Showing posts with label डिजिटल मार्केटिंग. Show all posts
Showing posts with label डिजिटल मार्केटिंग. Show all posts

Monday, 6 July 2026

आशेचा एक लहानसा किरण

मी आता खाली एक इमेज शेअर करतोय. कदाचित तुम्हाला काही समजणार नाही, पण मी समजावून सांगतो, आणि समजावून घ्या. कदाचित तुम्हाला बहुमोल माहिती मिळेल, उपयोग होईल.


ह्यात नमूद केलेल्या आकड्यांचा संदर्भ 


मी ह्यापूर्वी एक लेख दिला होता कि ज्यात मी गुगल सर्च कन्सोल नावाच्या विनामुल्य उपयुक्ततेबद्दल लिहिले होते, ज्याद्वारे मी माझ्या जखमी व्यवसायाबद्दल ( धन्यवाद AI ) बोललो होतो. 

त्यात माझ्या वेबसाईट वरच्या काही ( बहुतेक सर्व ) इमेजेस ह्या नवीन Algorythm नुसार मोबाईल वापरकर्त्या मंडळींना अजिबात योग्य वेळात लोड होत नसल्याने गुगल माझ्या website चा अनुभव Poor म्हणून गणत होते. त्या मी आता Improvement करिता परिश्रम घेतो आहे. त्याचे पहिल्या टप्प्यातील सदर निकाल आहेत :-

आकड्यांचा अर्थ

  

१. Core Web Vitals : ह्यात फरक पाडणाऱ्या प्रमुख बाबी ( उदा. इमेजेस ) बद्दल बोलले गेले आहे. 
२. ह्यात सध्याची स्थिती दिलेली आहे. २९ हा सध्याचा ( जून 26 ) आकडा आहे. म्हणजे अशा २९ ठिकाणी अजूनही Poor अनुभव येतोय, २१ ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे. एकूण ५० आहेत. 
३. प्रवास Poor कडून Good कडे :- अजूनही Good URL नाहीयेत. परंतु एप्रिल मध्ये काम करायला घेतले तेव्हा सर्व ५० जागा Poor होत्या. लाल रंग Poor , नारिंगी रंग ठीकठाक , तर हिरवा रंग उत्तम दर्शवतो. प्रवास पाहता येईल.

ह्या सगळ्याचा काय उपयोग ?


माझे घसरलेले Ranking सुधारणे. आणि मला पूर्ववत विचारणा सुरु व्हाव्यात. अर्थात हे एका रात्रीत होणारे काम नाहीच. शिवाय हे एकमेव नाही. ह्याच्या जोडीने अनेक गोष्टी कराव्या लागतात, करत राहाव्या लागत आहेत. आणि तरीही आव्हानात्मक आहेच. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शोध घेणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनातच आता फरक पडला आहे.

क्रमशः पुढचा अपडेट पोस्ट करेनच !

Saturday, 21 March 2026

गुगल सर्च कन्सोल : एक दुर्लक्षित उपयुक्तता

काही वर्षे माझी अशी समजूत झाली होती ( आणि ती काही अंशी खरी सुद्धा होती ) , की आता महत्त्व ( फक्त ) व्हिडीयोज ना द्यावे. कारण सुमारे २०१३ पासून माझ्या web वरची माझी खरी मालमत्ता ( म्हणजे माझी website ) तर तयार आहेच; शिवाय ती बऱ्या पैकी पहिल्या पानावरचे स्थान राखून सुद्धा आहेच. 

परिणाम स्वरूप २०१९ नंतर ( जवळ जवळ ७ वर्षे ) मी website साठी काही कंटेंट लिहिला नाही, शिवाय त्याकडे काही लक्ष देखील पुरवले नाही. 

विचार इतकाच : की व्यवसायात काही बदल झालेला नाहीये, की त्याच्या स्वरुपात, पद्धतीत. आणि जे काही विचार मांडायचे आहेत, ते तर Youtube द्वारे सुरूच आहेत की.

गेल्या काही महिन्यांतला बदल 

गेल्या ( खरे तर वर्षभर ) सहा महिन्यांत , आणि जास्त करून जानेवारी पासून एक विचित्र अनुभव येत आहे, की मला ट्रेनिंग करिता येणारी मंडळी अगदी गंभीर रित्या कमी झालेली आहेत. 

प्रत्येक तिमाही ला आढावा घेण्याच्या पद्धतीचा खूप मोठा फायदा 

गेले दोन वर्षे आम्ही प्रत्येक तिमाही ला बसून परिस्थिती चे मूल्यमापन करतो, शिवाय पुढच्या तीन महिन्या मध्ये अगदी काही झाले तरी कार्य पद्धतीत मोठ्ठे बदल करत नाही. उलट सखोल विचार करणे, मूळ तत्वांना धक्का न लावणे ह्या गोष्टी कसोशीने पाळतो. ह्यामुळे "नक्की काय होत असेल" ह्याचा नीट विचार करता आला. नाहीतर उथळ विचारांना बळी पडून मोठे नुकसान होऊ शकते. 


काय आढळले ?

आम्ही विचार करत होतो, तसा बाह्य परिस्थितीचा विशेष फटका बसलेला नाहीये

तर लोकांच्या माहिती शोधण्याच्या पद्धतीत घडून आलेला बदल ह्याचं आहे हा फटका. 
तरुण मुले , तसेच ज्यांना ठावूक आहे अशी सर्व मंडळी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्रास वापर करतात.
जी मंडळी पारंपारिक गुगल सर्च वापरतात, त्यानाही प्रथम कृत्रिम बुधीमत्तेचाच पर्याय दिसतो. 


फरक कसा पडला आहे ?

आता Chat GPT किंवा Gemini मुळे मंडळी व्यक्तिगत प्रश्न विचारतात. 

