Showing posts with label General. Show all posts
Showing posts with label General. Show all posts

Friday, 23 December 2022

एका Single Product मधील ताकद : कैलास जीवन

BYST च्या निमित्ताने कैलास जीवन ह्या प्रसिद्ध product व त्यांचे तिसऱ्या पिढीतील उद्योजकीय वारसदार श्री परेश कोल्हटकर ह्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला, त्यातील वेचक मुद्दे :-

  • आजोबा, कीर्तनकार, त्यांनी सुरु केलेला जवळपास ६५ वर्षे जुना उद्योग. दोन काकांनी उद्योग पुढे नेला. आता ३ री पिढी वारसा चालवीत आहे. सुरुवातीला वाड्यात असलेला हा उद्योग आता जवळजवळ १० हजार स्क्वेअर फुटात विस्तारला आहे.कारखाना जवळजवळ ८०% स्वयंचलित आहे. 
  • अद्ययावत अशी यंत्रसामुग्री असून सतत R & D सुरु ठेवून काळाच्या पुढे ५ पावले. Clinical Trials वर भर देवून कैलास जीवन हे जगाच्या काना कोपऱ्यात जाण्यासाठी आता सर्वतोपरी सिद्ध झाले आहे. बाह्य उपचारांसोबत पोटातूनही घेता येणारे कदाचित कैलास जीवन हे अगदी काही औषधांपैकी एक असावे.
  • नुसते "५० वर्षे जुने" असे न राहता, सर्व Documented अशा स्वरुपाची समिधा कैलास जीवन राखून आहे, ज्याच्या जीवावर सातासमुद्रापार जाण्यासाठी हे Multiprpose आयुर्वेदिक क्रीम आता सज्ज आहे. दर्जाबाबत अजिबात तडजोड होत नाही, तसेच सप्लायर्स च्या बाबतही नाही केली जात. सचोटी हे एक प्रमुख व्यावसायिक मूल्य म्हणून जपले जाते. 
  • TV वरची जाहिरात हा Turning Point ठरला. १९८८-८९ साली कैलास जीवन हे दूरचित्रवाणी वर झळकू लागलं आणि घरगुती स्वरुपात असलेला उद्योग खूप वाढायला लागला. इतका की कितीही करा, पुरेच् ना. इथून मुख्य झेप घेतली. मग धायरी ला एक एकर जागेत factory सुरु केली. ६५ वर्षांपासून प्रस्थापित अशा ह्या कंपनीने खूप मोठी रेंज करून त्यातील मोजकीच प्रमोट करणे ह्याऐवजी कैलास जीवनलाच आता खूप विस्तारायचे ठरवले आहे
  • १९९६ साली एका समांतर क्रीम ने बाजारात खूप भांडवल ओतून, जाहिरात करून वगैरे कैलास जीवन चे धाबे दणाणून सोडले. इथे कैलास जीवन ला त्यांच्या क्रीम ची इतर वैशिष्ट्ये शोधून ती मार्केट करायची संधी मिळाली व काही वर्षातच पुन्हा मूळ स्थान प्राप्त झाले. हातापायाची आग व डोळ्यांची जळजळ ह्यावर कैलास जीवन ला स्पर्धाच नाही, तर अशी वैशिष्ट्ये जाहिरातींतून दाखवून सेल जवळपास अडीच पट वाढला. तरीही नाही म्हणायला हा थोडा कसोटीचा काळ नक्कीच होता. असाच काळ Covid च्या सुमारास देखील आला. इथे प्रवर्तकांनी सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन दिले.
  • जाहिरात क्षेत्रातील अफाट ज्ञान हा देखील त्यांच्या यशातील प्रमुख मानकरी म्हणता येईल. कुठल्या भाषेतील मालिका कुठे पाहिल्या जातात, कोणते channels वापरावेत, तसेच प्रिंट माध्यमाचा असाधारण असा उपयोग ह्यावर परेश सरांकडे खडानखडा माहिती होती. साधारण खर्चाच्या २२ टक्के इतका भाग जाहिरातीवर कैलास जीवन खर्च करते, तर हे असायलाच हवे असा त्यांचा दावा.

