Tuesday 30 August 2022

Reactiveness कमी व्हायलाच हवा....

एखादया क्षेत्रात सखोल अभ्यास करून यश प्राप्त करायचं असेल,तर सर्वात आधी काय करावं तर आपलं ध्यान म्हणजे व्यवधान ( Attention ) कुठे विखुरले आहे हे शोधून काढणे व (सध्या) नकोसे विषय either थांबविणे किंवा त्यात कमी - जास्त गुंतणे. नको त्या विषयांत विखुरलेली आपली ध्यान - ऊर्जा थांबविणे. ह्याने खूप चांगला परिणाम मिळतो ह्यात वाद नाही.

एखादा विषय म्हणजे केवळ त्यातील task execute करतानाच फक्त जाणारा वेळ नव्हे 
त्यात काय, अमुक तमुक ठिकाणी आठवड्यातून किंवा महिन्यातून दोन चारच तास द्यायचे आहेत ना ! असा विचार आपण करतो. तर फक्त त्या ठिकाणी जाणारा वेळ नसतो तो, तर तो वेळ राखून ठेवण्याकरिता आपण करत असलेले अनेक उपाय, अनेक गोष्टी... ह्याचं काय ? ह्यातही जितकी लांब पल्ल्याची commitment तितका हा holding period चा राखीव वेळ वाढतो. हे एकदा फ्री करून बघा, किती relief वाटेल. हा वेळ मग अगदी फक्त ठरवलेल्या फोकस deep कामांनाच द्यायचा. खूप फरक पडतो.

प्रतिक्रिया संयत देणे फायदेशीर ठरते
बाहेरचे सोडा,आधी आपले मनच इतक्या प्रतिक्रिया देतं! शिवाय बाहेरचं आहेच. प्रतिक्रिया न देणे ह्याची सुद्धा एक नवीन सवय अंगिकारली तर हळूहळू आत निर्माण होणारे तरंग सुद्धा कमी व्हायला लागतात. परिणामी आपल्याला फक्त आपल्या कामावरच लक्ष द्यायला वेळ राहतो, ज्याला आपण focus केलंय. अवघड आहे हे ... सोप्पे नाही.

गावस्कर, तेंडुलकर, धोनी ह्यांनी प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू sledging करत असताना देखील अत्यंत शांतीत आपले आपले काम केलेलं आहे. परिणाम त्यांचे लांब करियर आपण पाहतो.

Saturday 20 August 2022

धंदा खरोखर वाढवायचाय ?

बिझनेस दुप्पट किंवा अधिक पट करण्याचा जलद मार्ग :-

आपल्या व्यवसायासाठी Evergreen कनेक्ट कोणते हे ठरवा.

आपली एक अशी सेवा किंवा उत्पादन असतं, जे अनेक वर्षे आपल्याला अर्थार्जन करून देत आहे. ह्याकरिता जे संपर्क उपयुक्त पडतील, असे संपर्क म्हणजे Evergreen Connects. हे सोडून आपल्याला काही Connects नैमित्तिक देखील हवे असतात. उदा. काही प्रासंगिक event केला वगैरे. ह्याच्याकरिता हे Deep Network नका वापरू. ह्याकरीता जाहिरात वगैरे उपयुक्त होऊ शकेल.

विविध नेटवर्क मधून आपल्यासाठी खरेच काम करणारे पार्टनर्स निवडा.

सरसकट सगळ्यांसोबत १ टू १ करीत बसायचे नाही. ठराविक लोक निवडायचे. हे ठराविक कोण ? ते आपल्या क्षेत्रातील असतीलच असे नाही. हे जास्तीत जास्त २ ते ३ च असतील. कमी तितके चांगले. सुरुवातीला अगदी एकच असला तरीही चालेल.

आपली विविध Online profiles तयार ठेवा, अद्ययावत ठेवा.