ही नवी सर्च इंजिने त्यांचे व्यक्तिगत मुद्देसूद, आस्थेने अमर्यादित, उलट सुलट शंका निरसन करतात. ही उत्तरे ही इंजिने इंटरनेट वरूनच शोधतात. ही सर्वात सुयोग्य उत्तरे सर्वात जलद देण्याची कटीबद्धता गुगल अर्थातच राखून आहे. माझ्या पाहण्यात आले, की गेल्या ६ आणि खास करून ३ महिन्यापासून गुगल आता फार जुना ( माझा बराचसा ) आशय दाखवत नाही. आणि दुसरा तितका तुल्यबळ आशय उपलब्ध नसेल, तर दाखवेलही काही काळ ( हेही माझ्या बाबतीत झालंय ). आणि जरी समोर माझ्या वेबसाईट वरील मजकूर दाखवला तरीही काही अशा अटकळी आहेत, की ज्या द्वारे आपल्याला कळू शकते की लोक आपली website उघडूनच पाहत नाहीयेत

तर गुगल कडे ही माहिती जात राहते आणि हा क्लिक थ्रू रेशो ( CTR ) सातत्याने कमी कमी होत चालला असेल, तर गुगल किंवा इतर AI इंजिने अनुमान बांधतात, की आता ह्या links लोकांना देत राहण्यात अर्थ नाही.

हे कसं दुरुस्त करायचं  ?

मी इथे जेमिनी च्या मदतीनेच हे केले. म्हणजे "काय करू" ची अगदी Step By Step मदत घेत आहे. तर आधी काय होतंय हे पहायचं : ते गुगल सर्च कन्सोल च्या मदतीने. हे एक अतिशय कमी ठावूक असलेलं अत्यंत उपयुक्त , विनामुंय असं हत्यार आहे. ज्याद्वारे आपल्या Website वर काय सुरु आहे हे समजते. खूप सखोल शोधा अंती मला अनेक गोष्टींसोबत एक प्रमुख गोष्ट सापडली, ती म्हणजे माझी पेजेस महिनोंमहिने mobile वर झटपट लोड होत नाहीयेत. त्यामुळे बघा काय फरक पडलाय :-👇

२०२५ वि. २०२६

इम्प्रेशन मध्ये किंचित वाढच आहे, परंतु क्लिक्स मध्ये मात्र लक्षणीय घट आहे, आणि ती वाढतच चालली आहे ( होती ). आता ह्यावर काम सुरु केलेले आहे. आणि थोडी थोडी परिस्थिती सुधारत चाललेली आहे.  





Sunday, 20 July 2025

Indiamart हे लौकिक अर्थाने सर्च इंजिन नव्हे !

सर्च इंजिन म्हणजे काय ? तर लोकांच्या मनात असलेल्या शोध मोहिमेत त्यांना मदत करणारे. वरकरणी दिसताना असंच भासतं कि हे एक उत्तम सर्च इंजिन आहे. निदान ज्या प्रकारे त्यावर माहिती टाकलेली दिसते, त्यावरून तरी. पण प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केलीत, की अत्यंत चीड येवू लागते.

तुम्हाला हवं ते निवांत पाहण्याची, त्यातून शिस्तीत, आरामात काहीच निवडण्याची सोय नाही. सारखे सारखे pop ups टाकून हैराण मात्र करत असतात. 

थोड्या फार फरकाने just dial ह्याची सुद्धा वेगळी कथा नाही. 

कसे असायला हवे ?


आपण गुगल वर एखादा व्यवसाय शोधात असतो, त्यात त्या त्या व्यवसायानुरूप साधारणपणे सर्व मानक दिलेले असतात. त्यावरून आपल्याला सहजपणे निवडता येतं. 

👉हे ह्या websites वर नाही. हे सोपे का होऊ नये ? 

ग्राहकाला चटकन काही सप्लायर बाजूला वेगळे काढून ठेवता यायला हवे, त्यांना संपर्क साधणे सहज हवे. हे काहीही नाही. तर India Mart त्यांच्या लिस्टिंग करणाऱ्यांत चढा ओढ लावते , आणि लाभार्थींचा व्यवसाय वर ढकलते. 

⛔हे नसायला हवे. तुमचा मूळ उद्देश ( स्व धर्म ) हा लोकांना लोकांचे शोध पटकन मिळवून देणे हा असायला हवा आणि पर्यायाने तो platform देखील ✔

स्वधर्म म्हणजे व्यावहारिक नाही असे अजिबात नाही 


जेव्हा BNI सारखी एखादी संस्था Selling, किंवा lead generation wing स्थापन करण्यासाठी नाही म्हणते, तेव्हा स्वधर्म च पाळत असते. टेल्को म्हणजे आताची टाटा मोटर्स इंडिका V2 चे दोषकारक बम्पर स्वखर्चाने बदलून देते, ती स्वधर्म च पाळत असते

ह्या रूपकाने एखाद्या माशिनेरी शोधणाऱ्या व्यक्तीला त्याच्या त्याच्या मापदंडा अनुसार मशिनरी चे जास्तीत जास्त पुरवठादार कमीत कमी वेळात समोर आणून देणे हा indiamart सारख्या website चा स्वधर्म का असू शकत नाही ?

Sunday, 2 February 2025

अर्थपूर्ण संपर्काचे एक उदाहरण

उथळ साहित्याच्या सध्याच्या युगात एक योग्य उदाहरण नजरेस आले. 

अनेक इमेल्स प्रमाणे मला VJM Global ह्या कंपनीकडून देखील नियमित इमेल्स येत होते, आहेत. तसा मी नियमित पणे unsubscribe वगैरे करत असतो, पण काही काही मात्र त्यातील मजकूर वाचत नसलो, तरीही "राहू द्या" स्वरुपात असतात, त्याच प्रवर्गातील ही. 

आज मात्र त्यांची इमेल उघडून बघितली. त्यात त्यांनी Compliance Calendar दिलेले आहे. खूप चोख आहे. शिवाय वाखाणण्याजोगे असे कि खाली एक लहानशी प्रश्नावली देखील दिलेली आहे, ज्यात आपण आपला प्रश्न त्यांच्याकडे पाठवू शकतो, ज्यावर ते उत्तर देवू शकतील. 

शिवाय बाकी सर्व आहेच : जसे कि यु ट्यूब , सोशल इत्यादी. 

ह्या सर्व प्रकारामुळे मी त्यांची website तपासली , जी अत्यंत व्यावसायिक रित्या , अत्यंत चोख ( आकर्षक नव्हे ) तयार केलेली आहे. 

ह्यानंतर मी त्यांचे इतरही इमेल्स तपासले. एक ठराविक ( आठवड्यातून १ इमेल ) frequency त्यात सांभाळली गेलेली आहे, आणि गेले वर्षभर सातत्य देखील. 

