Saturday, 8 January 2022

चावरा प्रेषित


साधारण सात एक महिन्यांपूर्वी आमच्या घरी आभू ने अचानक एक मांजरीचं पिल्लू आणलं, आता ही आमच्या घरातली मिंचकू झाली आहे.

अपरिमित आनंद दिलाय तिने. घरातली छोटी छोटी भांडणं आणि सोबत पाली सुद्धा गायब झाल्या आहेत. तिला काही झालं की सगळ्यांचा जीव कावरा बावरा होतो. माणूस म्हणून असणाऱ्या सर्व संवेदना तिने जागृत केल्यात. तिचे दात शिवशिवत असतात हल्ली त्यामुळे न खुपसता ती आम्हाला चावी चावी कलते. 

मनातलं कळतं की काय !

इतर वेळी आपल्याला खिजगणतीतही न मोजणारी ही व्यक्ती आपल्याला बरं नसलं, मनस्थिती ठीक नसली, तर कधी पोटावर येऊन झोपते, तर कधी पांघरुणात. सकाळी तिचं म्याव म्याव करत मागणं सुद्धा किती नाजूक,संयत ! किती शिकावं आणि किती नाही.

आम्ही खरंच समजतो,की परमेश्वराने तिला आमच्याकडे पाठवलं आहे! एक प्रेषित .....

1 comment:

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.