आपल्या समोर काय घडतं ह्यापेक्षा पाठीमागे काय हे लक्षात घ्यायला हवे. एकदा भेट झाल्यानंतर आपल्याविषयी लोक बऱ्याच वेळा Stalk करतात. म्हणजे काय, तर "कोण हा/ही नक्की " असा Online शोध घेतात. इथे खरी मेख असते. आणि खरी संधी सुद्धा. कारण इथे त्या व्यक्तीला आपल्या profile मध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला असतो, आणि उथळ पृष्ठभाग सोडून तो/ती जरा बुडी मारायच्या मूड मध्ये असतो. इथे खरं Conversion चं पहिलं बीज पेरलं जातं. इथे तयार हव्यात निदान ह्या गोष्टी :-
  1. तुमच्या बद्दल Sensibly बोलणारी एक Website ( आकर्षक नसली तरी Okk )
  2. तुमचं एक Linked-In Profile ज्यात तुमच "काम" दिसेल ( विश्वासार्हता )
  3. तुमचं पोस्टिंग - विषयाला धरून लिहिताय का ( Likes, Follwers पाहणारे आपले कस्टमर नसतात )

Follow-Up चे Automation करा 

नुसती कार्ड्स ची देव-घेव झाली की धंदा होत नाही. तसेच आपली profiles सुद्धा अशीच नाही कळणार लोकांना. ती ( योग्य त्या ) त्यांच्याकडे पाठवा आणि पाठपुरावा करण्यासाठी एक Automated System वापरा, जेणेकरून तुम्हाला आपोआप कळेल कि ...
  • कोणत्या दिवशी कुणाला काय पाठवायचे आहे 
  • कुणाला Offer दिली आहे, कुणाचा Follow-Up Due आहे
  • कुणाचे Renewal आहे 
  • कोणत्या खास ग्राहकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे वगैरे 
ह्या systems वापरायला विशेष तांत्रिक ज्ञान लागत नाही. आवश्यक आहे ती Conversion करण्याची भूक.

दोन्हीकडून Traffic हवे 

नेट्वर्किंग मध्ये  "देव-घेव करणारे" हवेत . म्हणजे ते आपण दिलेले रेफरल निभावतात, तसेच आपल्यालाही देतात

अगदीच नवखे नको 

ही मंडळी निरागसपणे, खरोखर चांगल्या भावनेने देतात, पण ते तितके Qualified Connects असतीलच असे काही नाही.

"Shiners" पासून दूरच 

हे नुसते भाव खातात. यांना फक्त मान आणि स्टेटस हवं असतं. हे लोक जरा दूरच ठेवा.


हा स्वार्थीपणा नाही. आपल्या अपेक्षा असतात आणि ते गैर नाही. आपणच देतोय, आणि समोरचा नुसता घेतोय, हे समजण्या इतके सुज्ञ तर प्रत्येक जण असतोच. उगाच स्वत:वर संशय घेऊ नका. स्वत:च्या समजुतीवर ठाम विश्वास ठेवा.

अपेक्षित बदल मोजायचं माप काय ?

मला धंदा दुप्पट करायचाय तर तो एखाद्यासाठी त्याची मिळणारी फी असेल, एखाद्यासाठी turnover. तर आज काय स्थिती आहे ही तारीखवार लिहून ठेवा.

ठराविक पार्टनर सोबत वारंवार भेटा 

आपण १,2 किंवा ३ च *Deep Referral Partner निवडतोय . तर त्याच्यासोबत आठवडा किंवा १५ दिवसातून एक मीटिंग ठरवा, आणि त्या वेळी गेल्या वेळी देव-घेव केलेले referrals चा Follow-Up घ्या. ह्यामुळे निश्चित फरक पडतो हा माझा अनुभव आहे.

* हा Deep referral पार्टनर कोणत्याही network चा असेल, धंदा वाढण्याशी मतलब. 

