कधी कधी छान सेशन्स attend करायचा योग येतो. असाच आला काल.
१. Chat GPT ह्या बहुचर्चित विषयावर Enjay IT systems चे CEO लीमेश पारेख ह्यांनी खूप छान टिप्स दिल्या. अगदी सर्व सामान्य विषयांसाठी हे टूल न वापरता अधिक चांगल्या पद्धतीने स्वत: च्या व्यवसाय केंद्रित कसे करता येईल ह्याचा हा एक छान डेमो होता. सोबतच लीमेश सर हे इतर मुद्देही सहज प्रवाहीपणे मांडतात. जरूर ऐका. ह्या सेशन ची Youtube Link :- https://youtu.be/tassf58YpoI
२. काल "Digitization for Smart Manufacturing" वर एक कार्यक्रम होता. वक्ते, डॉ. अरविंद टिळक हे ह्या क्षेत्रात अनेक वर्षे अनुभवी होतेच, शिवाय त्यांनी दिलेले काही काही संदर्भ, दाखले आणि काही विचार हे खूप चांगले होते. उदाहरणार्थ त्यांनी मांडलेला एक विचार म्हणजे : Costing मध्ये न घेतला जाणारा विषय : एखादा तास मशीन बंद राहिले तर बुडणारे उत्पन्न आणि ह्याला पूरक म्हणजे : इथे जर Smart Digitization ची काही तंत्रे वापरली तर होऊ शकणारा परिणामकारक बदल... हा अगदी नवा विचार होता माझ्याकरिता. हा सेशन प्रत्यक्ष होता. PMA च्या सभागृहात. श्री टिळक ह्यांच्या websites वर अधिक माहिती मिळूच शकेल :- https://aiplindia.com/
३. नव्या आर्थिक वर्षाचे नियोजन ह्या विषयावर निवडक उद्यमी च्या साप्ताहिक मीटिंग मध्ये श्री राहुल पोरे ह्यांनी एक सेशन घेतले. स्वत: CMA ह्या नात्याने कार्यरत असणारे पोरे सर ह्यांचे सेशन उत्कृष्ट झाले. हे झूम वर होते. ह्या सेशन ची लिंक :- https://youtu.be/qia6H6O25gs
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.