बिझनेस दुप्पट किंवा अधिक पट करण्याचा जलद मार्ग :-
आपल्या व्यवसायासाठी Evergreen कनेक्ट कोणते हे ठरवा.
आपली एक अशी सेवा किंवा उत्पादन असतं, जे अनेक वर्षे आपल्याला अर्थार्जन करून देत आहे. ह्याकरिता जे संपर्क उपयुक्त पडतील, असे संपर्क म्हणजे Evergreen Connects. हे सोडून आपल्याला काही Connects नैमित्तिक देखील हवे असतात. उदा. काही प्रासंगिक event केला वगैरे. ह्याच्याकरिता हे Deep Network नका वापरू. ह्याकरीता जाहिरात वगैरे उपयुक्त होऊ शकेल.
विविध नेटवर्क मधून आपल्यासाठी खरेच काम करणारे पार्टनर्स निवडा.
सरसकट सगळ्यांसोबत १ टू १ करीत बसायचे नाही. ठराविक लोक निवडायचे. हे ठराविक कोण ? ते आपल्या क्षेत्रातील असतीलच असे नाही. हे जास्तीत जास्त २ ते ३ च असतील. कमी तितके चांगले. सुरुवातीला अगदी एकच असला तरीही चालेल.
आपली विविध Online profiles तयार ठेवा, अद्ययावत ठेवा.
आपल्या समोर काय घडतं ह्यापेक्षा पाठीमागे काय हे लक्षात घ्यायला हवे. एकदा भेट झाल्यानंतर आपल्याविषयी लोक बऱ्याच वेळा Stalk करतात. म्हणजे काय, तर "कोण हा/ही नक्की " असा Online शोध घेतात. इथे खरी मेख असते. आणि खरी संधी सुद्धा. कारण इथे त्या व्यक्तीला आपल्या profile मध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला असतो, आणि उथळ पृष्ठभाग सोडून तो/ती जरा बुडी मारायच्या मूड मध्ये असतो. इथे खरं Conversion चं पहिलं बीज पेरलं जातं. इथे तयार हव्यात निदान ह्या गोष्टी :-
- तुमच्या बद्दल Sensibly बोलणारी एक Website ( आकर्षक नसली तरी Okk )
- तुमचं एक Linked-In Profile ज्यात तुमच "काम" दिसेल ( विश्वासार्हता )
- तुमचं पोस्टिंग - विषयाला धरून लिहिताय का ( Likes, Follwers पाहणारे आपले कस्टमर नसतात )
Follow-Up चे Automation करा
नुसती कार्ड्स ची देव-घेव झाली की धंदा होत नाही. तसेच आपली profiles सुद्धा अशीच नाही कळणार लोकांना. ती ( योग्य त्या ) त्यांच्याकडे पाठवा आणि पाठपुरावा करण्यासाठी एक Automated System वापरा, जेणेकरून तुम्हाला आपोआप कळेल कि ...
- कोणत्या दिवशी कुणाला काय पाठवायचे आहे
- कुणाला Offer दिली आहे, कुणाचा Follow-Up Due आहे
- कुणाचे Renewal आहे
- कोणत्या खास ग्राहकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे वगैरे
ह्या systems वापरायला विशेष तांत्रिक ज्ञान लागत नाही. आवश्यक आहे ती Conversion करण्याची भूक.
दोन्हीकडून Traffic हवे
नेट्वर्किंग मध्ये "देव-घेव करणारे" हवेत . म्हणजे ते आपण दिलेले रेफरल निभावतात, तसेच आपल्यालाही देतात.
अगदीच नवखे नको
ही मंडळी निरागसपणे, खरोखर चांगल्या भावनेने देतात, पण ते तितके Qualified Connects असतीलच असे काही नाही.
"Shiners" पासून दूरच
हे नुसते भाव खातात. यांना फक्त मान आणि स्टेटस हवं असतं. हे लोक जरा दूरच ठेवा.
हा स्वार्थीपणा नाही. आपल्या अपेक्षा असतात आणि ते गैर नाही. आपणच देतोय, आणि समोरचा नुसता घेतोय, हे समजण्या इतके सुज्ञ तर प्रत्येक जण असतोच. उगाच स्वत:वर संशय घेऊ नका. स्वत:च्या समजुतीवर ठाम विश्वास ठेवा.
अपेक्षित बदल मोजायचं माप काय ?
मला धंदा दुप्पट करायचाय तर तो एखाद्यासाठी त्याची मिळणारी फी असेल, एखाद्यासाठी turnover. तर आज काय स्थिती आहे ही तारीखवार लिहून ठेवा.
ठराविक पार्टनर सोबत वारंवार भेटा
आपण १,2 किंवा ३ च *Deep Referral Partner निवडतोय . तर त्याच्यासोबत आठवडा किंवा १५ दिवसातून एक मीटिंग ठरवा, आणि त्या वेळी गेल्या वेळी देव-घेव केलेले referrals चा Follow-Up घ्या. ह्यामुळे निश्चित फरक पडतो हा माझा अनुभव आहे.
* हा Deep referral पार्टनर कोणत्याही network चा असेल, धंदा वाढण्याशी मतलब.
फार Fundamental चर्चा नकोत
पार्टनर वर विश्वास ठेवू. त्याला त्याचा धंदा सगळ्यात जास्त समजतो. त्याच्यावर विचारमंथन, चर्चा, मार्ग दर्शन टाळू. आपण referral Partner बनूयात. Mentor / Coach नाही. जरी आपला व्यवसाय हा असेल, तरीही.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.