ह्यामुळे सदर कंपनी बद्दल एक आदर आणि विश्वास निर्माण होतो. असे अर्थपूर्ण संपर्क निर्माण करणे अधिक आवश्यक आहे.

शिवाय आपल्या स्वत:च्या व्यवसायातील असे Essential माहिती देणारे आपण काय तयार करू शकू असा विचार जरूर करायला हवा, जो आशय मनोरंजक नसेल, परंतु आवश्यक असेल, जो टाळता येणार नाही !


Wednesday, 27 September 2023

खरंच अगदी स्पेसिफिक प्रेक्षक वर्ग ( आणि ग्राहक ) हवाय ?

तर मग असं करून पहा :-

  1. काहीतरी आपल्या सखोल कामातलं सूत्र तुम्हाला उमगलंय, जे काहीतरी खरोखरंच भारी problem Solve करतंय.
  2. त्याच्या विषयी एक मोठ्ठा explainer वगैरे न बनवता, प्रत्यक्ष काय फरक पडतोय आणि ते जे सूत्र आहे त्याचं वेगळेपण आणि प्रभाविपण नक्की काय हे हे सुद्धा अगदी थोडक्यात मांडा.
  3. भारंभार पोस्टिंग न करता मोजके करा. पोस्टिंग मध्ये मागतील त्यांनाच लिंक द्या.

काळजी करू नका, लोकांना समजतं. किंबहुना ज्यांना समजतं, तेच आपले प्रेक्षक आणि ते तुम्हाला योग्य ग्राहका पर्यंत नेवून पोचवतील.

मी नुकतेच असे एक पोस्टिंग केले आहे. परिणाम ? पाहूयात. पण मला उथळ प्रतिक्रिया नकोच आहेत मुळात त्यामुळे जो परिणाम आहे तो मोजा कशाला ?

ती पोस्ट मी Linked-In वर टाकली आहे. कुणाला हवी असेल तर मला एक Email करा :- contact@joywebservices.com ला.

Sunday, 3 September 2023

बदल रही हैं आज जिन्दगी कि चाल ज़रा .....

 "लुटेरा" चित्रपटातील एका गीतात खालील पंक्ती आहेत :

बदल रही है आज ज़िन्दगी की चाल ज़रा

इसी बहाने क्यूँ ना मैं भी दिल का हाल ज़रा 

संवार लूं हाय सवार लूं 

संवार लूं हाय सवार लूं

कालच आम्ही काही सम व्यावसायिक संध्याकाळी व्यावसायिक चर्चेला प्रत्यक्ष बसलो होतो, तेव्हा हाच प्रत्यय आला. विषय असा होता ... की आमच्यातीलच एका प्रथितयश व्यावसायिकाने "बिन माहितीच्या लोकांपर्यंत आता कोणत्या मार्गाने पोहोचता येईल" हा मुद्दा उपस्थित केला. मग एकमेकांचा Data sharing, एकमेकांना उत्स्फूर्ततेने मदत करणे व जोडून अनेक मार्ग चर्चिले गेले. मी २-४ वेळा त्यांना "फेसबुक जाहिराती कधी वापरून पाहिल्या आहेत का कधी ?" असा प्रश्न केला, कुणीही केलेल्या नाहीत. मी एकदा सांगितलेही ... कि तुम्ही जे मार्ग बोलताय, ते मी भरपूर वापरून झाल्यानंतर फेसबुक सुद्धा भरपूर वापरलेले आहे, वापरत असतो वगैरे; पण कुणी ऐकेचना !

शेवटी जेव्हा अगदी निघायचा विषय झाला तेव्हा मी फेसबुक फनेल्स कशी वापरात आणता येतील असा विषय मांडला जो सर्वांना अगदी नवखा होता. सर्वात मूळ मुद्दा असा की Banners वगैरे उपयुक्त असतील ना, पण आता माणसे फेसबुक वर जास्त आहेत, शिवाय ads हा एक अत्यंत उत्तम मार्ग आहे जो आपल्याला अगदी lasor targetted असे योग्य रीतीने ग्राहक देवू शकतो. ह्या संदर्भातील माझा सर्व प्रवास मी अगदी सविस्तर मांडलेला आहे, कुणाला पाहायचा असेल, तर खालील लिंक पहावी :-

https://100mitras.substack.com/p/my-facebook-ads-journey

तर मुद्दा असा आहे, की नव्या मार्गाने जावे लागेल, नव्हे... जावे लागेल. 

"बदल रही है आज ज़िन्दगी की चाल ज़रा इसी बहाने क्यूँ ना मैं भी दिल का हाल ज़रा  संवार लूं "

Monday, 14 August 2023

"कोण" पेक्षा "कुठून" हे अधिक महत्त्वाचे....

आपल्याला शोधणारा आपल्याला नक्की कुठून म्हणजे कोणत्या ठिकाणाहून शोधत आहे हे पहिले जाणून घेऊन त्याप्रमाणे विचार करायला हवा. बरेचदा जे साधारणपणे ऑफलाइन लोक असतात ज्यांच्या एकाच ठिकाणी दोन-तीन गोष्टी दुकानात ठेवलेल्या असतात ते त्या दोन तीन गोष्टी गुगल listing मध्ये एकत्र टाकता येतील का असं विचारतात.उदाहरणादाखल फोटोमध्ये दाखवलेले एक दुकान पहा👇🏻


कोकणात किंवा छोट्या गावांमध्ये साधारण अशा प्रकारची दुकाने आढळतात. या दुकानात खाद्यपदार्थ, किराणामाल तसेच सायकलचे पंक्चर काढायची देखील सोय आहे.एका लहानशा गावाच्या दृष्टीने ही अगदी योग्य अशी सोय आहे. तरीही गुगलवर या दुकानाचे लिस्टिंग करताना तिन्हीपैकी एक निवडावे लागेल.

एकतर सायकलचे दुकान किंवा किराणा मालाचे दुकान किंवा उपहारगृह.

