Tuesday 12 December 2023

विनाकारण App

मी एका सामाजिक संस्थेचा सदस्य आहे. ही संस्था काही दुर्बल घटकांना मदत करते. मदत करायला माझ्यासारखे उद्योजक तसेच व्यावसायिक असतात. ह्यांचे नेटवर्किंग छान व्हावे, आणि एकंदरीत काम करण्यातील उत्साह अधिक वाढावा म्हणून संस्थेने एक ॲप तयार केले आहे.

ह्या app मध्ये अनंत त्रुटी आहेत..अगदी मूलभूत शोध वगैरे देखील नीट नाहीये. तर ह्या app चा वापर छान व्हावा म्हणून संस्थेने नुकतेच एक संमेलन भरवले, सर्वांची मते फिते घेतली. एकंदरीत एका सामाजिक संस्थेने बऱ्यापैकी पैसे खर्चून आम्हाला बोलावले, आणि एका अगदी किरकोळ अशा ॲप साठी ना काही परिणाम साधला, ना काही ध्येय प्राप्ती. 

मुळात संवाद साधायला WhatsApp सारखे app आहे; reputation साठी Linked In आहे, मग स्वतः च्या ॲप ची तशी गरज काय ?

आम्ही पूर्वी निवडक उद्यमी साठी wild appricot नामक सेवा वापरायचो. उत्तम होती. त्यांनी paid केलं त्यामुळे आम्ही थांबवले, कारण आमचे funded model नाही.

असो.

Sunday 5 November 2023

निर्णय घेताय ? जरा गौर .....

एकंदरीतच Quick Decision Making ह्या कौशल्याबद्दल खूप आदराने बोलले जाते, शिवाय हे एक खूपच महत्त्वाचे कौशल्य आहे ह्यात वादच नाही. परंतु ह्यात बरेच मुद्दे पुसट राहून जातात. 

  • Quick हे हळूहळू विकसित होणारे कौशल्य आहे. 
  • फक्त अंत: प्रवृत्ती तून ह्यात कधी तरी यश मिळू शकेल, परंतु हे जर नीट सरावाने अंगी बाणवले तर यश मिळण्याची शक्यता कित्येक पटीने वाढूच शकेल.
  • Quick हे Fast आहे, तरीही सर्व बाजूंचा नीट विचार करून अमलात आणावे. फक्त Fast नको.
  • ह्यात उपलब्ध माहितीचा एकंदरीत दर्जा झटक्यात समजून येण्याची क्षमता ह्याला अधिक महत्त्व आहे.
  • ह्यात परिणामांचा विचार हा व्हायलाच हवा. ह्यात Second Order Thinking हे कौशल्यही येतेच.
असे सर्व लक्षात येवूनही आपल्याकडून चुका का होतात बरं ? त्याचे कारण म्हणजे Attention Bias. अर्थात फक्त उपलब्ध माहिती किंवा मान्यता द्वारे निर्णय घेणे. साधारण काही नियम आपण स्वत:चे स्वत: पाळले, तर आपल्याला खूप मन: शांती मिळू शकेल किंवा होऊ शकणारे नुकसान व मानसिक स्थैर्याचे स्खलन तरी निश्चितपणे वाचूच शकेल.

  1. ज्या स्त्रोतातून माहिती येत आहे त्याला अतिरिक्त महत्त्व न देणे 
  2. कोणत्याही परिस्थितीत माहोल ला बळी न पडणे 
  3. कोणतीही Ideology न मान्य करणे ( स्वत: ची सोडून )
  4. प्रतिक्रिया वादी पणा कमी करणे 
  5. मी अजून माहिती काढेन हे ठरवणे 
  6. परिणामांचा सांगोपांग विचार करूनच निर्णय घेईन 
  7. जगावेगळे निर्णय घेवून शूर पण दाखवावा, परंतु त्याचे व्यावहारिक पडसाद आधी पाहावेत.
मुद्दे क्रमाने मांडलेले नाहीत, सुचेल तसे येत गेलेत ( अजून काही सुचले तर निश्चित add करू )

ह्याबद्दल आमच्या निवडक च्या मीटिंग मध्ये चर्चा झाली होती नुकतीच , ३ नोव्हेंबर ला. जे निवडक चे सभासद आहेत त्यांच्याकरिता झूम ची रेकॉर्डिंग लिंक त्यांच्या whatsapp तसेच इमेल ला दिलेली आहे. 

Friday 27 October 2023

नि:स्पृह (व्यावसायिक) छाया गोलतगावकर .....

 6 ऑक्टोबर 2023 रोजी 'निवडक उद्यमी' च्या साप्ताहिक मीटिंग मध्ये 'थकलेले पैसे वसूल करण्याची प्रक्रिया' ह्या विषयावर सौ.छाया गोलटगावकरांची मुलाखत झाली.

'ह्युमन रिसोर्स ऑफिसर', डॉक्टर, वकील यांसारख्या व्यक्ती ह्या मुळातच सहानुभूतीपूर्वक असाव्यात असा ह्या पेशांचा घटनादत्त अपेक्षित स्थायीभाव पण जमिनीवरील परिस्थिती नेमकी कशी उलटच असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. छायाताई मात्र ह्याला सन्माननीय अपवाद ठरल्या. 

दैनंदिन जीवनात रेंगाळलेली कामं, त्यात झालेली आर्थिक आणि भावनिक गुंतवणूक, वेळेचा अपव्यय आणि त्यामुळे येणारं नैराश्य ह्या सगळ्यामुळे आपल्याकडे येणारा व्यक्ती कावलेला असतो ह्याचं भान त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. मुलाखतीच्या सुरुवातीलाच वकिली हा एक उदात्त व्यवसाय आहे आणि आपण त्याच्या प्रतिनिधी आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं.

पैसे थकवणं, किंवा सामाजिक स्तरात आपल्यापेक्षा वरचंढ असलेल्यांकडून होणारी दंडेली आणि मानहानीकारक वागणूकी विरुद्ध उभं राहणं हे सामान्यांचं कर्तव्यच आहे हेही त्यांनी बजावून सांगितलं.

स्वतःच्या ओळखीबद्दल लिहिलेल्या माहिती आणि प्रस्तावनेत त्यांनी सुचवलेले बदल त्यांच्या दक्षतेची आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीची साक्ष देतात.

मुलाखतीच्या विषयावरील त्यांचं प्रभुत्व, तांत्रिक माहिती, काही क्लुप्त्या आणि एकंदरच संयतपणे विषय मांडण्याची पद्धत वादातीत होती (त्याबद्दल अधिक लिहीत नाही - प्रत्यक्ष मुलाखतच लोकांनी ऐकावी हि अपेक्षा). 

लिंक :- https://youtu.be/A0Q6U_MM_io?si=yC8Y5omrr-GWDCiW

एक कबुली मात्र जरूर देऊ इच्छितो - 

मुलाखत कश्या पद्धतीने उलगडावी ह्याबद्दल झालेल्या चर्चेचे मुद्दे आणि प्रश्न लिखित स्वरूपात देण्यास माझ्याकडुन झालेल्या दिरंगाईबद्दल छायाताईंनी रास्त पण सौम्य आक्षेप माझ्याकडे नोंदवला आणि त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला.

त्याबद्दल क्षमस्व.

प्रत्येक छोट्या मोठ्या व्यावसायिकाला कमी अधिक प्रमाणात भेडसावणाऱ्या एका ज्वलंत विषयावर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलंत आणि वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात त्याबद्दल 'निवडक उद्यमी' तर्फे आभार आणि तुमच्या कारकिर्दीस अनंत शुभेच्छा.

------------

निशांत आवळे 

निर्णय ( त्यातल्या त्यात ) जास्त अचूक कसे घ्यायचे ....

"Second Order Thinking" असा विषय निवडलाय निशांत ने आज निवडक च्या सेशन साठी. काय आहे हे ?

Chat GPT केलं आणि थोडक्यात विचारलं तर हे बरं उत्तर सापडलं :-

Certainly! Here's a simple explanation of "Second Order Thinking" for your WhatsApp post:

**🧠 What is Second Order Thinking? 🤔**

Hey there!

Second Order Thinking is like thinking ahead about what might happen after something happens. It's not just about what's right in front of you, but also considering the consequences and effects that come later.

For example, it's not just about buying an ice cream, it's thinking about how that ice cream might make you feel too cold later on.

It's all about looking beyond the obvious and being smart about your decisions!

Keep thinking! 

मराठीत काय म्हणता येईल याला ? 

( परिणामांचा अभ्यास / शक्यतांची पडताळणी / ..... ? )

ह्याचा नक्की उपयोग पाहिला तर आपल्या पुढच्या निर्णयांची अचूकता मिळविणे ह्यासाठी ही पद्धत वापरता येईल. साधारणपणे समोर झटकन येणारी माहिती पाहून आपल्याकडून चुकीचा निर्णय घेतला जावू शकतो, ह्याचं बऱ्याच अंशी कारण म्हणजे सुरुवातीलाच आपला पुढचा विचार न करण्याची सवय. 

Second Order Thinking मध्ये ह्याच गोष्टीला केंद्रस्थानी ठेवले आहे : कि फक्त समोर उभ्या थकलेल्या एखाद्या समस्ये बाबत उपाय योजनेचा विचार करताना त्यातून पुढे उद्भवणाऱ्या परिणामांबद्दल देखील आपण आधीच जरा अधिक सखोल विचार केला तर पुढे होणारा निष्कारण त्रास निश्चित वाचू शकेल.

निवडक च्या विचारधारेप्रमाणे जर व्यावसायिक , तसेच त्याला जोडून असलेले आयुष्यातील निर्णय जर आपल्याला अशा प्रकारे घेता आले, तर !

ही सवय कशी लावता येईल ह्याचा अभ्यास अधिकाधिक करत राहायला हवा .... 

Friday 20 October 2023

कारकुंड्या मनोवृत्तीची फळे

नेट्वर्किंग क्लब मध्ये चित्र विचित्र अनुभव येतात. खास करून रेफरल नामक प्रकार दिल्यावर.

नुकतेच मी एकाला एक दोन-तीन रेफरल दिले, त्याबद्दल पहा त्यांची उत्तरे :-


हे update कसे आहे बघा .... जणू काही सदर व्यक्ती मला report करत आहे ... कप्पाळ ! एखाद्याने रेफरल दिला म्हणजे काही वेगळे कष्ट घेवून आपल्यासाठी काहीतरी तयार संपर्क दिला आहे ही भावनाच नाही. कसा वाढणार धंदा !

असाच अनुभव येतो Done Deal सांगताना. एखाद्याने रेफरल दिला आणि काही कारणाने त्याचे पेमेंट यायचे वगैरे राहिले असेल, तर मंडळी सांगतात... "पेमेंट आले कि done deal देतो" ... जणू काही त्याने तुला referral देवू करून काही गुन्हा अपराधच केलाय ! अरे, ज्याने रेफरल दिला त्याची काय चूक ? आणि तू काय सरकारी tax भरतो आहेस कि काय !

काय म्हणायची ही मानसिकता ! कारकुंड्या मनोवृत्तीची ही फळे ......

Saturday 7 October 2023

Feedback कसा असायला हवा ?

हल्ली हे Review प्रकरण खूप उथळ झालंय. तरीही निवडक च्या प्रथेप्रमाणे आपण प्रत्यक बाबीच्या खोलात शिरतोच. हीच तर संधी ना शिकण्याची. तर ह्या "अभिप्राय" बद्दल काही सुचतंय ...

