Tuesday, 1 March 2022

क्या खाना, तो दम खाना !


माझे डॉक्टर मित्र ( व ग्राहक सुद्धा ) ह्यांनी ही तिरळी ( ४ ऐवजी ३ ओळींची म्हणून चारोळी ऐवजी ) पाठवली. हसून हसून बेजार तर झालोच, शिवाय स्वधर्म सुद्धा ह्याला relate करावासा वाटला.

दुसऱ्याकडे पाहून आपलं काम ठरवलं की असं होतं 

वेळेनुसार आपल्या offer मध्ये बदल करावा लागतो हे सत्य आहे. कधी कधी अगदी survival च धोक्यात आले असेल तर हे 180 डिग्री change करावे लागतातही. तरीही स्वैरपणे आपला बिझनेस बंद-चालू करणे, तो बदलणे, त्यात सतत बदल करत राहणे इ प्रकारांनी आपला ब्रँड नक्की धोक्यात येईल.

अल्ला देख रहा है 

जसं आपण एखाद्याबद्दल मत सावकाशीने बनवतो,तसेच आपल्याबद्दल सुद्धा होत असते. हे का होतं याचा मी जवळून अभ्यास केलेला आहे, आणि विद्यार्थी सुद्धा मीच आहे😊 . " झटका " किंवा " लहर " आली आणि कहर केला असं होतं. 

प्रतिक्रिया सौम्य करणे हा इलाज 

माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की कितीही माझा झोन किंवा माझा स्वभाव, मी जरा वेगळा आहे असं जरी मी छातीठोकपणे म्हणालो ना,तरीही मला जगायला त्याच वस्तू लागतात ज्या चारचौघांना लागतात. त्यामुळे मला जगाला फाट्यावर नाही मारता यायचं. मला xट पण फरक पडत नाही हे म्हणणं खूप स्वैर आहे. त्यामुळे मलाही ultimately त्याच गोष्टी मिळवायच्या असतील,तर चारचौघांसारखे थोडे तरी वागायला लागेलच. त्यातलाच एक भाग म्हणजे एकदम प्रतिक्रिया न देणे, दिलीच तर सौम्य देणे. आवडलेल्यालाही, नावडलेल्यालाही.

आत मधली प्रतिक्रिया जास्त महत्त्वाची !

एखादी उबळ आली की आधी शांत होऊन म्हणावं " हा आणखी एक विचार आहे " ना भारी, ना बंडल ना अजून काही. क्या खाना तो दम खाना !


No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.