"हे असं का" हे समजून घेण्याची गरज आहे. गुगलवर तुमचं दुकान शोधणारा त्या रस्त्यावर नसतो किंवा त्या गावातही नसतो त्यामुळे आल्यावर एकाच ठिकाणी तीन गोष्टी मिळणे हे तो पाहत नसून आधी पाहत असतो की याच्यापैकी कदाचित एखादीच गोष्ट कुठे मिळेल. कारण गुगलवर सर्च टाकताना "सायकलचे दुकान किंवा किराणा मालाचे दुकान किंवा उपहारगृह" असे टाकत नाहीत तर त्यापैकी कदाचित एकच गोष्ट टाकली जाईल._सायकल दुकान अधिक उपहारगृह व सोबत किराणामाल असे देखील शोधले जाणे तसे अवघडच._त्यामुळे गुगलच्या शोध मोहिमेत तुम्हाला झळकायचं असेल तर गुगलवर शोधणारी व्यक्ती ही काय सर्च टर्म टाकेल हे पाहूनच लिस्टिंग तयार करावे.यातली एक टीप अशी की एकावेळी एका ठिकाणी एकच व्यवसाय नोंदा. त्याच ठिकाणी दुसरा व्यवसाय नोंदविता येत नाही हे लक्षात ठेवा.

Saturday, 13 May 2023

Video का तयार करावेत ?

एका नेट्वर्किंग मीटिंग मध्ये Video Creator चे प्रेझेन्टेशन सुरु होते. त्या व्यक्तीने खालील प्रश्न विचारले :-

"किती जणांनी 5 Point Someone हे पुस्तक वाचले आहे " .... ( फक्त ३ हात वर आले )

" किती जणांनी 3 Idiots बघितला आहे " ..... ( साधारण २५ लोकांचे हात वर आले )

Video कसा जास्त लोकप्रिय आहे, आणि तो जास्त लोक पाहतात म्हणून तुम्ही Video करा असा सूर होता आणि समजही तसाच झाला. ती व्यक्ती तिच्या सेवा विकत होती त्यामुळे ठीक असाही भाव उमटू शकतो, ह्या निमित्ताने थोडे चर्वित चर्वण ....

मुळात फक्त "जास्त लोक पाहतात" हा निकष Video बनविण्यामागे असला की घोळ होऊ शकतो. ह्या ऐवजी Video केल्याने माझे उत्पादन, प्रक्रिया, सेवा ही अधिक उत्तम प्रकारे उलगडून दाखविला येईल किंवा माझा विचार, त्याचे पैलू माझ्या हाव भावांसकट अधिक दृक श्राव्य, जिवंत करता येईल असा जर दृष्टीकोन ठेवला, तर जास्त उत्तम असा अनुभव तयार होईल. मुळात Video म्हणजेच एक न अनुभवलेला अनुभव आहे. कल्पिलेला अनुभव. तो अधिक उत्तम करावा ह्याकडे फोकस ठेवला तरच तो बोलका होईल.

दुसरा भाग असा कि एखाद्या व्यावसायिकाने असा विचार केला तर ? की असा Video वगैरे बनवत बसण्या ऐवजी का नाही एखादे पुस्तकच लिहावे ? किंवा ब्लॉग्स लिहावेत ? कारण वाचणे हे जे जास्त कठीण काम ... ते जे लोक करतील ... कदाचित ते मोजकेच आपल्या साठी महत्त्वाचे संपर्क असू शकतात, नाही का !

Videos हे जास्त पाहिले जातातच, वादच नाही. पण हे search कसे होतात हे पाहायला हवे. अब्जावधी videos नेटवर जाणे, ते Index होणे, त्यावर Google चा Crawler येणे, हे बऱ्या पैकी आव्हानात्मक आहे. परत त्या त्या विचारणे ( Query ) ला तो तो Video जोडून देणे हे खूप जास्त आव्हानात्मक आहे. पुन्हा कितीही सुंदर आपण लिहिलेले असले, किंवा Video केलेला असला तरीही तुमचाच का दाखवू ? असा गुगल ला प्रश्न पडणारच. कारण आपण तर चकट फू काम करतो, आणि शाहरुख खान पण नाही .... मग काय विशेष त्यात ?

त्यामुळे सुरुवात उत्तम explainer Videos ने करावी. Tags, Description छान टाकावे. Browse करणाऱ्या व्यक्तीला अगदी सहज आणि उत्तम रीतीने सर्व पैलू समजतील अशा प्रकारे Navigation असावे. Thumbnail सुद्धा थोडा चांगला करावा. जमले, तर Videos च्या Description मध्ये Chapters हा Youtube चा पर्याय वापरायला हरकत नाही. 


Tuesday, 24 January 2023

ऑनलाईन- ऑफलाईन वेगळं नसतं भौ....

काल मला माझ्या एका परिचित उद्योजिके चा फोन आला...

" माझे गुगल views ना ३०,००० ( wow ) वरून एकदम ८००० वर ड्रॉप झालेत. आम्ही नुकताच पत्ता बदलला ना .. त्यामुळे असेल का ?"

१. नक्कीच. आपण घर बदलले की नाही का आलेल्यांना बंद दार दिसतं, तसेच असते हे.

२. तरी ह्याला एक उपाय म्हणजे : नवीन पत्ता झाला की verify करून घ्या. गुगल प्रोफाईल chya dashboard वर हा पर्याय आहे. परत थोडी वाट पाहावी लागेल, पण होऊन जातं. आपला जुना पत्ता नाहीका पोस्टातून नवीन करून मिळतो आणि त्याला वेळ लागतो, तस्संच.

३. काही अती हायपर मंडळी हे लवकर व्हावं म्हणून अगाऊच करून ठेवतात. माझ्या एका मित्राच्या बाबत हे घडलंय. ते डॉक्टर आहेत, एका नवीन संस्थेशी संलग्न होताना नव्या ठिकाणी क्लिनिक जाणार म्हणून त्यांनी गुगल लिस्टिंग नव्या पत्त्याचे जाण्यापूर्वीच करून ठेवले. ते सस्पेंड झाले. परत मिळवता येते, आलेही. पण मुद्दा असा की नवीन जागेत प्रत्यक्ष शिफ्ट झाल्यावर हे उद्योग करा. 

ऑनलाईन हे नंतर झालं. आधी दुकानच होतं. आणि गुगल प्रोफाइल हे नकाशे चे अतिरिक्त version, extension आहे जे प्रत्यक्ष व्यवसाय शोधायला सोपं पडावं म्हणून केलं गेलंय. त्यासारखा विचार करा. म्हणजे नेहमी सारखा.

