Monday 28 February 2022

गुगल हे सर्वस्व : धोकादायक गैरसमज

गुगल किंवा सर्च म्हणजेच सर्वस्व अशा संदर्भाची दोन-तीन वक्तव्ये कानी पडली  :-

१. एका उद्योजका कडून :


एक उद्योजक, जे अनेक वर्षे त्यांचा व्यवसाय एका विशिष्ट नावाने करीत आहेत. ते म्हणाले "गुगल" चं सर्वात बेष्ट हो. बाकी काही नाही ! इतकं strong त्यांना वाटत आहे, की त्यांनी त्यांची website आणि डोमेन मध्ये सुद्धा category सर्च येईल असा बदल केलाय.

२. एका पब्लिक फोरम मध्ये :


सदर फोरम चालविणारी व्यक्ती सुद्धा म्हणाली : " गुगल हाच आता परिसर झालंय "

३. एका paid ट्रेनिंग मध्ये :


मी नुकतंच एक linked in चं workshop केलं. पहिल्या दिवसा नंतर केलंच नाही. कारण : Title कसे Searchable व्हावे हेच तो सांगत होता.


प्रोब्लेम नक्की कुठे आहे ?


आपला बिझनेस सर्च व्हावा असा सारखा विचार करत राहणे ह्या विचारसरणी बद्दल आक्षेप आहे. थोडे थोडे बदल ठीक आहेत. जसे कि गुगल माय बिझनेस चे Title किंवा website चे key Words. परंतु linked-in च्या प्रमुख Headline मध्येच एकदम बदल किंवा व्यवसायाचे रूढ झालेले विशेष असे नाव, किंवा website domain बदलू नये. आपणच स्वत:ला जनरल करण्यात काय अर्थ आहे ? आपलं जे Unique नाव ते तसेच असायला हवे. सर्च हा स्पेशल हवा. जनरल नको. आपल्याकडे ग्राहक आणायला जाहिराती हा मार्ग आहेच की !


Saturday 26 February 2022

निश्चित व्यवसायाकडे वाटचाल ....

वर च्या पहिल्या फोटोत आहेत बाचल सर, ज्यांचे अवंती कालाग्राम हे सुरेख resort आहे, तर दुसरे छायाचित्र आहे डॉ स्मिता सोवनी ह्यांचे ज्या एक ट्रेनर आहेत.

एका संकल्पनेतून सुरू झालेल्या आमच्या निउ ची आता निश्चित बिझनेस कडे मार्गक्रमण सुरू झालेले आहे. 3+1 अशा पद्धतीने निउ चा कार्यक्रम सुरू आहे.

3 + 1 म्हणजे ?

3 मीटिंगस डिजिटल व एक physical. Physical मध्ये 2 मेम्बर्स वर Deep Focus. त्यांच्या एखाद्या installation वर व अव्यक्त व्यवसाय असेल तर विशेष लक्ष देऊन. गेल्या महिन्यात वाकडे व गांधी ह्यांच्याकडे तर ह्या महिन्यात बाचल व डॉ स्मिता हा प्रयोग संपन्न झाला. सहकार्य तसेच कनेक्ट्स कुठे वाढवता येतील ह्यावर चर्चा असं घडतंय. कुणाशी जास्त 121s करता येतील ,हे सुद्धा समजतंय.

Friday 25 February 2022

जे चमकतं तेच फक्त सोनं नसतं ....



BYST : एक प्रचंड सुख देणारी संस्था !

भारतीय युवा शक्ती ट्रस्ट अर्थात BYST ह्यांचं - माझं नातं 2009 पासूनचं. नोकरी मागणाऱ्या मंडळींना नोकरी देणारे बनविण्याचा ध्यास घेतलेली ही संघटना. संस्थापक आणि 1st चेअरमन JRD TATA. दुसरे स्व राहुलजी बजाज आणि सध्याचे नौशाद फोर्ब्ज. कामाची पद्धत सोपी : उद्योजक निवडायचे, त्यांना COUNSELING करून मोठं स्वप्न दाखवायचं,  प्रपोजल करायला उद्युक्त करायचे, कर्ज देऊ करायचं, आणि घेतलं कर्ज निभावायला मदत करायची, मोठं उद्योजक बनवायचं. अडचणी आल्या तर सोबत पुन्हा उभं रहायचं. 

