे लागतात, वृद्धिंगत करावे लागतात. Follow up सुद्धा घ्यावा लागतो. ग्राहक आहे म्हणून मी आहे हे विसरता कामा नये !

Re-Make नव्हे, Recreate करायला हवं .....

 

कॉपी पेस्ट नको नुसतं 

एखादी जुनी कल्पना वापरली जाताना त्याचे नुसते नवे version करण्यापेक्षा नवनिर्मिती करायचा प्रयत्न व्हायला हवा.

जुना DON कुणाला आठवणार नाही ? पण तितकाच लोकप्रिय ठरलाय नवा DON. शाहरुख वगैरे तर आहेच, शिवाय कहाणी मध्येही नवनिर्मिती आहे.

जुन्या कल्पना वापरून नवीन उत्पादने तयार करतात किंवा पुनरुज्जीवन केले जाते तेव्हा हे वापरून केल्यास खूप छान परिणाम साधता येईल.

उदाहरणादाखल Vespa स्कूटर चे घेता येईल. तोच जुना लुक, style , स्लीक पणा ठेवलाय, पण नव्याची जोड आहे, COOL आहे. "कितना देती है" चा विचार न करणारेच ती घेतील. 

असाच सुरेख मिलाफ Caravan ह्या product मध्ये आहे. जुन्या स्मृतींना साद घातलीये, पण संपूर्ण उत्पादनच नवे आहे.

आईस्क्रीम मध्येही खत्री बंधूंनी जुन्या Pot Ice Cream ला पुनरुज्जीवित केले आहे !

तुम्हाला सापडतायेत का अशी काही उदाहरणे ? नक्की शेअर करा .....

Tuesday 8 March 2022

Videos : पटकन घ्या .....


Videos हा देखील एक उत्तम कंटेंट चा form आहे. ह्याचा प्रमुख फायदा म्हणजे विशेष "लेखन" कौशल्य न लागताही हे छान spread करता येतं.

Editing वगैरे ....

केलंत तर ठीकच,पण जास्त महत्त्व त्यातल्या कंटेंट ला आहे, शिवाय उगाचच भरमसाठ videos करून सुद्धा उपयोग नाही. जे काही करायचं ते आधी आवश्यक असेल तरच करा, आणि पटकन अपलोड करून आउट करा.

कालचाच प्रसंग

काल कोल्हापूर ला होतो,तिथे BYST ऑफिस ला जाण्याचा योग आला. एक उत्साहाने सळसळणारी तरुण उद्योजिका भेटली, शिवाय आमच्या BYST च्या संबंधाने तिच्याकडे छान कंटेंट होता; ज्या द्वारे उद्योजक तसेच मेंटर्स प्रेरित होऊ शकतील. त्यामुळे लगोलग पटकन हा CANDID VIDEO करून घेतला आणि यु ट्यूब वर अपलोड पण केला !

Video ची लिंक :- https://youtu.be/_HUfr1417-A

Creative Spree

प्रेरक उबळ असं म्हणता येईल याला. ही आली मनात, की लगेच त्या झटक्यात करून घ्यायचं काम. म्हणजे पटकन कंटेंट तयार होतो. आणि share सुद्धा करून टाकायचा लवकरच !

Sunday 6 March 2022

Reviews ना अति महत्त्व नको द्यायला .....

एक केक व्यावसायिक :-

त्यांचे ४.९ रेटिंग होते, शिवाय 300 + reviews होते, एक दिवस एक फोन येतो, गुगल मधून, लेटेस्ट माहिती तपासायला, आणि लिस्टिंग hack होते. व्यावसायिक Depression मध्ये !

एक डॉक्टर :-

एक असमाधानी ग्राहक ह्यांना धमकी देतो, १ star reviews  देवून, पैसे उकळायचा प्रयत्न करतो. प्रथितयश डॉक्टर, पण टेन्शन मध्ये !

अजून एक डॉक्टर :-

ज्यांना एक review येतो, पेशंट "डॉक्टर ने जास्त पैसे लावले" असा आरोप करतो, डॉक्टर हवालदिल !

प्रत्येक गोष्ट यथावकाश settle तर होईलच. त्याचप्रमाणे ह्या तीनही केसेस settle झाल्याच. तरीही ह्यातून शिकण्यासारखे मात्र बरेच काही आहे :-
  • online हा अनेकांपैकी एक मार्ग आहे.
  • एक तर गुगल माझ्या साठी आहे, मी गुगल साठी नाही 
  • सगळे reviews गुगल ला का टाकू ?
  • नावलौकिक वाढविण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत 
  • लिस्टिंग hack झालं, माझा बिझनेस तर नाही ना !
  • Review विभागून घ्या : जेथून आले त्या त्या ठिकाणांवरून !

