आपण अप्रिय होण्यापासून तरी लांब राहूच शकू, काय ?
Sunday, 30 August 2026
आपण कसे हळूहळू अदृश्यपणे अप्रिय होत जावू शकतो .....
आपण अप्रिय होण्यापासून तरी लांब राहूच शकू, काय ?
Friday, 28 August 2026
अफाट मानसिक शक्तीचे प्रदर्शन ....
हरवत चाललेल्या " Playing for Hours Together & Offering No stroke At All " ह्या वृत्तीचे दर्शन गावस्कर, द्रविड, पुजारा ह्यांच्यानंतर आज घडले. शिवाय मला ती विश्वचषकातील ग्लेन Maxwell ची inning आठवली. त्यात स्वत: उत्तुंग फटके मारू शकत असणाऱ्या Pat Cummins नेही स्वत: च्या नैसर्गिक वृत्ती वर आवर घालून अत्यंत सावध खेळ केला , आणि Australia ला एक अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता.
एक उद्योजक म्हणून, माणूस म्हणून देखील हा अप्रतिक्रिया युक्त स्तब्ध पणा अंगी बाणवणे हे महत्त्वाचे !
Friday, 7 August 2026
कंटाळा : थोडे विचारमंथन
कालच एका व्यक्तीसोबत चर्चा सुरु असताना तिने मला सुचविले
" तुझ्या तोंडात सारखा हा कंटाळा आला हा वाक्प्रचार असतो. तो काढून टाक यार "
इथून ह्या विचार मंथनाची सुरुवात झाली. मग made डॉ आनंद नाडकर्णी ह्यांचे कधीतरी वाचलेले आठवले कि कुठे असतो हा कंटाळा , दाखवा कि जरा ! पण असतो यार. मनासारखेच आहे, हवे सारखेच आहे. दिसत नाही,पण त्याची प्रारूपे मात्र दिसतात.
तर काहीतरी आवश्यक असलेले करावेसे वाटत नाही हे त्याचे प्रमुख व्यक्त रूप.
आता हे का करावेसे वाटत नाही, हे पाहायला लागलो. उत्तर : उर्जा कमी पडली. का ? तर ती कमी झाली असेल. कदाचित वयोमानाने. पण तरुण मुलांनाही येतोच कि कंटाळा ( हास्य जत्रेत ओंकार चा कंटाळा नामक एपिसोड पहा कधी ). पण ह्याला बऱ्याच अर्थी वाईट च लेखले गेलेले आहे हे मात्र त्रिवार सत्य.
मला तर माझे Offering नीटपणे अधिक सखोल करायला हा कंटाळा खुप मार्गदर्शक ठरतोय. आणि आता मी त्याला सरावलोय. हे जे काही Passion वगैरे म्हणतात ना, त्याची तपासणी करताना ज्याचा कंटाळा येतो ना, त्या गोष्टी आवर्जून बाजूला करा. उरेल, फक्त आवड. आणि आवडीचं काम करताना सुद्धा कंटाळा येवू शकतोच कि. आपण Burn Out होतो, पैसे अनेक काळ मना जोगते मिळत नाहीत वगैरे. इथेच कधी घोळ होऊ शकतो.
कारण जे लावून धरलेलं असतं त्यातून कधी उगवेल, ठावूक नाही आणि पोट तर भरत नाहीये. अशावेळी Guilt येवू शकतो आणि हेच ते Distraction. कालच एका उद्योजिकेशी मला Part Time Job हवाय ह्या विषयावर बोलताना तिची अडचण, घालमेल मला समजली. हे असं सारखं पैसे मागत जगायचा कंटाळा आलाय तिला. म्हणजे थोडक्यात अनेक काळ मना जोगते मिळत नाहीत ह्याचाच ! Job पाहणं हे नक्की distraction. पण तिच्याच क्षेत्रात पाहणं हा उपाय. अजून खोल जावून आपलं निश्चित काम निवडून, ठरवून आयुष्यभर आपल्या जगण्यासोबत कसं Relate करता येईल, हे पाहण्यासाठी हे Distractors येत असतात. Stoic Philosophy मध्ये एक सिद्धांत च आहे :
अडथळे हाच मार्ग
झाला कंटाळा Channelize.