फार Fundamental चर्चा नकोत 

पार्टनर वर विश्वास ठेवू. त्याला त्याचा धंदा सगळ्यात जास्त समजतो. त्याच्यावर विचारमंथन, चर्चा, मार्ग दर्शन टाळू. आपण referral Partner बनूयात. Mentor / Coach नाही. जरी आपला व्यवसाय हा असेल, तरीही.


Thursday 18 August 2022

तरीही तुम्हाला लिहावंसं वाटतंय का ?

कालच एका मित्राशी चर्चा करताना विषय निघाला, ते linked in वर अनेक वर्षे लिहित असतात. त्यांच्या एका मित्राची तक्रार सांगत होते ... " काही Likes नाहीत, comments नाहीत, काही उपयोग नाही " 

चांगलं आहे. तरीही तुम्हाला लिहावंसं वाटतंय का ?

नील पसरिचा नावाचा एक लेखक आहे, ज्याचं एक podcast आहे त्यात त्याने म्हटलंय कि रोज माझी व्यक्त व्हायची जागा म्हणजे माझा blog. तो सलग ३ वर्षे हून अधिक , रोज एक blogpost लिहित असे. "आज काय चांगलं घडलं" इतकाच विषय. स्वत:शीच संवाद. आज त्याचा podcast सर्व ऐकतात, ह्यातच यश आलं की ! पण असं काही नाही झालं, किंवा खात्री दिली गेली, 

तरीही तुम्हाला लिहावंसं वाटेल का ?

Blog म्हणजे व्यक्त होणे हो ! platform कोणताही असेल. blogger, इमेल लिस्ट, whatsapp किंवा चक्क आपली डायरी. स्वत:शी उत्स्फुर्तपणे झालेला संवाद, मार्केटिंग साठी नव्हे. Marketing मध्ये ing म्हणजे करणे ... थोडा push आहे. आपण म्हणतोय ते "होणारं" ... आतून सळसळून बाहेर यायला मागणारं. किती हवं, काही प्रमाण नाही. कसं हवं ... काहीही चालतंय ... बोलायचं असेल, तर mobile वर करा रेकॉर्ड. Video नाही म्हणणार मी कारण त्यात थोडं दिसणं वगैरे आलं.

आता तरी तुम्हाला लिहावंसं वाटेल का ?

आमच्या मित्राच्या कथेतला उर्वरित भाग सांगतो : ते स्वत: जे आवश्यक वाटेल तेच लिहितात, शिवाय सगळा प्रत्यक्ष अनुभवच लिहितात, Forwarded काहीच नाही, ४-५ वर्ष तरी लिहितायेत ( न मोजता ) . आणि त्याना त्यातून कस्टमर मिळतात. 🙋

आता ( तरी ) कदाचित लिहाल .....

हे कस्टमर तुमच्या कोणत्याही पोस्ट ला LIKE/COMMENT/SHARE करणारे अजिबात नसू शकतात. आणि  ४-५ वर्षात एखादा मिळेल, ह्याची काहीच शाश्वती नाही. 

तरी लिहाल ?

तुम्हाला लौकिक यश असेल, तरी आणि नसेल ( तुमच्याच मनात ) तरीही लिहा. कारण हा प्रवास आहे. प्रवासवर्णन समजून लिहा. ह्याचा जगाला , निदान एखाद्याला तरी, कधी तरी, कुठे तरी निश्चित उपयोग होईल. गेला बाजार .. तुम्हाला भीड भाड न बाळगता व्यक्त व्हायला तर मिळेल !

आता ( तरी ) लिहा !

Wednesday 17 August 2022

Co Working....

Co Working हा Start Ups साठी नवा प्रकार नाही. आमच्या स्नेही स्वप्ना कुलकर्णी ज्या स्वतः एक CA आहेत, त्या अनेक वर्षे Indicube co-working मधून काम करतात.

