सर्व प्रकारच्या व्यावसायिक मंडळींना मी "leads" तसेच नेट्वर्किंग मध्ये "Referrals" करता काम करताना पाहत असतो. जणू काही एखादा बिझनेस आणि त्याची परिणामकारकता म्हणजे सतत नवीन, आणखी नवीन स्त्रोतांकडून सतत अविरत leads येत राहणे. हे जरी महत्त्वाचे असले, तरी इतर बाबीही तितक्याच किंबहुना अधिक महत्त्वाच्या ठरतात. उदा :-
- नवनव्या तंत्रांचा मागोवा घेत राहणे
- आपल्या व्यवसायात ती अंमलात आणणे
- अधिक प्रभावी व्यक्तींना भेटणे ( फक्त "विक्री" वाढवणे ह्यासाठी नव्हे )
हे करताना काही नवनवे कोर्सेस करीत रहाणे, विविध कार्यशाळा अटेंड करणे तसेच अनेक प्रदर्शने व त्या अनुषंगे घडणारे परिसंवाद तसेच नेट्वर्किंग च्या संधी आवर्जून घ्यायला हव्यात. बऱ्याच वेळा ही सत्रे विनामुल्य असतात. काही ठिकाणी सशुल्क देखील असतात.
माझ्या मते आपल्या थेट क्षेत्रातील निदान एक - दोन तरी अशी प्रदर्शने आपण वार्षिक पातळीवर अटेंड करावीतच !
ह्यात सर्व काही घडू शकते, आणि आपण पूर्वी कधीही न विचार केलेल्या संधी देखील आपले दार ठोठावू शकतात.
ह्या करता आपल्या मनात येणाऱ्या , मागे खेचणाऱ्या विचारांचे संपूर्णपणे निर्दालन करून रस्ता करावा लागतो. अनेक वेळा माझे असेही झालेले आहे, कि ३- ४ दिवस राखीव ठेवले आणि तितके काहीच हाताला नाही लागले, वगैरे. होते असे कधी. पण म्हणून हा संपूर्ण विचार चुकीचा ठरवणे हे मात्र चूक ठरेल.
तर आपल्या पुढच्या "प्रदर्शन" किंवा "परिषद" कार्यक्रमास शुभेच्छा !
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.