Guilt नको.
Sunday, 10 August 2025
जागतिक अर्थकारण आणि माझा व्यवसाय : बरेच शिकण्यासारखे
सध्या जगाच्या आर्थिक पटलावर जरा जास्तच हलचल दिसतीये. त्यानिमित्ताने एक व्यावसायिक ( खरे तर एक गुंतवणुकदार ) ह्या नात्याने जाणवणाऱ्या काही गोष्टी :-
गुंतवणुकदार ह्या नात्याने संधी !
कदाचित रोखे बाजार बरेच खाली जातील. प्रत्येक खाली जाणाऱ्या पायरीवर काही शेअर्स थोड्या ( अगदी अत्यल्प ) प्रमाणात घेत राहण्याची संधी. ही गुंतवणूक हमखास वाढते, १५ -२० वर्षांत अनेक पट वाढू शकते. शेअर बाजार कायम वर जाण्यासाठीच जन्माला आलेला आहे. आणि आपण जरी नाही राहिलो, तरी पुढच्या पिढी करिता उत्तम गुंतवणूक आहे ही. नुसतं "मी उद्योजक" बिरूद मिरविण्यात काहीच मतलब नाही.
बातम्यांना बळी पडायचे नाही
अमेरिकन लोकांना त्यांच्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या शेकडो वस्तूंच्या किमती त्यांच्या आयात शुल्क धोरणामुळे वाढून बसतील. चैन सोडा हे म्हणणे जितके सोपे तितकेच अंमलात आणणे मुश्कील. त्यामुळे हे बाजार अमेरिका भीतीग्रस्त होतील, शेअर खरेदीची पुन्हा संधी देतील, आणि २०२६ च्या आसपास पुन्हा ठिकाणावर येतील. त्यामुळे कोणत्याही भीतींना बळी नाही पडायचे.
ग्राहक , ग्राहकवर्ग विखुरायचे
भारताने चांगलाच धडा घेतला असणार : एकूण पैकी फक्त अमेरिकेला होणारी निर्यात ६२ % टक्के आहे. ही विखुरायला हवी. हेच धोरण आपण आपल्या Segments अर्थात ग्राहक वर्गांबद्दल लागू करायला हवे. एकाच ग्राहकावर अवलंबून आपले उत्पन्न नको, एकाच Segment ग्राहक वर्गावर वर सुद्धा नको.
मैत्री फक्त फायद्याशी !
मुत्सद्देगिरी : एक आवश्यक कौशल्य
Thursday, 7 August 2025
उद्योग = अनिश्चितता
करार मदार : सावधपणे घेऊयात !
Wednesday, 6 August 2025
ह्या अचानकतेला तयार रहायलाच हवे !
Sunday, 3 August 2025
तुम्हाला हे चालेल का ?
Wednesday, 16 July 2025
तक्रार :- प्रगतीची उत्तम संधी
Monday, 26 May 2025
ही निष्ठुरता नव्हे, तर "विवेक" आहे
अनेक वर्षे मी स्वत: Pocket नामक एक सुंदर, अत्यंत उपयुक्त असे संकेतस्थळ तसेच App वापरत आहे.
👉मला वाटणारे, आवडणारे, उपयुक्त लेखांक ह्यावर नुसते लिंक ह्या स्वरुपात सेव्ह करून ठेवायचे. ते मी नंतर वाचतो, ते सुद्धा जाहिराती बाजूला करून, शिवाय हव्या त्या अक्षराच्या मापात ( मोठ्या - छोट्या ). अजून म्हणजे दोन्हीकडे : मोबाईल व web वर, लिखित मजकूर "श्राव्य" करून ऐकण्याची सोय वगैरे अत्यंत उपयुक्त. त्यात पुन्हा अधोरेखित करून ठेवायची सोय, वगैरे.
😢 दुर्दैवाने ही website बंद होत आहे. वाईट वाटले.
☝ ही झाली "वापरकर्ता" ह्या नात्याने एक बाजू. पण काय कारण असेल ? हे जरा खणले असता एक साधारण कारण जाणवले ते असे : की ... Firefox ( संकेतस्थळाचे प्रवर्तक ) ह्यांना त्यावर उर्जा आणि वेळ देणे परवडत नाहीये.
