Showing posts with label नेटवर्किंग. Show all posts
Showing posts with label नेटवर्किंग. Show all posts

Thursday, 13 November 2025

तोच ( ग्राहक ) च नसेल, तर मी कुठून असणार !

​नेटवर्किंग मध्ये काम करत असताना कसे कसे अनुभव येत राहतात, जे शिक्षण म्हणून नाही घेतले ना, तर नक्की वैफल्य येईल. नुकताच आलेला एक अनुभव असा :

मला प्रवासाला जायचे होते. मी शक्यतो माझी हॉटेल खोली वगैरे माझी मीच पोर्टल वरून बुक करून जात असतो. गेल्या वेळी मला असे वाटले, की एखाद्या प्रवास यात्रेच्या सुविधा देणाऱ्या एखाद्या व्यावसायिक व्यक्तीमार्फत हे काम करावे. उद्देश असा की फक्त कमी पैशात सर्व काही असे न असता जरा ऐसपैस , तिथली रूम सेवा वगैरे बद्दल माहिती असलेल्या व्यक्तीने हे करून द्यावे. थोडे अधिक पैसे द्यायची माझी तयारी आहेच. सेवेला मोल असावेच. शिवाय बिझनेस नेटवर्क मधील मेंबर असल्याने जरा अधिक विश्वसार्हता वगैरे.

मी भरपूर वेळ हातात ठेवून वगैरे संपर्क केला, वेळोवेळी रिमाइंड केले. उत्तर “झालय हो, टेन्शन नका घेवू” हे पालुपद. शेवट अगदी प्रवासाच्या २-३ दिवस आधी १०० टक्के आगावू रक्कम भरून हॉटेल रूम बुक केली. दुर्दैवाने मी आजारी पडल्याने रद्द करावे लागणार असे दिसले. सदर व्यक्तीला हे सांगताच ताबडतोब उत्तर “पैसे परत मिळत नाहीत एक दिवस अगोदर रद्द केले तर” ! 

एकतर दोन दिवस होते हातात. किमान प्रयत्न करणे आणि त्याचे आश्वासन देणे तरी निश्चित शक्य होतच. बाकी काही असो, पण मला हा 

कायमच प्रश्न सतावत आलेला आहे … की आपण जे काम करत असतो ना, अगदी कोणतेही, ते कुणा तरी करिता असते नाही का ? 

म्हणजे असं… की तो जो … ज्याच्या करिता हा खटाटोप मांडलेला असतो, त्यालाच खोडून काढल्यासारखे झाले ना हे. तेही सेवा व्यवसाय !

शिवाय, बिझनेस नेटवर्क, जिथे फक्त एकमेकांच्या ओळखींचा व्यापार असतो, तिथे तर हे फार घातक ठरू शकते, नाही का ?

पूर्वी माझे एक मशीनरी चे पुरवठादार होते. माझा व्यवसाय मार्केटिंग करून मागण्या मिळविणे व जी मंडळी ती मशीन्स तयार करतात त्यांच्याकडून तयार करून घेवून ती पुरवणे ह्या प्रकारचा होता. तर कधी कधी ह्या पुरवठा दारांकडून वेळोवेळी विविध मशिनरीची वेगवेगळ्या ( म्हणजे मशीन तेच असेल, परंतु समोरून त्या मशीनकडून ईप्सित कार्य बदलले की मॉडल मध्ये बारीक बदल होत असे. ) किंमतपत्रकांची गरज भासायची. त्यामुळे आम्ही ह्यांच्याकडून ही किंमत पत्रके पुन्हा पुन्हा घेत असू. बरेच लोक द्यायचे सुद्धा. मान्य, की कधी कधी माझ्याकडून सुद्धा पूर्वी मागितलेले किंमतपत्रक पुन्हा मागविले गेले असावे. तरी मलाही भान होतेच की ! पण माझ्या ह्या मित्राने मात्र मला खणखणीत सांगून टाकले “आता ह्यापुढे मी तुम्हाला कोणतेही कोटेशन देणार नाही” 

एक दुसरा पुरवठादार होता, तो म्हणाला : “तुम्ही नुसतीच कोटेशन्स घेत राहता. ऑर्डर तर कधीच देत नाही !” 

ह्या दोघांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल मला नक्कीच आदर वाटतो. पण आपला उदरनिर्वाह हा वेळ विकून होत नाही ( आपण नोकरदार नाही ). ह्या अर्थी आपण सांगत आहोत की “अमुक आमच्याकडे आहे , तर ते तुम्ही घ्या”. मग समोरून विचारणा होणार. तर ह्याच मूलभूत संकल्पनेला छेद दिल्यासारखं झालं ना हे.


ह्या उलट एक व्यक्ती म्हणाली तीन वेळा नाही तीनशे वेळा विचारा सर. मी देतच राहीन. ह्या व्यक्तीशी पुढे घनिष्ठ मैत्री झाली. गुज्जू भाई. त्याचं म्हणणं : सुरुवातीला तुझ्याकडून जास्त प्रश्न येतील. हळूहळू कमी होतील.पण तू ट्रेन झालास की मला तुझ्याचकडून भरपूर धंदा येईल ना बाबा ! 


उगाच नाही लोक गुजराथी मंडळींकडून धंदा शिकत !

Thursday, 24 July 2025

स्पष्ट नकार म्हणजे शिष्टपणा नाही

आजचीच ताजी ताजी घटना....

