Monday, 22 March 2021

श्री बीमन गांधी ह्यांचा उद्योजकीय प्रवास

गेल्या आठवड्यात आपण business planning ह्या विषयाला धरून केस स्टडी मांडण्यासाठी बीमन गांधी सर ह्यांना पाचारण केलं होतं. अर्थात सुरेखच मांडले सरांनी. सर हे स्वत: business coach आहेत. प्रथेप्रमाणे पाठोपाठ सरांची मुलाखत झाली, ज्यात त्यांचा उद्योजकीय प्रवास त्यांनी मांडला.

त्यांची संपूर्ण मुलाखत आपण इथे क्लिक करून ऐकू शकता, किंवा निशांत आवळे  ह्यांनी त्यातले महत्त्वाचे मुद्दे खाली मांडले आहेत तेही पाहू शकता :-

1.गुजरातमधील राजकोट येथे जन्म पण पुढे 'पुण्या' लाच आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवडणारे

2.शिक्षणाने (Instrumentation and Control) ह्या क्षेत्रातील अभियंते पण पेशाने बिझिनेस कोच, मेंटर, सल्लागार ह्या सगळ्या भूमिकांत लीलया वावरणारे तरीही आपली 'सेवा' ही अमुक एका क्षेत्राशी बांधिल नाही (Domain Independent service)ह्याची आवश्यक ती जाणीव करून देणारे

3.देशातील 65 लाख व्यवसाय-उद्योग हे सूक्ष्म, लघू व मध्यम ह्या प्रकारात मोडतात व ज्याकरता केंद्रीय मंत्रिमंडळात समर्पित असं खातं असून सुद्धा एक टक्क्यांपेक्षा कमी उद्योग पुढील पातळी गाठतात आणि ह्या (MSME) क्षेत्रात देशाला प्रगतीपथावर नेण्याची क्षमता आहे हे ओळखून आपल्या बिझिनेस कोचिंगने अशा उद्योगांना पुढील पातळीवर नेण्याचं उद्दिष्ट ठेवून गांधी सर गेली 6 वर्ष काम करतायत

4.1993 साली अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर 2015 सालापर्यंत मोठमोठया देशी व परदेशी कंपनीत वेगवेगळ्या पदांवर काम करताना व जगातले जवळपास 40 देश पालथे घालतांना मिळालेला अनुभव आज ते लघु उद्योजकांबरोबर शेअर करतायत

5.वैयक्तिक कोचिंग आणि छोट्या छोटया समूहांसाठी 'बिझिनेस क्रिटिकल स्किल वर्कशॉप' द्वारे ते मार्गदर्शन करतात

6.स्वतःच्या 'सेवे'चे मार्केटिंग करतांना समाजमाध्यमांवर सतत व दर्जेदार कॉन्टेन्ट तयार करून पोस्ट करणे व 'नेटवर्किंग' ला ते प्राधान्य देतात

7.एक वेळचं काम किंवा पोस्टिंग करून दृश्यमानता (Visibility) साध्य होत नाही, तसेच निव्वळ व्यावसायिक परतावा मिळण्यासाठी काम करण्यात आपली अधिकची क्रयशक्ती खर्ची पडते असं ते म्हणतात

8. "सॅटर्डे क्लब" चे ते मेंबर आहेत तर "भारतीय युवा शक्ती ट्रस्ट" तसेच "पुणे मॅनेजमेंट असोसिएशन" सारख्या सेवाभावी संस्थांमध्ये ते विना मोबदला कार्यरत आहेत.तिथे काम करतांना तयार झालेली विश्वासार्हता, प्रतिष्ठा आणि दृश्यमानता आपोआपच त्यांच्या व्यवसायात काम मिळवून देण्यास कारणीभूत ठरतेय.

उदा: 'भारत फोर्ज' ह्या नामांकित कंपनीचं एक प्रोजेक्ट अशाच सेवाभावी संस्थांमधील कामामुळेच त्यांना मिळालं असल्याचं ते सांगतात

9. नुकतीच त्यांची "पुणे मॅनेजमेंट असोसिएशन'च्या 'Entrepreneurship Development' च्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

10.सूक्ष्म किंवा लघु उद्योजकांना   व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात त्यांची 'सेवा' कदाचित आवाक्याबाहेरची वाटू शकेल हे लक्षात घेऊन त्यांनी 'मास्टरक्लास' ही शृंखला सुरू केली आहे जिथे साधारण 8 पेक्षा कमी लोकांच्या ग्रुप ला ते एका वेळी साधारण 6 ते 7 सेशन्समध्ये  व पुढे एक वैयक्तिक सेशन असं मार्गदर्शन करतायत

11.व्यवसायाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर व्यावसायिक कसा भरकटू शकतो आणि कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक असतं हे समजून घेण्यासाठी त्यांची मुलाखत जरूर ऐका

12.कामानिमित्त सतत 'जर्मनी' ला जावं लागणारे मात्र सध्या स्वयंप्रेरणेने वरचेवर 'जेजुरी' ला जाणारे श्री बिमन गांधी ह्यांना 'निवडक उद्यमी' तर्फे धन्यवाद आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐


No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.