बास. इतकेच पुरेसे आहे, असते.
"तुमचा तो Zero Budget Digital Marketing Course किती भारी होता हो, का घेत नाही तुम्ही ?" अशी मला अनेक ट्रेनिंग कोर्सेस बाबत कायम विचारणा होतंच असते. पण दिलेली उर्जा आणि मिळणारा परतावा हा माझ्या आयुष्याला संलग्न नसेल तर मी त्या गोष्टी चक्क थांबवतो.
माझा मशिनरी उद्योग किंवा ट्रेनिंग ह्या गोष्टी मी अशाच बंद केलेल्या आहेत. दुसऱ्याने करावे का ह्याबद्दलचे हे अनुमान नव्हे. पण "करता येतं" किंवा असं करणारे काही असतात असं पाहिल्यावर हुशः वाटतं.
हेच तर कारण आहे, आपण आपले अर्थपत्रक प्रत्येक तिमाही ( आणि मासिक-साप्ताहिक सुद्धा 👌 ) पाहून आपल्या कृतींत यथोचित बदल करण्याला. काही निर्णय परखडपणे घेता येतात. फायदा ? उर्जा वाचते.
हा "विवेक" च आहे.
Saturday, 24 May 2025
परखड परीक्षणाची फलश्रुती
- छापून येणाऱ्या बातम्यांतील आणि प्रत्यक्ष असणाऱ्या आर्थिक आकड्यातील तफावत
- शेवटच्या तिमाहीत कंपन्या आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी करत असलेली धावाधाव.
एका वस्त्र उद्योजकाची कहाणी :-
नियमित, परखड परीक्षणाचा फायदा
- पादत्राणे दालन बंद केले
- "प्रत्येक मागणी आपल्याला पुरवता यायलाच हवी" हा दुराग्रह काढून टाकला. ह्या मुळे XXL प्रकारचे फक्त २०-२५ शर्टस विकले जात, परंतु साठा मात्र त्याच्या १० पट करावा लागे. हा पडून राहणारा Asset ताळेबंदात सतत दिसायचा, त्यामुळे मालमत्ता कमी होत होती.
- हाच अर्थ प्रवाह मागणी सतत असणाऱ्या वस्त्रांकडे वळवला.
- आणि हीच कृती पुढे दोन तिमाही कायम ठेवली.
परिणाम स्वरूप :-
- नफ्यात भरभक्कम वाढ, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ तसेच बोनस देता आला.
- वेळ बराच शिक्कल राहिला, ह्यातून नवीन अजून एक दुकान काढले, असेच, पण वेगळ्या भागात ( ह्याबद्दल आम्ही पूर्वी चर्चा केलेली होती ).
- नवीन सामान विक्रीस नाही ठेवलेले, आहे त्यातील उप प्रवर्गातील वस्त्रे ठेवली, गरजेप्रमाणे साठा कमी जास्त केला.
- मुद्दा १ आणि २ मुळे आधीचाच एक कर्मचारी आता मूळ दुकान पूर्णपणे चालवितो, तर हा स्वत: आता नव्या दुकानी बसतो, ते चालवितो. ( नया धंदा , पुराना आदमी )
- हेही दुकान आता जेमतेम ६ महिन्यांतच Cash Flow + ve झालेले आहे.
Friday, 9 May 2025
खरे उपयुक्त संपर्क मिळविण्याची एक क्लुप्ती
सर्व प्रकारच्या व्यावसायिक मंडळींना मी "leads" तसेच नेट्वर्किंग मध्ये "Referrals" करता काम करताना पाहत असतो. जणू काही एखादा बिझनेस आणि त्याची परिणामकारकता म्हणजे सतत नवीन, आणखी नवीन स्त्रोतांकडून सतत अविरत leads येत राहणे. हे जरी महत्त्वाचे असले, तरी इतर बाबीही तितक्याच किंबहुना अधिक महत्त्वाच्या ठरतात. उदा :-
- नवनव्या तंत्रांचा मागोवा घेत राहणे
- आपल्या व्यवसायात ती अंमलात आणणे
- अधिक प्रभावी व्यक्तींना भेटणे ( फक्त "विक्री" वाढवणे ह्यासाठी नव्हे )
Sunday, 15 December 2024
समांतर गुंतवणूक हवीच
आपली गुंतवणूक विभागून करा :-
असे उद्योग कुठे शोधायचे ?