एका व्यक्तीने काल मला ते काय करतात ते (कळत नव्हतं नीट) एक व्हॉट्सॲप संदेशमार्फत पाठवलं. पाठोपाठ घडून आलेल्या छोटेखानी संदेश आदान प्रदानातून आम्ही कोणत्या ग्रुप मार्फत एकमेकांना ओळखतो ह्याची खात्री पटली.

दरम्यान आज सदर व्यक्तीचा दुसरा संदेश. त्यात affiliate marketing बद्द्ल लिहिले होते, ज्याचा त्यांनी सांगितलेल्या बिझनेस शी तसा भासमान संबंध नाही आढळला. मी त्यांना स्पष्ट फिरून विचारलं की "आपण नक्की काय करता ?"

( प्रत्येकाकडे स्वतः विषयी नेमकं सांगायचं कौशल्य नसू शकतं.किंवा सुरुवात करताना नव व्यावसायिक अनेक वाटा हाताळून पाहत असतो, तेव्हा देखील असे होत असते.)

सदर व्यक्तीने जे सांगितलं, त्यात एक विशिष्ट उल्लेख केला, जे मला वाटलं की माझ्या कामाचे असेल. म्हणजे त्याची सेवा मी त्या विशिष्ट उपयोगासाठी जसेच्या तसे सुचवू शकेन. परंतु त्यांची सेवा ERP ही ज्या विशेष वापरासाठी आहे त्यात माझ्या मनातला वापर नव्हता. तरी हे संभाषण सुरु असतानाच त्यांनी " सर फोन करतो, बोलू सविस्तर " असे उत्तर पाठवले.

ही धोक्याची घंटा 

ह्यात खूप वेळ जातो, त्यामुळे मी त्याला स्पष्ट, परंतु नीट कळवून टाकले की बाबा, माझ्याकडे सरळ सरळ अशी requirement नाही त्यामुळे फोन करू नकोस. ह्यात खूप वेळ जाऊ शकतो. अर्थात हे सापेक्ष आहे म्हणा. तरीही आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं असेल तर अनेक ठिकाणी आपला जाणारा वेळ, आणि पाठोपाठ जाणारी ऊर्जा, पैसे ह्याचा विचार करणे नक्कीच उपयुक्त !

हा शिष्टपणा नाही 

उगाचच आढ्यताखोर आविर्भाव ह्यात नाही. तर पुढे जावू शकणारा दोघांचा वेळ वाचविणे हा उद्देश आहे. तरीही मी त्याला फोन करू नको , पण चहा करिता कधीही भेट ठरवू शकतो असे निश्चित सांगितले आहे.

पाहुयात आता 



Friday, 27 June 2025

आत्मसन्मान हीच खरी ऊर्जा

उद्योग व्यवसायात आपले उत्पादन, सेवा ह्या सुचणे, त्यांना एक व्यावसायिक विक्रीयोग्य रुप देणे, पाठोपाठ त्यांविषयी सतत सांगत राहणे हेही काम असते. म्हणजे काय तर त्यांचे कायमस्वरूपी दालन प्रत्यक्ष दुकान किंवा आंतरजालावर प्रस्थापित संकेतस्थळ तयार करणे ( किंबहुना दोन्हीही ). 

आणि नंतर ते अनेक ठिकाणी : अशी ठिकाणे, जी गप्पा मारण्यासाठी तयार करण्यात आलेली असतात जसे की इंस्टाग्राम वगैरे; किंवा अशी ठिकाणे की जिथून प्रत्यक्ष खरेदी करण्याच्या उद्देशाने व्यक्ती येतात, म्हणजेच बाजार  (जसे की अमेझॉन, जस्ट डायल, इंडिया मार्ट इत्यादी ); तर काही अशीही ठिकाणे की जिथे व्यक्ती त्यांच्या संगणक अथवा भ्रमण ध्वनी मार्फत शोध करतात ( जसे की गुगल ) अशा ठिकाणी पोस्ट करणे.

अजूनही इतर मार्ग आहेतच. इथे विषय भटकायला नको म्हणून थांबवतो,कारण चर्चा ह्या मार्गांची नाही, तर एक उद्यमी ला कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल बोलायचं आहे. 

उद्यमी:- मग ती व्यक्ती स्वतः चे काहीतरी असे करू पाहतेय की ज्याद्वारे तिचे अर्थार्जन त्याद्वारे होईल, दुसऱ्या कुणाची चाकरी न करता.
हा प्रवास सुरू असताना काही व्यक्ती, संस्थांच्या संपर्कात येतात, तिथे काही "महत्त्वाच्या" वगैरे व्यक्ती असतात, म्हणजे काय तर व्यवस्थेने त्यांना दिलेले पद. तर त्यांच्यापर्यंत पोचण्याचा उद्यमी सतत प्रयत्न करत असतात. त्यासाठी मनाविरुद्ध जाणे, विनंत्या करत राहणे हा प्रवास बऱ्याच ना इलाजस्ताव ती व्यक्ती करत असते, राहते. कृत्रिमरीत्या आवडून घेऊन करत राहते. काही व्यक्ती ह्या कृत्रिमरीत्या मुरवून घेतलेल्या कौशल्याला सरावतात. काहींमध्ये अजिबात हे शिरत नाही. काही लोक कधी कधी हे जमवून घेतात, तर कधी कधी अजिबात झेपत नाही त्यांना.

हीच शिदोरी पुढे कामी येणार 

कधी कधी मला स्वतः ला देखील स्वतः बाबत हा अनुभव येतो,येत असतो. 

"तुझं हेच चुकतं"
"थोडी आणखी कळ काढली असतीस तर.."

