Saturday, 13 August 2022

खालून वर की वरून खाली ?


हा फोटो घेतलाय मी साधारण ६ व्या मजल्यावरून. फोटो किती सुरेख वगेरे प्रश्न नाहीये, सांगायचं वेगळेच आहे. इथे इमारतींच्या गच्च्यांवर एका नजरेत दिसून येतं,की साधारण सोलर सिस्टीम किती लोकांनी लावली आहे ते. बऱ्याचदा निर्बुद्ध पणे survey करत भरपूर साधने, वेळ खर्ची पडतात आणि हे conclusion मिळत नाही.

हेच लॉजिक problem solving ला लावून पाहू. KRA म्हणजे एखाद्या अभेद्य अशा परिस्थितीतून बाहेर पडायला नक्की कुठे काम करायला हवे असा प्रश्न जेव्हा भेडसावतो,तो तेव्हा EXACTLY हा दृष्टीकोन कामाला येतो. तर मी पटकन त्या परिस्थितीच्या बाहेर नाही, तर वर जातो, आणि पाहतो की नक्की परिणाम कुठे घडवून आणायचे आहेत. मग KPI म्हणजे मापदंड काय हे ठरवायला वेळ लागत नाही.

जास्त क्लिष्ट ( शब्दच किती क्लिष्ट आहे ) बोललोय का मी ? ठाऊक नाही. पण मते द्या !

4 comments:

  1. Very correct example. Overviw and then define an issue.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या पुस्तकातून प्रेरणा .....

      Delete
  2. नक्की कुठे काम करायला हवं, असा प्रश्न नाही तर स्थिती निर्माण होते, तेव्हा मी बाहेर नाही आणि वर तर अजिबात जात नाही, तर ती जी काय स्थिती असते त्या स्थिती सोबत थांबतो, मग ती अवस्था अथवा स्थितीच मार्ग दाखवते,,या अवस्थेतला माझा प्रवास तब्बल 15 वर्ष सुरू आहे, त्यात्या वेळच्या स्थिती सोबत राहिल्याने भरकटलो नक्कीच नाही।

    ReplyDelete
    Replies
    1. बर. तरीही जर त्याच्या वर आला असतात, तर त्या त्या वेळी नक्कीच वेगळे , अधिक जलद बाहेर पडायचे मार्गही सुचले असते. कित्येकदा त्या त्या स्थितीत राहिल्यानेच आपण बाहेर पडत नसू.

      Delete

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.