Co-working म्हणजे एकत्रित resources वाटून घेणे. Concept नवीन नाही. आमच्या वेळी टेबल स्पेस, केबिन स्पेस होतंच. मी तसेच माझ्या अनेक मित्रांनी अशा प्रकारे व्यवसाय केलेला आहे.माझा पहिला जरा बरा उद्योग बोरिवली पूर्व येथून टेबल स्पेस मधून सुरू झाला. नंतर बोरिवली खूप लांब पडू लागलं, तर ठाणे पश्चिम येथे पंडित हाऊस मधून अनेक वर्षे मी व्यवसाय केला. ही देखील केबिन स्पेस. नंतर पुण्यात आल्यावर सुद्धा कृष्ण लीला चेंबर ही केबिन स्पेस होती.

Concept तोच फक्त attributes बदललेत. पूर्वी एक ऑपरेटर फोन घेऊन intercom द्वारे transfer करी, आता mobile जमान्यात हे गायब झाले आहे. पण बाकी तसेच आहे. नाही म्हणायला जरा access control, Mobile वर SMS वगैरे गोष्टी आल्यात, तरी जुनी दारूच नवीन बाटलीत. 

तसे पाहता, startup शब्द नवीन. Concept तोच की !

Rework मध्ये स्टार्टअप प्रकाराची पार करून टाकली आहे !
तर या नव्या co-working मध्ये work station share होतात, wifi अमर्यादित राहते, AC असतो, व शांतता ही. स्वप्ना ह्यांच्या WORK SPACE चे भाडे ८००० आहे. Area उत्तम आहे. एखाद्याला सुरूवात करायला उत्तम पर्याय ( जर कुणी येणार असेल आपल्याकडे तर )

आपले विचार ?????

Monday 15 August 2022

Cloud Kitchen : अधिक फायदेशीर?


जवळच असलेल्या उपहारगृहात हा sticker पाहण्यात आला. Zomato हा platform वापरून hotels ही cloud kitchens मध्ये कशी रुपांतरीत होत चालली आहेत ह्याचे एक उदाहरण. अजून दोन उदाहरणे काल पाहण्यात आली :-

एक ठिकाणी छोले छान मिळतात म्हणून गेलेलो काल. ते छान वगैरे होतेच, शिवाय भरपुरही होते. माझा मित्र म्हणाला ... घरी पाठवलं ना,तर काय - काय अजून पाठवतात. शिवाय इथे बसून खायला जागाच नाही. उभ्या उभ्याच कार्यक्रम उरकायचा. शिवाय मोजका मेनू. त्यातूनच निवडा. किंमत अगदी रास्त. जागा स्वच्छ.

जवळच आशाज टिफीन म्हणून आहे, तुफ्फान गर्दी असते. ह्यांचे मॉडेल हेच. पार्सल तयारच असतात. ह्यांचे पार्सल अगदी छान. लगेच swigi Zomato तयारच असतात.

माझ्या मित्राने जवळच राहण्याचे hotel सुरू केलंय. त्यात food licences ची झंझट नको,म्हणून ह्यांच्याशी tie up karun ठेवला आहे. ब्रेकफास्ट आशा मधून included in Price. 

आहे की नाही कल्पक ?


Saturday 13 August 2022

खालून वर की वरून खाली ?


हा फोटो घेतलाय मी साधारण ६ व्या मजल्यावरून. फोटो किती सुरेख वगेरे प्रश्न नाहीये, सांगायचं वेगळेच आहे. इथे इमारतींच्या गच्च्यांवर एका नजरेत दिसून येतं,की साधारण सोलर सिस्टीम किती लोकांनी लावली आहे ते. बऱ्याचदा निर्बुद्ध पणे survey करत भरपूर साधने, वेळ खर्ची पडतात आणि हे conclusion मिळत नाही.

हेच लॉजिक problem solving ला लावून पाहू. KRA म्हणजे एखाद्या अभेद्य अशा परिस्थितीतून बाहेर पडायला नक्की कुठे काम करायला हवे असा प्रश्न जेव्हा भेडसावतो,तो तेव्हा EXACTLY हा दृष्टीकोन कामाला येतो. तर मी पटकन त्या परिस्थितीच्या बाहेर नाही, तर वर जातो, आणि पाहतो की नक्की परिणाम कुठे घडवून आणायचे आहेत. मग KPI म्हणजे मापदंड काय हे ठरवायला वेळ लागत नाही.