असे आप्तस्वकीय मंडळींचे ताशेरे, किंवा 

"त्याने बघ कसं पुढे - पुढे करून बरोब्बर पदरात दान पाडून घेतलं"
"आपलं प्रोफाईल नाय ना यार तसं

ह्या स्वरूपाची किंचित असूया, खेद मिश्रित वल्गना ( स्वतः ची )

अशा अनेक मनो प्रवासातून मी गेलोय,जात असतो. मला खरं तर ह्यातून मुक्त व्हायचं असतं ( हेही आत्ता आत्ता म्हणजे साठी ला  आल्यावर उमगलेले नव सत्य ). तर मला ह्यातून एक गोष्ट सुचली ती म्हणजे :- 

एका प्रमाणाबाहेर आपण हे नाही सहन करू शकत. आणि नाही करायचं. कधी कधी ते so called पदस्थ आपल्याला बऱ्यापैकी दुर्लक्षित करतात अशी जाणीव झाली आणि माझी अशी काही कृती झाली की त्यातून प्राप्त होऊ शकणाऱ्या संभाव्य लाभाला घातक होती ( हे नंतरच जाणवतं) , तर सर्वप्रथम स्वतः बद्दल योग्य वाटून घ्यायचं, अजिबात खंत किंवा अपराधी वगैरे वाटून घ्यायचे नाही , कारण आपण आपल्या आत्मसन्मानाची कदर केली, त्याकडे आलो की विश्रामाची भावना जागृत होते.

हीच शिदोरी पुढे कामी येणार !



Monday, 8 January 2024

Presentation साठी सुद्धा तयारी करावी लागते boss !

नेटवर्क ग्रुप मध्ये एक संधी असते कि सर्व members समोर Presentation द्यायची. members ही अमुल्य संधी जरा हलक्यात घेतात. मी पाहिले आहे कि ...

  1. Product बद्दल खूप बोलतात. ऐवजी referrals कसे हवेत हे बोलायला हवं 
  2. मी का referrable आहे ह्यासाठी top म्हणजे लोक ज्यांना ओळखतात त्या लोकांची नावे घ्यायला हवीत 
  3. Video Play करणे ह्यामुळे व्यक्तिगत कनेक्ट ची संधी हरवून बसतो आपण 
  4. presentation च्या पूर्वी आपल्या मेम्बेर्स शी वैयक्तिक call करून त्यांना आमंत्रित करावे 
  5. नंतर धन्यवाद स्वरुपात एखादा मेसेज तरी जावा.

ह्यामुळे आपल्याला व्यवसाय मिळायची संधी वाढते .

काय वाटतं तुम्हाला ?

Friday, 20 October 2023

कारकुंड्या मनोवृत्तीची फळे

नेट्वर्किंग क्लब मध्ये चित्र विचित्र अनुभव येतात. खास करून रेफरल नामक प्रकार दिल्यावर.

नुकतेच मी एकाला एक दोन-तीन रेफरल दिले, त्याबद्दल पहा त्यांची उत्तरे :-


हे update कसे आहे बघा .... जणू काही सदर व्यक्ती मला report करत आहे ... कप्पाळ ! एखाद्याने रेफरल दिला म्हणजे काही वेगळे कष्ट घेवून आपल्यासाठी काहीतरी तयार संपर्क दिला आहे ही भावनाच नाही. कसा वाढणार धंदा !

असाच अनुभव येतो Done Deal सांगताना. एखाद्याने रेफरल दिला आणि काही कारणाने त्याचे पेमेंट यायचे वगैरे राहिले असेल, तर मंडळी सांगतात... "पेमेंट आले कि done deal देतो" ... जणू काही त्याने तुला referral देवू करून काही गुन्हा अपराधच केलाय ! अरे, ज्याने रेफरल दिला त्याची काय चूक ? आणि तू काय सरकारी tax भरतो आहेस कि काय !

काय म्हणायची ही मानसिकता ! कारकुंड्या मनोवृत्तीची ही फळे ......

Tuesday, 25 July 2023

संख्या व खरी परिणामकारकता

बिझनेस नेटवर्क्स व्यवस्थित चालावी यासाठी त्यातील प्रमुख घटक म्हणजे त्या त्या नेटवर्क चे मेम्बर्स ह्यांनी कृतीशील राहावे लागते. आणि ते राहावेत ह्यासाठी नेते मंडळी अनेक प्रकारे शक्कल लढवीत असतात. त्यातली एक शक्कल म्हणजे : अमुक एक संख्याबळ मिळविणे व त्याला जोडून असलेला एखादा खास मान-सन्मान. 

ह्यातील उद्देश तसेच हेतू निश्चितच उदात्त आहे ह्यात शंका नाही. कारण अणूक एक संख्येत घोळत पडलेला एखादा ग्रुप ह्या उद्दिष्टाने जरा ढवळला जातो, त्यांचे म्होरके कामाला लागतात आणि एक उर्जा संचारते. ही उर्जा संक्रमित होते व नवनवीन मेंबर जोडले जातात. ह्याची परिणती अर्थात उत्तम प्रकारे व्यवसाय वाढण्यात होऊ लागते, जे की नेटवर्क चे प्रमुख साध्य असते.

हे काम जर योग्य रीतीने केले, तर खूप छान परिणाम मिळतात. एक तर व्यवसाय वाढीला लागतो , शिवाय नाठाळ मंडळी बाद होवून कर्तृत्त्ववान मेंबर चमकू लागतात. 