Tuesday, 13 September 2022

Execution चं असाधारण महत्त्व ....

 Compaq विरुद्ध Dell

ह्या दोन्ही कंपन्या संगणक क्षेत्रातील दादा कंपन्या. १९९० ते १९९८ मध्ये Compaq ने Mass Production मार्ग वापरून घवघवीत यश मिळविले, तर त्यानंतर Dell ने Inventory अगदी कुशलतेने म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा Orders करून खूप सुरेख यश मिळविले. ह्यात Dell ने प्रथम समजून घेतलं कि, संगणक क्षेत्रात जुन्या झालेल्या कोणत्याही Part चं मोल हे प्रचंड प्रमाणात घसरत जातं त्यामुळे हि Inventory कमीत कमी ठेवणे म्हणजे ग्राहक सुद्धा नव नवीन models ला आकृष्ट राहतो, शिवाय कोणताही माल पडून न राहिल्याने त्यात रक्कम अडकून बसत नाही. ह्याउलट Compaq ने मात्र Mass Production वापरून किंमत कमी ठेवायची ह्यावर भर दिला होता. ही पद्धत पूर्वी उपयुक्त व्हायची ती नव्या प्रकारे Lean Cash Flow ठेवताना अयशस्वी ठरली.

Dell ने अत्यंत कुशल असे Execution model वापरले. हे सोप्पे नाही, परंतु याला गत्यंतर देखील नाही.

अंमलबजावणी च महत्त्वाची 


आपल्या लहान लहान उद्योजकांच्या बाबतीत मला खूप वेळा असे लक्षात येते, की मंडळी "सेल" च्या इतके मागे लागलेले असतात कि त्यांच्या लक्षातच येत नाही कि अनेक छोट्या मोठ्या गोष्टी राहूनच गेल्या आहेत. दिखाऊ गोष्टी जास्त केल्या जातात आणि चिरकाल , स्थायी उपयुक्त गोष्टींकडे पाठ फिरविली जाते. परिणाम : आयुष्यभर "शिकार" करत बसावी लागते.

संपर्क सेतू Chatbot : छोटेसे उदाहरण 


आम्ही एक app विकतो. ज्याद्वारे Whatsapp चे Automation होते. म्हणजे काय , तर एखाद्याला आपल्या सेवा किंवा उत्पादनात अधिक रस असेल, तर त्याने अमुक एक अक्षरे किंवा क्रमांक पोस्ट केला कि आपोआप उत्तरे मिळतात. वरकरणी छोटेसे वाटणारे हे feature  प्रचंड उपयुक्त आहे. परंतु त्यात सुरुवातीला हे Chatbots Set Up करावे लागतात. ह्या कामाचा लोक कंटाळा करताना दिसतात.

ह्याविरुद्ध एकाच वेळी अनेक मेसेजेस पाठवणारी apps अधिक लोकप्रिय आहेत. का ? कारण ती अनेक लोकांना एकाच वेळी मेसेज सेंड करतात , वगैरे. अरे, पण जे तुमचा मेसेज पाहून येतात, त्याचं काय ? त्यांना तर हे Chatbots अधिक Engage करतील ना ? शिवाय एकदा आलेल्या माणसाला आपल्या कंपनीची माहिती देण्याची किती सुरेख संधी असते ही ! म्हणजेच एका प्रकारे Conversion into Customer ही शक्यता वाढीस लागत नाही का ? 

Execution चा आळस : प्रमुख कारण 

आळस म्हणू किंवा दृष्टी चा अभाव म्हणू, पण ह्या गोष्टी लोक करायला कचरतात. अशीच गोष्ट website बद्दल देखील पाहायला मिळते. तीच गोष्ट गुगल profile बद्दल, linked in profile बद्दल. लोकांना पोस्टिंग, Video , Photo वगैरे टाकण्याची इतकी उत्कंठा असते , कि हे जे खरं convert होणारं काम आहे, ते मागे पडून जातं. 

