Tuesday 23 March 2021

रीव्युज किंवा testimonials चा खरंच उपयोग होतो का ?

निश्चितपणे होतो. 

online किंवा डिजिटली तुम्ही मार्केटिंग करत असाल, तर हा सर्वात जवळचा मार्ग आहे ग्राहक मिळविण्याचा. कारण, डिजिटली जेव्हा आपण जातो, तेच मुळी unknown म्हणजे आपल्याला माहित नसलेल्या संभाव्य ग्राहक वर्गापर्यंत. Vice Versa, तोही आपल्याला ओळखत नाहीये. इतपत काम online जाहिराती वगैरे करतात. तरी, पुढचं प्रत्यक्ष stage-2 चं, म्हणजेच त्याचं ग्राहकात रूपांतरण करण्याचं काम हे reviews करतात.

सतत करत राहणे महत्त्वाचे आहे !

एक-दोन दा हे करून उपयोग नाही, तर हे सतत करत राहणे महत्त्वाचे आहे. जागरूकतेने.

अवघड, कष्टप्रद अजिबात नाही हे 

  • फक्त प्रासंगिक जागरूकता हवी ह्याविषयी म्हणजे त्या त्या वेळी मनाला alert करणे , आणि हि एक प्रोसेस म्हणून स्वीकारणे.
  • ह्यावर विश्वास ठेवणे. कि  It works !
  • Comfort Zone मधून बाहेर येणे. "जाऊ-दे , परत कधीतरी" अस करू नका. आज मिळणारे reviews परत , पुन्हा मिळत नाहीत.
  • ह्याचा Conversion साठी सर्वात जास्त उपयोग होतो. बाकी सब एक तरफ, जोरू का भाई एक तरफ, अशी म्हण आहे, अगदी असंच आहे हे !
मग, कधी पहायला मिळेल तुमचा पहिला वहिला review ?

Monday 22 March 2021

Amazing Customer Service चे एक उदाहरण !

 माझी पहिलीच निर्यात order होती ती आणि साल होत १९९४. Internet वगैरे अगदीच प्राथमिक अवस्थेत होतं तेव्हा. माझ्याकडे पैसे नसायचे, तरीही जनकल्याण जी माझी बँक होती, त्यांनी माझी LC negotiate केली. मी सप्लायर ना advance देवू शकत नसे; मात्र मशीन्स तयार झाल्यावर लगेच पेमेंट अशी सोय मी बँक मार्फत करून घेतली होती.

त्यामुळे करायला असं लागायचं, कि मशीन तयार झालं , कि excise deptt चा एक शिक्का लागायचा , आणि २४ तासात मशीन dispatch करायला लागायचं. नेहमी मी असं झालं कि बँकेत जाऊन चेक घ्यायचो, सगळ सुरळीत व्हायचं. एकदा मात्र गाडी अगदी काट्यावर आली. जेमतेम ४ तास उरले आणि बँकेत चेक तयार नव्हता. तेव्हा कळल मला , कि आमची बँक सांगली बँक मार्फत हा उद्योग करत असे. प्रेशर. तो चेक collect करायचा, सांगली बँकेत जायला हवं ५.३० वाजलेले. अधिकारी निघून जायची भीती.

मी बँकेत फोन केला. वैद्य म्हणून अधिकारी होते. 

"चेक तयार नाहीये" उत्तर. मी म्हटलं "झालं, बोऱ्या वाजला".

"अहो तयार करतो ना, कुठे देवू सांगा". माझा कानावर विश्वास बसेना. 

वैद्यांनी अक्षरश: चेक मला मुलुंड स्टेशन ला ३ नंबर फलाटावर ७ वाजता दिला, जो मी धावत पळत घेऊन साकीनाक्याला गेलो, आणि मशीन dispatch केल वेळेत !

एवढ काय त्यात अस वाटेल; पण बँक अधिकारी, तोही डोंबिवलीला राहणारा, माझ्यासठी fast लोकल सोडतो मुलुंडला आणि मला चेक देतो !

एखाद्या चाकरमान्याला विचारा काय असत हे सगळं !

#टीप : हे वैद्य साहेब पूर्ण निर्यात विभागाचे प्रमुख होते !