ह्याउलट जर विवेक राखला नाही, तर मात्र "नुसती संख्या" हा एक नंबर गेम होतो, विचित्र संस्कृती तयार होते आणि गाडी रसातळाला जावू लागते. त्यामुळे कर्तव्याचा काहीतरी माप-दंड हवाच.

ह्याच संदर्भात मी ज्या क्लब चा सदस्य आहे, तिथे ५० ही संख्या प्राप्त झाली, की एक विशेष सन्मान दिला जातो. मी एक प्रस्ताव दिलाय तो असा, की याकरिता त्या ग्रुप ने निदान ३ महिने सलग ५५ ही संख्या राखून दाखवावी. त्यानंतर त्यांचा सन्मान करावा.

पाहू काय होतंय !

Sunday, 7 May 2023

नेटवर्किंग आणि धंदा

नुकतंच मला एका परिचित व्यक्तीने एक Requirement share केली. मी संपर्क केला, तर त्यांनी सगळं पुन्हा share करायला सांगितलं, प्रोफाईल मागविल वगैरे. ह्याचा अर्थ असा, कि ज्यांनी रेफर केलं त्यांचं तिकडे तितकेसे वजन नाहीये. किंवा त्यांनी माझ्या बद्दल बोलायला काहीच कष्ट घेतलेले नाहीयेत. 

अशा प्रकारे काम करायचे नाही असं मी ठरवलं आहे. कारण मी अशा प्रकारे अजिबात कनेक्ट करून देत नाही.

जी लोकप्रिय नेटवर्क आहेत म्हणजे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यामध्ये रेफरल देणे आणि त्या मार्फत प्रत्यक्ष व्यवसायात ते रेफरल रूपांतरित होणे याला खूप महत्त्व दिलं जातं.

एका प्रकारे खरंही आहे ते कारण मुळात नेटवर्किंग चा कन्सेप्टच हा आहे की काही ठराविक व्यावसायिक लोकांसोबत काम करून व्यवसाय वृद्धी व्हावी

हे रेफरल विविध प्रकारे दिले जातात. कधी कुणी पटकन संपर्क तिथल्या तिथे शेअर करतो, किंवा कधी कुणी अगदी तपशीलवार व्यवसाय समजून घेऊन नंतर शेअर करतो.

खरं म्हणजे व्हायला हवं असं की आपल्या मेंबर चा व्यवसाय नीट समजून घेऊन, त्या व्यवसायाला अनुरूप असा एखादा संपर्क पाहून त्याच्याशी परस्पर बोलून आणि एक पार्श्वभूमी तयार करूनच आपल्या मेंबरला त्यांच्याशी जोडून देणे.

या पद्धतीने काम केलं तर आपल्या मेंबरचे काम कमी होत जाईल आणि त्याला सेल्स किंवा मार्केटिंग याच्यावर फार लक्ष न देता प्रत्यक्ष काम (कर्म) याच्यावर जास्त एकाग्रतेने काम करता येईल.

सध्या नेटवर्कमध्ये खूप उथळ पद्धतीने काम होताना दिसत. रेफरल ची खिरापत वाटणे हा एक लोकप्रियतेचा मार्ग होऊन बसलाय. त्यात मिळणाऱ्या टाळ्या, मिळणारी उथळ प्रसिद्धी, हा एक अधिकाधिक मेंबर्स मिळवणे याचा मार्ग होऊन बसलाय. यात पुन्हा जेव्हा हे मेंबर्स अधिक मिळवणे याच्या मोहिमा उघडल्या जातात तेव्हा तेव्हा हे दाखवलं जातं की मेंबर्स वाढले की आपोआप व्यावसायिक संधी अधिकाधिक निर्माण होत आहेत

वरकरणी यात जरी तथ्य वाटलं, तरी यात वाहवून जाण्याची शक्यता अधिक आहे. मेंबर्स चं लक्ष एकमेकां सोबत अधिक दृढ नातेसंबंध निर्माण करणे यापासून विचलित होऊन ते विखुरलं जातं. 

त्यामुळे कमी आणि मोजक्या लोकांसोबत अधिक खोलवर काम करणे या प्रकाराला तिलांजली मिळते.

Monday, 20 February 2023

Referrals देण्याची घाई नको .....

पार्श्वभूमी 


एकमेकांना व्यावसायिक संदर्भ ( Referrals ) देणे हा प्रमुख उद्देश ठेवून व्यावसायिक नेट्वर्किंग क्लब्स चालविले जातात. ह्यात विक्री होण्यासाठी मिळणारे connects ह्यावरच जास्त भर असतो. आधी मेम्बर्स आळीपाळीने आपापल्या व्यवसायाची ओळख देतात; तसेच आपल्याला हवे असलेले संदर्भ किंवा connects मागत देखील असतात. ह्याच मीटिंग मध्ये मग मेम्बर्स असे कनेक्ट स्वत: च्या नेटवर्क मधून share करतात. तसेच पूर्वी अशा कनेक्ट मधून काही प्रत्यक्ष व्यवहार घडला असेल, तर तो देखील share करतात, प्रत्यक्ष किंमती सकट. उद्दिष्ट : अशा नेट्वर्किंग ची प्रत्यक्ष ताकद लोकांना कळावी. आणि अधिकाधिक संदर्भ share व्हावेत.

आहे उदात्त तरी ....


