Wednesday 23 February 2022

"करोडपती" चा हुक ........

हा शब्द किंवा तत्सम संकल्पना अगदी पूर्वापार माणसाला आकर्षित करत राहिल्या आहेत. त्यामुळे ह्या एकाच जाळ्यात अनेक मासे अनादी काळ लटकून ओढता येतात.

"मूळ" काम हळूहळू अदृश्य व्हायला लागतं

म्हणजे असं, की कारकीर्द सुरुवात करताना जे काम देऊन पोटापाण्याची सोय करायची, ते काम ह्या करोडपती विचारात हरवून जातं. फक्त करोडपती किंवा नंतर अब्जो पती होणे हाच Goal होऊन जातं, आणि हे करोड किंवा अब्ज मिळाले की इतिश्री असं वाटू लागतं, इतकं ह्या श्रीमंती चं समाजात कौतुक !

श्रीमंत कोण, गरीब कोण ?

श्रीमंत म्हणजे साधारणपणे तो की ज्याच्याकडे आलबेल आहे, ज्याला मागायची गरज पडणार नाही किंवा जो दुसऱ्या ला सहजपणे देऊ शकतो. ह्यात कुठेच करोड वगैरे चा संबंध नाहीये

जितक्या सहजपणे जनरल बोगी मध्ये एखाद्या चा डबा खायला आपल्या समोर येतो, तितक्या सहजपणे विमानतळावर कुणीतरी, कधीतरी आपल्याला काहीतरी offer केलेलं आठवतंय का ? 

मी स्वत: असंख्य वेळा हे पाहिलंय कि सो called वंचित वगैरे समाज जो आपण म्हणतो ना, ज्याला "नाही रे" वर्ग म्हणतात, तो जरा ह्या "आहे रे" पेक्षा बराच श्रीमंत असतो. एक तर त्यांच्या शारीरिक हालचाली जास्त असतात. शिवाय बऱ्याच वेळा कमी का असेना, जमिनीतून पिकलेलं ते consume करतात. गुरं ढोरं सुधा ह्यांची गवतावरच जगत असतात. त्यांच्यापुरत तरी ते निश्चित ठीक ठाक जगतात. हे करून अनेकदा ह्यांच्या कुटुंबातला एखादा दुसरा सदस्य शहरात नोकरीला असतो, ज्याचा पगार अतिरिक्त. कोविड मध्ये हि मंडळी त्यांच्या ह्या सामुग्रीवर बऱ्या पैकी तग धरू शकली. आणि जमीन हि FD प्रमाणे मोडून नाही टाकावी लागत. तर ही भूमाता खरोखरच आई प्रमाणे कायम देत राहते.

ही मंडळी अमाप श्रीमंत वगैरे नसतील कदाचित, पण आपल्या सारख्या शहरी born, शिक्षणावर आपला प्रपंच चालविणाऱ्या किंवा बुद्धीजीवी लोकांच्याहून अधिक राखून असतात हे मात्र निश्चित. त्या करोड वगैरेंची गरजच नसावी त्यांना. 

ह्या विचार सरणी ला लेबलिंग 

असं बोललं, कि ह्यामुळेच मराठी समाज मागे वगैरे ; किंवा ह्यांना गरिबीचा सोस वगैरे असं लेबलिंग करतात. ह्या विचारांनी आपल्या राहणीत एक साधे पणा येतो, प्रचंड ओढत आणि साठवत राहण्यापेक्षा मूळ कौशल्य विकास करण्याकडे मनुष्य प्रवृत्त होऊ शकतो. 

ब्रेक Even Point पेक्षा १० टक्के पुरेसा आहे 

ब्रेक Even म्हणजे संसार चालवायला लागतो त्यापेक्षा थोडा अधिक पैसा पुरेसा आहे. सात पिढ्या चालवेन इतका ठेवणं किंवा त्यासाठी काम करत राहणं खूप धोकादायक ठरेल. 

हे समजायचं कसं ?

आपल्या आयुष्याकडे जरा पाहूयात. त्यात कुठे imbalance जाणवतोय का कुठे ? पैसे मिळविण्याकरिता खूप जास्त तास मोजतोय का ? तर थांबतो जरा. घरात थांबतो. चालायला जातो. वाटलं तर त्या सिरियल्स पाहू, GYM मध्ये जाउ, मित्र मैत्रिणी करेन. नाक्यावर फक्या मारेन. पण वेळ जात नाही म्हणून पैसे जोडत बसणार नाही. फास्ट बरं करणारी औषधे नको. जरा लांबचा रस्ता पकडेन. थोडे स्लो होईन.

पुढचं कसं व्हायचं ?

ही खरी फक्त चिंता असते. म्हणजे न घेतलेल्या कर्जावर आगाऊ भरलेलं व्याज. मी हे STOP केलंय. ऐवजी विश्वास ठेवतोय. होतंय. Everything is OK. असं काम करूयात की त्यात शारीरिक झीज होईल, शिवाय मनाला थोडं काम मिळेल. पुढे जे होईल ते होऊदेत ना !

ह्या करता कोट्याधीश व्हावं लागतंच नाही मुळी !

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.