Online काही येगळं नस्तय 

Wednesday, 11 January 2023

reviews बद्दल काही पथ्ये ..

नेट्वर्किंग ग्रुप्स मध्ये आपण एकमेकांना reviews द्यायला अत्यंत उत्सुक असतो. एकच वेळी खूप review घेणे खूप अडचणीचे ठरू शकते. तरी review घेताना खालील पथ्ये पाळा:-

तुम्ही जर आठवड्यातून वगैरे नियमित review घेत नसाल तर एकदम ५-१० रिव्ह्यू घेणे ही गुगल ला कृत्रिम कृती वाटते त्यामुळे आपल्या लिस्टिंग ला धोका संभवतो. रोज २ ते ३ च घ्या

एखाद्या वेळी आपल्याकडे लोक येतात, आणि आपण त्यांना हे रिव्ह्यू द्यायला सांगतो. विसरू नये म्हणून एखादी व्यक्ती खास तैनात करतो आणि जागीच हे करून घेतो. अजिबात करू नका. लोकांना आवाहन करा, पण त्यांना त्यांच्या ठिकाणी पोचून निवांत करू द्या. Track ठेवू, पण हळू हळूच होवू द्या.

Reviews ना प्रतिसाद द्या, तपशीलवार. प्रत्येक प्रतिसाद वेगळा, खास हवा. ह्यावर वेळ खर्च करा. Copy paste केलेलं किंवा "धन्यवाद" असे मोघम उत्तर नको. ही संधी समजा, उरकायची कृती नाही.

Saturday, 24 December 2022

प्रचार पद्धती आणि आपला व्यवसाय

२३ डिसेंबर chya सकाळ मध्ये पान ९ वर एक लेख आलाय. निवडणूक प्रचार आता कशा प्रकारे करतात वगैरे. त्यानिमित्ताने थोडे विचारमंथन : 

काही दिवसांपूर्वीच मी बारामती ला गेलेलो. तिथे एक recording studio चालकाशी भेटलो असता "पंचायत इलेक्शन" हे त्यांचे मोठे events असतात असे समजले. जोडीने त्यांनी आता सोशल मीडिया सर्व सेवा द्यायला सुरुवात केली आहे. एकूण काय,  धंदा जोरात आहे. 

"महारानी" ह्या web series मध्ये नवीन कुमार (चक्क बिहार मध्ये) एका PR एजन्सी ला नेमतो. ही एजन्सी त्याला single largest party तरीही ती सरकार बनवू शकत नाही, तेव्हा तो उद्विग्न होवून ह्या एजन्सी chya संचालिकेवर डाफरतो की "काही उपयोग नाही तुझ्या ह्या आधुनिक तंत्राचा". तिचं त्यावरच उत्तर पाहण्यासारखे आहे 

"आपको मुख्यमंत्री बनाना ये contract हैं , थोड़ा धीरज रखें"

पुढे नवीन मुख्यमंत्री होतो की नाही हा मुद्दा इथे नाहीच. पण तिचा final deliverable काय आहे हे पाहूया. 

आपले कोणतेही तंत्र, मग ते परेश सरांच्या कैलास जीवन प्रमाणे दूरदर्शन असो, प्रिंट मीडिया असो, की नवीन कुमार प्रमाणे डिजिटल असो, ते जर इप्सित साध्य करत नसेल तर उपयोग काय त्याचा ?




Wednesday, 23 November 2022

Youtube Videos :- लोकप्रियता विरुद्ध प्रत्यक्ष परिणामकारकता

हल्ली "Youtuber" हा प्रकार फार लोकप्रिय झालंय. माझ्या अगदी जवळून पाहण्यात अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी त्यांचे प्रत्यक्ष काम सोडून फक्त पैसे मिळतात म्हणून हा प्रकार सुरु केला आहे. असो. पण तुम्ही जर त्यांच्यापैकी नसाल, आणि फक्त आपल्या प्रत्यक्ष धंद्यावर फोकस असाल, तर काही ट्रिक्स ( जादू नव्हे ) आपल्याला सांगेन :-

  1. Youtube हा एक Video upload कारणासाठी एक platform आहे हे लक्षात ठेवा.
  2. त्याच्यावर Search व्हावे म्हणून Videos नका बनवू, तर उपयुक्त असणारे Video बनवा.समस्या सोडवा.
  3. जास्त लोकप्रिय असणाऱ्या विषयांवर बनवा, पण कोणता Content लोकांना मिळत नाहीये त्यावर तयार करा. हे Youtube वर तपासता येतं. ह्यातून तुमची अधिकार सिद्धता निश्चित वाढेल. आणि "नको त्या Queries" टाळल्या जातील. हे कसे करता येईल : Channel Dashboard वरून Channel Analytics वरून Research हा Tab. मग वरील इमेज प्रमाणे Step by Step. 
  4. Monetize करण्याच्या मागे लागू नका. त्यापेक्षा आपला स्वत:चा प्रमुख व्यवसाय तुम्हाला निश्चित जास्त पैसे मिळवून देईल.

Friday, 11 November 2022

इमेल कचरा व्यवस्थापन

नियमितपणे अनावश्यक येणारे इमेल्स ची Subscriptions बंद करून टाकणे :-

खूप वेळा आपण अनाहूतपणे किंवा कधीतरी कदाचित ठरवून काही इमेल्स येत राहावेत म्हणून "subscribe" केलेले असतात. ते जर सध्याला अनावश्यक भासत, वाटत असतील, तर ताबडतोब बंद करून टाकावीत. त्या करिता इमेल उघडून अगदी खाली हा पर्याय उपलब्ध असतो, तो निवडा. बारीक अक्षरांत असतो हा. मी रोज निदान ३ तरी अशी subscriptions बंद करीत असतो.



आपल्या कोणत्याही Channel मधून असा कचरा निर्माण होत नाहीये ह्याची देखील खबरदारी घ्या 

बऱ्याच वेळा Softwares आपल्याला फशी पाडतात हे करायला. उदा. Whatsapp Bulk Messaging चे एखादे Application. किंवा Email Marketing चं एखादं software. भसाभस काहीतरी एखाद्याने न विचारातच पाठवत राहणे म्हणजे Impact निर्माण करणे नव्हे. मला वाटलंच लिहावंसं वगैरे तर इथे blog वर लिहितो किंवा त्या त्या whatsapp ग्रुप वर. अगदीच share करावेसे वाटले तर whatsapp ला status म्हणून ठेवतो.