संपूर्ण सेशन मधून सर्वात जास्त काय भावलं , कशा प्रकारे ....

खास करून एखादा मुद्दा आवडला असेल, तर तो विषद करून सांगावा. त्याने आपल्यात नक्की काय फरक पडेल हे सुद्धा जरूर सांगता यायला हवे. म्हणजे वक्त्याला त्याच्या व्यवसायातील एखाद्या ठराविक वैशिष्ट्याबद्दल अधिक समजून येते. आपल्याला असा कुणी कधी अभिप्राय दिला असेल, तर समजून येतं कि माझा खरं हा strong point आहे ज्यावर मी साधारणपणे भर देत असतो/असते. 

Sample म्हणून खालील feedback पहा. नेमक्या पद्धतीने सांगितले आहे vendor ला त्यामुळे त्यांना त्यांची बलस्थाने त्वरित लक्षात येतात.

I am just a call away from XXXXX whenever my team or I myself encounter any issues related to CRM, she understands everything and helps us efficiently.

The biggest achievement for me is that me and my team had said goodbye to Excel sheets and WhatsApp.

काय खटकलं किंवा काय नाही पटलं , का नाही पटलं हे देखील आवर्जून सांगावे 

ह्याबद्दल अभिप्राय देताना "आपला काय विचार होता हे विचार मांडण्यामागे" असा सूर असायला हवा. कारण आपल्याला पटलं नाही, तर ते बाद करून टाकण्या ऐवजी जर समजून घेतलं तर विचारांना एक नवी दिशा मिळू शकते. उलटपक्षी "बाद" केल्यास एक नवीन शिकण्याची संधी आपण गमावून बसतो.

Monday 2 October 2023

आपल्या स्वप्नात खरोखर तेवढा दम आहे का ?

आज एके ठिकाणी एका चर्चेत काही मुली, ज्यांना काहीतरी वेगळं म्हणजे संगीतात करियर करायचं आहे, त्यांना त्यांच्या घरातून होणाऱ्या टोकाच्या विरोधाबद्दल बोलत होत्या. अर्थात पालक मंडळींबद्दल आक्षेप होता. काही मुलींचे पालक तर अगदी कडक सरळ नोकऱ्या धरा आणि झटपट पैसे कमवा अशा मताचे होते आणि मुलीना तसं धडधडीत बोलून देखील दाखवीत होते.

एकीच्या घरात पालकांचा एकमेकात संपूर्ण बेबनाव होता आणि त्याचे पडसाद त्यांच्या मुलीच्या सोबत असलेल्या नात्यावर ठळक उमटले होते. 

साहजिकच सारखा असा सूर निघत होता, की पालकांनी असं वागायला नकोय.

खरेही आहे, नकोच ना असे वागायला. पण तरीही ... तिच्या स्वप्नात नक्कीच बळ ( दम ) कमी असावा. असता तर एक तर ती खणखणीत आई-बापांना समजावेल, किंवा कौशल्याने पटवेल तरी, किंवा असेच काही करून तिच्या स्वप्नाच्या मार्गावर घट्ट राहील. कदाचित असेल सुद्धा.

मुद्दा असा आहे, की आई वडील काही शत्रू नसतात तर त्याना खरोखर वाटत असते कि आपल्या मुलीचं भलं व्हावं. त्यांना ठावूक नसतं कि आपल्या मुलीने योग्य मार्ग धरलेला आहे. आणि इथेच मेख आहे.

तिला तिच्या स्वप्नावर पूर्ण विश्वास असेल, आणि प्रेम असेल, ध्यास असेल, तर ती आपल्या आई वडिलांना पटवून देईल नाहीतर चक्क फाटा देईल, किंवा manage करेल चक्क !

आणि असं होत नसेल, तर मात्र स्वप्नात दम नाही... म्हणजे ही फक्त एक इच्छा , इतकेच.

Wednesday 27 September 2023

खरंच अगदी स्पेसिफिक प्रेक्षक वर्ग ( आणि ग्राहक ) हवाय ?

तर मग असं करून पहा :-

  1. काहीतरी आपल्या सखोल कामातलं सूत्र तुम्हाला उमगलंय, जे काहीतरी खरोखरंच भारी problem Solve करतंय.
  2. त्याच्या विषयी एक मोठ्ठा explainer वगैरे न बनवता, प्रत्यक्ष काय फरक पडतोय आणि ते जे सूत्र आहे त्याचं वेगळेपण आणि प्रभाविपण नक्की काय हे हे सुद्धा अगदी थोडक्यात मांडा.
  3. भारंभार पोस्टिंग न करता मोजके करा. पोस्टिंग मध्ये मागतील त्यांनाच लिंक द्या.

काळजी करू नका, लोकांना समजतं. किंबहुना ज्यांना समजतं, तेच आपले प्रेक्षक आणि ते तुम्हाला योग्य ग्राहका पर्यंत नेवून पोचवतील.

मी नुकतेच असे एक पोस्टिंग केले आहे. परिणाम ? पाहूयात. पण मला उथळ प्रतिक्रिया नकोच आहेत मुळात त्यामुळे जो परिणाम आहे तो मोजा कशाला ?

ती पोस्ट मी Linked-In वर टाकली आहे. कुणाला हवी असेल तर मला एक Email करा :- contact@joywebservices.com ला.

Sunday 3 September 2023

बदल रही हैं आज जिन्दगी कि चाल ज़रा .....

 "लुटेरा" चित्रपटातील एका गीतात खालील पंक्ती आहेत :

बदल रही है आज ज़िन्दगी की चाल ज़रा

इसी बहाने क्यूँ ना मैं भी दिल का हाल ज़रा 

संवार लूं हाय सवार लूं 

संवार लूं हाय सवार लूं

कालच आम्ही काही सम व्यावसायिक संध्याकाळी व्यावसायिक चर्चेला प्रत्यक्ष बसलो होतो, तेव्हा हाच प्रत्यय आला. विषय असा होता ... की आमच्यातीलच एका प्रथितयश व्यावसायिकाने "बिन माहितीच्या लोकांपर्यंत आता कोणत्या मार्गाने पोहोचता येईल" हा मुद्दा उपस्थित केला. मग एकमेकांचा Data sharing, एकमेकांना उत्स्फूर्ततेने मदत करणे व जोडून अनेक मार्ग चर्चिले गेले. मी २-४ वेळा त्यांना "फेसबुक जाहिराती कधी वापरून पाहिल्या आहेत का कधी ?" असा प्रश्न केला, कुणीही केलेल्या नाहीत. मी एकदा सांगितलेही ... कि तुम्ही जे मार्ग बोलताय, ते मी भरपूर वापरून झाल्यानंतर फेसबुक सुद्धा भरपूर वापरलेले आहे, वापरत असतो वगैरे; पण कुणी ऐकेचना !

शेवटी जेव्हा अगदी निघायचा विषय झाला तेव्हा मी फेसबुक फनेल्स कशी वापरात आणता येतील असा विषय मांडला जो सर्वांना अगदी नवखा होता. सर्वात मूळ मुद्दा असा की Banners वगैरे उपयुक्त असतील ना, पण आता माणसे फेसबुक वर जास्त आहेत, शिवाय ads हा एक अत्यंत उत्तम मार्ग आहे जो आपल्याला अगदी lasor targetted असे योग्य रीतीने ग्राहक देवू शकतो. ह्या संदर्भातील माझा सर्व प्रवास मी अगदी सविस्तर मांडलेला आहे, कुणाला पाहायचा असेल, तर खालील लिंक पहावी :-

https://100mitras.substack.com/p/my-facebook-ads-journey

तर मुद्दा असा आहे, की नव्या मार्गाने जावे लागेल, नव्हे... जावे लागेल. 

"बदल रही है आज ज़िन्दगी की चाल ज़रा इसी बहाने क्यूँ ना मैं भी दिल का हाल ज़रा  संवार लूं "

Wednesday 30 August 2023

भपक्या पेक्षा स्वत्व महत्त्वाचे !

Saturday क्लब च्या नवीन chapter ची मोर्चे बांधणी सध्या सुरु आहे. त्या करिता सुरुवातीच्या बैठका मी एका लहानशा हॉटेलात घेतो. शिवाय ह्या बैठका अगदी " formal " स्वरूपाच्या नसतात. ह्यात तसा फारसा अजेंडा नसतो. अर्थात ठराविक हेतू ठेवून. 

गेल्या वेळी एक व्यावसायिक आले, ज्यांनी " तुम्ही ह्या मिटींग्स सुद्धा नेहमी होणाऱ्या मिटींग्स प्रमाणे घ्या" असा एक आगंतुक सल्ला दिला. मी त्यांना माझी भूमिका समजावली. तरीही जग " Presentation" ह्या प्रकाराला इतकं अति महत्त्व देतात कि बऱ्याच लोकाना हे अक्षरश: खरं वाटतं, नव्हे... हेच खरं वाटतं. 

कसं आहे कि ह्यापूर्वी ह्या Pattern ने उभा केलेला एक chapter धडाक्यात सुरु झाला, पुढे कोसळला आणि पुढच्या वर्षीच्या Renewal च्या वेळी सुद्धा हडबडला. उलट पक्षी आम्ही पर्वती chapter अतिशय कमी दिमाखात सुरु केला, जो ९५ टक्के मंडळींनी Renew केला, शिवाय आता बऱ्या प्रगतीपथावर आहे.

ह्यालाच समांतर काही गोष्टी निरीक्षणात आल्या :-

१. Pitchers ह्या web सिरीज मध्ये शेवटी गंडलेले Presentation च फंडिंग मिळवून देतं. कारण त्यात स्वत्व होतं.

२. आजच डॉ तेलंग भेटले, एक छान वाक्प्रचार वापरला त्यांनी : Convince पेक्षा Convey करतो मी. छान.

३. नळ stop जवळचं, जुनं असं स्वीकार उपहारगृह. मिटिंग साठी बसू नये अशी कडक पुणेरी पाटी मिरविणारे स्वीकार जेवण उत्तम देते. रु २०० इतक्या माफक योग्य दरात बऱ्यापैकी चांगला माहोल देऊ करणारे हे एक अत्यंत उत्तम हॉटेल आहे. ह्यांनाही इतर Soft Skills नाही लागत ! 

 ४.नुकतेच मी आणि स्वाती एका "खादाडी" नामक हॉटेलात गेलो होतो. त्यांचा तर भर ना सादरीकरणा वर होता, ना खर्चिक अंतर्गत सजावटीवर. उगाचच fancy मेन्यू कार्ड नाही कि कुठला भपका नाही. counter तर अगदी कोपऱ्यात कुठेतरी. "मी तर सतत इकडे तिकडेच असते, हवाय कशाला मोठा counter ?" असं म्हणणाऱ्या मालकीण बाई फोटोत सर्वात शेवटी कोपऱ्यात बसलेल्या दिसतात.

ह्या ऐवजी जाणविला त्यांचा मेन्यू. नेहमी खाण्यातल्या, घरात तयार केले जाणारे आगळे वेगळे मराठी पदार्थ, रास्त दरात, स्वस्तात, आणि उत्तम चवीचे देणे हे काम मात्र चोख. हवाय काय अजून ? 










Monday 14 August 2023

"कोण" पेक्षा "कुठून" हे अधिक महत्त्वाचे....

