Friday, 23 December 2022

एका Single Product मधील ताकद : कैलास जीवन

BYST च्या निमित्ताने कैलास जीवन ह्या प्रसिद्ध product व त्यांचे तिसऱ्या पिढीतील उद्योजकीय वारसदार श्री परेश कोल्हटकर ह्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला, त्यातील वेचक मुद्दे :-

  • आजोबा, कीर्तनकार, त्यांनी सुरु केलेला जवळपास ६५ वर्षे जुना उद्योग. दोन काकांनी उद्योग पुढे नेला. आता ३ री पिढी वारसा चालवीत आहे. सुरुवातीला वाड्यात असलेला हा उद्योग आता जवळजवळ १० हजार स्क्वेअर फुटात विस्तारला आहे.कारखाना जवळजवळ ८०% स्वयंचलित आहे. 
  • अद्ययावत अशी यंत्रसामुग्री असून सतत R & D सुरु ठेवून काळाच्या पुढे ५ पावले. Clinical Trials वर भर देवून कैलास जीवन हे जगाच्या काना कोपऱ्यात जाण्यासाठी आता सर्वतोपरी सिद्ध झाले आहे. बाह्य उपचारांसोबत पोटातूनही घेता येणारे कदाचित कैलास जीवन हे अगदी काही औषधांपैकी एक असावे.
  • नुसते "५० वर्षे जुने" असे न राहता, सर्व Documented अशा स्वरुपाची समिधा कैलास जीवन राखून आहे, ज्याच्या जीवावर सातासमुद्रापार जाण्यासाठी हे Multiprpose आयुर्वेदिक क्रीम आता सज्ज आहे. दर्जाबाबत अजिबात तडजोड होत नाही, तसेच सप्लायर्स च्या बाबतही नाही केली जात. सचोटी हे एक प्रमुख व्यावसायिक मूल्य म्हणून जपले जाते. 
  • TV वरची जाहिरात हा Turning Point ठरला. १९८८-८९ साली कैलास जीवन हे दूरचित्रवाणी वर झळकू लागलं आणि घरगुती स्वरुपात असलेला उद्योग खूप वाढायला लागला. इतका की कितीही करा, पुरेच् ना. इथून मुख्य झेप घेतली. मग धायरी ला एक एकर जागेत factory सुरु केली. ६५ वर्षांपासून प्रस्थापित अशा ह्या कंपनीने खूप मोठी रेंज करून त्यातील मोजकीच प्रमोट करणे ह्याऐवजी कैलास जीवनलाच आता खूप विस्तारायचे ठरवले आहे
  • १९९६ साली एका समांतर क्रीम ने बाजारात खूप भांडवल ओतून, जाहिरात करून वगैरे कैलास जीवन चे धाबे दणाणून सोडले. इथे कैलास जीवन ला त्यांच्या क्रीम ची इतर वैशिष्ट्ये शोधून ती मार्केट करायची संधी मिळाली व काही वर्षातच पुन्हा मूळ स्थान प्राप्त झाले. हातापायाची आग व डोळ्यांची जळजळ ह्यावर कैलास जीवन ला स्पर्धाच नाही, तर अशी वैशिष्ट्ये जाहिरातींतून दाखवून सेल जवळपास अडीच पट वाढला. तरीही नाही म्हणायला हा थोडा कसोटीचा काळ नक्कीच होता. असाच काळ Covid च्या सुमारास देखील आला. इथे प्रवर्तकांनी सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन दिले.
  • जाहिरात क्षेत्रातील अफाट ज्ञान हा देखील त्यांच्या यशातील प्रमुख मानकरी म्हणता येईल. कुठल्या भाषेतील मालिका कुठे पाहिल्या जातात, कोणते channels वापरावेत, तसेच प्रिंट माध्यमाचा असाधारण असा उपयोग ह्यावर परेश सरांकडे खडानखडा माहिती होती. साधारण खर्चाच्या २२ टक्के इतका भाग जाहिरातीवर कैलास जीवन खर्च करते, तर हे असायलाच हवे असा त्यांचा दावा.

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.