छोटी छोटी task , पूर्णत्त्वाला नेणे हे उत्तर 


Doctors ने दिलेल्या गोळ्या जशा एका वेळी एक ह्या प्रमाणात घेतो; तसेच ही कामे सुद्धा लहान लहान Dosages मध्येच घ्यावी म्हणजे एक एक part पूर्ण होत जातो. ह्याप्रमाणेच सर्व कामे एक टप्पा ठरवून केली तर छान पूर्ण होत जातात. Software मध्ये Version हा एक Concept असतो तसे आपण करू शकतो. 





Wednesday, 18 May 2022

कंटाळ्याला करूयात channelize !

OPC म्हणजेच स्वतंत्र सिंगल उद्योजकाची हीच थोडी तारांबळ उडत असते, की सगळं एकट्याने किंवा एकटीनेच करायचं असतं. ह्यात Automation कसं सध्या करता येईल, हे पाहायला हवं : म्हणजे मग कामे जरा सोप्पी होतात आणि हातात पण येवू शकतात. 

Automation टप्प्याटप्प्याने करावं ...

आपल्या नित्याच्या कामात सर्वात त्रासदायक भाग कोणता, ते ठरवावं, तो किती महत्त्वाचा आहे हे पहावं आणि त्याला आधी प्राधान्यक्रमाने Automate करावं.

मला Accounts ह्या प्रकारचा प्रचंड कंटाळा यायचा, येतो. त्यामुळे ह्याच्यावर मी सर्वात आधी फोकस केला. याच्या जोडीला follow अप चे सेल्स call, किंवा पैसे मागणे ह्यासुद्धा कामाचा मला तितकाच त्रास व्हायचा. एक अजून काम होतं, ते म्हणजे आठवून ठराविक तारखांना इमेल्स पाठविणे. एकदा कोटेशन दिली व त्या orders जर close नाही झाल्या; तर ते leads एकदम बाद न करता त्यांच्याशी निदान इमेल द्वारे तरी संपर्क करावा लागतो; त्याना आपल्या क्षेत्रातील updates पाठवत राहिले तर ते leads आपल्याला लक्षात ठेवतात शिवाय पुढे भविष्यात requirements देतातही. याचाही मला कंटाळा येतो.

ह्या कंटाळा प्रकरणाला च मग channelize केलं मी ....

"असा कसा कंटाळा येवून चालेल ?" ह्या आदर्श वादातून आधी बाहेर आलो, 

आता चक्क लिस्ट च तयार केली आणि एक छोटी scale तयार केली ....

  1. कंटाळा आणणाऱ्या गोष्टी 
  2. किती कंटाळा आणतात ( 0 ते १० scale वर )
  3. त्याचं महत्त्व किती ( 0 ते १० scale वर ) 

मग ह्या गुणांची केली बेरीज आणि सरासरी काढली 

  • ह्यात सर्वात जास्त सरासरी चे आयटम्स अग्रक्रमाने घेतले व त्यावर आधी काम सुरु केलं.
  • त्यात कधी tools वापरून, तर कधी delegate करून Automation केलं 
  • 100 टक्के Automation केलेलं नाही, नाहीतर ताबा सुटू शकतो.







अधिक माहिती किंवा मदत हवी असेल; तर जरूर Comment Section मध्ये जरूर पोस्ट करा.

Saturday, 14 May 2022

Are You Selling ?

व्यवसाय आपण मांडलाय त्यामुळे तो चालवायलाही आपणच हवा.

"चालवायला" हे महत्त्वाचं.

बिझनेस चालला नाही असं कधी कधी म्हटल जात. म्हणजे चालवायला जमलं नाही हेच सत्य. बस एका जागी उभी असते,ती चालक येवून चालवतो तेव्हा चालते. असेच जर धंदा चालता करायचा असेल तर तो उठून चालवायला हवा. नुसता विचार करून, dream करून चालणार नाही तो.