किती गुंतवायला हवेत ?
- आपला व्यवसाय ही सुद्धा आपली एक गुंतवणूक च आहे हा एक त्रयस्थ दृष्टीकोन विकसित व्हायला हवा.
- त्याने आपल्याला "पैसे" द्यायलाच हवेत. नसेल देत, तर ती कमी करा, विखरा.
- म्हणजे व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम व्हायचा नाही.
ह्याबद्दल काही साहित्य जरूर सुचवू शकेन :-
हे सोडून आमचे निवडक मधील काही podcasts तुम्हाला नक्की उपयुक्त ठरूच शकतील :-
Saturday, 20 July 2024
Wiring बदलण्याचा राजमार्ग !
शिव राज्याभिषेकाच्या तस्वीरीत काही गुजराथी व्यापारी दिसतात. गुजरातेतल्या लोकांशी अगदी युरोपातील अनेक व्यापाऱ्यांशी कित्येक वर्षे व्यापारी संबंध होते. सुरत हे अत्यंत मोठी व्यापारी पेठ होती-आहे.
हे आवर्जून सांगायचं कारण म्हणजे भिडे सर , म्हणजे Saturday Club चे संस्थापक, ह्यांनी हे वेळीच ओळखलं आणि गुजराथी मंडळींची ही व्यावसायिक वृत्ती मराठी माणसांत उतरवायची असा चंग बांधला, आणि ही वृत्ती निर्माण होण्यासाठी मराठी माणसाचं "वायरिंग" बदलायचा एक Crash उपक्रम तयार केला, तो म्हणजे Saturday Club !
वर्षानुवर्षे नोकरी पेशात मुरलेल्या मराठी माणसांत हा व्यवसाय हळूहळू परंतु निश्चित स्वरुपात भिनायला लागतो तो काही विशेष गोष्टी त्याच्या नकळत त्याच्या सुप्त मनात कोरल्या गेल्याने !
हा बदल ( किंवा कोणताही ) घडायला प्रमुख लागतो, तो "विश्वास" आणि शिवाय अजून दोन गोष्टी : त्या म्हणजे तंत्र-कौशल्य आणि सराव. Saturday Club च्या सतत एका ठराविक दिनक्रमाने होत राहणाऱ्या व्यावसायिक मिटींग्स मुळे ; तसेच त्यात share केल्या जाणाऱ्या सभासदांच्या यशोगाथांमुळे हे साध्य होते, होत राहते.
हळू हळू हे वायरिंग बदलत जाते आणि घडतो एक पक्का व्यावसायिक !
आज Saturday Club हा एक समाज आहे , ज्यातून अनेक चळवळी निर्माण होत आहेत, एक "श्रीमंत" मराठी माणूस निर्माण करण्याकरिता.
एकदा वायरिंग बदललं कि नवीन पिढी देखील व्यवासायाकडेच आकृष्ट होते आणि एक नवा समाज घडू लागतो !
अशा एका द्रष्ट्या युगपुरुषाला आज गुरुपौर्णिमेच्या खास वंदन !
Sunday, 5 November 2023
निर्णय घेताय ? जरा गौर .....
एकंदरीतच Quick Decision Making ह्या कौशल्याबद्दल खूप आदराने बोलले जाते, शिवाय हे एक खूपच महत्त्वाचे कौशल्य आहे ह्यात वादच नाही. परंतु ह्यात बरेच मुद्दे पुसट राहून जातात.
- Quick हे हळूहळू विकसित होणारे कौशल्य आहे.
- फक्त अंत: प्रवृत्ती तून ह्यात कधी तरी यश मिळू शकेल, परंतु हे जर नीट सरावाने अंगी बाणवले तर यश मिळण्याची शक्यता कित्येक पटीने वाढूच शकेल.