आपल्याला शोधणारा आपल्याला नक्की कुठून म्हणजे कोणत्या ठिकाणाहून शोधत आहे हे पहिले जाणून घेऊन त्याप्रमाणे विचार करायला हवा. बरेचदा जे साधारणपणे ऑफलाइन लोक असतात ज्यांच्या एकाच ठिकाणी दोन-तीन गोष्टी दुकानात ठेवलेल्या असतात ते त्या दोन तीन गोष्टी गुगल listing मध्ये एकत्र टाकता येतील का असं विचारतात.उदाहरणादाखल फोटोमध्ये दाखवलेले एक दुकान पहा👇🏻


कोकणात किंवा छोट्या गावांमध्ये साधारण अशा प्रकारची दुकाने आढळतात. या दुकानात खाद्यपदार्थ, किराणामाल तसेच सायकलचे पंक्चर काढायची देखील सोय आहे.एका लहानशा गावाच्या दृष्टीने ही अगदी योग्य अशी सोय आहे. तरीही गुगलवर या दुकानाचे लिस्टिंग करताना तिन्हीपैकी एक निवडावे लागेल.

एकतर सायकलचे दुकान किंवा किराणा मालाचे दुकान किंवा उपहारगृह.

"हे असं का" हे समजून घेण्याची गरज आहे. गुगलवर तुमचं दुकान शोधणारा त्या रस्त्यावर नसतो किंवा त्या गावातही नसतो त्यामुळे आल्यावर एकाच ठिकाणी तीन गोष्टी मिळणे हे तो पाहत नसून आधी पाहत असतो की याच्यापैकी कदाचित एखादीच गोष्ट कुठे मिळेल. कारण गुगलवर सर्च टाकताना "सायकलचे दुकान किंवा किराणा मालाचे दुकान किंवा उपहारगृह" असे टाकत नाहीत तर त्यापैकी कदाचित एकच गोष्ट टाकली जाईल._सायकल दुकान अधिक उपहारगृह व सोबत किराणामाल असे देखील शोधले जाणे तसे अवघडच._त्यामुळे गुगलच्या शोध मोहिमेत तुम्हाला झळकायचं असेल तर गुगलवर शोधणारी व्यक्ती ही काय सर्च टर्म टाकेल हे पाहूनच लिस्टिंग तयार करावे.यातली एक टीप अशी की एकावेळी एका ठिकाणी एकच व्यवसाय नोंदा. त्याच ठिकाणी दुसरा व्यवसाय नोंदविता येत नाही हे लक्षात ठेवा.

Monday 31 July 2023

एकच ट्रेनिंग, पुन्हा पुन्हा का बरे करतात मंडळी ?

एकच ट्रेनिंग जसे Saturday क्लब चे MDP हे पुन्हा पुन्हा करत राहण्याचा काय उपयोग, असा प्रश्न मला अनेक वेळा अनेक जण विचारतात.

काहीजण खरच कुतूहल म्हणून, तर काहीजण थोडेसे खोचक पणाने.

MDP म्हणजे Membership Development Programme. हा खरे तर उद्योजक development किंवा बिझनेसमन Development प्रोग्राम आहे. कारण ह्यात कौशल्य, हेतू यासोबत मानसिकता ह्यावर देखील विस्तृत प्रमाणात चर्चा होत असते.

तर एमडीपी हा सॅटर्डे क्लबचा एक असा प्रशिक्षण कार्यक्रम आहे की जो इतर प्रशिक्षण कार्यक्रमांपेक्षा खूप निराळा आहे

हा खास करून मराठी उद्योजका करता तयार केलेला आहे ज्याने कदाचित पिढ्यान पिढ्या स्वतःचा उद्योग म्हणजे काय याबद्दल अजिबात कुठलेही पाणी चाखलेले नाही.

त्यामुळे अशा संपूर्णपणे नवख्या आणि अगम्य प्रदेशात प्रवेश करताना किंवा त्याच्यात वावरत असताना होऊ शकणाऱ्या असंख्य चुका यातून टळू शकतात.

तसेच सतत नव्या नव्या चुका करत राहिल्यावर किंवा नवे नवे प्रश्न उभे राहिल्यावर त्याचं उत्तर कुठे शोधावं?

तर ते ह्या एमडीपीमध्ये शोधावं.

याचा अर्थ एमडीपी याला एका डिक्शनरी प्रमाणे घ्यावं ज्याच्यात पडलेल्या प्रश्नाला पटकन त्या त्यावेळी उत्तर मिळू शकेल.

उद्योजकाच्या सभोवतालच्या परिस्थिती सतत नव्याने बदलत राहतात. सोबत तो करत असलेले प्रयत्न आणि पर्यायाने त्याच्यासमोर उभी राहिलेली आव्हाने देखील.
या नवनव्या आव्हानांना कसं सामोरे जायचं याचा एमडीपी हा परिपाठ आहे.

शिवाय प्रत्येक एम डी पी ला येणारे विविध नवे नवे उद्योजक, त्यांच्या नवकल्पना, त्यांच्यासोबत नेटवर्किंग करण्याची मिळणारे संधी, हा सुद्धा एमडीपी चा एक महत्त्वाचा पैलू.

एमडीपी हा खूप विचार करून तयार करण्यात आलेला प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यात अनेक धडे तयार केलेले आहेत. चार तासांमध्ये हे धडे बऱ्यापैकी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. हे खूप प्रश्नोत्तर पद्धतीने घेतलं जातं त्यामुळे मनात पडणाऱ्या अनेक शंका कुशंकांचं इथेच निरसन होऊन जातं. तरीही वर म्हटल्याप्रमाणे एखाद्याच धड्यावर किंवा एखाद्याच मुद्द्यावर मन अधिक विचार करू लागतं आणि तेच अधिक मनाला भिडतं, याचं कारण सुद्धा उघड आहे:- त्या त्या वेळेला समोर असणारी आव्हाने. यात असं होऊ शकतं की इतरही तितक्याच महत्त्वाच्या पैलूंकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे एक किंवा दोन महिन्यांनी पुन्हा जेव्हा एमडीपी करतो तेव्हा जुने प्रश्न जाऊन नवीन उपस्थित झालेले असतात. त्या नवीन प्रश्नांना या नव्या एमडीपीमध्ये उत्तर मिळून जातं.

तर सॅटर्डे क्लबचा एमडीपी हा एक जबरदस्त कार्यक्रम जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तेव्हा करत जा. विद्यार्थी दशेत रहा.

आयुष्याचे कारण सापडून जाईल.

Tuesday 25 July 2023

संख्या व खरी परिणामकारकता

बिझनेस नेटवर्क्स व्यवस्थित चालावी यासाठी त्यातील प्रमुख घटक म्हणजे त्या त्या नेटवर्क चे मेम्बर्स ह्यांनी कृतीशील राहावे लागते. आणि ते राहावेत ह्यासाठी नेते मंडळी अनेक प्रकारे शक्कल लढवीत असतात. त्यातली एक शक्कल म्हणजे : अमुक एक संख्याबळ मिळविणे व त्याला जोडून असलेला एखादा खास मान-सन्मान. 

ह्यातील उद्देश तसेच हेतू निश्चितच उदात्त आहे ह्यात शंका नाही. कारण अणूक एक संख्येत घोळत पडलेला एखादा ग्रुप ह्या उद्दिष्टाने जरा ढवळला जातो, त्यांचे म्होरके कामाला लागतात आणि एक उर्जा संचारते. ही उर्जा संक्रमित होते व नवनवीन मेंबर जोडले जातात. ह्याची परिणती अर्थात उत्तम प्रकारे व्यवसाय वाढण्यात होऊ लागते, जे की नेटवर्क चे प्रमुख साध्य असते.

हे काम जर योग्य रीतीने केले, तर खूप छान परिणाम मिळतात. एक तर व्यवसाय वाढीला लागतो , शिवाय नाठाळ मंडळी बाद होवून कर्तृत्त्ववान मेंबर चमकू लागतात. 

ह्याउलट जर विवेक राखला नाही, तर मात्र "नुसती संख्या" हा एक नंबर गेम होतो, विचित्र संस्कृती तयार होते आणि गाडी रसातळाला जावू लागते. त्यामुळे कर्तव्याचा काहीतरी माप-दंड हवाच.

ह्याच संदर्भात मी ज्या क्लब चा सदस्य आहे, तिथे ५० ही संख्या प्राप्त झाली, की एक विशेष सन्मान दिला जातो. मी एक प्रस्ताव दिलाय तो असा, की याकरिता त्या ग्रुप ने निदान ३ महिने सलग ५५ ही संख्या राखून दाखवावी. त्यानंतर त्यांचा सन्मान करावा.

पाहू काय होतंय !

Wednesday 28 June 2023

माझ्यासाठी जे Right; तेच राईट !

३-४ महिन्यांपूर्वी मला एका हितचिंतक मित्रा कडून सरकारी कामाची एक संधी आली. संधी मला Next-Level घेवून जावू शकेल अशी. दिवसभर बसून मी सर्व कागदपत्रे तयार करून दिली. शेवटी त्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी मला जराशा विचित्र अटी फेकल्या , त्या खालील प्रमाणे :-

  • तुमचा कोर्स केल्याने उद्योजक पुढच्या महिन्यापासून अर्थार्जन करायला लागलाच पाहिजे.
  • त्यातून निदान ८० टक्के लोक अर्थार्जन करायला लागलेच हवेत.
  • डिजिटल कोर्स अगदी स्वस्तात व्हायला हवा.
  • अधिकाऱ्यांनी "ओके" म्हटले, कि तुमचे पैसे फटक्यात रिलीज.
जे अधिकारी हे सर्व बोलले त्यांनी मला खात्री दिली कि हे काम तुमचेच आहे. पैसे बिसे सुद्धा कुणालाच द्यायचे नाहीत वगैरे. 

तर नुकतेच त्या प्रोजेक्ट चे पैसे Sanction होवून आले, आणि मी त्यांना धडधडीत "नाही" म्हटले आहे. हो, ही मोठी संधी ( कदाचित ) नाकारून. 

तत्त्वाचा प्रश्न केलेला नाहीये, पण नुकत्याच अशाच एका सिमिलर घटनेत आमच्या एका मित्राला बसलेला फटका डोळ्यासमोर आहे. त्याचा analysis केला तर खालील गोष्टी माझ्या लक्षात आल्या :-
  1. आपण सगळ्यात "बाप" असू, पण सरकारी खात्यात आपल्या हातात काहीच नाही.
  2. अगदी क्लीन अधिकारी वर्ग असला, तरीही तर प्यादे कुठे अडले कि सगळे नामानिराळे होतात. मरतो, तो उद्योजक. 
  3. अशा केसेस मध्ये आर्थिक तर होतंच, शिवाय मानसिक नुकसान देखील प्रचंड होऊ शकतं, वेळ खूप जातो हे अतिरिक्त.
  4. अगदी Defined प्रकारचा Product किंवा सेवा असेल, उदा. Dunlop चे tyre supply, तर ठीक आहे. पण असे कोणते उत्पादन किंवा सेवा असेल, ज्यात नवीन पणा आहे, आणि ज्यात काही मान्यता देणारे अधिकारी आहेत, अशात सरकारी खात्यात हात न घालणे हे योग्य.
( Disclaimer : हे "माझे" विचार आहेत फक्त. चर्चेला, मताला जरूर वाव आहे )

Thursday 1 June 2023

कस्टमर बदलतोय....

छोट्या ( तुलनेने ) शहरांत आता खरे मार्केट आहे असे वारंवार म्हटले जाते. असेलही. पण सर्वच क्षेत्रात आहे असे नाही. बहुतेक ठिकाणे चाणाक्ष उद्योजकांच्या नजरेतून कधीच हेरली गेलेली आहेत. Time to upgrade ! असे आता प्रत्येक ग्रामीण नागरिकाला वाटू लागले आहे आणि त्यांची राहणी आता स्मार्ट होवू लागली आहे.