श्री बीमन गांधी ह्यांचा उद्योजकीय प्रवास

गेल्या आठवड्यात आपण business planning ह्या विषयाला धरून केस स्टडी मांडण्यासाठी बीमन गांधी सर ह्यांना पाचारण केलं होतं. अर्थात सुरेखच मांडले सरांनी. सर हे स्वत: business coach आहेत. प्रथेप्रमाणे पाठोपाठ सरांची मुलाखत झाली, ज्यात त्यांचा उद्योजकीय प्रवास त्यांनी मांडला.

त्यांची संपूर्ण मुलाखत आपण इथे क्लिक करून ऐकू शकता, किंवा निशांत आवळे  ह्यांनी त्यातले महत्त्वाचे मुद्दे खाली मांडले आहेत तेही पाहू शकता :-

1.गुजरातमधील राजकोट येथे जन्म पण पुढे 'पुण्या' लाच आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवडणारे

2.शिक्षणाने (Instrumentation and Control) ह्या क्षेत्रातील अभियंते पण पेशाने बिझिनेस कोच, मेंटर, सल्लागार ह्या सगळ्या भूमिकांत लीलया वावरणारे तरीही आपली 'सेवा' ही अमुक एका क्षेत्राशी बांधिल नाही (Domain Independent service)ह्याची आवश्यक ती जाणीव करून देणारे

3.देशातील 65 लाख व्यवसाय-उद्योग हे सूक्ष्म, लघू व मध्यम ह्या प्रकारात मोडतात व ज्याकरता केंद्रीय मंत्रिमंडळात समर्पित असं खातं असून सुद्धा एक टक्क्यांपेक्षा कमी उद्योग पुढील पातळी गाठतात आणि ह्या (MSME) क्षेत्रात देशाला प्रगतीपथावर नेण्याची क्षमता आहे हे ओळखून आपल्या बिझिनेस कोचिंगने अशा उद्योगांना पुढील पातळीवर नेण्याचं उद्दिष्ट ठेवून गांधी सर गेली 6 वर्ष काम करतायत

4.1993 साली अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर 2015 सालापर्यंत मोठमोठया देशी व परदेशी कंपनीत वेगवेगळ्या पदांवर काम करताना व जगातले जवळपास 40 देश पालथे घालतांना मिळालेला अनुभव आज ते लघु उद्योजकांबरोबर शेअर करतायत

5.वैयक्तिक कोचिंग आणि छोट्या छोटया समूहांसाठी 'बिझिनेस क्रिटिकल स्किल वर्कशॉप' द्वारे ते मार्गदर्शन करतात

6.स्वतःच्या 'सेवे'चे मार्केटिंग करतांना समाजमाध्यमांवर सतत व दर्जेदार कॉन्टेन्ट तयार करून पोस्ट करणे व 'नेटवर्किंग' ला ते प्राधान्य देतात

7.एक वेळचं काम किंवा पोस्टिंग करून दृश्यमानता (Visibility) साध्य होत नाही, तसेच निव्वळ व्यावसायिक परतावा मिळण्यासाठी काम करण्यात आपली अधिकची क्रयशक्ती खर्ची पडते असं ते म्हणतात

8. "सॅटर्डे क्लब" चे ते मेंबर आहेत तर "भारतीय युवा शक्ती ट्रस्ट" तसेच "पुणे मॅनेजमेंट असोसिएशन" सारख्या सेवाभावी संस्थांमध्ये ते विना मोबदला कार्यरत आहेत.तिथे काम करतांना तयार झालेली विश्वासार्हता, प्रतिष्ठा आणि दृश्यमानता आपोआपच त्यांच्या व्यवसायात काम मिळवून देण्यास कारणीभूत ठरतेय.