जेव्हा जेव्हा हे sharing होते, तेव्हा तेव्हा टाळ्या वाजतात, देणाऱ्या वर लोकांचा आदराचा भाव प्रदर्शित होतो. त्यात पुन्हा लोकांत प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून सर्वाधिक संदर्भ देणारी व्यक्ती निवडली जाते, किंवा तिच्याकडे लक्ष जाईल अशी एखादी कृती केली जाते. उद्दिष्ट पुन्हा : ही उदात्त संस्कृती निर्माण व्हावी, जोपासली जावी. हे referrals देताना व्यवस्थित पद्धत पाळली न गेल्याने खूप वेळ वाया जातो, आणि ह्या उदात्त कृतीतून उथळपणाच जास्त वाढीला लागतो. नेटवर्क चालविणाऱ्या मंडळींना ह्यातून दिसणाऱ्या भासमान आकड्यांवर अधिक प्रेम असलेलं दिसतं; हे आकडे इतर लोकांच्या नजरेत भरतात आणि तेच त्यांना जास्त लोकप्रिय करतात. ह्या ऐवजी प्रत्यक्ष referrals, ते अधिक कसदार दिले - घेतले जावेत ह्याकरिता जर संस्कृती निर्माण केली गेली, तर खरे आकडे वाढतीलच, शिवाय वेळ खूपच वाचू शकेल. एक मोठा धोका ह्यात असतो : तो म्हणजे वरकरणी हे अनाकर्षक दिसतं. कारण ह्यात टाळ्या खूप कमी वाजतात आणि Adrenaline Rush अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे हे कुणीच मनावर घेत नाही. ह्यात "मेम्बर ची संख्या वाढविणे" मध्ये असलेली किक नाही. परिणामी नेत्यांना ह्याबद्दल सांगून तसा काहीच उपयोग होत नाही असा माझा अनुभव आहे. member ना सांगायचे तर त्यात खूप वेळ जातो, माझ्या सारख्या मेम्बर चा. तरी, मी कृतीने हे करून दाखवायचा खूप प्रयत्न करत असतो. 

माझी मेथड 


  1. ज्याला referral द्यायचा त्याची योग्यता आधी तपासणे, नसेल तर त्याला ती कशी build करायची हे सांगणे.
  2. योग्यता असेल, तर ज्यांचा referral द्यायचा, त्याना विचारणे कि त्यांची गरज अजूनही आहे , की भागली, किंवा सदर संपर्क त्यांच्या उपयोगाचा आहे किंवा नाही. 
  3. असेल, तर आपल्या मेम्बर बाबत त्यांना कल्पना देणे, जमल्यास त्यांच्या सेवेची किंमत देखील सांगणे. जर ते हो म्हणाले, तर आपल्या मेम्बर ला सदर संपर्क share करायचा.
  4. मेम्बर जेव्हा आपापले ASK मागतात, तेव्हा आपल्या मनात येणारा संपर्क reference म्हणून share न करता, वहीत नोंद करून ठेवायचा आणि आवश्यक छान बीन करून मगच Qualify झाल्यास referral म्हणून share करायचा.

ह्या पद्धतीने खूप वेळ वाचतो, आणि आपल्या मेम्बर ची प्राथमिक Filtration प्रोसेस मधून सुटका होऊ शकते. त्याचे देखील काम fast होते. 

माझ्या बद्दल सांगताना किंवा referral मागताना मी देखील माझ्या Reputation ( व्यावसायिक नावलौकिक ) बद्दल सविस्तर सांगतो, तसेच योग्य तेच संदर्भ मागतो. त्यामुळे असे झटकन referrals मिळण्याची शक्यता मंदावते तसेच मिळालेले रुपांतरीत होण्याची शक्यता वाढते. 

आपल्याला हे विचार कसे वाटले, ह्याबद्दल प्रतिक्रिया जरूर द्या. 

Monday, 23 January 2023

व्यवसायातील परिपक्वता...

एखादया कुटुंबात, समाजात व्यवसायाचा वारसा आहे असं आपण गौण पणे म्हणतो. खरेही आहे. हा वारसा म्हणजे अनेक छोटे छोटे निर्णय घेताना येत असलेला सफाईदार पणा. हे घडत असतं ते त्या त्या घरांतील वेळोवेळी घडणाऱ्या चर्चांमधून. लहान मुलांना देखील ही निर्णय प्रक्रिया आधी समजू लागते आणि मग उमगू लागते. आणि ते लगेच कृतीत सहजपणे परावर्तित होवू लागते. हा वारसा.

हे संपूर्ण पिढीचे शिक्षण अगदी कमी वेळात करायचे उत्तम साधन म्हणजे व्यावसायिकांच्या समूहात वावरायचे आणि उत्तम श्रोता, वाचक बनायचे.

आमच्या Saturday क्लब मध्ये एक तरुण उद्योजिका आहे वैष्णवी जोशी. मातृ पार्जित (आई पासून चालत आलेला ) फोटोग्राफी चा व्यवसाय पुढे सुरू ठेवणारी वैष्णवी ...

  • बहुतेक वेळा तिचा प्रो कॅमेरा सोबत आणते, मनसोक्त भरपूर फोटो काढते, वाटते. अजिबात हात आखडता न घेता. दर १५ दिवसांनी येणारी मीटिंग ही आपले reputation सिद्ध करणे, तसेच कौशल्य पणाला लावून हात साफ करून घेण्याची देखील उत्तम संधी आहे हे चांगले जाणून आहे.
  • शिवाय, फक्त एकाच मिनिटाच्या ओळखीतून आपला नावलौकिक अतिशय छान पद्धतीने सर्व मेंबर्स पर्यंत पोहोचवते.
  • ह्याशिवाय मिळताच नव्या प्रकारच्या कामांच्या शोधात राहते आणि क्षेत्र विस्तारत राहते.