यात मेंटर ची भूमिका महत्त्वाची

ह्या प्रवासकरिता मेंटर्स नियुक्त करायचे आणि वेळोवेळी ह्या उद्योजकांना मदत करत राहणे हा pattern. मी सुद्धा एक मेंटरच आहे इतबे. माझ्याच सारखे अनेक जण आहेत, जे आपला अनुभव खर्ची घालतात आणि असंख्य उद्योजक कार्यरत राहतात.

अनेक ठिकाणी सेंटर्स

चेन्नई येथे सुरुवात झाली 1992 ला, पाठोपाठ पुणे व हैद्राबाद सुरू झाली 19998 साली. आता भुवनेश्वर, फरिदाबाद तसेच आसाम व राजस्थानात देखील सेंटर आहेत. महाराष्ट्रात औरंगाबाद व वर्धा इथे सेंटर्स आहेत.

मेंटर exchange कार्यक्रम

विविध ठिकाणी असणारे मेंटर्स एकमेकांना भेटवून देणे, उद्योजकांना भेटवून आणणे हादेखील एक सुरेख उपक्रम होत असतो byst कडून. नुकतंच पुणे भागातील मेंटर्स औरंगाबाद ला तसेच औरंगाबाद चे मेंटर्स पुण्यात आले होते. उद्योजकांच्या प्रगतीचे आलेख पाहून समाधान मिळतंच, शिवाय अडचणीही ऐकता येतात. 

वरील फोटो ह्याचेच आहेत. शिवाय अशाच एका कार्यक्रमात भुवनेश्वर चे काही मेंटर्स देखील आले आणि माझ्या कन्येसमान असणारी rosalyn ही byst मधील officer देखील मला भेटली !

एक न चमकणारे pure सोने !

नेटवर्किंग मध्ये किंवा इतरत्र फक्त presentation च्या जोरावर crowd ओढणारे पाहताना आमच्या BYST बद्दल सांगावसं वाटतं... की अजिबात चमचम न करताही 24 carrot असं हे सोनं आहे !

Thursday 24 February 2022

BNI चा funda कदाचित हाच असेल ...

BNI नामक एक आतंरराष्ट्रीय नेटवर्किंग संस्था आहे,ज्यांचा प्रमुख अजेंडा हा आहे की फक्त एकच ग्रुप मध्ये काम करायचं , म्हणजेच within bni तरी इतर ग्रुप्स ना जायचं नाही. वरकरणी हा Restrictive वाटणारा approach खूप योग्य आहे असं लक्षात येऊ लागलं आहे माझ्या.

आपण focused राहतो

एकाच ठिकाणी काम करत राहिल्याने आपण प्रत्येक member च्या बिझनेस मध्ये खोल शिरतो, शिवाय फोकस राहतो !

जास्त ओपन होत जातील संबंध

जास्त जास्त आपण संपर्कात येऊ लागतो तसे अधिक कळू लागतो आणि एकमेकांच्या उपयोगीही पडू लागतो. 

Reviews चा खरा उद्देश

हा review मिळालाय आमच्या नेटवर्किंग ग्रुप वरून. ह्या अनुषंगाने एक विचार मनात आलाय तो मांडतो :-

व्यवसायात उत्तरोत्तर आपलं प्रमोशन करायचं काम कमी कमी होत जायला हवं अथवा मिळणारे results तरी जास्त व्हायला हवेत. हा कन्सेप्ट जर मुळाशी ठेवला,तर आपण घेत असलेले reviews हे समजून घ्यायला हवेत. 

प्रत्येक review गुगल वर असायला हवा असे नाही !