जास्त क्लिष्ट ( शब्दच किती क्लिष्ट आहे ) बोललोय का मी ? ठाऊक नाही. पण मते द्या !

Thursday 11 August 2022

Automation म्हणजे ग्राहक संवादाला फाटा नव्हे...


दांडेकर पुलाजवळ अनेक बसेस चा पिकप point आहे. इथे उभा असताना जाणवलेल्या काही गोष्टी. अर्थात प्रवासाला निघालोय त्या निमित्ताने :-

१. इतक्या बसेस इथे जात - येत असतात, तरी प्रवाशांसाठी एक साधं बाक सुध्दा नाही. बस स्टॉप असायला काय हरकत ? खास करून पावसाळ्यात तर फार गरज आहे. साधी हातातली bag सुद्धा खाली ठेवायला नको वाटते.

२. इथे एकही प्रवासी बस कंपनीने शौचालयाची सोय केलेली नाही. 

३. कधी कधी बसेस यायला वेळ लागतो. निदान चहा - पाणी तरी एखादी बरी टपरी असावी.

४. तुमचे उद्या बुकिंग आहे, असे air bnb चे तसेच bus अमुक ठिकाणी आहे वगैरे असे redbus किंवा Konduskar चे मेसेज येतात. पण प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या बिझनेस कडून उदा. Konduskar कडून किंवा airbnb मधून ज्याच्याकडे property किंवा हॉटेल बुक केलेलं आहे त्या hotel कडून एक थेट फोन आला, (फोन + मेसेज आला तर अधिक उत्तम) तर ! नव्या जागी जाताना असंख्य प्रश्न असतात, "मी आहे" असं सांगणारा, खात्री देणारा आवज ऐकला की खूप जास्त sure वाटतं!

५. खास करून Airbnb वर बुकिंग करणे जरा क्लिष्ट आहे, शिवाय कुणीच मार्गदर्शन करत नाही. त्या property owner कडून एखादा कॉल गेला, तर अनेक लोक दुवा देतील. शिवाय त्या property owner चा व्यवसाय देखील निश्चित वाढेल. 

६. अशीच गोष्ट पीकप points ची: दांडेकर पुलासारख्या महत्त्वाच्या स्टॉप वर तरी ( खरे तर प्रत्येकच ) एखादा मनुष्य असेल तर ! हा आपला ब्रँड ॲम्बेसेडर होवू शकतो. नंतर reviews साठी खटपट करायची गरजच पडणार नाही

७. बस मध्ये सर्व सोय आहे, एक public address system सुद्धा आहे. Stop सुद्धा ठरलेले आहेत. मग रेल्वे लोकल किंवा airport सारखे announcement चे pre Recorded मेसेजेस का बरं प्ले करता येवू नयेत ?

८. पूर्वी ह्या app जमान्याच्या आधी एकदा मुंबई सेंट्रल एस्टी डेपो तून bus निघायच्या पूर्वी एक stand वरून एक अगदी up to date वेशातला मनुष्य आला,त्याने इत्यंभूत माहिती दिली, की एस्टी कुठे कुठे थांबेल, किती वाजता वगैरे. इतकेच काय , तर गरजेला "पिशव्या" मागून घ्या असेही सांगितले. त्याला ना app लागली,ना मोबाईल, ना वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश. फक्त भान एकच ... प्रवाशांच्या सेवेसाठी.

नुसते scale up किंवा automation करून उपयोग नाही; किंवा नुसतं तंत्रज्ञानाच्या विरुद्ध जाऊनही उपयोगी नाही. दोन्हींचा मेळ हवा. 

आपली मते द्या. आवडेल.