तालुका प्लेसेस किंवा अजून काही मोक्याची ठिकाणं इथे तर खूप वाव दिसतो. एक ताजं उदाहरण म्हणजे .... मी परवा पुण्याहून बारामती ला गेलो होतो,तिथून काम संपायला उशीर झाला. साताऱ्याला जायचं होतं, विचार केला ... निरेला थांबू. मला काय तसं बेसिक लॉज सुद्धा चालतं.पण निरा जे एक well connected ठिकाण आहे, तिथे बरे हॉटेल नाही थांबायला.

पुणे,बारामती,सातारा,मुंबई laa ला ट्रेन,फलटण जवळ, शिवाय अनेक मार्गांवर नीरा हे स्पेशल लोकेशन आहेच आहे. तरी इथे असे हॉटेल नसावे.

इथे इतका scope नाय सायेब असे तो लॉज मालक म्हणाला. कदाचित त्याला ठाऊक नसावे की हल्ली ऑनलाइन सर्च तर असतोच, शिवाय पर्यटन सुद्धा बदलले आहे.

काय जाणो एखादे छानसे हॉटेल एव्हाना setup झालेही असेल पुन्हा जाईस्तो.

Sunday 21 May 2023

इथे Steve Jobbs चं काय काम ?

IIT , IIM , MIT किंवा London School of Economics वगैरे मध्ये जावून शिक्षण घेणे किंवा इथे शिकून आलेले, फंडे करणारे लोक्स हा एक नवा वर्ग निर्माण झालेला आहे. 

ह्याच्या सोबत, सतत कायम बाहेरच्या लोकांचीच ( नेट वरील ) उदाहरणे घेवून आणि देत राहणे हा देखील एक वर्ग आहे.

शिवाय, इथल्या देखील प्रथितयश लेखकांची अभिवचने share करणे, संस्कृतातील सुभाषितांचे दाखले देणे ही देखील एक पद्धत रुजू असते. 

हे सगळं फोल नाही 


हे करावं ना, पण जग वाचणे... ह्याचं काय ? आजूबाजूला ... अगदी जवळच घडत असलेलं काही .. ते पहावं. अनुभवावं. रीचवावे. बुद्धीचा फिल्टर घट्ट  काम करत असतोच की : काय घ्यावं/ काय नाही. हे अधिक सजग.

कालच एका ठिकाणी जाण्याचा प्रसंग आला. एका अगदी छोट्याशा प्रश्नाचं उत्तर शोधताना एका " Start Up " ( ही एक अतिरिक्त जातकुळी ) ने थेट Steve Jobbs चं ( अर्थात ऐकीव किंवा कथित ) उदाहरण दिलं. 

ह्यांना आपल्या कोपऱ्या वरचा बाळू वडेवाला का दिसत नाही ... जो वड्यांचा हिशोब ठेवायला नको, म्हणून सरळ १३ ( एका वडा पाव चा दर ) गुणिले १,२,....१०,२०.... असे दुकानात कोष्टकच लावून ठेवतो. 

किंवा आपल्या गल्ली बोळाच्या तोंडावरचे केरळी आण्णा का दिसत नाहीत, जे tyre चे दुकान दिसायला चक्क रस्त्यावर एकावर एक असे Tyres रचून ठेवतात. 

अशी असंख्य उदाहरणे आजूबाजूला असताना.... मी पाहू कशाला नभाकडे ?

Saturday 13 May 2023

Video का तयार करावेत ?

एका नेट्वर्किंग मीटिंग मध्ये Video Creator चे प्रेझेन्टेशन सुरु होते. त्या व्यक्तीने खालील प्रश्न विचारले :-

"किती जणांनी 5 Point Someone हे पुस्तक वाचले आहे " .... ( फक्त ३ हात वर आले )

" किती जणांनी 3 Idiots बघितला आहे " ..... ( साधारण २५ लोकांचे हात वर आले )

Video कसा जास्त लोकप्रिय आहे, आणि तो जास्त लोक पाहतात म्हणून तुम्ही Video करा असा सूर होता आणि समजही तसाच झाला. ती व्यक्ती तिच्या सेवा विकत होती त्यामुळे ठीक असाही भाव उमटू शकतो, ह्या निमित्ताने थोडे चर्वित चर्वण ....

मुळात फक्त "जास्त लोक पाहतात" हा निकष Video बनविण्यामागे असला की घोळ होऊ शकतो. ह्या ऐवजी Video केल्याने माझे उत्पादन, प्रक्रिया, सेवा ही अधिक उत्तम प्रकारे उलगडून दाखविला येईल किंवा माझा विचार, त्याचे पैलू माझ्या हाव भावांसकट अधिक दृक श्राव्य, जिवंत करता येईल असा जर दृष्टीकोन ठेवला, तर जास्त उत्तम असा अनुभव तयार होईल. मुळात Video म्हणजेच एक न अनुभवलेला अनुभव आहे. कल्पिलेला अनुभव. तो अधिक उत्तम करावा ह्याकडे फोकस ठेवला तरच तो बोलका होईल.

दुसरा भाग असा कि एखाद्या व्यावसायिकाने असा विचार केला तर ? की असा Video वगैरे बनवत बसण्या ऐवजी का नाही एखादे पुस्तकच लिहावे ? किंवा ब्लॉग्स लिहावेत ? कारण वाचणे हे जे जास्त कठीण काम ... ते जे लोक करतील ... कदाचित ते मोजकेच आपल्या साठी महत्त्वाचे संपर्क असू शकतात, नाही का !

Videos हे जास्त पाहिले जातातच, वादच नाही. पण हे search कसे होतात हे पाहायला हवे. अब्जावधी videos नेटवर जाणे, ते Index होणे, त्यावर Google चा Crawler येणे, हे बऱ्या पैकी आव्हानात्मक आहे. परत त्या त्या विचारणे ( Query ) ला तो तो Video जोडून देणे हे खूप जास्त आव्हानात्मक आहे. पुन्हा कितीही सुंदर आपण लिहिलेले असले, किंवा Video केलेला असला तरीही तुमचाच का दाखवू ? असा गुगल ला प्रश्न पडणारच. कारण आपण तर चकट फू काम करतो, आणि शाहरुख खान पण नाही .... मग काय विशेष त्यात ?

त्यामुळे सुरुवात उत्तम explainer Videos ने करावी. Tags, Description छान टाकावे. Browse करणाऱ्या व्यक्तीला अगदी सहज आणि उत्तम रीतीने सर्व पैलू समजतील अशा प्रकारे Navigation असावे. Thumbnail सुद्धा थोडा चांगला करावा. जमले, तर Videos च्या Description मध्ये Chapters हा Youtube चा पर्याय वापरायला हरकत नाही. 


Sunday 7 May 2023

नेटवर्किंग आणि धंदा

नुकतंच मला एका परिचित व्यक्तीने एक Requirement share केली. मी संपर्क केला, तर त्यांनी सगळं पुन्हा share करायला सांगितलं, प्रोफाईल मागविल वगैरे. ह्याचा अर्थ असा, कि ज्यांनी रेफर केलं त्यांचं तिकडे तितकेसे वजन नाहीये. किंवा त्यांनी माझ्या बद्दल बोलायला काहीच कष्ट घेतलेले नाहीयेत. 

अशा प्रकारे काम करायचे नाही असं मी ठरवलं आहे. कारण मी अशा प्रकारे अजिबात कनेक्ट करून देत नाही.

जी लोकप्रिय नेटवर्क आहेत म्हणजे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यामध्ये रेफरल देणे आणि त्या मार्फत प्रत्यक्ष व्यवसायात ते रेफरल रूपांतरित होणे याला खूप महत्त्व दिलं जातं.

एका प्रकारे खरंही आहे ते कारण मुळात नेटवर्किंग चा कन्सेप्टच हा आहे की काही ठराविक व्यावसायिक लोकांसोबत काम करून व्यवसाय वृद्धी व्हावी

हे रेफरल विविध प्रकारे दिले जातात. कधी कुणी पटकन संपर्क तिथल्या तिथे शेअर करतो, किंवा कधी कुणी अगदी तपशीलवार व्यवसाय समजून घेऊन नंतर शेअर करतो.

खरं म्हणजे व्हायला हवं असं की आपल्या मेंबर चा व्यवसाय नीट समजून घेऊन, त्या व्यवसायाला अनुरूप असा एखादा संपर्क पाहून त्याच्याशी परस्पर बोलून आणि एक पार्श्वभूमी तयार करूनच आपल्या मेंबरला त्यांच्याशी जोडून देणे.

या पद्धतीने काम केलं तर आपल्या मेंबरचे काम कमी होत जाईल आणि त्याला सेल्स किंवा मार्केटिंग याच्यावर फार लक्ष न देता प्रत्यक्ष काम (कर्म) याच्यावर जास्त एकाग्रतेने काम करता येईल.

सध्या नेटवर्कमध्ये खूप उथळ पद्धतीने काम होताना दिसत. रेफरल ची खिरापत वाटणे हा एक लोकप्रियतेचा मार्ग होऊन बसलाय. त्यात मिळणाऱ्या टाळ्या, मिळणारी उथळ प्रसिद्धी, हा एक अधिकाधिक मेंबर्स मिळवणे याचा मार्ग होऊन बसलाय. यात पुन्हा जेव्हा हे मेंबर्स अधिक मिळवणे याच्या मोहिमा उघडल्या जातात तेव्हा तेव्हा हे दाखवलं जातं की मेंबर्स वाढले की आपोआप व्यावसायिक संधी अधिकाधिक निर्माण होत आहेत

वरकरणी यात जरी तथ्य वाटलं, तरी यात वाहवून जाण्याची शक्यता अधिक आहे. मेंबर्स चं लक्ष एकमेकां सोबत अधिक दृढ नातेसंबंध निर्माण करणे यापासून विचलित होऊन ते विखुरलं जातं. 

त्यामुळे कमी आणि मोजक्या लोकांसोबत अधिक खोलवर काम करणे या प्रकाराला तिलांजली मिळते.

Sunday 23 April 2023

श्रेय बीय इत्यादी......


एखाद्या विचाराची आपण रुजवात केली आणि तो दुसऱ्या कोणी अमलात आणला आणि नंतर आपलं नाव त्याने घेतलं नाही तर मनाला नक्कीच त्रास होतो. निदान मला तरी एक दोन वेळा असं झालेलंच आहे असं कबूल करावं लागेल.

नुकतंच एका सॉफ्टवेअर बद्दल त्याच्या निर्मात्याने काही बोलले असता त्या सॉफ्टवेअरची प्रत्यक्ष कल्पना ज्याची होती त्या व्यक्तीने असं सांगितलं की "ही कल्पना माझी बरका ".... आणि माझ्या मनात या विचाराची शृंखला सुरू झाली.

खरं म्हणजे ज्याचा विचार, त्याला हे इतकं वाईट वाटण्याची आवश्यकता नाही. तांत्रिकदृष्ट्या. म्हणजे असं पहा की जो विचार आहे तो अमलात येणे येणे महत्त्वाचे नाही का.....

मग तो कुणाच्याही मार्फत येईना का !

अहंकार दुखावतो हे जरी आपण सत्य मानलं तरीही "प्रगल्भ होणे" म्हणजे हा अहंकार बाजूला ठेवून जे प्रत्यक्ष अमलात आणायचे होते ते कुणी तरी अंमलात आणले याबद्दल समाधान मानणे अधिक श्रेयस्कर नव्हे का ?