आपण इंटरनेटवर सर्च मध्ये पहिलं यावं किंवा आपलं नाव prefer केलं जावं हे सर्वच उद्योजक मंडळींना वाटतं. पण हे काही तितकंसं खरं नाहीये. खूप deep विषय आहे हा, तरी reviews च्या context मध्ये विचार केला, तर ज्या सोर्स कडून जो आपला ग्राहक आला आहे , त्याने त्या त्या ठिकाणी तो review दिला की बास ! ह्याने सर्च वाढेल का ? काय ठाऊक ! पण त्या ग्रुप मध्ये मात्र इतर मंडळींना कळेल की आपली सेवा किंवा उत्पादन हे कदाचित जगातलं सर्वात भारी नसेल, पण उपयुक्त मात्र निश्चित आहे.

हळूहळू परंतु निश्चित growth चा हा हमखास मार्ग 

ह्या मार्गाने आपण अगदी झटक्यात प्रगती करू असे नाही, परंतु उत्तरोत्तर आपलं काम तेच, तसंच राहील आणि आपले लाभार्थी मात्र एका स्थिर वेगाने वाढत राहतील !

Wednesday 23 February 2022

"करोडपती" चा हुक ........

हा शब्द किंवा तत्सम संकल्पना अगदी पूर्वापार माणसाला आकर्षित करत राहिल्या आहेत. त्यामुळे ह्या एकाच जाळ्यात अनेक मासे अनादी काळ लटकून ओढता येतात.

"मूळ" काम हळूहळू अदृश्य व्हायला लागतं

म्हणजे असं, की कारकीर्द सुरुवात करताना जे काम देऊन पोटापाण्याची सोय करायची, ते काम ह्या करोडपती विचारात हरवून जातं. फक्त करोडपती किंवा नंतर अब्जो पती होणे हाच Goal होऊन जातं, आणि हे करोड किंवा अब्ज मिळाले की इतिश्री असं वाटू लागतं, इतकं ह्या श्रीमंती चं समाजात कौतुक !

श्रीमंत कोण, गरीब कोण ?

श्रीमंत म्हणजे साधारणपणे तो की ज्याच्याकडे आलबेल आहे, ज्याला मागायची गरज पडणार नाही किंवा जो दुसऱ्या ला सहजपणे देऊ शकतो. ह्यात कुठेच करोड वगैरे चा संबंध नाहीये

जितक्या सहजपणे जनरल बोगी मध्ये एखाद्या चा डबा खायला आपल्या समोर येतो, तितक्या सहजपणे विमानतळावर कुणीतरी, कधीतरी आपल्याला काहीतरी offer केलेलं आठवतंय का ? 

मी स्वत: असंख्य वेळा हे पाहिलंय कि सो called वंचित वगैरे समाज जो आपण म्हणतो ना, ज्याला "नाही रे" वर्ग म्हणतात, तो जरा ह्या "आहे रे" पेक्षा बराच श्रीमंत असतो. एक तर त्यांच्या शारीरिक हालचाली जास्त असतात. शिवाय बऱ्याच वेळा कमी का असेना, जमिनीतून पिकलेलं ते consume करतात. गुरं ढोरं सुधा ह्यांची गवतावरच जगत असतात. त्यांच्यापुरत तरी ते निश्चित ठीक ठाक जगतात. हे करून अनेकदा ह्यांच्या कुटुंबातला एखादा दुसरा सदस्य शहरात नोकरीला असतो, ज्याचा पगार अतिरिक्त. कोविड मध्ये हि मंडळी त्यांच्या ह्या सामुग्रीवर बऱ्या पैकी तग धरू शकली. आणि जमीन हि FD प्रमाणे मोडून नाही टाकावी लागत. तर ही भूमाता खरोखरच आई प्रमाणे कायम देत राहते.

ही मंडळी अमाप श्रीमंत वगैरे नसतील कदाचित, पण आपल्या सारख्या शहरी born, शिक्षणावर आपला प्रपंच चालविणाऱ्या किंवा बुद्धीजीवी लोकांच्याहून अधिक राखून असतात हे मात्र निश्चित. त्या करोड वगैरेंची गरजच नसावी त्यांना. 