एक वेगळा Approach असा ...

इतका जनरल आपला व्यवसाय नसावाच मुळी ! हा एक अजून खोल नेणारा Approach आहे. असा विचार जरूर करून पहा ! म्हणजे मग reviews वगैरे विचार खूप उथळ वाटतील. आणि एक अधिक काल चालणारा, सखोल असा व्यवसाय उभा राहू शकेल !

दिलेले Referral सुद्धा निभावायला लागतात !

Referrals देणे : Networking धर्म निभावायची उत्तम संधी !

नेट्वर्किंग मधून व्यवसाय वाढतो म्हणजे फक्त leads मिळाले आणि ते Execute केले, असं नाहीये. तर आपण दिलेल्या रेफरल बद्दला सुद्धा जागरूक रहावे लागेल. 

अनेकदा मिळालेले प्रोजेक्ट्स किंवा कामे पूर्णत्त्वास नेताना दोन्ही पक्ष कुरकुर करतात. आणि मग त्यात आपण रेफरल दिलेला असला तर आपल्यावर जबाबदारी येतेच. आपण "तुम्ही तुमचं बघून घ्या" असं म्हणून झटकू शकतो जबाबदारी; एखादे वेळी असं करावे सुद्धा लागू शकेल, पण त्याचीही स्टेज असते. आणि आपण बांधील राहतोच !

आपली भूमिका त्रयस्थ असावी ! 


कोणतीच Side बरोबर किंवा चूक नसते अशा प्रोजेक्ट्स मध्ये. आपण त्रयस्थ राहावे, आणि त्याना त्यांचा dispute सोडविण्याला प्रोत्साहन द्यावे, इतकेच ! त्यांनी कुणीही काही निर्णय घेऊन टाकला असेल, तर आपण खरे तर काही करू शकत नाही. आपली गरज वाटत सुद्धा नसेल त्यांना कदाचित ! हे देखील ठीकच आहे की.

Tuesday 1 March 2022

क्या खाना, तो दम खाना !


माझे डॉक्टर मित्र ( व ग्राहक सुद्धा ) ह्यांनी ही तिरळी ( ४ ऐवजी ३ ओळींची म्हणून चारोळी ऐवजी ) पाठवली. हसून हसून बेजार तर झालोच, शिवाय स्वधर्म सुद्धा ह्याला relate करावासा वाटला.

दुसऱ्याकडे पाहून आपलं काम ठरवलं की असं होतं 

वेळेनुसार आपल्या offer मध्ये बदल करावा लागतो हे सत्य आहे. कधी कधी अगदी survival च धोक्यात आले असेल तर हे 180 डिग्री change करावे लागतातही. तरीही स्वैरपणे आपला बिझनेस बंद-चालू करणे, तो बदलणे, त्यात सतत बदल करत राहणे इ प्रकारांनी आपला ब्रँड नक्की धोक्यात येईल.

अल्ला देख रहा है 

जसं आपण एखाद्याबद्दल मत सावकाशीने बनवतो,तसेच आपल्याबद्दल सुद्धा होत असते. हे का होतं याचा मी जवळून अभ्यास केलेला आहे, आणि विद्यार्थी सुद्धा मीच आहे😊 . " झटका " किंवा " लहर " आली आणि कहर केला असं होतं. 

प्रतिक्रिया सौम्य करणे हा इलाज 

माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की कितीही माझा झोन किंवा माझा स्वभाव, मी जरा वेगळा आहे असं जरी मी छातीठोकपणे म्हणालो ना,तरीही मला जगायला त्याच वस्तू लागतात ज्या चारचौघांना लागतात. त्यामुळे मला जगाला फाट्यावर नाही मारता यायचं. मला xट पण फरक पडत नाही हे म्हणणं खूप स्वैर आहे. त्यामुळे मलाही ultimately त्याच गोष्टी मिळवायच्या असतील,तर चारचौघांसारखे थोडे तरी वागायला लागेलच. त्यातलाच एक भाग म्हणजे एकदम प्रतिक्रिया न देणे, दिलीच तर सौम्य देणे. आवडलेल्यालाही, नावडलेल्यालाही.

आत मधली प्रतिक्रिया जास्त महत्त्वाची !

एखादी उबळ आली की आधी शांत होऊन म्हणावं " हा आणखी एक विचार आहे " ना भारी, ना बंडल ना अजून काही. क्या खाना तो दम खाना !