सोबत काळजीसुद्धा
हीच लहानसहान मुलं, तरुण जेव्हा ह्याच तंत्रज्ञानाद्वारे समाजविघातक कामे करू लागतात, तेव्हा मात्र खरंच हे सगळं शाप आहे की वरदान, हा प्रश्न पडतो. "बुलीबाई" किंवा "सुलीडिल्स" ह्या दोन apps भयंकर आहेत. सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय असणाऱ्या, वेगळ्या मतांच्या महिलांची छायाचित्रे आंतरजालावर टाकणे हे ह्या apps चं काम. सायबर पोलिसांच्या शोधा अंती कळून आलंय, की ह्या apps ची निर्मिती करणारी मंडळी कोवळे तरुण आहेत, त्यात काही मुली सुद्धा आहेत.
सोयीस्कर दुर्लक्ष ?
ह्या गुन्हेगारांचा तपास करताना अशी अडचण येत राहते,की ह्या आंतर जालांचे मालकी हक्क सांगणाऱ्या बड्या आयटी कंपन्याही सहकार्य करत नाहीत. मुळातच तांत्रिक दृष्ट्या अति प्रगत कर्मचारी ताफा बाळगणाऱ्या ह्या कंपन्यांना आपली किमान नैतिक जबाबदारीचंही भान नसावं ? की धंदा पाहून सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं ?
इथेच values म्हणजे मूल्यांचा प्रश्न उपस्थित होतो. कंपनी प्रवर्तकाने मुळात काय value मूल्य धरून कंपनी उभी केलेली आहे, कर्मचाऱ्याने कोणते मूल्य स्वीकारून सदर काम स्वीकारले आहे हे अगदी पायास्वरूप महत्त्वाचे ठरते.
उत्तम विचारांचा वारसाच देऊ शकतो
पालक म्हणून उत्तम विचार करायला प्रेरित करणे, चांगले विचार करायला शिकविणे, " मला काय करायचंय, मला पगार मिळतोय ना !" किंवा "क्लायंट ने काम दिलंय, आपल्याला काय" असं तोकडं समर्थन न देणे ह्यासाठी लहान वयातच स्वतः विचारपूर्वक कृती करावी लागेल. मूल्य, जगणं, सामाजिक भान समजावून द्यावं लागेल. 24 x 7 फक्त "धंदो" चा विचार करून चालणार नाही.
बघा काय वाटतंय !
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.