ह्या विचार सरणी ला लेबलिंग 

असं बोललं, कि ह्यामुळेच मराठी समाज मागे वगैरे ; किंवा ह्यांना गरिबीचा सोस वगैरे असं लेबलिंग करतात. ह्या विचारांनी आपल्या राहणीत एक साधे पणा येतो, प्रचंड ओढत आणि साठवत राहण्यापेक्षा मूळ कौशल्य विकास करण्याकडे मनुष्य प्रवृत्त होऊ शकतो. 

ब्रेक Even Point पेक्षा १० टक्के पुरेसा आहे 

ब्रेक Even म्हणजे संसार चालवायला लागतो त्यापेक्षा थोडा अधिक पैसा पुरेसा आहे. सात पिढ्या चालवेन इतका ठेवणं किंवा त्यासाठी काम करत राहणं खूप धोकादायक ठरेल. 

हे समजायचं कसं ?

आपल्या आयुष्याकडे जरा पाहूयात. त्यात कुठे imbalance जाणवतोय का कुठे ? पैसे मिळविण्याकरिता खूप जास्त तास मोजतोय का ? तर थांबतो जरा. घरात थांबतो. चालायला जातो. वाटलं तर त्या सिरियल्स पाहू, GYM मध्ये जाउ, मित्र मैत्रिणी करेन. नाक्यावर फक्या मारेन. पण वेळ जात नाही म्हणून पैसे जोडत बसणार नाही. फास्ट बरं करणारी औषधे नको. जरा लांबचा रस्ता पकडेन. थोडे स्लो होईन.

पुढचं कसं व्हायचं ?

ही खरी फक्त चिंता असते. म्हणजे न घेतलेल्या कर्जावर आगाऊ भरलेलं व्याज. मी हे STOP केलंय. ऐवजी विश्वास ठेवतोय. होतंय. Everything is OK. असं काम करूयात की त्यात शारीरिक झीज होईल, शिवाय मनाला थोडं काम मिळेल. पुढे जे होईल ते होऊदेत ना !

ह्या करता कोट्याधीश व्हावं लागतंच नाही मुळी !

Monday 14 February 2022

Story telling ...आवश्यक कौशल्य !

अगदी standup कॉमेडियन व्हायला पाहिजे असं नाही,पण निदान आपल्या व्यवसायाबद्दल तरी रंजकतेने सांगता यायला हवं.

सतत, फक्त presenation skills ची वर्कशॉप्स करायची आवश्यकता नाही. निउ मध्ये आपण 3 + 1 पॅटर्न सुरू केलाय आता, त्यात जे 1 आहे,ते आहे तुमच्या स्वतः बद्दल विस्तृतपणे सांगता येण्याची एक संधी.

अत्यंत रुक्ष भासणारा सरकारी job समरसतेने जगणारी आणि तितक्याच रंजकतेने सांगणारी आमची एक मैत्रीण मनीषा देशपांडे ही ह्या पोस्ट ची प्रेरक ठरली.

एक छोटा podcast पोस्ट करतोय ! मते जरूर व्यक्त करा :

Saturday 12 February 2022

सरसकट Downloads का बरं नाहीत ?

टीम फेरीस ह्या लेखकाचं एक पुस्तक  *The 4-Hour Work Week यात मार्केटिंग ची एक tact तो सांगतो : Life-Time Support Free असं म्हटलं , की एकदम Value वाढते. आणि विक्री सुद्धा. खरोखरच तुम्हाला आयुष्यभर एखाद्या विषयावरचे प्रश्न सोडविता आले ( मी water तसेच डिजिटल चे सोडवितो ) तर उत्तमच आहे. सेल वाढो अथवा न वाढो, एक "Give" म्हणून हे उत्तमच आहे !