वैष्णवी आणि तिच्यासारखे इतर व्यावसायिक डोळस पणाने पाहत राहून देखील लवकर परिपक्वता आणता येईल.

Sunday, 6 March 2022

दिलेले Referral सुद्धा निभावायला लागतात !

Referrals देणे : Networking धर्म निभावायची उत्तम संधी !

नेट्वर्किंग मधून व्यवसाय वाढतो म्हणजे फक्त leads मिळाले आणि ते Execute केले, असं नाहीये. तर आपण दिलेल्या रेफरल बद्दला सुद्धा जागरूक रहावे लागेल. 

अनेकदा मिळालेले प्रोजेक्ट्स किंवा कामे पूर्णत्त्वास नेताना दोन्ही पक्ष कुरकुर करतात. आणि मग त्यात आपण रेफरल दिलेला असला तर आपल्यावर जबाबदारी येतेच. आपण "तुम्ही तुमचं बघून घ्या" असं म्हणून झटकू शकतो जबाबदारी; एखादे वेळी असं करावे सुद्धा लागू शकेल, पण त्याचीही स्टेज असते. आणि आपण बांधील राहतोच !

आपली भूमिका त्रयस्थ असावी ! 


कोणतीच Side बरोबर किंवा चूक नसते अशा प्रोजेक्ट्स मध्ये. आपण त्रयस्थ राहावे, आणि त्याना त्यांचा dispute सोडविण्याला प्रोत्साहन द्यावे, इतकेच ! त्यांनी कुणीही काही निर्णय घेऊन टाकला असेल, तर आपण खरे तर काही करू शकत नाही. आपली गरज वाटत सुद्धा नसेल त्यांना कदाचित ! हे देखील ठीकच आहे की.

Saturday, 26 February 2022

निश्चित व्यवसायाकडे वाटचाल ....

वर च्या पहिल्या फोटोत आहेत बाचल सर, ज्यांचे अवंती कालाग्राम हे सुरेख resort आहे, तर दुसरे छायाचित्र आहे डॉ स्मिता सोवनी ह्यांचे ज्या एक ट्रेनर आहेत.

एका संकल्पनेतून सुरू झालेल्या आमच्या निउ ची आता निश्चित बिझनेस कडे मार्गक्रमण सुरू झालेले आहे. 3+1 अशा पद्धतीने निउ चा कार्यक्रम सुरू आहे.

3 + 1 म्हणजे ?

3 मीटिंगस डिजिटल व एक physical. Physical मध्ये 2 मेम्बर्स वर Deep Focus. त्यांच्या एखाद्या installation वर व अव्यक्त व्यवसाय असेल तर विशेष लक्ष देऊन. गेल्या महिन्यात वाकडे व गांधी ह्यांच्याकडे तर ह्या महिन्यात बाचल व डॉ स्मिता हा प्रयोग संपन्न झाला. सहकार्य तसेच कनेक्ट्स कुठे वाढवता येतील ह्यावर चर्चा असं घडतंय. कुणाशी जास्त 121s करता येतील ,हे सुद्धा समजतंय.

Thursday, 24 February 2022

BNI चा funda कदाचित हाच असेल ...

BNI नामक एक आतंरराष्ट्रीय नेटवर्किंग संस्था आहे,ज्यांचा प्रमुख अजेंडा हा आहे की फक्त एकच ग्रुप मध्ये काम करायचं , म्हणजेच within bni तरी इतर ग्रुप्स ना जायचं नाही. वरकरणी हा Restrictive वाटणारा approach खूप योग्य आहे असं लक्षात येऊ लागलं आहे माझ्या.

आपण focused राहतो

एकाच ठिकाणी काम करत राहिल्याने आपण प्रत्येक member च्या बिझनेस मध्ये खोल शिरतो, शिवाय फोकस राहतो !

जास्त ओपन होत जातील संबंध

जास्त जास्त आपण संपर्कात येऊ लागतो तसे अधिक कळू लागतो आणि एकमेकांच्या उपयोगीही पडू लागतो. 

Reviews चा खरा उद्देश

हा review मिळालाय आमच्या नेटवर्किंग ग्रुप वरून. ह्या अनुषंगाने एक विचार मनात आलाय तो मांडतो :-

व्यवसायात उत्तरोत्तर आपलं प्रमोशन करायचं काम कमी कमी होत जायला हवं अथवा मिळणारे results तरी जास्त व्हायला हवेत. हा कन्सेप्ट जर मुळाशी ठेवला,तर आपण घेत असलेले reviews हे समजून घ्यायला हवेत. 

प्रत्येक review गुगल वर असायला हवा असे नाही !

आपण इंटरनेटवर सर्च मध्ये पहिलं यावं किंवा आपलं नाव prefer केलं जावं हे सर्वच उद्योजक मंडळींना वाटतं. पण हे काही तितकंसं खरं नाहीये. खूप deep विषय आहे हा, तरी reviews च्या context मध्ये विचार केला, तर ज्या सोर्स कडून जो आपला ग्राहक आला आहे , त्याने त्या त्या ठिकाणी तो review दिला की बास ! ह्याने सर्च वाढेल का ? काय ठाऊक ! पण त्या ग्रुप मध्ये मात्र इतर मंडळींना कळेल की आपली सेवा किंवा उत्पादन हे कदाचित जगातलं सर्वात भारी नसेल, पण उपयुक्त मात्र निश्चित आहे.

