कधी कधी असं कुणी म्हटलेलं ऐकायला येतं आपल्याला. मी सुद्धा ही फ्रेज अधून मधून वापरत असतो. पण कुणी विचारलं तर नक्की सांगता येत नव्हतं मला, कि म्हणजे नक्की काय. पण अगदी काल-परवाच मला हे "उमगलं" आणि म्हटलं ...लगेच पोस्ट करावं.
Band Width म्हणजे फक्त वेळ नव्हे, किंवा कौशल्य सुद्धा नव्हे किंवा क्षमता सुद्धा नव्हे. तर माझ्या मते एखाद्या विषयाकडे, संपूर्ण विषयाकडे Focussed Attention देण्याची क्षमता किंवा जागा.
कोणताही नवा छोटा-मोठा प्रोजेक्ट घेऊन तो पूर्णत्वाला न्यायचा असेल तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो, शिवाय सोबत उर्जा कारणी लागते व सोबत पैसेही खर्च होतात. उर्जा हा अपोआप जाणारा प्रकार आहे, तर पैसे देणे ह्यात विशेष वेगळे परिश्रम करावे लागत नाहीत. वेळ द्यावा लागणे हा देखील तसा परावलंबी निर्णयच म्हणावा लागेल. कारण आपण निर्णय काय घेतला आहे, कि कुठे Attention द्यायचं ह्यावरून बाकीच्या ३ बाबी कामाला लागतात.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.