Dream ने चालकाला उर्जा मिळेल, त्यातून एखादं उद्दिष्ट येईल डोळ्यांसमोर. आणि मग त्यातून विविध प्रयत्न करत राहण्याची इच्छा शक्ती. Dream सुद्धा महत्त्वाचं, आणि प्रत्यक्ष बस चालवणे सुद्धा, त्यामुळे चला, सेल करुयात !

Thursday, 10 March 2022

Re-Make नव्हे, Recreate करायला हवं .....

 

कॉपी पेस्ट नको नुसतं 

एखादी जुनी कल्पना वापरली जाताना त्याचे नुसते नवे version करण्यापेक्षा नवनिर्मिती करायचा प्रयत्न व्हायला हवा.

जुना DON कुणाला आठवणार नाही ? पण तितकाच लोकप्रिय ठरलाय नवा DON. शाहरुख वगैरे तर आहेच, शिवाय कहाणी मध्येही नवनिर्मिती आहे.

जुन्या कल्पना वापरून नवीन उत्पादने तयार करतात किंवा पुनरुज्जीवन केले जाते तेव्हा हे वापरून केल्यास खूप छान परिणाम साधता येईल.

उदाहरणादाखल Vespa स्कूटर चे घेता येईल. तोच जुना लुक, style , स्लीक पणा ठेवलाय, पण नव्याची जोड आहे, COOL आहे. "कितना देती है" चा विचार न करणारेच ती घेतील. 

असाच सुरेख मिलाफ Caravan ह्या product मध्ये आहे. जुन्या स्मृतींना साद घातलीये, पण संपूर्ण उत्पादनच नवे आहे.

आईस्क्रीम मध्येही खत्री बंधूंनी जुन्या Pot Ice Cream ला पुनरुज्जीवित केले आहे !

तुम्हाला सापडतायेत का अशी काही उदाहरणे ? नक्की शेअर करा .....

Monday, 14 February 2022

Story telling ...आवश्यक कौशल्य !

अगदी standup कॉमेडियन व्हायला पाहिजे असं नाही,पण निदान आपल्या व्यवसायाबद्दल तरी रंजकतेने सांगता यायला हवं.

सतत, फक्त presenation skills ची वर्कशॉप्स करायची आवश्यकता नाही. निउ मध्ये आपण 3 + 1 पॅटर्न सुरू केलाय आता, त्यात जे 1 आहे,ते आहे तुमच्या स्वतः बद्दल विस्तृतपणे सांगता येण्याची एक संधी.

अत्यंत रुक्ष भासणारा सरकारी job समरसतेने जगणारी आणि तितक्याच रंजकतेने सांगणारी आमची एक मैत्रीण मनीषा देशपांडे ही ह्या पोस्ट ची प्रेरक ठरली.

एक छोटा podcast पोस्ट करतोय ! मते जरूर व्यक्त करा :

Saturday, 12 February 2022

सरसकट Downloads का बरं नाहीत ?

टीम फेरीस ह्या लेखकाचं एक पुस्तक  *The 4-Hour Work Week यात मार्केटिंग ची एक tact तो सांगतो : Life-Time Support Free असं म्हटलं , की एकदम Value वाढते. आणि विक्री सुद्धा. खरोखरच तुम्हाला आयुष्यभर एखाद्या विषयावरचे प्रश्न सोडविता आले ( मी water तसेच डिजिटल चे सोडवितो ) तर उत्तमच आहे. सेल वाढो अथवा न वाढो, एक "Give" म्हणून हे उत्तमच आहे !

तरी सर्वच बाबतीत हे नको वाटतं. उदा. झूम recordings. बऱ्याचदा "ऐकेन कधीतरी" म्हणून नुसतं सडत बसतं मटेरीअल. त्यामुळे आता बऱ्याच वेळेला "फक्त पाहायला" तेही ३ एक दिवस अशी मी policy केली आहे. ज्या मंडळींना खरेच रस आहे तीच येतील. अशा पद्धतीने माझ्या विषयात रस असणारे लोक फिल्टर होत जातात, शिवाय नक्की लोकांना विषय भाव्तोय कि नाही हे सुद्धा कळत.