रोज emails delete करीत राहणे 

लागेल कधीतरी किंवा असुदेत अजून एक कॉपी म्हणून असंख्य Emails जमा होत जातात आणि एक दिवस कोटा फुल होतो. यात वेळच्या वेळी काढून न टाकलेल्या इमेल्स खूप आहेत हे लक्षात असुद्या. डिजिटल युगाची ही आदळणारी देणगी, अशीच manage करावी लागेल. सोशल मिडिया ची notifications बंद करून टाका. उगाच किती त्रास तो !

कसदार, आवश्यक, उपयुक्त असं कमीच असतं 

त्यामुळेच सतत delete करत राहणे हे मोठं काम आहे. हे करीत राहिलं, की आपोआपच उपयुक्त असं वर तरंगतं.

Tuesday, 18 October 2022

QR कोड: Hawkins वि Honda

Hawkins : कल्पक कंटेंट पण .....

गेले काही दिवस hawkins chya जाहिराती पाहण्यात येत आहेत. तयार करू शकता येणारे पदार्थ व त्यासाठी लागणारे साहित्य - उपकरणे हे hawkins गेले काही दिवस पीच करीत आहे.

एक गोष्ट मात्र निश्चित की त्यांचा कॉल टू action मात्र होंडा इतका सशक्त नाही. QR कोड हा hawkins chya website वर नेतो,इथे वाचकांशी नाते दुरावण्याची मोठी शक्यता निर्माण होते. 

होंडा :- ग्राहकाच्या वर्तनाचा अधिक विचार 

ह्या जाहिरातीत २ ठिकाणी QR CODE दिसतात. उजवीकडचा कोड व्हिडिओ जाहिरात दाखवतो, तर दुसरा कोड वाचकांशी WHATSAPP वरून संवाद साधतो. हा CALL TO ACTION अधिक सशक्त वाटतो.


Wednesday, 28 September 2022

Suspensions फार seruously घेऊ नका

"माझं गुगल प्रोफाईल सस्पेंड झालं. मी काहिच केलेलं नाहीये यार"
किंवा 
" फक्त पत्ता बदलला तर सस्पेंड ?"

वगैरे अर्थाचे अनेक मेसेज हल्ली येत असतात. त्याने लोक disturb होतात, आणि योग्यच आहे. Offline पेक्षा सुरुवातीला मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसादाने आपण digital वर खूप काम करू लागतो आणि जास्त जास्त करू लागतो. त्यामूळे होतं असं

पण आता हे सर्व AI आधारित व्हायला लागलंय. म्हणजे COMPUTER च आपले प्रोफाईल, त्यात होत राहणाऱ्या घटना, वगैरे ठरवतो, आणि त्यानुसार काही विचित्र घडलं की आधी पुढचा अनर्थ टाळणारी कृती करतो ( त्याच्या दृष्टीने ).

म्हणजे AI कृत्रिम बुद्धिमत्ता.

हे समजून घेण्यासाठी ही बातमी कामाला येईल 

म्हणजे काय तर तुम्हाला अडचण आली तर support ला संपर्क करायचा आणि अडचण सोडवून घ्यायची. असे.

सर्वात आधी म्हणजे digital ला सर्वस्व मनायचे नाही. कारण त्याच्या scale up चा फायदा हवा असेल, तर चतुराईने काम करायचे. Digital हा सपोर्ट आहे. समजून घ्यायचं.

Sunday, 17 July 2022

प्रथम तुज पाहता ......

 घाबरू नका, एकदम गाण्या बिण्या बद्दल लिहिण्याचा मानस नाहीये माझा. फक्त एक फंडा म्हणून वापरतोय.

बरीच मेहनत करून, Finally जेव्हा एखादा आपल्याला संपर्क करतो, त्यानंतर आपला Autoresponder जर असा मेसेज सेंड करत असेल , तर बिघडणार काहीच नाही, पण सुधारणार मात्र नक्कीच नाही. 


अगदीच "नोकरदार" किंवा "सरकारी" मेसेज वाटतो की नाही ? आपल्या प्रत्येक संवादातून आपण आपल्या ग्राहकाला आपण त्याच्यासोबत आहोत, किंबहुना, त्याच्यासोबत व्यवसाय करायला उत्सुक आहोत, हे सांगायला हवं.

प्रत्येक वेळी एखाद्या Research ची जोड हवीच का ?


***प्रत्येक वेळी गुगल असे म्हणते, किंवा अमुक विद्यापीठातल्या तमुक प्राध्यापकाने असे म्हटले आहे असे आधार लागत नाहीत. आपली बुद्धी, आपली समज ह्यावर विश्वास ठेवून जगायला लागलं कि, जाणवेल, कि वरील Autoresponder बदलून जरा बदलला कि ग्राहक आपल्याला लगेच orders ची थाळी घेऊन हजर होईल असं नाही, तरी शक्यता  प्रकारात तरी नक्की येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सतत एक सकारात्मक, उत्तम संवाद साधायची सवय लागेल, ज्यातून मग आश्चर्यकारक असे Results मिळू शकतील.

प्रत्येक संपर्क महत्त्वाचा ! मौल्यवान 

saturday club चे संस्थापक भिडे सर ह्यांच्याकडे सुमारे १२ हजार व्यावसायिक मंडळींचा data प्रिंटेड, वर्गवारी करून , Filing करून कपाटात नीट राखून ठेवला होता. हे मला सांगितलं त्यामानाने तरुण व्यावसायिक हर्षवर्धन भुर्के ( आज ४५ असतील ). ते जेव्हा भिडे सरांना २०१६ मध्ये भेटले तेव्हा, भिडे सर वय वर्ष ८३. 

आलेल्या संधीचं सोनं करणे म्हणजे हेच छोटे-छोटे बदल लगेच अंमलात आणणे, नाही का ?


तर जर whatsapp ला autoresponder सेट केला असेल, तर तो लगेच ग्राहकाभिमुख करा आणि स्वत: ला बदल. माझा एक mentor , गोपालकृष्णन एक शब्द छान वापरतो : Prospect Empathy. Empathy ला मराठी शब्द सहानुभूती असा आहे, पण मला आस्था हा शब्द जास्त योग्य वाटतो. 