हळूहळू परंतु निश्चित growth चा हा हमखास मार्ग 

ह्या मार्गाने आपण अगदी झटक्यात प्रगती करू असे नाही, परंतु उत्तरोत्तर आपलं काम तेच, तसंच राहील आणि आपले लाभार्थी मात्र एका स्थिर वेगाने वाढत राहतील !

Thursday, 10 February 2022

का बरं घ्यायचं मोठं टार्गेट ?


आमच्या saturday क्लब च्या chapter मध्ये नुकताच आम्ही 50 मेम्बर्स चा संकल्प सोडलाय.

ह्याच वेळी chapter मध्ये आतही challenges आहेतच. फक्त आम्हालाच नव्हे,तर संपूर्ण रिजन मध्ये असलेल्या अनेक chapters म्हणजेच जवळजवळ सर्वच chapters ना काही प्रश्न भेडसावत असतात.

हे प्रश्न आधी सोडवायचे की नवीन मेम्बर्स वाढवण्याकडे लक्ष द्यायचं ? असा सवाल कधी कधी समोर येतो, त्याबद्दल थोडं ...

# स्वयंप्रेरीत members मिळत नसतील,तर प्रशिक्षित करावी लागतील. ट्रेनिंग हा अविभाज्य भाग आहे. ही ट्रेनिंग्स जास्त प्रमाणात व्हायला हवीत, शिवाय विविध टप्प्यावर असायला हवीत. सर्वात अग्रक्रमाने : नवीन leadership विकसित करण्यासाठी हवीत. 

# नवीन मेम्बर्स add करावेच लागतील, त्यातून स्वयं प्रेरित मंडळी अधिक मिळण्याची शक्यता जास्त आहे

# शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः जेव्हा कुणाला आमंत्रित करतो, योग्य मेम्बर आणण्यासाठी प्रयत्न करतो,तेव्हा माझा एक नवीन संपर्क तयार होतो,जो मला स्वतः ला काही व्यवसायात मदत करू शकतो-शकेल.

# आमचे एक ट्रेनर विनीत बनसोडे ह्यांचं एक वाक्य मला सतत प्रेरित करत राहतं : प्रत्येक दगडाखाली हिरा आहे ! Member च्या संदर्भाने विचार करा : आणि हे हिरे अधिकाधिक गोळा करत रहा

मला जेव्हा ह्यासाठी स्वतः ला प्रयत्न करायला लागतो,तेव्हा माझा comfort झोन आपोआप ब्रेक होतो आणि मी सहजपणे optimistic होतो,प्रयत्नवादी होतो, हा आंतरिक बदल मला हवाय, म्हणून हवं हे 50 चं target !

Saturday, 29 January 2022

वाकडे ह्यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे : सोलर पॉवर आणि आपली सोसायटी चे बिल

काल श्री वाकडे ह्यांनी काही मुद्दे सांगितले, ते खालील विडीयो मध्ये सविस्तर ऐकता येतील, शिवाय समरी अशी :-

  • २५-30 सदनिका धारकांच्या इमारतीत १५ kw ची system लागेल.
  • साधारण ६० युनिट्स रोजचे लागतील 
  • पंप, लिफ्ट इत्यादी सर्व ह्यावर चालतं 
  • ह्या १५ KW सिस्टीम साठी ८ लाख खर्च येतो अंदाजे 
  • ह्याचा payback पिरीयड साधारण ३.५ ते ४ वर्षे आहे, त्या नंतर १० टक्के बिल येईल
  • आयुष्यमान १५ वर्षे तरी नक्कीच चालेल, घसारा १५ टक्के मिळेल, मालमत्ता करत ५ टक्के मिळेल 
  • ह्याला अंदाजे ९०० चौ फुट जागा लागेल 
  • मेंटेनन्स म्हणजे काचा साफ करणे, महिन्याकाठी 
  • Shadow Free जागा हवी 
  • महा वितरण शी सर्व Liaison वाकडे & co चं पाहतात.
  • संपूर्ण काम ४ महिने मध्ये पूर्ण होतं 
सविस्तर विडीयो :- 



Thursday, 27 January 2022

मेम्बर फोकस्ड Activity

नेटवर्किंग द्वारे जर स्वतः चा व्यवसाय वाढवायचा असेल, तर उद्बोधन तर हवंच, पण active, शिस्तबद्ध प्रयत्न देखील करणे आवश्यक आहे. मुळात आपण एखादे उद्दिष्ट ( आर्थिक ) डोळ्यासमोर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ते मिळविण्यासाठी मार्गक्रमण.

निवडक उद्यमी हे उद्दिष्ट गाठायला सोबत राहणाऱ्या उद्यमी लोकांचा समूह आहे. जरा विचार करूया, की व्यवसाय कसा मिळेल :

थेट कुणाला आपली सेवा/ products हवी असल्यास
इतर सहकार्य करार- मदार ( सामायिक व्यावसायिक )
इतर मदत ( जसे एखाद्या शहरात नेटवर्क वाढविणे )

इथपर्यंत यायला जरा वेळ जावा लागतो, मेम्बर व्यवसाय करणे योग्य आहे की नाही हे त्याच्या कामावरून, सहभागावरून हळूहळू आपल्याला कळायला लागतं. साधारण वर्षभरानंतर त्या मेम्बर चा व्यवसाय आपल्याला थोडा "परिचित" होतो. आता हीच exact वेळ असते खोलात शिरायची. 

म्हणजे काय करायचं ?