* सदर लिंक amazon वरील ह्या पुस्तकाच्या "Buy" ला जाते.


Wednesday, 12 January 2022

माझ्याकडे सध्या Band Width शिल्लक नाहीये !

कधी कधी असं कुणी म्हटलेलं ऐकायला येतं आपल्याला. मी सुद्धा ही फ्रेज अधून मधून वापरत असतो. पण कुणी विचारलं तर नक्की सांगता येत नव्हतं मला, कि म्हणजे नक्की काय. पण अगदी काल-परवाच मला हे "उमगलं" आणि म्हटलं ...लगेच पोस्ट करावं.

Band Width म्हणजे फक्त वेळ नव्हे, किंवा कौशल्य सुद्धा नव्हे किंवा क्षमता सुद्धा नव्हे. तर माझ्या मते एखाद्या विषयाकडे, संपूर्ण विषयाकडे Focussed Attention देण्याची क्षमता किंवा जागा

कोणताही नवा छोटा-मोठा प्रोजेक्ट घेऊन तो पूर्णत्वाला न्यायचा असेल तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो, शिवाय सोबत उर्जा कारणी लागते व सोबत पैसेही खर्च होतात. उर्जा हा अपोआप जाणारा प्रकार आहे, तर पैसे देणे ह्यात विशेष वेगळे परिश्रम करावे लागत नाहीत. वेळ द्यावा लागणे हा देखील तसा परावलंबी निर्णयच म्हणावा लागेल. कारण आपण निर्णय काय घेतला आहे, कि कुठे Attention द्यायचं ह्यावरून बाकीच्या ३ बाबी कामाला लागतात. 

Saturday, 8 January 2022

चावरा प्रेषित


साधारण सात एक महिन्यांपूर्वी आमच्या घरी आभू ने अचानक एक मांजरीचं पिल्लू आणलं, आता ही आमच्या घरातली मिंचकू झाली आहे.

अपरिमित आनंद दिलाय तिने. घरातली छोटी छोटी भांडणं आणि सोबत पाली सुद्धा गायब झाल्या आहेत. तिला काही झालं की सगळ्यांचा जीव कावरा बावरा होतो. माणूस म्हणून असणाऱ्या सर्व संवेदना तिने जागृत केल्यात. तिचे दात शिवशिवत असतात हल्ली त्यामुळे न खुपसता ती आम्हाला चावी चावी कलते. 

मनातलं कळतं की काय !

इतर वेळी आपल्याला खिजगणतीतही न मोजणारी ही व्यक्ती आपल्याला बरं नसलं, मनस्थिती ठीक नसली, तर कधी पोटावर येऊन झोपते, तर कधी पांघरुणात. सकाळी तिचं म्याव म्याव करत मागणं सुद्धा किती नाजूक,संयत ! किती शिकावं आणि किती नाही.

आम्ही खरंच समजतो,की परमेश्वराने तिला आमच्याकडे पाठवलं आहे! एक प्रेषित .....

Wednesday, 5 January 2022

गमावलेली संधी की अजून काही ?


हे फोटो घेतलेत आपल्या सदाशिव पेठेतील प्रसिद्ध पूना बोर्डिंग च्या बाहेरच्या veranda मधून. बाहेरच्या भिंतीवर ही अशी random पोस्टर्स लावली होती, ती पाहून मनात आलेले विचार 

हे जाहिराती का घेत नाहीत ?
मस्त modernize का करत नाहीत ?
पुढे कोण सांभाळणार ?
कदाचित आटोपशीर ठेवायचा असेल कारभार

तुमच्या मनात काय येतंय ? 

जरूर पोस्ट करा प्रतिक्रिया द्वारे !

"चहा" बद्दल थोडं ...