ही आस्था विकसित करणे म्हणजे कायम ह्याचं स्मरण राखणे की आपल्या सेवा ग्राहकाला काय Value Add करतील ? ह्याबद्दल पुन्हा कधीतरी. सध्या आपला Autoresponder गरज असल्यास नीट करून घेऊ. 

*** इंटरनेट वरून अनेक महान वक्ते आपल्याला विनामुल्य ऐकायला / वाचायला मिळतात. त्यातील निवडक असे भाष्य निवडून चर्चा असा एक सुरेख प्रवास आम्ही निवडक उद्यमी ह्या आमच्या साप्ताहिक ग्रुप मध्ये करत असतो. शुक्रवारी रात्री online मिटींग्स असतात. मीटिंग विनामूल्य attend करता येते.


Tuesday, 5 July 2022

फोटो पोस्ट केल्याने धंद्यात वाढ ?

आज मला एक इमेल आला गुगल मधून :-


विशेष म्हणजे बऱ्याच अलीकडे पोस्ट केलेल्या माझ्या फोटोज ना बरेच views दिसले. त्यात सुद्धा home awaits ह्या ठिकाणी माझे जे जे फोटो मी पोस्ट केले, ते बरेच पाहिले गेलेत. अर्थात हे व्यवसायात परावर्तीत झाले असतीलच.




स्वत:चे insights जरी पाहिले तरी ध्यानात येतं कि सर्वात प्रिय म्हणजे फोटोज च असतात.

काही आयडीयाज :-

  1. आपण आपल्या कोणत्याही व्यावसायिकाकडे गेलो, तर तिथले फोटोज त्यांच्या Google business profile वर आवर्जून पोस्ट करायचे. ( पूर्वी यालाच GMB म्हणायचे )
  2. आपण स्वत: आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकाना किंवा मित्र मंडळीना फोटो काढायला प्रेरित करायचे.
  3. एखादा खास Selfie-Point ठेवू शकतो ; बदल्यात एखादी Five Star देवू शकता !
  4. आपला जर का SAB प्रकारचा म्हणजे ग्राहकाकडे जाऊन सेवा देण्याचा व्यवसाय असेल, तर तिथून ग्राहकाना फोटोज पोस्ट करायला सुचवू शकता.
  5. ट्रेनिंग घेत असलात तर प्रत्येक ट्रेनी ला एखादा सेल्फि आपल्या profile वर पोस्ट करायला सांगू शकतो 
  6. बिझनेस क्लब असेल, तर award winner मेंबर च्या गुगल profile वर त्याचा award घेतानाचा फोटो पोस्ट करू शकता.
अजून काही आयडीयाज सुचतायेत का ? जरूर share करा !

एक अपडेट : (ऑक्टोबर २०२२ ) :-

माधवी जाधव ( Atharv Eco Friendly ) ह्यांच्या दुकानात मी १५ ऑगस्ट ला जाऊन फोटो पोस्ट केले होते, त्यांना ३,५०० + views आलेले आहेत. मान्य की Views हे सर्वस्व नव्हे; परंतु Views म्हणजे search ---> Traffic. मग एकदा का customer झाला कि Reviews येतातच !

Monday, 4 July 2022

Https : Conversion मधील लहानसा परंतु महत्त्वाचा भाग !

आज सकाळी एक चांगला माहितीपूर्ण इमेल आला :-


उत्सुकतेने मी लिंक क्लिक केल्यावर काय घडलं 🔽

पुढे advance वर मी क्लिक केलं 🔽


मी पुढे गेलो नाही ( जाऊ शकलो नाही ) कारण रिस्क वाटलं. माहितीपूर्ण लेख होता, परंतु Unsecured वेबसाईट वरून असल्याने पुढे जाता आले नाही. असं आपल्याही बाबतीत होऊ शकेल. तेव्हा ही एक लहानशी परंतु अवश्यक बाब आपल्या web developer कडून लगेच अमलात आणा. 

थोडी गुंतवणूक आहे, परंतु आवश्यक अशी आहे.का ? 

  1. ज्याने मला मेल धाडली आहे, त्याला मी हे कळवणार आहे; तरी असे माझ्यासारखे सगळे थोडीच असणार आहेत ? शिवाय मलाही कायम असा वेळ थोडीच असणार आहे ?
  2. इंटरनेट च्या फायद्या सोबत येणारे हे धोकेही आहेत. हे secure करण्याला पर्याय नाही.
  3. मेडिकल insurance सारखे आहे हे. करायलाहवे.
  4. ही मेल धाडणारा माझ्या सुमारे ७ वर्षे संपर्कात आहे. अनोळखी. हे असेच स्लो convert होतात. पण एकदा झाले कि फक्त upsell करणे इतकेच काम राहते. त्यामुळे हा एक Reputation Point आहे हे विसरू नका.
  5. मूळ मेल च उघडला गेलेला नाही त्यामुळे "Buy" वगैरे चा प्रश्नच उरत नाही. 
  6. पुढचेही मेल कदाचित मी उघडणार नाही.
आजच आपल्या web developer ला संपर्क करा. मदत हवी असेल तर ह्याच इमेल ला respond करा. पण ही स्टेप आवर्जून, लगेच घ्या.

Tuesday, 21 June 2022

Google My Business नव्हे; तर Google Business Profile

नुकताच मी GMB म्हणजेच Google My Business बद्दल एक webinar attend केला. त्यात मिळालेली मौल्यवान, अद्ययावत माहिती Share करतोय :-

