Tuesday 8 February 2022

व्याजाचे पैसे वाचविणे .....


कालच माझा 30 वर्षे जुना मित्र महेश दोशी माझ्या ऑफिस ला भेट देऊन गेला. ह्या व्यापारी मित्राची ओळख आमची व्यापारी मित्र मासिकामुळेच झाली आहे.

कॅश फ्लो कसा सावरला ...

महेश चा मशिनरी व packaging मटेरियल ट्रेडिंग हा साताऱ्यात व्यवसाय आहे. सुरुवातीला बँक,कर्जे , cc असा प्रवास सुरु असताना महेश च्या लक्षात आलं, की cc आणि कर्जाची व्याजे देताना काही राहतच नाहीये धंद्यात. त्याने केलं इतकंच : सप्लायर ना 30 दिवसांचे क्रेडिट किंवा cash discount मागायला सुरुवात केली. परिणामी हळूहळू cc ची गरज पडेनाशी झाली. आता उलट झालंय. महेश ला साईड म्हणजे महिन्याचं क्रेडिट लागतंच नाही. घेतानाच discount करून घेणे हे जणू सूत्र झालंय.

बनिया life style

याला खरं तर style नसलेली साधी राहणी( धंद्यात सुद्धा ) असं नाव देता येईल. शो बाजी वर खर्च न करता stock वर पैसा लावणे, आणि वर्षानुवर्षे एकाच पद्धतीने आर्थिक नियोजन ( saving नाही ) व भांडवल हळूहळू निश्चित वाढवत नेणे, ह्यामुळे हे सर्व घडून आलं आहे ह्यात तिळमात्र शंका नाही.

1 comment:

  1. खरंच सस्टनेबल बिझिनेस मॉडेल आहे हे - उत्पन्नापेक्षा खर्च कमी ठेवणे, त्यात वाचलेला पैसा पुन्हा त्याच व्यवसायात गुंतवणे आणि त्याद्वारे भांडवल वृद्धी आणि पर्यायाने व्यवसाय वृद्धी साध्य करणे - थोडंसं ह्याच धर्तीवर एक उपयुक्त माहिती शेअर करायचा मोह आवरत नाहीयेय - भांडवली बाजारात सुचिबद्ध 6000 कंपन्यांपैकी 5975 कंपन्या आजपासून ह्याआधीची 20 किंवा 10 वर्षे दरवर्षीदेखील सातत्याने आदल्या वर्षीपेक्षा 10% टक्क्यांनी महसूल वृद्धी साध्य करू शकलेल्या नाहीत 😊

    ReplyDelete

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.