- Quick हे Fast आहे, तरीही सर्व बाजूंचा नीट विचार करून अमलात आणावे. फक्त Fast नको.
- ह्यात उपलब्ध माहितीचा एकंदरीत दर्जा झटक्यात समजून येण्याची क्षमता ह्याला अधिक महत्त्व आहे.
- ह्यात परिणामांचा विचार हा व्हायलाच हवा. ह्यात Second Order Thinking हे कौशल्यही येतेच.
- ज्या स्त्रोतातून माहिती येत आहे त्याला अतिरिक्त महत्त्व न देणे
- कोणत्याही परिस्थितीत माहोल ला बळी न पडणे
- कोणतीही Ideology न मान्य करणे ( स्वत: ची सोडून )
- प्रतिक्रिया वादी पणा कमी करणे
- मी अजून माहिती काढेन हे ठरवणे
- परिणामांचा सांगोपांग विचार करूनच निर्णय घेईन
- जगावेगळे निर्णय घेवून शूर पण दाखवावा, परंतु त्याचे व्यावहारिक पडसाद आधी पाहावेत.
Friday, 27 October 2023
नि:स्पृह (व्यावसायिक) छाया गोलतगावकर .....
6 ऑक्टोबर 2023 रोजी 'निवडक उद्यमी' च्या साप्ताहिक मीटिंग मध्ये 'थकलेले पैसे वसूल करण्याची प्रक्रिया' ह्या विषयावर सौ.छाया गोलटगावकरांची मुलाखत झाली.
'ह्युमन रिसोर्स ऑफिसर', डॉक्टर, वकील यांसारख्या व्यक्ती ह्या मुळातच सहानुभूतीपूर्वक असाव्यात असा ह्या पेशांचा घटनादत्त अपेक्षित स्थायीभाव पण जमिनीवरील परिस्थिती नेमकी कशी उलटच असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. छायाताई मात्र ह्याला सन्माननीय अपवाद ठरल्या.
दैनंदिन जीवनात रेंगाळलेली कामं, त्यात झालेली आर्थिक आणि भावनिक गुंतवणूक, वेळेचा अपव्यय आणि त्यामुळे येणारं नैराश्य ह्या सगळ्यामुळे आपल्याकडे येणारा व्यक्ती कावलेला असतो ह्याचं भान त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. मुलाखतीच्या सुरुवातीलाच वकिली हा एक उदात्त व्यवसाय आहे आणि आपण त्याच्या प्रतिनिधी आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं.
पैसे थकवणं, किंवा सामाजिक स्तरात आपल्यापेक्षा वरचंढ असलेल्यांकडून होणारी दंडेली आणि मानहानीकारक वागणूकी विरुद्ध उभं राहणं हे सामान्यांचं कर्तव्यच आहे हेही त्यांनी बजावून सांगितलं.
स्वतःच्या ओळखीबद्दल लिहिलेल्या माहिती आणि प्रस्तावनेत त्यांनी सुचवलेले बदल त्यांच्या दक्षतेची आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीची साक्ष देतात.
मुलाखतीच्या विषयावरील त्यांचं प्रभुत्व, तांत्रिक माहिती, काही क्लुप्त्या आणि एकंदरच संयतपणे विषय मांडण्याची पद्धत वादातीत होती (त्याबद्दल अधिक लिहीत नाही - प्रत्यक्ष मुलाखतच लोकांनी ऐकावी हि अपेक्षा).
लिंक :- https://youtu.be/A0Q6U_MM_io?si=yC8Y5omrr-GWDCiW
एक कबुली मात्र जरूर देऊ इच्छितो -
मुलाखत कश्या पद्धतीने उलगडावी ह्याबद्दल झालेल्या चर्चेचे मुद्दे आणि प्रश्न लिखित स्वरूपात देण्यास माझ्याकडुन झालेल्या दिरंगाईबद्दल छायाताईंनी रास्त पण सौम्य आक्षेप माझ्याकडे नोंदवला आणि त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला.
त्याबद्दल क्षमस्व.