तरी सर्वच बाबतीत हे नको वाटतं. उदा. झूम recordings. बऱ्याचदा "ऐकेन कधीतरी" म्हणून नुसतं सडत बसतं मटेरीअल. त्यामुळे आता बऱ्याच वेळेला "फक्त पाहायला" तेही ३ एक दिवस अशी मी policy केली आहे. ज्या मंडळींना खरेच रस आहे तीच येतील. अशा पद्धतीने माझ्या विषयात रस असणारे लोक फिल्टर होत जातात, शिवाय नक्की लोकांना विषय भाव्तोय कि नाही हे सुद्धा कळत.

* सदर लिंक amazon वरील ह्या पुस्तकाच्या "Buy" ला जाते.


Friday 11 February 2022

इमेल न्यूज लेटर : अर्थपूर्ण कंटेंट वितरणा करिता ....

मागे एका *पोस्ट द्वारे मी Automation Tools च्या अतिवापराने होणारे दुष्परिणाम ह्याबद्दल बोललो होतो. वारंवार अनुभव येऊन सुद्धा आपण ह्यांना कधी हुक होऊ हे सांगता नाही येत. 

आता काय; सगळे whatsapp वरच असतात ना ! अशा उथळ विचाराचा आधार घेऊन मी **संपर्क-सेतू नामक नवीन tool द्वारे whatsapp newsletter तयार केले आणि माझ्या जुन्या-फिन्या, संपर्कात असणाऱ्या/नसणाऱ्या मंडळींना सुद्धा ते पाठवायला सुरुवात केली आणि परिणामी माझा नंबर whatsapp ने लागोपाठ दोन दिवस, दोनदा ban केलेला होता. ह्यामुळे सुरु झाला माझा उलटा प्रवास, कि हे का होत असेल ? 

हे realize झालं ...

  • सगळे whatsapp वर असतात (हे कुणी सांगितलं मुळात ?) .... हे सगळे मला नक्की हवेत का ?
  • सगळ्यांना माझा कंटेंट का बरं आवडावा
  • कित्येक मंडळींच्या मी विस्मरणात सुद्धा गेलो असेन !
  • Whatsapp मध्ये खूप लिंक्स टाकायच्या नाहीत 
  • Whatsapp मध्ये फक्त block असतं ; unsubscribe नाही, इथूनच लोक report करतात 
  • ** संपर्क सेतू मधील chat-bot हे उपयुक्त आहे ते वापरायचं
  • ***न्यूज लेटर हा सशक्त पर्याय होऊ शकेल
  • इमेल हे कदाचित कमी वापरलं जात असेल, किंवा स्पॅम मधून वगैरे शोधावं लागत असेल; हे फक्त तीच मंडळी करतील, ज्यांना खराखुरा रस आहे !
  • न्यूज लेटर चा subscribe form असेल, जो मी फक्त relevant ग्रुप्स तसेच whatsapp status ला ठेवेन त्यातल्या त्यात !

==================================

Footnotes

* https://nupune.blogspot.com/2022/01/tools.html

** Joy Web ही संपर्क-सेतू ची channel partner आहे. लिंक क्लिक करून काही purchase केल्यास joy ला अर्थार्जन होते. ह्या आधी किंवा नंतरही सल्ल्यासाठी स्वागत.

*** http://eepurl.com/hTptNT


Thursday 10 February 2022

का बरं घ्यायचं मोठं टार्गेट ?


आमच्या saturday क्लब च्या chapter मध्ये नुकताच आम्ही 50 मेम्बर्स चा संकल्प सोडलाय.

ह्याच वेळी chapter मध्ये आतही challenges आहेतच. फक्त आम्हालाच नव्हे,तर संपूर्ण रिजन मध्ये असलेल्या अनेक chapters म्हणजेच जवळजवळ सर्वच chapters ना काही प्रश्न भेडसावत असतात.

हे प्रश्न आधी सोडवायचे की नवीन मेम्बर्स वाढवण्याकडे लक्ष द्यायचं ? असा सवाल कधी कधी समोर येतो, त्याबद्दल थोडं ...