How to win friends and influence people या जगप्रसिद्ध पुस्तकात अमेरिकेच्या अध्यक्षा बद्दल एक उल्लेख केला गेलेला आहे त्यात असं म्हटलं आहे की एक अशी कल्पना की ज्याने हे अध्यक्ष "अध्यक्ष" झाले.

ही कल्पना मुळात त्या पक्षाच्या एका दुसऱ्या सहकाऱ्याची होती. हे ज्या व्यक्तीला ठाऊक होते त्या व्यक्तीने सदर सहकाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी जे उत्तर दिले ते अगदी मार्मिक आणि ऐकण्याजोगे आहे.

"ही कल्पना जरी माझी असली तरी ती मूर्त स्वरूपात आणणे याकरता माझ्यापेक्षाही सक्षम व्यक्ती ही जे अध्यक्ष झाले ती आहे त्यामुळे ती योग्य हातात पडली".

मला वाटतं श्रेय बिय हे विचार करताना यापेक्षा मोठं उदाहरण नसावं....

तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे प्रतिक्रिया स्वरूपात ऐकायला जरूर आवडेल.....

Thursday 13 April 2023

शब्द स्वामित्त्व : सर्वात प्रभावी कौशल्य !

An Image can tell what 100 words can say 

Video is the most popular media toay 

Podcast is getting more & more popular 

अशी वाक्य सतत कानावर पडत असतात. शिवाय तो Mehrabian आहेच साथीला, जो म्हणतो की शब्द हे फक्त ७ % उपयोगी ठरतात समोरच्यावर प्रभाव पाडायला. 

ह्या सर्वाने काय व्हायला लागत... कि आपण शब्द संपत्ती ला दुय्यम समजायला लागतो. शब्द आणि तेही मायबोलीतील, हे अधिक भिडतात ही गोष्ट वादातीत आहे. जर आपण आपला स्वत:चा असा विचार सर्वात आधी ग्राह्य धरला तर. 

नुकतेच एका सरकारी कार्यालयात भेट द्यायचा प्रसंग उद्भवला. एका टेंडर संदर्भात त्यांना काही माहिती द्यायची होती. माझे सर्व म्हणजे बऱ्या पैकी काम मायबोलीत चालतं. (हा मी एखाद्याला कनेक्ट व्हायचा सर्वात जवळचा सेतू )

तर तिथले कर्मचारी व उपस्थित व्यक्ती अगदी अभिमानाने " हे इंग्रजीतले शब्द मराठीत आणणे हा कसा मूर्खपणा सुरु आहे " ह्या आविर्भावाने काम करीत होते. एक व्यक्ती- जी प्रत्यक्ष संगणकात मजकूर टाकत होती - त्यांना अनेक मराठी प्रतिशब्द अगदी छान अवगत असलेले दिसत होते, त्यांनी Minutes of Meeting साठी एक सोप्पा, सुरेख, तत्काळ समजून येणारा मराठी शब्द सुचविला : "इतिवृत्त". Minutes of Meeting ह्या शब्दावरून माझ्या मनात अगदी पहिल्यापासून गोंधळच जास्त व्हायचे. कार्यालयांमध्ये रुजलेला हा बोअर शब्द. इतिवृत्त ला काय Problem आहे यार ! कमालीचा त्रास आणि अनादर दिसत होता मंडळींच्या चेहऱ्यांवर. असो.

मुद्दा असा ...की कितीही उदो उदो केला Videos, Images, Audios चा; तरी शोधायला Filters लावले जातात ते शब्दांचेच. त्यानेच आपला शोध सोप्पा, नेमका होतो. 

माझं तर म्हणणं असं .. कि कमीत कमी शब्दांत मला सांगता यायला हव काय म्हणायचं ते ... म्हणजे ते जो शोधात असणाऱ्याच्या हातात चटदिशी पडेल. व्यवसायाचा देखील उद्देश तर हाच असतो ना ? 

अगदी Chat GPT ने तुम्हाला तुमच्यासाठी हा आशय स्वरूपातील मजकूर झटक्यात दिला, तरी त्याला काय द्यायला सांगायचं हे नेमक्या शब्दांतच सांगावं लागतं ना ! कसं वाढवायचं हे कौशल्य ? तर ऐकून, वाचून. स्वत: स्वत:चं विकायची घाई न करता. तसेच वेळोवेळी कागदांवर टिपून, टिपत राहून, पुन्हा संदर्भ वापरत राहून. 

हे कागदांवर किंवा डायरीवर घेवू शकलात तर खूपच छान. अगदी नाईलाज झाला तरच mobile. टिपून घेणे हे कागदावरच सोपं पडतं. परवा डिजिटल चं कौतुक करताना एक व्यक्ती ने मला त्यांचे असेच कार्ड पाठवले. मी मात्र माझे physical कार्ड चटदिशी त्यांच्या हातात थमविले. त्यांनी ते पाहिले शिवाय काहीतरी नोट सुद्धा केले. हे कुठे करणार डिजिटल कार्डवर ? तर मिळालेल्या, गोळा केलेल्या माहितीवर काम करायला सुद्धा पुन्हा शब्द सामग्रीच लागते. त्यामुळे हे स्वामित्त्व लवकर प्राप्त करणे श्रेयस्कर !

Saturday 8 April 2023

काल attend केलेली ३ सेशन्स ...

कधी कधी छान सेशन्स attend करायचा योग येतो. असाच आला काल.

१. Chat GPT ह्या बहुचर्चित विषयावर Enjay IT systems चे CEO लीमेश पारेख ह्यांनी खूप छान टिप्स दिल्या. अगदी सर्व सामान्य विषयांसाठी हे टूल न वापरता अधिक चांगल्या पद्धतीने स्वत: च्या व्यवसाय केंद्रित कसे करता येईल ह्याचा हा एक छान डेमो होता. सोबतच लीमेश सर हे इतर मुद्देही सहज प्रवाहीपणे मांडतात. जरूर ऐका. ह्या सेशन ची Youtube Link :- https://youtu.be/tassf58YpoI

२. काल "Digitization for Smart Manufacturing" वर एक कार्यक्रम होता. वक्ते, डॉ. अरविंद टिळक हे ह्या क्षेत्रात अनेक वर्षे अनुभवी होतेच, शिवाय त्यांनी दिलेले काही काही संदर्भ, दाखले आणि काही विचार हे खूप चांगले होते. उदाहरणार्थ त्यांनी मांडलेला एक विचार म्हणजे : Costing मध्ये न घेतला जाणारा विषय : एखादा तास मशीन बंद राहिले तर बुडणारे उत्पन्न आणि ह्याला पूरक म्हणजे : इथे जर Smart Digitization ची काही तंत्रे वापरली तर होऊ शकणारा परिणामकारक बदल... हा अगदी नवा विचार होता माझ्याकरिता. हा सेशन प्रत्यक्ष होता. PMA च्या सभागृहात. श्री टिळक ह्यांच्या websites वर अधिक माहिती मिळूच शकेल :- https://aiplindia.com/

३. नव्या आर्थिक वर्षाचे नियोजन ह्या विषयावर निवडक उद्यमी च्या साप्ताहिक मीटिंग मध्ये श्री राहुल पोरे ह्यांनी एक सेशन घेतले. स्वत: CMA ह्या नात्याने कार्यरत असणारे पोरे सर ह्यांचे सेशन उत्कृष्ट झाले. हे झूम वर होते. ह्या सेशन ची लिंक :- https://youtu.be/qia6H6O25gs 


Sunday 19 March 2023

मला काम "करावेसे" वाटत आहे का ?

एका लहानशा, तुमच्या माझ्या सारख्या व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायात करायच्या कामाचे प्रमुख ३ भाग असतात 

  1. जे काही आपण ग्रहण करणाऱ्या ला म्हणजे ग्राहकाला देत असतो ते देणे व ह्या देवून हस्तांतरित करावयाच्या प्रक्रियेत समाविष्ट असलेली विविध / सर्व कामे. ह्याला सोप्पे करण्यासाठी आपण "धंदा चालवणे" म्हणू.
  2. दुसरे म्हणजे हा व्यवसाय मिळावा म्हणून करत असणारी कामे. ह्याला "धंदा मिळवणे" म्हणू.
  3. तिसरे म्हणजे ही सर्व कामे सुरळीत चालण्यासाठी करायची कामे. ह्याला "प्रशासन" हा शब्द योग्य वाटतो. 

मिळवणे - चालवणे - प्रशासन. अगदी कोणत्याही धंद्यात हीच त्रिसूत्री येईल कामाला. 

ब्रम्हा=मिळवणे विष्णू=प्रशासन महेश=चालवणे. ही तीनही कामे थोड्या थोड्या प्रमाणात व्यावसायिकाच्या आयुष्याचा भाग असतातच. कमी जास्त फरकाने काही आवडते, जास्त आवडते, आवडत नाही, वगैरे. परंतु करणे प्राप्तच असते. हे सातत्यानेही करावे लागते. इथे जरा गडबड होऊ शकते. आणि धार-सोड होऊ शकते. हे कसे टाळायचे ?

काम आवडून घ्यावे लागते 

तसे पाहिले तर कोणत्याही कामातील प्रमुख भाग सारखेच असतात. शारीरिक, मानसिक शक्तीचा फक्त फरक असतो. तरी हे आत्मसात करता येतं आणि जितक्या लवकर आपण ही सवय अंगी बाणवू शकू, तितकं लवकर आपलं जिणं सोप्पं होऊ शकेल. मनस्थिती छान ठेवून अगदी कोणतेही काम आपण करायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यातून खूप आनंद नाही मिळाला, तरी येणारा वैताग मात्र हमखास कमी होऊ शकेल. काम करावेसे वाटू लागेल.

Monday 13 March 2023

व्यावसायिक Category : मोठ्ठा विषय

बिझनेस नेटवर्क मध्ये जॉईन होताना कोणती Category घ्यायची ?

