"निवडक उद्यमी" बद्दल

काय आहे नक्की "निवडक उद्यमी" ?

हा एक निवडक उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे. उद्दिष्ट : व्यवसाय करणे उत्तरोत्तर सुलभ होत जावे, उद्योजक मंडळीना एक व्यावसायिक ज्ञानाचा अखंड स्त्रोत उपलब्ध व्हावा.

कार्यपद्धती व सभासदत्व :

११ डिसेंबर २०२४ रोजी निवडक उद्यमी ग्रुप ला ५ वर्षे पूर्ण झाली. नुकतीच आमची एक बैठक झाली, ज्यात निवडक उद्यमी ची नवी दिशा ठरविण्यात आली, ती अशी :-

१. साधारणपणे नियमित अंतराने एक Podcast ऐकायला मिळेल. विषय विविध असले, तरीही मराठी उद्योजकतेशी संबंधितच असतात.  त्यामुळे निवडक च्या यूट्यूब playlist ला subscribed करून घ्यावे ✔️ 

२. दर ३ महिन्यांनी सदस्य मंडळी प्रत्यक्ष भेटतील, अनौपचारिक पणे. तरीही सर्व उद्योजक असल्याने ह्यात एकमेकांशी मोकळ्या चर्चा तसेच नव्याने ओळखी वगैरे नक्कीच होईल. परस्परांच्या व्यवसायांचे, व्यावसायिक परिणाम करू शकणाऱ्या कृतींचे परखड परीक्षण व आवश्यक बदल सुचविणे हा हेतू.

३. नवीन सदस्य जे जोडले जावू इच्छित आहेत, त्यांना प्रथम त्रैमासिक भेटीपूर्वी निदान २ महिने तरी whatsapp ग्रुप वर विनामूल्य जोडून घेतले जाईल. त्यांनी त्रैमासिक भेटीसाठी यावे, ह्याच्या पश्चात त्यांच्या सभासदत्त्वा बाबत निर्णय होईल. 

४. आमचा एक निशुल्क फेसबुक ग्रुप देखील आहे. ज्यावर उत्पादने, सेवा ह्यांची जाहिरात करता येते.

सभासद्त्त्वा चे फायदे चा उपयोग :-


उद्योजक म्हणून इतरत्र सुरु असलेल्या सवंग नेटवर्क पेक्षा वेगळा अनुभव, विचार ह्यांचे साहचर्य. एक वेचक, मोजक्या उद्यमी मंडळींचा whatsapp ग्रुप ज्यावर गर्दी , गोंगाट नाही, तर फक्त विशिष्ट विषयांवर चिंतन - चर्चा.

व्यावसायिक संधी  

निवडक उद्यमी च्या सदस्य मंडळीना एखाद्या कामा बद्दल संदर्भ वगैरे द्यायचा झाल्यास, त्या त्या व्यक्तीशी औपचारिक भेट घ्यावी लागतेच असे नाही; किंवा प्रेझेन्टेशन वगैरे द्यावे/घ्यावे लागत नाही. मुळात अनेक वर्षे एकमेकांच्या सहवासात राहून नावलौकिक सिद्ध झालेला असल्यामुळे कार्यपद्धतीची अंमलबजावणी सहज होते, उद्योजकाला कसलेही अवघडलेपण जाणवत नाही व कामे तातडीने पूर्णत्वास जातात.

व्यावसायिक म्हणून घडून येणारा बदल  

निवडक उद्यमी हा प्राथमिकत: "व्यावसायिक संदर्भ मिळणे" ह्यासाठी निर्माण केला गेलेला नाही. व्यवसाय खऱ्या अर्थाने वृधिंगत होत राहणे, त्याचे नियमित कालावधीत मोजमाप करता येणे तसेच एक व्यक्ती म्हणून व्यवसाय हे आपल्या आयुष्यासाठी अत्यंत सुदृढ असे साधन व्हावे, ह्या व्यापक उद्दिष्टाने निवडक उद्यमी प्रेरित आहे.

निवडक उद्यमी चे काही विद्यमान उपक्रम - 


निवडक ची अत्यंत मोजक्या विषयांवर पॉडकास्ट होत असतात, त्यांची तसेच ग्रुप च्या विशेष कार्यक्रमांची एकत्रित माहिती तुमच्या whatsapp वर थेट मिळेल. तसेच व्यवसायाशी संबंधित विषयांवर निवडक उद्यमींच्या सभासदांची मतमतांतरे मांडण्यासाठी, तुमचे विचार व्यक्त करण्यासाठी हा एक विशेष whatsapp ग्रुप आहे. इथे सतत आपल्या व्यवसायाचे प्रमोशन अपेक्षित नाही.

इच्छुकांनी - contact@joywebservices.com ह्या क्रमांकावर संपर्क साधावा 

सौमित्र घोटीकर 
निशांत आवळे

1 comment:

  1. ह्या ग्रुपचा सभासद व्हायला आवडेल. धन्यवाद. शैलेश जोग 9820536607. Email : provin

    ReplyDelete

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.