ब्रँडेड चहा : एक concept घेऊन केलाय तयार जसा की खांडसरी. इथे शक्यतो एकाच प्रकारचा चहा मिळतो, ही मंडळी franchise विकतात

टपरीवर चा चहा : इथे customised चहा मिळू शकतो, म्हणजे हवा तसा ... कारण ब्रँड फिंड नो भानगड at all, ग्राहक खुश !


Tea on Wheels म्हणा किंवा cloud tea किचन म्हणा : जवळपास ची कार्यालये किंवा दुकाने हे ह्यांचे टार्गेट. Door Delivery.

*Value proposition* समजून घ्यायला मदत होते ह्याची. 

नजरेस आलेलं एक पोस्टर


ह्या एकाच पोस्टर मध्ये अनेक गोष्टी आहेत, काय वाटतं तुम्हाला ?

हे करणं योग्य आहे, की एकच बिझनेस ?

Sunday, 26 December 2021

प्रत्येकाचा "segment" निराळा .....

आजच घडलेले 2 प्रसंग :-

प्रसंग १ : आमच्या बिझनेस नेट्वर्किंग क्लब मधील एक चर्चा 

" खूपच कच्चे आहेत यार आपले मेम्बर्स "

" असं कसं , इतकं कसं कळत नाही यार ! "

" अमुक-अमुक सारखं व्हायचं तर खूपच पल्ला गाठायला  लागेल "

प्रसंग २ : फोन वरील एक चर्चा, विषय : आंतरराष्ट्रीय प्रदर्शन 


" त्या mahabiz बद्दल काय अनुभव आहे ? "

" काहीच फरक पडत नाही , म्हणजे आपण व्यवसाय मिळवायला म्हणून गेलो, तर काहीच घडत नाही तसं "

" का बरं ? "

" म्हणजे आपल्यात आणि त्यांच्यात इतकं अंतर जाणवतं ! आपली लायकी च नाही त्यांना Match होण्याची ! सर्वच बाबतीत अत्यंत पुढे आहेत ते आपल्या. आपण कुठे कमी आहोत हे कळायला जावं फार तर ! "

ह्यातल्या दोन्ही Highlighted प्रतिक्रिया तपासल्या तर त्यात कुठेतरी कमी पणाची किंवा कुणासारखे तरी होण्याची किंवा आपण तसे नसण्याची खंत किंवा सल प्रामुख्याने दिसते आहे. Milestones असतातच. तरी त्या पासून फक्त प्रेरणा घेवून, तरीही आपला वेगळा प्रवास जाणून, स्वत:ला समजून घेण्याची आणि ते वेगळेपण जपण्याची, कसोशीने जपण्याची नितांत आवश्यकता असते, आहे. 

Segmentation : एक सुटसुटीत तंत्र !


ढिगाने Videos सापडतील ह्या विषयावर इंग्रजी मध्ये youtube वर. मी अगदी सोप्प्या पद्धतीने समजावून द्यायचा प्रयत्न करतो. तर हे कळायला हवं कि मी कोणत्या प्रकारच्या ग्राहक वर्गाशी deal करण्यासाठी Comfortable आहे, कुणाशी मला सहज, ताणरहित संवाद करता येतोय ते. 

ह्याकरता आधी हे समजून घ्यावं लागेल, की जे मी माझं Deliverable म्हणून समोर आणतोय, म्हणजेच जे मी समोरच्याला देवून त्याबदल्यात अर्थार्जन करू इच्छितोय, त्याची खरी उपयुक्तता कोणत्या प्रकारच्या गरजा असलेल्या कोणत्या प्रकारच्या ग्राहकाला आहे. 

चला, एक उदाहरण घेऊ : माझंच !


तर माझं Deliverable काय आहे ? तर डिजिटल मार्केटिंग सल्ला | सेवा | प्रशिक्षण 
का बरं मी हे देतोय ? माझ्या स्वत:च्या अनुभवाचा बेस.