आता त्या मेम्बर बद्दल एकंदरीत जास्त माहीत व्हायला हवं :
अर्थात त्याचा जीवनपट, त्याची एकंदरीत philosophy, त्याचे बिझनेस verticals, आणि अर्थात त्याचे goals. शिवाय त्याला हे मिळवायला साधारण कोणत्या प्रकारच्या बिझनेस पार्टनर्स, असोशिइट्स किंवा कोणते नवीन सहाययक, किंवा कोणती इतर मदत हवी आहे हे त्या मेंबर ने explain करून सांगायची त्याला संधी मिळणे.

मेंबर focussed Activity

हाच उपक्रम निवडक मध्ये आता आम्ही करू पाहत आहोत. दर महिन्याला एक शुक्रवार हा राखीव असेल तो अशा 2 members करता. 11.30 पासून ते 1.00 हा वेळ पहिल्या member साठी तर 2.00 ते 3.30 हा वेळ दुसऱ्या member साठी द्यायचा आहे. मध्ये जेवण.

ह्यात प्रत्येकाचा "फायदा" आहे.

हे "दुसऱ्या करता करणे" ह्या भावनेतून तर कराच, शिवाय ह्याला एक व्यावहारिक, प्रॅक्टिकल अँगल सुद्धा आहे.

दुसऱ्याचा व्यवसाय समजून घेता घेता आपल्याला कळू शकतं, की सदर मेंबर आपल्याला कुठे कनेक्ट देऊ शकेल, मला कुठे मदत होऊ शकेल त्याची. पटकन 10 मिनिटांत न उरकता दोन- चार तास पसरलेली ही activity असल्याने ह्यातून खूप छान हे सर्व घडू शकेल.

पाहू, ता. 28 पासून हे सुरू करत आहोत. पोस्ट करूच, यथावकाश.

Sunday, 23 January 2022

21 तारखेची निउ मीटिंग

मागे निवडक मध्ये franchising च्या उथळपणा विषयी चर्चा झालीच होती. कोणीही उठतय आणि franchise देतंय हे तर अगदी वरचेवर दिसतं. अनेकवेळा ह्याचा सखोल न विचार केलेला असतो, ना अभ्यास. व्यावसायिक बांधिलकी तर फारच लांबचा विषय राहिला. ह्याच पार्श्वभूमीवर खांडसरी चहा च्या सुनील गोसावी ह्यांच्याशी चर्चा झाली.

पाठोपाठ मकरंद पारखी ह्यांनी एखादा छोटासाच मिळालेला कनेक्ट एक मोठया ऑर्डर मध्ये कसा रूपांतरित केला त्याविषयी उलगडून सांगितलं

नंतर उपस्थित लोकांनी आपली ओळख करून दिली - घेतली, संपुर्ण सेशन Live होता फेबु च्या कृपेने :

https://www.facebook.com/saumitramg/videos/1108086523259956/

Saturday, 15 January 2022

मेंटरिंग करणे हे स्वतः साठी आहे !


BYST च्या निमित्ताने बऱ्याच तरुण तरुण उद्योजकांना मेंटरिंग करण्याची संधी मिळते. मुळात मेंटरिंग हा शब्द आहे फक्त. यात त्या नव उद्योजका च्या फक्त आधी मी उद्योग केलेला आहे, इतकंच सत्य आहे. आधीची गाडी पकडण्यासारखं. त्यामुळे फक्त सांगायची भूमिका असायला हविये, आणि शिकणाऱ्या ची पण, हे स्वतः ला सतत सांगायला लागतं. नाहीतर कुठून तो "आगाऊपणा" अंगात घुसेल सांगता येत नाही☺️

राजपाल ह्यांचं मेंटरिंग 

मालाड chapter ला प्रेसेंटशन ला आधी माझी ओळख करून द्यायची होती,त्याकरता एक blank sheet मला पाठवला गेला,जो मी तसा निरिच्छ पणे भरून दिला. रात्री श्री राजपाल ह्यांचा मला फोन ( माझी ओळख करून देणारे ) आला, आणि साधारणपणे 20 ते 25 मिनिटे ह्या व्यक्तीने माझा ताबा घेतला, अगदी बापा प्रमाणे. माझ्या प्रत्येक उत्तराला प्रतिप्रश्न करत, मागे न हटता त्यांनी माझे अक्षरशः उद्बोधन केले, ह्याला म्हणायचं मेंटर. आणि ह्यात त्यांचा स्वतः चा तसूभरही फायदा नसताना. सगळा फायदा माझाच. अशा काही व्यक्ती असतात, ज्या विनाकारण इतरांचं मेंटरिंग करत असतात, त्यांना प्रणाम !

एक रेफरल की कीमत तुम क्या जानो ठाकूर


फक्त आडनाव वाकडे असलेला हा सरळ व सरधोपट उद्योजक. स्वतः च्या कष्टातून उभारलेला उद्योग. स्वतः पुरता न थांबता, त्याने दुसऱ्या एका मेम्बर ला एक रेफरल देऊ केला ज्याचं रूपांतरण 3 कोटी च्या order मध्ये झालं. हे कसं घडलं ह्याची कथा निउ च्या संक्रांत meeting मध्ये share केली गेली. ही मीटिंग facebook live झाली.

121s ना चालना ....

ह्या स्टोरी मुळे 121 करणे किती महत्त्वाचं आहे , हे अधोरेखित झालं. शिवाय योग्य पार्टनर्स पिक करणं हे देखील किती महत्त्वाचं आहे, हे सुद्धा !