प्रत्येक व्यावसायिक हा काहीतरी अनेक इतर उप व्यवसाय करीतच असतो जे इतर काही मंडळींचे मुख्य व्यवसाय असतात. उदाहरणार्थ एक Branding सल्लागार Graphic Design, Printing, Packaging इत्यादी व्यवसाय करीतच असतो. त्याच वेळी हेच प्रमुख व्यवसाय असलेले अनेक लोक असतात. एक प्रघात असा की एका Category चा एकच मेम्बर असावा. आणि हे योग्य आहे असे वाटते. हा विषय ह्या पोस्ट चा नाही. तरीही आपण जॉईन होताना कोणती Category निवडावी ? हा प्रश्न कुणाच्या मनात येवू शकतो, खास करून एखादी प्रभावी मीटिंग Attend केली असेल व तेथे आपल्याच सारखे इतर कुणी मेम्बर दिसल्यास. नक्कीच वाटू शकते, की ह्याच ग्रुप ला जॉईन व्हावे. अशाच वेळी त्या ग्रुप चे नेते मंडळी सुद्धा आपल्या विविध प्रकारे मागे लागत असतात, की लवकर जॉईन व्हा, वगैरे. ह्या प्रसंगी खालील टिप्स कामी येवू शकतात :-

  1. सर्वात आधी : लगेच जॉईन होऊ नका. अगदी संधी हातातून चालली आहे असा भास निर्माण झाला तरीही. क्या खाना, तो दम खाना. जगात अनेक नेटवर्क आहेत. काळजी नसावी.
  2. तुमचा प्रमुख धंदा देत असलेल्या व्यवसायाची Category जर तिथे उपलब्ध असेल, तरच ती निवडा. उदा. आपण जर Certified Financial Planner असाल, आणि हेच तुमच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असेल, आणि सदर ग्रुप मध्ये ह्याच Category मध्ये कुणी हजर असेल, तर उगाच Financial Coach वगैरे Category घेवू नये. सदर ग्रुप चे नेते वगैरे मागे लागले तरीही. 
  3. जर अशी Category तिथे उपलब्ध असेल, तर इतर सर्व Factors पाहून जॉईन होवूच शकता. तरीही एक लक्षात असू द्या : की पुढे ह्या इतर Category हा प्रमुख व्यवसाय असणारे किंवा नसणारे उद्योजक देखील Join होवूच शकतात.
  4. सदर ग्रुप चे Leaders किंवा नेते ह्यांना मेम्बर संख्या वाढविणे हे प्रमुख उद्दिष्ट दिलेले असते. ते गाठले की छोटी छोटी कौतुके होत असतात. ही लोकांना फार प्रिय असतात. आपल्या ग्रुप मेम्बर चा प्रत्यक्ष व्यवसाय वाढविणे ह्याकडे दुर्लक्ष होत असते, राहते. त्यामुळे तुमच्या व्यवसाय मिळण्याच्या प्रक्रियेला विलंब लागू शकतो हे ध्यानात राहू द्या. शिवाय हे काही समाजाचे नेते वगैरे नसतात. तर त्या ग्रुप चे नेते असतात. त्या ग्रुप मध्ये थोडे जास्त चांगले.
  5. हे क्लब किंवा नेटवर्क चालविणाऱ्या संस्था देखील ह्या ग्रुप्स मध्ये स्पर्धा लावत असतात. उद्दिष्ट ? चांगलेच. की प्रत्येक ग्रुप ने स्वत: हून प्रयत्नपूर्वक व्यवसाय वाढ करावी, ग्रुप मेम्बर्स ना जोडीला घेवून. वापरायचा विवेक प्रत्येक ग्रुप leader ठेवेलच असे नाही.
  6. तुम्ही जर leader असाल तर मात्र नीट पाहून, पारखून घ्यायला हवे. 

त्यामुळे, संयम, हेच प्रमुख अस्त्र ठेवा. 

Friday 10 March 2023

प्रत्येक काम महत्त्वाचेच ....

माझ्याकडे सध्या एक जरा चांगली संधी निर्माण झाली आहे... म्हणजे त्यातून काहीतरी चांगले, व्यवसायात जरा घवघवीत परिणाम मिळवून देणारी अशी एक घटना घडत आहे. पुन्हा ह्यात हो/नाही आहेच.

 "तू जरा जास्तच न होत असलेली किंवा साशंक बाजू बघत आहेस " असा विचार एका जवळच्या व्यक्तीने मांडला.

हा एक लोकप्रिय गैरसमज आहे. माझ्या बाबत नव्हे, तर एकंदरीतच. 

अनुभवाधारित, सारासार विचार करणे; हे योग्यच आहे नाही का ? पूर्वी मला अशा संधींच्या बाबत अनुभव असेल, तो गाठीला धरून निर्णय घेणे आणि कोणत्याही परिस्थितीत अयोग्य अशा काहीही Commitments न देणे ह्याला जर महत्त्व देवून विचार केला तर तो योग्यच आहे; निदान माझ्या पुरता तरी

माझे व्यावसायिक आणि पर्यायाने सारासार आयुष्य कमीतकमी गुंतागुंतीचे रहावे व मला माझ्या हातातल्या प्रत्यक्ष कामावर अधिकाधिक लक्ष देवून ते ग्राहकासाठी जास्त सुयोग्य कसे राहील, इथे माझा प्रमुख विचार असायला हवा. 

तर वरील घटनेच्या संदर्भात होत असं होतं, की मी त्याला अवास्तव (हो, अवास्तवच  !) महत्त्व देत होतो, त्यामुळे त्यातील प्रत्यक्ष कामाचा वेळ वगळून उरलेल्या वेळातही स्वप्न रंजन किंवा इतर समांतर विचार वगैरे करत बसलो होतो. नशीब वेळीच डोके ठिकाणावर आले. तेही एक वेगळीच घटना आठवल्याने ....

परचुरे शास्त्री नामक व्यक्तीस समाजाने फक्त त्याला महारोग झाला म्हणून वाळीत टाकले होते. परिणामी त्यांच्या जखमा, त्याची मलमपट्टी हा विषय तर बादच. महात्मा गांधी ह्यांनी त्यांना सेवाग्राम येथे आणले व स्वत: त्यांची  रुग्णसेवा केली. हा विचार आजच्या "आनंदवन" च्या मुळाशी आहे. ज्यामुळे बाबा आमटे प्रेरित झाले. 

हे सुरु असतानाच देशाच्या भविष्याला कलाटणी देणारा १९४२ चा चले-जाव संग्राम, त्याची रणनीती वगैरे खलबते, तसेच योजना प्रत्यक्ष सेवा ग्रामात सुरूच होत्या. नेहरू वगैरे सर्व मोठे नेते तेथे तळ ठोकून होते. किती खलबते सुरु असतील, कल्पना केलेलीच बरी.

अशाही परिस्थितीत गांधीजी मध्येच उठून जात. अगदी High Voltage मीटिंग असेल तरीही.... "मला शास्त्रींच्या जखमा धुवायची वेळ चुकवायची नाही" असा विचार ठेवून. 

हातातले प्रत्येक काम तितकेच महत्त्वाचे आणि एक "सध्या बाजूला ठेवू" हा विचार माझ्या मनातून कायमचा खोडला गेला ह्या प्रसंगामुळे.

आणि परिणाम म्हणाल ? तर चलेजाव सुद्धा लक्ष्यभेदी ठरले तसेच रुग्णसेवा देखील. कारण बाबांनी हि कुटी पाहूनच तर प्रेरणा घेतली !

Wednesday 1 March 2023

फक्त repurpose करा ......

कालच एका सह व्यावसायिकाशी 1-2-1 करत होतो. तो मराठीच आहे, शिवाय त्याचा खास महाराष्ट्रीय पदार्थ तयार करण्याचा महाराष्ट्राबाहेर व्यवसाय आहे. हे पदार्थ फक्त एकाच सणा पुरते ते तयार करतात तेही वर्षात एकाच Season पुरते. तरी हे विक्री करण्यासाठी त्यांनी एक लहानसे दुकान भाड्याने घेतले आहे, जे ते वर्षभर ठेवतात. कारण हा सर्व माल त्यांना तयार करायचा असतो, शिवाय विकायचा देखील असतो. 

त्यांचा सदर व्यवसाय जवळपास १० ते ११ वर्षे आहे, व अत्यंत Loyal असा ग्राहक वर्गदेखील आहे. 

गेल्या सणासुदीला त्यांनी बऱ्यापैकी विक्री केली, तसेच आता कोविड पश्चात बाजार खुला झाल्याने त्यांना गेल्या तुलनेत जवळपास दीडपट विक्रीची अपेक्षा आहे. त्यामुळे ते तात्पुरते ३ महिन्या करिता जवळपासच एखादे दुकान शोधात आहेत. असा सर्व विषय सुरु होता.

मी त्यांना सुचविले, कि मुख्य दुकानात फक्त प्रमुख Category तील एक-दोन प्रकार ठेवा, उरलेले online किंवा एखादा TV Set. ज्यावर निवड करता येईल. मग अतिरिक्त Stock थेट तयार करण्याच्या जागेवरून पाठवता येईल ( मग तो कुठेही असेना का ! ) शिवाय ह्या मुळे, तुम्ही तुमच्या शहराबाहेर सुद्धा विक्री करू शकाल. हे एक नवीन module उभे राहील. 

ह्याचं डिजिटल मार्केटिंग करायचा सर्वात स्वस्त आणि नेमका उपाय म्हणजे फेसबुक Live करून विविध दिवशी विविध पदार्थ दाखविणे, शिवाय प्रोमो ऑफर्स देणे.

हे व्यावसायिक जोडीने असेच खाद्य पदार्थ तयार करण्याच्या किंवा इतर कार्यशाळा देखील घेतात. कारण, अर्थात इतर वर्षभर काय करणार ? तर मी त्यांना असे सुचविले , कि ते ठराविक पदार्थ देणे इतकाच तुमचा scope नसून त्या अमराठी शहरात मराठी सणासुदीच्या विविध प्रसंगाना विविध वस्तू मराठी लोकांना पुरविणे हा तुमचा व्यवसाय समजलात , तर विविध लोकांशी संधान बांधून जे तुमचे तयार मार्केट , ग्राहक आहेत त्यांनाच पुन्हा पुन्हा कमी कष्टांत विक्री करू शकाल, शिवाय वर्षभर !

आपल्या कॅश फ्लो कडे एक नजर टाका, तुम्हालाच तुमची उत्तरे सापडतील !

Monday 27 February 2023

Autoresponders : कसे अर्थपूर्ण करायचे ?


Whatsapp वर Auto responders आहेत हे आता सर्वश्रुत आहे. हे Tool म्हणून वापरण्यात काही ग्रेट आहे अशातला भाग नाही. पण हे कसे असायला हवेत, त्यातला आशय काय असायला हवा हे मात्र नीट पहा. नाहीतर ग्राहकाशी संवाद साधण्याची एक बहुमोल संधी आपण गमावून बसतो. 

आता हेच पहा :-

अशाच एक नवीन जोडल्या गेलेल्या व्यक्तीला मी एक मेसेज पाठविला, तिचे आपोआप उत्तर हे असे आले :-

" Thank You for Your Message. We're unavailable right now. But respond as soon as possible "

गैर आहे का ? अजिबात नाही. पण Value Addition काय करता येईल ? ग्राहकाच्या जवळ जाता येईल का अजून ?

" Thanks for showing interest in us. Till the time someone attends you, why don't you have a look at our website {  Link } ?"

हे, किंवा असेच काहीसे. ह्यात आपल्याला फार काही करावे नाही लागत. जरासं ethical Hacking करायचं, बास. म्हणजे काय, तर आपल्या mobile कंपन्या support ला उत्तरे कसे देतात ते पहायचं आणि आपला Content replace करायचा.

इथे Whatsapp चे Chatbots खूप उपयुक्त ठरतात. हे कसे वापरता येतील, असे समजायला ९८५०९९७११० ह्या क्रमांकावर फक्त 000 असे Type करून पाठवा. आणि जो परिणाम तुम्हाला प्राप्त होईल, त्यातून कल्पकतेने स्वत:चा व्यावसायिक Autoresponder Message तयार करा.

Tuesday 21 February 2023

ग्राहका.... तुझ्याच साठी !

आपले काम आपण चोख बजावणे, ते वेळेत हातावेगळे करणे व ग्राहकाला समाधानी ठेवणे म्हणजे झालं असं समजून अनेक सहज, सोप्या संधी नजरेतून सुटतात. ह्याचं हे देखील एक कारण असेल की दिखाऊ मार्केटींग, सोशल मीडिया वगैरे ला दिलं जाणारं अतिरिक्त महत्त्व.

कालच मी एका व्यक्तीला केक पुरवठादार ह्यांचा संदर्भ दिला. तर ती म्हणाली " insta वर भरपूर रिव्ह्यू मिळतील". अर्थात तिचा हेतू शुद्धच होता. तरी मी म्हणालो की आधी तुला केक उत्तम व वेळेत मिळो. तर हे मुख्य. ज्याच्या भोवती इतर पैलू जोडलेत. Reviews वगैरे. 

पुन्हा एकदा पुणे कोल्हापूर पिक अप पॉइंट बद्दल...