# स्वयंप्रेरीत members मिळत नसतील,तर प्रशिक्षित करावी लागतील. ट्रेनिंग हा अविभाज्य भाग आहे. ही ट्रेनिंग्स जास्त प्रमाणात व्हायला हवीत, शिवाय विविध टप्प्यावर असायला हवीत. सर्वात अग्रक्रमाने : नवीन leadership विकसित करण्यासाठी हवीत. 

# नवीन मेम्बर्स add करावेच लागतील, त्यातून स्वयं प्रेरित मंडळी अधिक मिळण्याची शक्यता जास्त आहे

# शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः जेव्हा कुणाला आमंत्रित करतो, योग्य मेम्बर आणण्यासाठी प्रयत्न करतो,तेव्हा माझा एक नवीन संपर्क तयार होतो,जो मला स्वतः ला काही व्यवसायात मदत करू शकतो-शकेल.

# आमचे एक ट्रेनर विनीत बनसोडे ह्यांचं एक वाक्य मला सतत प्रेरित करत राहतं : प्रत्येक दगडाखाली हिरा आहे ! Member च्या संदर्भाने विचार करा : आणि हे हिरे अधिकाधिक गोळा करत रहा

मला जेव्हा ह्यासाठी स्वतः ला प्रयत्न करायला लागतो,तेव्हा माझा comfort झोन आपोआप ब्रेक होतो आणि मी सहजपणे optimistic होतो,प्रयत्नवादी होतो, हा आंतरिक बदल मला हवाय, म्हणून हवं हे 50 चं target !

Tuesday 8 February 2022

व्याजाचे पैसे वाचविणे .....


कालच माझा 30 वर्षे जुना मित्र महेश दोशी माझ्या ऑफिस ला भेट देऊन गेला. ह्या व्यापारी मित्राची ओळख आमची व्यापारी मित्र मासिकामुळेच झाली आहे.

कॅश फ्लो कसा सावरला ...

महेश चा मशिनरी व packaging मटेरियल ट्रेडिंग हा साताऱ्यात व्यवसाय आहे. सुरुवातीला बँक,कर्जे , cc असा प्रवास सुरु असताना महेश च्या लक्षात आलं, की cc आणि कर्जाची व्याजे देताना काही राहतच नाहीये धंद्यात. त्याने केलं इतकंच : सप्लायर ना 30 दिवसांचे क्रेडिट किंवा cash discount मागायला सुरुवात केली. परिणामी हळूहळू cc ची गरज पडेनाशी झाली. आता उलट झालंय. महेश ला साईड म्हणजे महिन्याचं क्रेडिट लागतंच नाही. घेतानाच discount करून घेणे हे जणू सूत्र झालंय.

बनिया life style

याला खरं तर style नसलेली साधी राहणी( धंद्यात सुद्धा ) असं नाव देता येईल. शो बाजी वर खर्च न करता stock वर पैसा लावणे, आणि वर्षानुवर्षे एकाच पद्धतीने आर्थिक नियोजन ( saving नाही ) व भांडवल हळूहळू निश्चित वाढवत नेणे, ह्यामुळे हे सर्व घडून आलं आहे ह्यात तिळमात्र शंका नाही.

Head Space आणि तत्सम

व्यवसाय म्हणजेच सतत अपुरेपणाची जाणीव, त्यामुळेच सतत एक लेवल pudhchya एखाद्या समिकरणाची,उत्तराची एक व्यावसायिक सतत आस धरून असतो.

मग आपण कधी कुठलं नवीन पुस्तक वाचतो,कधी एखादा कोर्स करतो, कधी एखादी आगळीवेगळी मीटिंग अटेंड करतो,तर कधी चक्क एखादं venture करू पाहतो.

ह्या सगळ्यात सर्वात जास्त खर्च होणारी गोष्ट म्हणजे आपलं व्यवधान : Attention. करतानाच जाणवत राहतं, की आपल्या इतर काही गोष्टी राहतायेत, सुटून चालल्या आहेत. 

आपली एखादा नवा, वेगळा विचार करायला व्यवधान द्यायची एक क्षमता असते, ती ही स्पेस. जागा. मोकळीक. निवांतपणा. बँडविड्थ. किंवा हेडस्पेस.