उदा: 'भारत फोर्ज' ह्या नामांकित कंपनीचं एक प्रोजेक्ट अशाच सेवाभावी संस्थांमधील कामामुळेच त्यांना मिळालं असल्याचं ते सांगतात

9. नुकतीच त्यांची "पुणे मॅनेजमेंट असोसिएशन'च्या 'Entrepreneurship Development' च्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

10.सूक्ष्म किंवा लघु उद्योजकांना   व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात त्यांची 'सेवा' कदाचित आवाक्याबाहेरची वाटू शकेल हे लक्षात घेऊन त्यांनी 'मास्टरक्लास' ही शृंखला सुरू केली आहे जिथे साधारण 8 पेक्षा कमी लोकांच्या ग्रुप ला ते एका वेळी साधारण 6 ते 7 सेशन्समध्ये  व पुढे एक वैयक्तिक सेशन असं मार्गदर्शन करतायत

11.व्यवसायाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर व्यावसायिक कसा भरकटू शकतो आणि कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक असतं हे समजून घेण्यासाठी त्यांची मुलाखत जरूर ऐका

12.कामानिमित्त सतत 'जर्मनी' ला जावं लागणारे मात्र सध्या स्वयंप्रेरणेने वरचेवर 'जेजुरी' ला जाणारे श्री बिमन गांधी ह्यांना 'निवडक उद्यमी' तर्फे धन्यवाद आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐


Sunday 21 March 2021

Youtube Chapters द्वारे वाढवा customer engagement

आपल्या संभाव्य किंवा सध्याच्या ग्राहकांना आपल्या बद्दल, आपल्या व्यवसायाबद्दल जेव्हा योग्य वाटेल तेव्हा relevant माहिती (उगीचच भारंभार नव्हे !) पाठवत राहिली , तर त्यांच्या मनात आपल्याबद्दल एक उत्तम प्रतिमा तयार होते. ह्याकरिता आपण Youtube Video Series किंवा विषयवार Play Lists चा अगदी छान वापर करता येतोच. शिवाय "Chapters" तयार करून पाहणाऱ्या व्यक्तीला त्याच्या योग्य भागाकडे खूप कमी वेळात आणता येतं, जेणेकरून त्याचा वेळ कमी जातो. हे आपण पाहूयात खालील Video द्वारे :-




Saturday 20 March 2021

प्रेझेन्टेशन इंट्रो ....

नेट्वर्किंग करताना अनेकदा आपलं प्रेझेन्टेशन देण्याची मेम्बर्स ची टर्न येते. त्यात कसं प्रेझेन्टेशन असावं हा मुद्दा आपण वेगळाच dicusss करू. आणखी एक म्हणजे, आपली ओळख कशी करून द्यायची आणि ती व्यवस्थित करून नाही दिली गेली, तर मात्र पंचाईत होते. 

ह्याला कधी कधी त्या त्या क्लब च्या प्रमुख आयोजकांना जबाबदार धरलं जातं.

नीट पारखून पाहिलं तर ही आयोजक team कारण ठरू शकेल, पण जबाबदार मात्र मेंबर स्वत:च ! कसा काय ?

कारण : ही ओळख नीट न झाल्याने, त्याच्या व्यवसायाला फरक पडतो, म्हणून !

काय करायला हवं ?

  • इंट्रो ही छोटी, छान , To The Point असावी. (ह्याबद्दल इतरत्र बोलू)
  • ती कुणी वाचायची , हे मेंबर ने स्वत: ठरवायचं
  • त्या व्यक्तीकडूनच ही ओळख करून घ्यायची. 
  • तत्पूर्वी व्यवस्थित तालीम करून घ्यायची निदान एक-दोन दा वाचून घेणे इ.

बघा फरक निश्चित पडेल.

व्यवसायात बदल घडवायला नेट वर्किंग हे उत्तम साधन आहे, कुशलतेने वापर केलात, तरच !

Thursday 18 March 2021

शुक्रवार : १९ मार्च ची meeting

 काय असेल agenda ?

  1. केस स्टडी असेल, मुख्यत: customer service बद्दल आपले सोलर वाले वाकडे सर ह्याबद्दल बोलतील. सोबत निशांत असेलच !
  2. कुणा मेम्बर्स चे उल्लेखनीय यश share करणे (आपले असल्यास उत्स्फुर्तपणे पुढे यावे)
  3. एखाद्या नवीन website बद्दल कुणाला काही सांगायचे असेल तर ...
  4. काही निमंत्रित व्यावसायिक सुद्धा असतील (आपणही कुणाला एक मीटिंग विनामुल्य बोलावू शकाल )
  5. Youtube वर चमकायची एक विशेष टीप मी सांगेन !
  6. शिवाय मेम्बर्स ची खास, fast ओळख सुद्धा वेळ असल्यास.
भेटू , उद्या ८ वाजता zoom वर ! लिंक NU वर whatsapp !