पूर्वी मी ह्याबद्दल लिहिलेच होते. तरी राहवत नाही म्हणून लिहितोय. की आता यांचा पिक अप स्पॉट बदलला आहे. आणि तो तद्दन घाणेरडा आहे. पहा तर ह्याची अवस्था 

किती ती घाण, कचरा. हा सगळा भाग म्हणजे दारू, गुंडगिरी इत्यादी चे पुण्यातील तीर्थक्षेत्र. सकाळी सुद्धा ही अवस्था आहे.

मुद्दा असा की ज्या प्रवासी कंपन्या हे पिक अप पॉइंट ठरवतात, त्यांना एखादे चांगले ठिकाण निदान तिथेच तयार करता येवू नये का ? अशक्य नाही कारण प्रसन्न परपल तसेच VRL ह्यांची अशी छोटेखानी परंतु स्वच्छ स्थानके मी पाहिली आहेत. निदान स्त्री प्रवाशांचा तरी विचार व्हावा. आणि चोख वेळेवर सेवा व सोबत हा अगदी सहज येणारा मुद्दा कसा विचारात नाही घेतला जात ? ह्यामुळे देखील ब्रँड पडू शकतो. किंबहुना ग्राहका विषयी सद्भावना अशी संस्कृती तरी निश्चित उदयाला येवू शकते. वाटेत एका ठिकाणी ब्रेकफास्ट साठी बस थांबते तेथे ह्याच्या उलट परिस्थिती. Five star नाही ( नकोच ) परंतु आवश्यक स्वच्छता, नीटनेटके पणा व सोबत रास्त दर ( स्वस्त नव्हे ) हे असेल तर ग्राहक दुवा देवून जाईल.

ह्यावर ग्राहकांशी आस्थेने बोलणे असेल तर अजून काय लागतं ? लोक तुमचे brand ambassador बनतात.
ह्याउलट पुण्यातल्या एका gym chya बाहेर अत्यंत दुरावस्थेत एक सार्वजनिक लघुशंका ठिकाण मी अनुभवले. Gym चालक अनेक वर्षे तक्रार करतोय, पण स्व खर्चाने ते सुस्थितीत काही आणीत नाही. महानगरपालिका करेल म्हणताना , अनेक ग्राहक घालवत आहे हे ह्या बाबाला कोणी सांगायचे !

Monday 20 February 2023

Referrals देण्याची घाई नको .....

पार्श्वभूमी 


एकमेकांना व्यावसायिक संदर्भ ( Referrals ) देणे हा प्रमुख उद्देश ठेवून व्यावसायिक नेट्वर्किंग क्लब्स चालविले जातात. ह्यात विक्री होण्यासाठी मिळणारे connects ह्यावरच जास्त भर असतो. आधी मेम्बर्स आळीपाळीने आपापल्या व्यवसायाची ओळख देतात; तसेच आपल्याला हवे असलेले संदर्भ किंवा connects मागत देखील असतात. ह्याच मीटिंग मध्ये मग मेम्बर्स असे कनेक्ट स्वत: च्या नेटवर्क मधून share करतात. तसेच पूर्वी अशा कनेक्ट मधून काही प्रत्यक्ष व्यवहार घडला असेल, तर तो देखील share करतात, प्रत्यक्ष किंमती सकट. उद्दिष्ट : अशा नेट्वर्किंग ची प्रत्यक्ष ताकद लोकांना कळावी. आणि अधिकाधिक संदर्भ share व्हावेत.

आहे उदात्त तरी ....


जेव्हा जेव्हा हे sharing होते, तेव्हा तेव्हा टाळ्या वाजतात, देणाऱ्या वर लोकांचा आदराचा भाव प्रदर्शित होतो. त्यात पुन्हा लोकांत प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून सर्वाधिक संदर्भ देणारी व्यक्ती निवडली जाते, किंवा तिच्याकडे लक्ष जाईल अशी एखादी कृती केली जाते. उद्दिष्ट पुन्हा : ही उदात्त संस्कृती निर्माण व्हावी, जोपासली जावी. हे referrals देताना व्यवस्थित पद्धत पाळली न गेल्याने खूप वेळ वाया जातो, आणि ह्या उदात्त कृतीतून उथळपणाच जास्त वाढीला लागतो. नेटवर्क चालविणाऱ्या मंडळींना ह्यातून दिसणाऱ्या भासमान आकड्यांवर अधिक प्रेम असलेलं दिसतं; हे आकडे इतर लोकांच्या नजरेत भरतात आणि तेच त्यांना जास्त लोकप्रिय करतात. ह्या ऐवजी प्रत्यक्ष referrals, ते अधिक कसदार दिले - घेतले जावेत ह्याकरिता जर संस्कृती निर्माण केली गेली, तर खरे आकडे वाढतीलच, शिवाय वेळ खूपच वाचू शकेल. एक मोठा धोका ह्यात असतो : तो म्हणजे वरकरणी हे अनाकर्षक दिसतं. कारण ह्यात टाळ्या खूप कमी वाजतात आणि Adrenaline Rush अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे हे कुणीच मनावर घेत नाही. ह्यात "मेम्बर ची संख्या वाढविणे" मध्ये असलेली किक नाही. परिणामी नेत्यांना ह्याबद्दल सांगून तसा काहीच उपयोग होत नाही असा माझा अनुभव आहे. member ना सांगायचे तर त्यात खूप वेळ जातो, माझ्या सारख्या मेम्बर चा. तरी, मी कृतीने हे करून दाखवायचा खूप प्रयत्न करत असतो. 

माझी मेथड 


  1. ज्याला referral द्यायचा त्याची योग्यता आधी तपासणे, नसेल तर त्याला ती कशी build करायची हे सांगणे.
  2. योग्यता असेल, तर ज्यांचा referral द्यायचा, त्याना विचारणे कि त्यांची गरज अजूनही आहे , की भागली, किंवा सदर संपर्क त्यांच्या उपयोगाचा आहे किंवा नाही. 
  3. असेल, तर आपल्या मेम्बर बाबत त्यांना कल्पना देणे, जमल्यास त्यांच्या सेवेची किंमत देखील सांगणे. जर ते हो म्हणाले, तर आपल्या मेम्बर ला सदर संपर्क share करायचा.
  4. मेम्बर जेव्हा आपापले ASK मागतात, तेव्हा आपल्या मनात येणारा संपर्क reference म्हणून share न करता, वहीत नोंद करून ठेवायचा आणि आवश्यक छान बीन करून मगच Qualify झाल्यास referral म्हणून share करायचा.

ह्या पद्धतीने खूप वेळ वाचतो, आणि आपल्या मेम्बर ची प्राथमिक Filtration प्रोसेस मधून सुटका होऊ शकते. त्याचे देखील काम fast होते. 

माझ्या बद्दल सांगताना किंवा referral मागताना मी देखील माझ्या Reputation ( व्यावसायिक नावलौकिक ) बद्दल सविस्तर सांगतो, तसेच योग्य तेच संदर्भ मागतो. त्यामुळे असे झटकन referrals मिळण्याची शक्यता मंदावते तसेच मिळालेले रुपांतरीत होण्याची शक्यता वाढते. 

आपल्याला हे विचार कसे वाटले, ह्याबद्दल प्रतिक्रिया जरूर द्या. 

Thursday 9 February 2023

अनुप वैद्य : सुरुवातीपासून Clarity चे उत्कृष्ट उदाहरण ...

" आपण मराठी ५००० फुटाच्या factory पासून सुरुवात करतात आणि म्हणतात ... बघू या कसे चालते ते आणि मग ....."

अनुप वैद्यांच्या ५०,००० स्क्वेअर फुटांच्या factory मध्ये त्यांच्या केबिन मध्ये बसून आम्ही गप्पांना सुरुवात केली. मी अगदी सगळे detail सांगणार नाही, कारण हा काही मुलाखती घेणारा Youtube Channel नाही. तरी त्यांचा पसारा लक्षात यावा आणि काय घेता येईल ते घ्यावे ह्यासाठी ह्या पोस्ट रुपी हा खटाटोप. 

आधी जरा खालील फोटो पाहून घ्या.( मी काही प्रो नव्हे )







उल्लेखनीय ....

  1. Tefabo Products नावाने त्यांचे एक Fabrication unit आहे. २०१८ साली सरळ ३५,००० फुटाच्या शेड मधून हे त्यांनी सुरु केले. हातात कोणतीही Order नव्हती. होता तो दांडगा अनुभव, लौकिक ( क्षेत्रातला ) आणि दूरदृष्टी. 
  2. वैद्य सरांनी फक्त ठरवले की पवन उर्जा क्षेत्रात लागणारे Fabrication करायचे २०३० पर्यंत आणि उत्तुंग भरारी घ्यायची. ( त्यांच्या शब्दांत Exponential Growth ) आत्मविश्वास हा खूप घासून घासून गुळगुळीत झालेला शब्द वाटला इतका अनुप सरांकडे ठाम पणा आहे.
  3. कधी कधी येणारे कठीण प्रसंग लीलया हाताळणाऱ्या वैद्य सरांकडे Cash Flow चे उत्तम ज्ञान आहे.
  4. Capex कमी हे त्यांचे जणू सूत्रच आहे. त्यामुळे निष्कारण अवजड यंत्रसामुग्री मध्ये पैसा गुंतवून ठेवण्या ऐवजी ते माणसांत गुंतवितात.
  5. सुरुवातीला महिन्याला ४ ते ५ लाख रु इतका लहानसा Turnover पासून सुरु झालेली Tefabo आता ७० कोटी ना पोचली आहे, पुढील वर्षी १०० कोट असणार हे अनुप सरांचे ठरलेलेच आहे. 
ह्यातून काही प्रेरक वाटले, तर नक्की प्रतिक्रिया रूपाने येवू द्यात !


Monday 30 January 2023

मार्केटिंग साठी वरदान : ChatGPT

 ३० नोव्हेंबर रोजी ChatGPT नामक एक AI based Tool बाजारात आलं आणि त्याने हवा करून टाकली आहे. हे ChatGPT करते तरी काय नक्की ? तर तुम्हाला हवे ते स्क्रिप्ट online काही क्षणांत लिहून देते. हो हो, बहुतेक सर्व विषयांवर. आणि समोरून हेल्पर सारखे. खालील Video बघा :-

बघितल्यावर लक्षात येईल की किती क्रांतिकारक आहे हे. 

गुगल आणि ह्याच्यात फरक असा आहे, कि हे तुम्हाला तुम्हाला हवा तसा मजकूर तयार करून देते क्षणार्धात. ह्याचा खुबीने वापर कसा करायचा ?

  1. आधी आपल्या ग्राहकांना पडणारे प्रश्न लिहून काढायचे 
  2. ते chat gpt ला विचारून उत्तरे घ्यायची.
  3. नंतर ही उत्तरे FAQ म्हणून वापरायची 
ही उत्तर whatsapp वरून वापरलीत तर ? Conversion अतिशय जलद मिळेल हे नक्की. मी स्वत: एक chat based टूल वापरतो. त्यात हे वापरले तर ? 

Comments स्वरुपात उत्तरे/ प्रश्न/ शंका अपेक्षित.


Tuesday 24 January 2023

ऑनलाईन- ऑफलाईन वेगळं नसतं भौ....

काल मला माझ्या एका परिचित उद्योजिके चा फोन आला...

" माझे गुगल views ना ३०,००० ( wow ) वरून एकदम ८००० वर ड्रॉप झालेत. आम्ही नुकताच पत्ता बदलला ना .. त्यामुळे असेल का ?"

