अनेक वर्षे मी स्वत: Pocket नामक एक सुंदर, अत्यंत उपयुक्त असे संकेतस्थळ तसेच App वापरत आहे.
👉मला वाटणारे, आवडणारे, उपयुक्त लेखांक ह्यावर नुसते लिंक ह्या स्वरुपात सेव्ह करून ठेवायचे. ते मी नंतर वाचतो, ते सुद्धा जाहिराती बाजूला करून, शिवाय हव्या त्या अक्षराच्या मापात ( मोठ्या - छोट्या ). अजून म्हणजे दोन्हीकडे : मोबाईल व web वर, लिखित मजकूर "श्राव्य" करून ऐकण्याची सोय वगैरे अत्यंत उपयुक्त. त्यात पुन्हा अधोरेखित करून ठेवायची सोय, वगैरे.
😢 दुर्दैवाने ही website बंद होत आहे. वाईट वाटले.
☝ ही झाली "वापरकर्ता" ह्या नात्याने एक बाजू. पण काय कारण असेल ? हे जरा खणले असता एक साधारण कारण जाणवले ते असे : की ... Firefox ( संकेतस्थळाचे प्रवर्तक ) ह्यांना त्यावर उर्जा आणि वेळ देणे परवडत नाहीये.
बास. इतकेच पुरेसे आहे, असते.
"तुमचा तो Zero Budget Digital Marketing Course किती भारी होता हो, का घेत नाही तुम्ही ?" अशी मला अनेक ट्रेनिंग कोर्सेस बाबत कायम विचारणा होतंच असते. पण दिलेली उर्जा आणि मिळणारा परतावा हा माझ्या आयुष्याला संलग्न नसेल तर मी त्या गोष्टी चक्क थांबवतो.
माझा मशिनरी उद्योग किंवा ट्रेनिंग ह्या गोष्टी मी अशाच बंद केलेल्या आहेत. दुसऱ्याने करावे का ह्याबद्दलचे हे अनुमान नव्हे. पण "करता येतं" किंवा असं करणारे काही असतात असं पाहिल्यावर हुशः वाटतं.
हेच तर कारण आहे, आपण आपले अर्थपत्रक प्रत्येक तिमाही ( आणि मासिक-साप्ताहिक सुद्धा 👌 ) पाहून आपल्या कृतींत यथोचित बदल करण्याला. काही निर्णय परखडपणे घेता येतात. फायदा ? उर्जा वाचते.
हा "विवेक" च आहे.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.