प्रत्येक छोट्या मोठ्या व्यावसायिकाला कमी अधिक प्रमाणात भेडसावणाऱ्या एका ज्वलंत विषयावर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलंत आणि वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात त्याबद्दल 'निवडक उद्यमी' तर्फे आभार आणि तुमच्या कारकिर्दीस अनंत शुभेच्छा.
------------
निशांत आवळे
Friday, 20 October 2023
कारकुंड्या मनोवृत्तीची फळे
नेट्वर्किंग क्लब मध्ये चित्र विचित्र अनुभव येतात. खास करून रेफरल नामक प्रकार दिल्यावर.
नुकतेच मी एकाला एक दोन-तीन रेफरल दिले, त्याबद्दल पहा त्यांची उत्तरे :-
Monday, 2 October 2023
आपल्या स्वप्नात खरोखर तेवढा दम आहे का ?
आज एके ठिकाणी एका चर्चेत काही मुली, ज्यांना काहीतरी वेगळं म्हणजे संगीतात करियर करायचं आहे, त्यांना त्यांच्या घरातून होणाऱ्या टोकाच्या विरोधाबद्दल बोलत होत्या. अर्थात पालक मंडळींबद्दल आक्षेप होता. काही मुलींचे पालक तर अगदी कडक सरळ नोकऱ्या धरा आणि झटपट पैसे कमवा अशा मताचे होते आणि मुलीना तसं धडधडीत बोलून देखील दाखवीत होते.
एकीच्या घरात पालकांचा एकमेकात संपूर्ण बेबनाव होता आणि त्याचे पडसाद त्यांच्या मुलीच्या सोबत असलेल्या नात्यावर ठळक उमटले होते.
साहजिकच सारखा असा सूर निघत होता, की पालकांनी असं वागायला नकोय.
खरेही आहे, नकोच ना असे वागायला. पण तरीही ... तिच्या स्वप्नात नक्कीच बळ ( दम ) कमी असावा. असता तर एक तर ती खणखणीत आई-बापांना समजावेल, किंवा कौशल्याने पटवेल तरी, किंवा असेच काही करून तिच्या स्वप्नाच्या मार्गावर घट्ट राहील. कदाचित असेल सुद्धा.
मुद्दा असा आहे, की आई वडील काही शत्रू नसतात तर त्याना खरोखर वाटत असते कि आपल्या मुलीचं भलं व्हावं. त्यांना ठावूक नसतं कि आपल्या मुलीने योग्य मार्ग धरलेला आहे. आणि इथेच मेख आहे.
तिला तिच्या स्वप्नावर पूर्ण विश्वास असेल, आणि प्रेम असेल, ध्यास असेल, तर ती आपल्या आई वडिलांना पटवून देईल नाहीतर चक्क फाटा देईल, किंवा manage करेल चक्क !
आणि असं होत नसेल, तर मात्र स्वप्नात दम नाही... म्हणजे ही फक्त एक इच्छा , इतकेच.
Wednesday, 30 August 2023
भपक्या पेक्षा स्वत्व महत्त्वाचे !
Monday, 31 July 2023
एकच ट्रेनिंग, पुन्हा पुन्हा का बरे करतात मंडळी ?
Saturday, 3 December 2022
Bisleri : भारतात येण्यापूर्वी .....
१९६९ साली रमेश चौहान ह्यांच्या हातात आलेली ही बिसलेरी कंपनी मूळची इटालियन. १८८१ पासून अस्तित्त्वात होती. बिसलेरी हे आडनाव आहे. ह्याच्या संस्थापकाचे. फेलिस बिसलेरी. ह्याबद्दल मी माझ्या water blog वर सविस्तर लिहिलंय.
मुद्दा असा आहे कि, ह्या फेलिस बिसलेरी ने एक मिनरल water सुरु केलं, ते त्याच्या नातवाने सुमारे ८० वर्षांने भारतात एकाला ब्रांड म्हणून विकलं. आता म्हणतात कि फक्त ४ लाखात कंपनी घेतली आणि ७००० कोटींना tata ग्रुप ला विकली असे.
ब्रांड तयार करणे ही एक मानसिकता आहे. इतका उत्तम परतावा कुठलीच गुंतवणूक देणार नाही !




.jpeg)

.jpeg)


.jpeg)