१. नक्कीच. आपण घर बदलले की नाही का आलेल्यांना बंद दार दिसतं, तसेच असते हे.

२. तरी ह्याला एक उपाय म्हणजे : नवीन पत्ता झाला की verify करून घ्या. गुगल प्रोफाईल chya dashboard वर हा पर्याय आहे. परत थोडी वाट पाहावी लागेल, पण होऊन जातं. आपला जुना पत्ता नाहीका पोस्टातून नवीन करून मिळतो आणि त्याला वेळ लागतो, तस्संच.

३. काही अती हायपर मंडळी हे लवकर व्हावं म्हणून अगाऊच करून ठेवतात. माझ्या एका मित्राच्या बाबत हे घडलंय. ते डॉक्टर आहेत, एका नवीन संस्थेशी संलग्न होताना नव्या ठिकाणी क्लिनिक जाणार म्हणून त्यांनी गुगल लिस्टिंग नव्या पत्त्याचे जाण्यापूर्वीच करून ठेवले. ते सस्पेंड झाले. परत मिळवता येते, आलेही. पण मुद्दा असा की नवीन जागेत प्रत्यक्ष शिफ्ट झाल्यावर हे उद्योग करा. 

ऑनलाईन हे नंतर झालं. आधी दुकानच होतं. आणि गुगल प्रोफाइल हे नकाशे चे अतिरिक्त version, extension आहे जे प्रत्यक्ष व्यवसाय शोधायला सोपं पडावं म्हणून केलं गेलंय. त्यासारखा विचार करा. म्हणजे नेहमी सारखा.

Online काही येगळं नस्तय 

Monday 23 January 2023

"मी" सुरु केला ... पण तो "माझा" नव्हे, सर्वांचा असतो "ग्रुप"

कधी कधी एखादा विचार माझ्या मनात आला, आणि तो लोकांपर्यंत पोचवावासा वाटला, की प्रथम स्वत: सुरु करून चालवीत असलेल्या ग्रुप ला तर आपण सहजच अध्यहृत घेतो. परत त्यात कुणी प्रश्न विचारायची सुद्धा शक्यता नसते. तरी मी स्वत: ला जाणीव करून द्यावीच लागते :-

" हा कुठला वारसा नाही, की कुठलेही आंदण" 

हा एक ग्रुप आहे boss, माझ्याकडून रुजवात झालेला. माझा नाही. 

कुणाचाच नाही. ग्रुप हा एक सर्व विचार आहे. सर्वांच्या विचारांतून परिपक्व, प्रगल्भ होत जाण्याची एक संधी. 

Once Upon a Time in Mumbai मध्ये एक छान प्रसंग आहे, त्यात शोएब ला काही दिवस त्याचा "धंदा" सांभाळायला देताना सुलतान मिर्झा म्हणतो :-

"ना ये कोई विरासत है, ना ही कोई खैरात

असाच approach ग्रुप्स बाबत असायला हवा. मी सुरु केला, म्हणून ती माझी मालकी नव्हे. तर सगळ्यांचा, सगळ्यांसाठी आहे.

व्यवसायातील परिपक्वता...

एखादया कुटुंबात, समाजात व्यवसायाचा वारसा आहे असं आपण गौण पणे म्हणतो. खरेही आहे. हा वारसा म्हणजे अनेक छोटे छोटे निर्णय घेताना येत असलेला सफाईदार पणा. हे घडत असतं ते त्या त्या घरांतील वेळोवेळी घडणाऱ्या चर्चांमधून. लहान मुलांना देखील ही निर्णय प्रक्रिया आधी समजू लागते आणि मग उमगू लागते. आणि ते लगेच कृतीत सहजपणे परावर्तित होवू लागते. हा वारसा.

हे संपूर्ण पिढीचे शिक्षण अगदी कमी वेळात करायचे उत्तम साधन म्हणजे व्यावसायिकांच्या समूहात वावरायचे आणि उत्तम श्रोता, वाचक बनायचे.

आमच्या Saturday क्लब मध्ये एक तरुण उद्योजिका आहे वैष्णवी जोशी. मातृ पार्जित (आई पासून चालत आलेला ) फोटोग्राफी चा व्यवसाय पुढे सुरू ठेवणारी वैष्णवी ...

  • बहुतेक वेळा तिचा प्रो कॅमेरा सोबत आणते, मनसोक्त भरपूर फोटो काढते, वाटते. अजिबात हात आखडता न घेता. दर १५ दिवसांनी येणारी मीटिंग ही आपले reputation सिद्ध करणे, तसेच कौशल्य पणाला लावून हात साफ करून घेण्याची देखील उत्तम संधी आहे हे चांगले जाणून आहे.
  • शिवाय, फक्त एकाच मिनिटाच्या ओळखीतून आपला नावलौकिक अतिशय छान पद्धतीने सर्व मेंबर्स पर्यंत पोहोचवते.
  • ह्याशिवाय मिळताच नव्या प्रकारच्या कामांच्या शोधात राहते आणि क्षेत्र विस्तारत राहते.

वैष्णवी आणि तिच्यासारखे इतर व्यावसायिक डोळस पणाने पाहत राहून देखील लवकर परिपक्वता आणता येईल.

Tuesday 17 January 2023

WhatsApp Broadcast Lists विषयवार असायला हव्यात ....

आपण व्हॉट्सॲप broadcast Lists मार्फत पाठवत असलेला मजकूर सर्वसामान्यपणे contacts ना सरसकट पाठविला जातो. माझ्या सारखा एखादा चोखंदळ वाचक असेल तर त्याच्या आवडी निवडी असतात. त्यामुळे होतं काय, की एखाद्या विशिष्ट व्यक्तीने विशिष्ट विषयाचे updates मला पाठवायला सुरूवात केली, की मला उत्कंठा असते,की पुढचं हा किंवा ही काय आणि कधी पाठवतो आहे ...

इतक्यात अचानक याच्याकडून त्याला महत्त्वाच्या वाटत असलेल्या परंतु भलत्याच विषयावरील पोस्ट येते. एकदा येते, दोनदा येते, परत तिसऱ्यांदा येते. मग मात्र त्या किंवा तिच्या बद्दल मनात संदेह निर्माण होतो : ही व्यक्ती पण सेलच ठोकत आहे.

आपण हवे नको असे पाहून ठरवू शकतो की हे वाचायचे की नाही हे. परंतु त्या व्यक्तीचं मनातलं अढळ स्थान डळमळीत होतंच. 

त्यामुळे मी हल्ली :-

१. विषयवार broadcast list तयार करतो
२. मध्ये मध्ये विचारत राहतो, की बोअर होत नाहीये ना ? 
३. असेल तर stop ची request पाठवा आणि लगेच हे stop करतो.

व्यावसायीक बाबतीत तर चक्क काही softwares वापरतो ज्यातून हे filtration व्यवस्थित होतं.

पण कळीचा मुद्दा म्हणजे कमी पाठवावे, मोजकेच पाठवावे, कधी कधीच पाठवावे.

Wednesday 11 January 2023

reviews बद्दल काही पथ्ये ..

नेट्वर्किंग ग्रुप्स मध्ये आपण एकमेकांना reviews द्यायला अत्यंत उत्सुक असतो. एकच वेळी खूप review घेणे खूप अडचणीचे ठरू शकते. तरी review घेताना खालील पथ्ये पाळा:-

तुम्ही जर आठवड्यातून वगैरे नियमित review घेत नसाल तर एकदम ५-१० रिव्ह्यू घेणे ही गुगल ला कृत्रिम कृती वाटते त्यामुळे आपल्या लिस्टिंग ला धोका संभवतो. रोज २ ते ३ च घ्या

एखाद्या वेळी आपल्याकडे लोक येतात, आणि आपण त्यांना हे रिव्ह्यू द्यायला सांगतो. विसरू नये म्हणून एखादी व्यक्ती खास तैनात करतो आणि जागीच हे करून घेतो. अजिबात करू नका. लोकांना आवाहन करा, पण त्यांना त्यांच्या ठिकाणी पोचून निवांत करू द्या. Track ठेवू, पण हळू हळूच होवू द्या.

Reviews ना प्रतिसाद द्या, तपशीलवार. प्रत्येक प्रतिसाद वेगळा, खास हवा. ह्यावर वेळ खर्च करा. Copy paste केलेलं किंवा "धन्यवाद" असे मोघम उत्तर नको. ही संधी समजा, उरकायची कृती नाही.

Sunday 1 January 2023

आपला व्यवसाय : कर्म साधन

नुकतंच प्रसाद कात्रे ह्या printing व्यवसायात गेले ४० वर्षे हून अधिक असलेल्या व्यावसायिक मित्राने निवडक उद्यमी ग्रुप वर त्यांचा व्यवसाय पुढे कोण सांभाळेल ह्याविषयी काही विचार शेअर केले.

त्यांच्याच मुलांनी वगैरे नाही, तरी निदान एखादा होतकरू धुरीण तयार करता येईल का वगैरे सांगोपांग चर्चा झाली.

तत्पूर्वी माझ्या संपर्कातील दोन ते तीन दुसऱ्या पिढीतील उद्योगांना मी भेटून आलो होतो.

एकाने वडिलांचे व्यावसायिक नाव सुरू ठेवले आहे, पण व्यवसाय मात्र बदलला आहे, आणि फायद्यात आहे व्यवसाय, परंतु दुसऱ्या पिढीत भव्य दिव्य वाढ अजिबात झालेली दिसत नाहीये,की, फार इच्छा सुद्धा नाहीये दिसत. त्याच्या पुढच्या पिढीत कुणी आहे का ? तर नाहीच दिसत. थोडक्यात उत्तराधिकारी ह्या विषयात जरा साशंकता च दिसते आहे.

दुसऱ्या व्यवसायात वडिलांच्या धंद्याच्या पूर्ण विरुद्ध धंदा मुलगा करतो आहे. त्यातही वडिलांचा सहभाग विशेष दिसत नाहीये. म्हणजे knowledge transfer ही प्रक्रिया तरी किमान असावी, तर तीही दिसत नाहीये. म्हणजे म्हणायला दुसरी पिढी, परंतु तसा उपयोग शून्य. उत्तराधिकारी वगैरे विचार तर शिवले ही नसावेत.

तिसरा उद्योजक पहिल्या पिढीचा. धडाडीचा. उत्तम माया कमावलेली आहे. स्थावर स्वरूपात आहे. परंतु लिक्वीड asset मध्ये बऱ्यापैकी संघर्ष दिसतोय. शिवाय स्वतः एकटीच व्यक्ती manage करते आहे. नुकतेच त्यांनी अनेक वर्षे सुरू असलेल्या व्यवसायात फार भविष्य दिसत नसल्याने नवे बिझनेस मॉडेल स्वीकारले आहे. ही व्यक्ती चतुर आहे, पैशात. त्यामुळे bisleri प्रमाणे ह्यांनी देखील उत्तम किमतीला बिझनेस विकून टाकला, तरी मग उत्तराधिकारी वगैरे नसेल, तर इथेही समस्या आहेच.

यासंदर्भात माझ्या CA शी मी माझ्या व्यवसायाबद्दल चर्चा केली असता त्यांनी एखादी होतकरू व्यक्ती पाहून त्याला घडवायचे सजेशन दिले. वरकरणी चांगले वाटले हे उत्तर, तरी ....

त्या व्यक्ती ला हा बिझनेस आकर्षक वाटेल का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे वेळेत आवरते घेवून माझा व्यवसाय माझ्यासाठी मरेपर्यंत निदान कर्माचे साधन झाला तरी ठीक म्हणतो मी !