माझ्यासाठी एक असते "पार्टी" म्हणजे ग्राहक व एक असतो vendor म्हणजे ते ते काम करणारी व्यक्ती किंवा संस्था. कामे मिळण्यासाठी मी जे प्रयत्न करतो, ते सगळे मार्केटिंग, पब्लिक रिलेशन्स, सेल्स, वगैरे domain च्या खाली येतात. ह्यातून कामे मिळतात व प्रोजेक्ट पूर्ण केले जातात.
ह्यामध्ये active follow up हि एक मोठी प्रक्रिया असते. ज्यात प्रत्यक्ष कोटेशन देणे, प्रोजेक्ट ची strategy तयार करणे, त्यानुसार pricing देणे वगैरे अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. शिवाय कामे सुरु झाल्यावरही त्रयस्थाप्रमाणे सदर प्रोजेक्ट चे काम त्याच्या उद्दिष्टा प्रती जात आहे किंवा नाही हे पाहणे, त्यात सुधारणा सुचवीत राहून त्या अंमलात आणणे ह्याकरिता मासिक बैठका होतात, ज्यात ग्राहक-vendor व मी स्वत: involve असतो. वारंवार, परत परत ही प्रक्रिया होत असल्याने ग्राहकांना प्रत्यक्ष काम करणारे कोण हे कळून येतं आणि त्याच वेळी Vendors ना देखील थेट ग्राहक कोण हे कळू शकतो.
इथेच घोळ होतो
ह्या दोन्ही घटकांना वाटू शकतं मध्येच कि, मग एजन्सी ची काय गरज ? नवीनच नव्हे तर आश्चर्यकारक रित्या अगदी मुरलेले व्यावसायिक सुद्धा असा उथळ विचार करताना आढळतात. पैसे प्रत्येकाला वाचवायचे आहेत, आणि फक्त हाच उद्देश असतो, दोन्ही घटकांचा. ह्यात एजन्सी चं वरवर नुकसान झालेलं दिसतं. पण त्रयस्थासारखे ह्या प्रकल्पाकडे पाहणे, आणि ROI ग्राहकाला मिळवून देण्याकरिता एजन्सी ला बायपास करून चालणार नाही हे दोन्ही घटकांना समजावून सांगावं लागेल, ते सुद्धा कामे initiate होण्यापूर्वीच !
ग्राहकाला त्याचा व्यवसाय कळतो, Digital Marketing नव्हे, आणि Vendor ला त्याचं काम फक्त कळतं, ग्राहकाने काय रणनीती राबवावी हे नव्हे. कारण एजन्सी हेच काम करत असते, शिवाय ग्राहकाशी व्यवस्थित Rapport ठेवल्यामुळे ग्राहकाच्या खाचा-खुचा त्यांना उत्तम ठाऊक असतात. हे दोघानाही जशी वेळ पडेल, तसे समजावून सांगायलाच हवं. vendor ला जास्त. जर ग्राहकाला योग्य परिणाम मिळाले नाहीत, तर लाजेखातर ग्राहक आपल्या सोडून दुसऱ्या कुणाकडे जायची शक्यता असते. ह्यात ना vendor कडे काम राहिलं, ना एजन्सीकडे ! शिवाय कामाची रास्त किंमत मिळणे, हे सुद्धा एजन्सी योग्य पद्धतीने करू शकते.
हे नाही केलं तर सतत अस्थिरता राहील
Vendor Development म्हणजे हेच तर करणे. हेच मी करत नव्हतो पूर्वी. माझ्या मशिनरी व्यवसायात असेच थेट ग्राहक यायचे, त्याना माझे सप्लायर परस्पर पटवायचे, आणि मला नंतर कळलं कि वैफल्य ! असा प्रवास अनेक वर्षे सुरु होता. त्यात स्वत:चं युनिट चालू करणे ( जी माझी अजिबात आवड नव्हती ) हे नको ते काम मी केलं आणि अनेक वर्षे गेली. दू;ख नाही त्याचं, कारण त्यानेच शिकवलंय हे सगळं. पण हे जर आताही मी केलं नाही तर "माझ्या विनाशाला मीच कारणीभूत" असेन हे नक्की.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.