  1. आता google my business नाही म्हणायचं , तर Google Business Profile असं म्हटलं जाईल.
  2. Up-To-Date असलेली Profiles ही जवळपास 2.7 पट अधिक भरवशाची समजली जातात. हे Up-to-Date व गुगल च्या धोरणानुसार Compliable ठेवणारया मंडळीना अर्थात जास्त धंदा मिळेल.
  3. तुमच्या व्यवसायाला जर का Physical Location असेल, तरच ते Google Maps वर दिसणार.
  4. Brands , कलाकार, संस्था तसेच इतर असे व्यवसाय जे फक्त Online च काम करतात, ते Google Business Profile साठी पात्र ठरत नाहीत.
  5. पात्र असलेल्या व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांशी सांगितलेल्या बिझनेस hours मध्ये वैयक्तिक संपर्कात रहावेच लागेल.
  6. अपात्र असलेले व्यवसाय : online फक्त , तसेच आपल्या मालकीच्या नसलेल्या किंवा भाडे-करार नसलेल्या ठिकाणी आपण काही काम करत असाल उदा क्लासेस घेणे, मिटींग्स करणे वगैरे तर हे पात्र नाही. Co-Working places पात्र ठरत नाहीत.
  7. काही व्यवसाय उदा. केटरिंग सेवा, पेंटिंग व्यवसाय, प्लंबर सेवा वगैरेंचे स्वत:चे लोकेशन नसते, तर ते ग्राहकाच्या दारात जाऊन सेवा देतात, असे व्यवसाय Service Area Business म्हणून गणले जातात. 
  8. असे SAB's हे स्वत:चे लोकेशन टाकू शकत नाहीत. बहुतेक Home based Businesses ह्या प्रकारात मोडतात. हे गुगल maps वर दिसत नाहीत, परंतु google search मध्ये दिसू शकतात. तुमचा व्यवसाय अशा प्रकारे जर setup केलेला असेल, तर त्यावरून प्रत्यक्ष पत्ता काढून टाका परंतु Service Areas मात्र शाबूत ठेवा. 
  9. काही व्यवसायांचे Hybrid Model असते. उदा. एखादे उपहारगृह. असे उपहारगृह ह्या दोन्ही सुविधांचा उपयोग करून घेऊ शकते. परंतु दिलेल्या व्यावसायिक वेळांत त्यांच्याकडे कर्मचारी वर्ग तसेच व्यवसायाची कायम स्वरूपी फिट केलेली पाटी दर्शनी भागात असायला हवी. असायला हवी.
  10. व्यवसायाचे नाव टाकताना जे कायद्याने नाव असेल तेच टाका. पुढे उगाचच गांव अथवा Category नका जोडू. Keywords वगैरे अजिबात चालत नाहीत.
  11. Practitioners म्हणजेच एखादा सल्ला वगैरे देणारे व्यावसायिक आपल्या firm चे नाव जोडू शकत नाहीत. त्यानी फक्त त्यांचे नाव तसेच आडनाव लावावे.
  12. पत्ता टाकताना जवळची खुण वगैरे टाकू नये. बिल्डींग नंबर वगैरे टाकायचा झाल्यास Add Line हा पर्याय वापरा.
  13. दुसऱ्या कोणी तुमचे बिझनेस लिस्टिंग तयार केले असेल, तर त्यांना सांगून तुम्हाला Primary Owner बनवा. हे फक्त त्यांनाच करता येईल, म्हणजे सर्व ताबा तुमच्या हातात येईल, यायलाच हवा.
  14. सारखी सारखी आपली Category बदलत राहिल्याने लिस्टिंग Suspend होऊ शकते.
  15. Seasonal Businesses बद्दल : जेव्हा Season असेल, उदा. गणपती ; तेव्हा व्यावसायिक तास सेट करायचे. जेव्हा सिझन नसेल तेव्हा Temporarily Closed असं निवडा. सिझन आला कि परत ON. फक्त बोर्ड मात्र कायम असायला हवा ( हे मात्र कसं व्हायचं हे कळले नाही )
  16. एकूण ३ फोन क्रमांक देता येतात. एकच त्यातला दिसतो. तो शक्यतो Landline असेल, शिवाय लोकल area code सकट ( उदा. ०२०-२४३२००४३ ) तर अधिक बळकटी येते.
  17. websites बद्दल सांगताना Redirected URLs  किंवा फेसबुक पेज वगैरे चालत नाही. थेट आपली website किंवा गुगल तर्फे मिळालेलीच.
  18. ९० टक्के लोक असे लिस्टिंग पाहतात, ज्यांवर फोटोज भरपूर आहेत. हे फोटो तुम्ही किंवा तुमच्या ग्राहकांनीही टाकलेले असू शकतील.
  19. इतर कोणत्या apps वगैरे GBP ला कनेक्ट केलेल्या असतील, तर त्या ताबडतोब काढून घ्या. अडचणीत येवू शकाल.
  20. लिस्टिंग सस्पेंड सुद्धा होते , त्याची मुख्य करणे ही : keywords नको इतके घातलेत, co-working space मध्ये बिझनेस लिस्ट केलाय; online फक्त असलेला बिझनेस लिस्ट केलाय, आणि अनेक..... 

इतकं महत्त्वाचं आहे का हे सगळं ?

जर तुमचा व्यवसाय सर्च वर अवलंबून असेल, तर निश्चितच आहे. कारण गुगल लिस्टिंग सस्पेंड झालेलं परवडणार नाही तुम्हाला. त्यापेक्षा Guidelines सांभाळलेल्या च बऱ्या. शिवाय ह्यामुळे profile optimize तर होतेच की !

तुमचं एखादं दुकान आहे, आणि तुम्ही गुगल वर नाही, असं असेल, तर मात्र विचार कराच करा , कारण :-


शंका, प्रश्न, प्रतिक्रिया जरूर द्या !

Sunday, 19 June 2022

पहिलं पाऊल:- WhatsApp Automation

WhatsApp आपण अक्षरशः जाता येता वापरतो. तरीही मी पाहतो की फारच कमी लोक अजून बिझनेस व्हॉट्सॲप वापरतात.

हे वापरण्याचे काही फायदे :-

१. विनामूल्य आहे.
२. व्यक्तिगत म्हणजे मेसेंजर वरून इथे शिफ्ट झालात तरीही तुमची chat history अजिबात delete होत नाही.
३. नंबरही तोच राहतो. फोनही.
४. समोरच्याला काही कळण्याच्या संबंध नाही फार. 
५. एकाच फोन मध्ये २ सिम स्लॉट असतील तर एकावर तुमचा वैयक्तिक व एकावर बिझनेस install करता येतं.
६. परत परत व्यावसायिक माहिती पाठवायला यात catalogues आहेत. तसेच quick reply हा पर्याय आहे.
७. लेबल वापरून chats pin अधिक प्रमाणात करता येतात.
८. Profile वरील share वरून qr code घेता येतो.

काहीच करायचे नाही. आपल्या चालू नंबरवर किंवा दुसऱ्या नंबरवर बिझनेस व्हॉट्सॲप install करायचे. बास.