आता यात मी " कोणत्या प्रकारच्या ग्राहक वर्गाशी deal करू" हे कसं ठरवता येईल ? 

मी जेव्हा स्वत: च्या अनुभवाचा बेस  असं म्हणतो, तेव्हा मला बाहेर माझ्या स्वत: सारखेच ग्राहक शोधावे लागतील. म्हणजे माझ्या स्वत: सारखेच प्रश्न पडू शकलेले, शकणारे. म्हणजेच :-

Manufacturing करणारे तेही पोर्टल्स वर जाहिरात करणारे, मशिनरी विकणारे. म्हणजेच हाच 💪 माझा टार्गेट segment झाला. पुन्हा size केवढा ? तर MSME segment. 

एकदा का हे कळलं कि आतली मळमळ बंद व्हायला हवी !


आता मला नको वाटत राहायला कि "अर्रर, मी त्या अमुक सारखं नाही काम करत !" प्रत्येकाचा segment वेगळा आहे. त्यात कमी, लहान, छोटं असं काहीच नाही. सगळे तसे सो called मोठ्ठेच होत राहिले, तर छोट्या गरजा कुणी भागवायच्या ? त्यामुळेच तर सर्व प्रकारचे, सर्व व्यावसायिक नांदत असतात, ह्याच जगात. 



Friday, 24 December 2021

व्यवसायावर आधारित Genuine चित्रपटांचं दुर्भिक्ष्य

आम्ही निऊ च्या मीटिंग साठी एक आठवडाभर जंग जंग पछाडल तरी "मेड इन चायना" "गुरु" "बदमाश कंपनी" "हरीश्चन्द्राची factory" ह्यापलीकडे गाडीच जाईना ! इंग्रजीतही फार नाहीत काही. तरी त्यातल्या त्यात आम्ही Rocket Sing निवडला ह्यावेळी चर्चेला.

रेकॉर्डेड मीटिंग पाहता येण्यासाठी लिंक : https://www.facebook.com/795309869/videos/346318493520370/

निऊ चा फेसबुक ग्रुप विनामुल्य असतो, त्याची लिंक :- https://www.facebook.com/groups/nupune/

व्यवसाय म्हणजे "मनोरंजन नाहीच" असं कसं समजतात कुणास ठाऊक ? म्हणजे ती लफडी, प्रेम-फिम, डान्स, कमी कपड्यातील अभिनेत्र्या, झाडांमागे पळापळी हे हवच का ? कधी जाणार याच्या पल्याड, कुणास ठाऊक !

Wednesday, 22 December 2021

जीर्णोद्धार अर्थात व्यावसायिक Model पुनर्विकसन


देवळांचे जीर्णोद्धार होत असतात. म्हणजे काय तर नूतनीकरण. अर्थात मोडकळीस आलेल्या भागाचे दुरुस्तीकरण किंवा चक्क अगदी जुन्या झालेल्या वास्तूला  नवीन स्वरूप देणे. 

आपल्या व्यवसायाचा जीर्णोद्धार कधी ?

आपल्या व्यवसायाची सुद्धा अशी डागडुजी, जीर्णोद्धार करावा लागेल, तर नवं गिऱ्हाईक येईल. काळापरतत्वे बदल घडवायला हवेत. खासकरुन कोविड नंतर कोणत्या वेगळ्या सवयी ग्राहकांना लागल्या आहेत ते ओळखून नवनवीन product किंवा सेवा मॉडेल विकसित करायला हवीत.

BUSINESS MODEL CANVAS

हे एक अत्यंत सुरेख असं tool आहे ज्याद्वारे आपण आपले बिझनेस मॉडेल छान पद्धतीने तयार करू शकतो आणि नव्या पद्धतीने छान नफा सुद्धा कमवू शकतो. पाण्याच्या व्यवसायात हे कसं वापरता येईल ह्याचे मी काही व्हिडिओस तयार केलेले आहेत. ह्या लिंक वरून ते पाहता येतील, व आपल्या व्यवसायात सुद्धा त्याचा वापर करता येईल.