Friday, 27 June 2025

आत्मसन्मान हीच खरी ऊर्जा

उद्योग व्यवसायात आपले उत्पादन, सेवा ह्या सुचणे, त्यांना एक व्यावसायिक विक्रीयोग्य रुप देणे, पाठोपाठ त्यांचे कायमस्वरूपी दालन प्रत्यक्ष दुकान किंवा आंतरजालावर प्रस्थापित संकेतस्थळ तयार करणे ( किंबहुना दोन्हीही ), नंतर ते अनेक ठिकाणी : अशी ठिकाणे, जी गप्पा मारण्यासाठी तयार करण्यात आलेली असतात जसे की इंस्टाग्राम वगैरे, किंवा अशी ठिकाणे की जिथून प्रत्यक्ष खरेदी करण्याच्या उद्देशाने व्यक्ती येतात, म्हणजेच बाजार, जसे की अमेझॉन, जस्ट डायल, इंडिया मार्ट इत्यादी, तर काही अशीही ठिकाणे की जिथे व्यक्ती त्यांच्या संगणक अथवा भ्रमण ध्वनी मार्फत शोध करतात, जसे की गुगल.

अजूनही इतर मार्ग आहेतच. इथे विषय भटकायला नको म्हणून थांबवतो,कारण चर्चा ह्या मार्गांची नाही, तर एक उद्यमी ला कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल बोलायचं आहे. उद्यमी:- मग ती व्यक्ती स्वतः चे काहीतरी असे करू पाहतेय की ज्याद्वारे तिचे अर्थार्जन त्याद्वारे होईल, दुसऱ्या कुणाची चाकरी न करता.

हा प्रवास सुरू असताना काही व्यक्ती, संस्थांच्या संपर्कात येतात, तिथे काही "महत्त्वाच्या" वगैरे व्यक्ती असतात, म्हणजे काय तर व्यवस्थेने त्यांना दिलेले पद. तर त्यांच्यापर्यंत पोचण्याचा उद्यमी सतत प्रयत्न करत असतात. त्यासाठी मनाविरुद्ध जाणे, विनंत्या करत राहणे हा प्रवास बऱ्याच ना इलाजस्ताव ती व्यक्ती करत असते, राहते. कृत्रिमरीत्या आवडून घेऊन करत राहते. काही व्यक्ती ह्या कृत्रिमरीत्या मुरवून घेतलेल्या कौशल्याला सरावतात. काहींमध्ये अजिबात हे शिरत नाही. काही लोक कधी कधी हे जमवून घेतात, तर कधी कधी अजिबात झेपत नाही त्यांना.

हीच शिदोरी पुढे कामी येणार 

कधी कधी मला स्वतः ला देखील स्वतः बाबत हा अनुभव येतो,येत असतो. 

"तुझं हेच चुकतं"
"थोडी आणखी कळ काढली असतीस तर.."

असे आप्तस्वकीय मंडळींचे ताशेरे, किंवा 

"त्याने बघ कसं पुढे - पुढे करून बरोब्बर पदरात दान पाडून घेतलं"
"आपलं प्रोफाईल नाय ना यार तसं

ह्या स्वरूपाची किंचित असूया, खेद मिश्रित वल्गना ( स्वतः ची )

अशा अनेक मनो प्रवासातून मी गेलोय,जात असतो. मला खरं तर ह्यातून मुक्त व्हायचं असतं ( हेही आत्ता आत्ता म्हणजे साठी ला  आल्यावर उमगलेले नव सत्य ). तर मला ह्यातून एक गोष्ट सुचली ती म्हणजे :- 

एका प्रमाणाबाहेर आपण हे नाही सहन करू शकत. आणि नाही करायचं. कधी कधी ते so called पदस्थ आपल्याला बऱ्यापैकी दुर्लक्षित करतात अशी जाणीव झाली आणि माझी अशी काही कृती झाली की त्यातून प्राप्त होऊ शकणाऱ्या संभाव्य लाभाला घातक होती ( हे नंतरच जाणवतं) , तर सर्वप्रथम स्वतः बद्दल योग्य वाटून घ्यायचं, अजिबात खंत किंवा अपराधी वगैरे वाटून घ्यायचे नाही , कारण आपण आपल्या आत्मसन्मानाची कदर केली, त्याकडे आलो की विश्रामाची भावना जागृत होते.

हीच शिदोरी पुढे कामी येणार !



No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.