Saturday 29 January 2022

वाकडे ह्यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे : सोलर पॉवर आणि आपली सोसायटी चे बिल

काल श्री वाकडे ह्यांनी काही मुद्दे सांगितले, ते खालील विडीयो मध्ये सविस्तर ऐकता येतील, शिवाय समरी अशी :-

  • २५-30 सदनिका धारकांच्या इमारतीत १५ kw ची system लागेल.
  • साधारण ६० युनिट्स रोजचे लागतील 
  • पंप, लिफ्ट इत्यादी सर्व ह्यावर चालतं 
  • ह्या १५ KW सिस्टीम साठी ८ लाख खर्च येतो अंदाजे 
  • ह्याचा payback पिरीयड साधारण ३.५ ते ४ वर्षे आहे, त्या नंतर १० टक्के बिल येईल
  • आयुष्यमान १५ वर्षे तरी नक्कीच चालेल, घसारा १५ टक्के मिळेल, मालमत्ता करत ५ टक्के मिळेल 
  • ह्याला अंदाजे ९०० चौ फुट जागा लागेल 
  • मेंटेनन्स म्हणजे काचा साफ करणे, महिन्याकाठी 
  • Shadow Free जागा हवी 
  • महा वितरण शी सर्व Liaison वाकडे & co चं पाहतात.
  • संपूर्ण काम ४ महिने मध्ये पूर्ण होतं 
सविस्तर विडीयो :- 



Thursday 27 January 2022

मेम्बर फोकस्ड Activity

नेटवर्किंग द्वारे जर स्वतः चा व्यवसाय वाढवायचा असेल, तर उद्बोधन तर हवंच, पण active, शिस्तबद्ध प्रयत्न देखील करणे आवश्यक आहे. मुळात आपण एखादे उद्दिष्ट ( आर्थिक ) डोळ्यासमोर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ते मिळविण्यासाठी मार्गक्रमण.

निवडक उद्यमी हे उद्दिष्ट गाठायला सोबत राहणाऱ्या उद्यमी लोकांचा समूह आहे. जरा विचार करूया, की व्यवसाय कसा मिळेल :

थेट कुणाला आपली सेवा/ products हवी असल्यास
इतर सहकार्य करार- मदार ( सामायिक व्यावसायिक )
इतर मदत ( जसे एखाद्या शहरात नेटवर्क वाढविणे )

इथपर्यंत यायला जरा वेळ जावा लागतो, मेम्बर व्यवसाय करणे योग्य आहे की नाही हे त्याच्या कामावरून, सहभागावरून हळूहळू आपल्याला कळायला लागतं. साधारण वर्षभरानंतर त्या मेम्बर चा व्यवसाय आपल्याला थोडा "परिचित" होतो. आता हीच exact वेळ असते खोलात शिरायची. 

म्हणजे काय करायचं ?

आता त्या मेम्बर बद्दल एकंदरीत जास्त माहीत व्हायला हवं :
अर्थात त्याचा जीवनपट, त्याची एकंदरीत philosophy, त्याचे बिझनेस verticals, आणि अर्थात त्याचे goals. शिवाय त्याला हे मिळवायला साधारण कोणत्या प्रकारच्या बिझनेस पार्टनर्स, असोशिइट्स किंवा कोणते नवीन सहाययक, किंवा कोणती इतर मदत हवी आहे हे त्या मेंबर ने explain करून सांगायची त्याला संधी मिळणे.

मेंबर focussed Activity

हाच उपक्रम निवडक मध्ये आता आम्ही करू पाहत आहोत. दर महिन्याला एक शुक्रवार हा राखीव असेल तो अशा 2 members करता. 11.30 पासून ते 1.00 हा वेळ पहिल्या member साठी तर 2.00 ते 3.30 हा वेळ दुसऱ्या member साठी द्यायचा आहे. मध्ये जेवण.

ह्यात प्रत्येकाचा "फायदा" आहे.

हे "दुसऱ्या करता करणे" ह्या भावनेतून तर कराच, शिवाय ह्याला एक व्यावहारिक, प्रॅक्टिकल अँगल सुद्धा आहे.

दुसऱ्याचा व्यवसाय समजून घेता घेता आपल्याला कळू शकतं, की सदर मेंबर आपल्याला कुठे कनेक्ट देऊ शकेल, मला कुठे मदत होऊ शकेल त्याची. पटकन 10 मिनिटांत न उरकता दोन- चार तास पसरलेली ही activity असल्याने ह्यातून खूप छान हे सर्व घडू शकेल.

पाहू, ता. 28 पासून हे सुरू करत आहोत. पोस्ट करूच, यथावकाश.

Tuesday 25 January 2022

गुगल आणि त्याचे AI

AI हे प्रकरण खेळ म्हणूनच ठीक. एक तर लोकांच्या कधी तरी मनात उमटलेल्या भावना screen वर ट्रॅक करायच्या आणि त्या बेसिस वर कंटेंट त्यांच्यासमोर सतत आणत राहायचा, हाच एक spam. हा हे गुगल आणि कं यथेच्छ करीत राहणार आणि म्हणे users ना ठोकणार ! 

कंपलीट xयागिरी आहे ही. आणि ह्यावर अवलंबून आपला धंदा फिंदा बांधणे ही तर डब्बल x यागिरी.

घडलेल्या 2 रिसेंट घटना

नुकतंच माझ्या ट्रेनिंग ला काही मंडळींनी छान review दिले, GMB अर्थात गुगल माय बिझनेस वर. काही दिसतात,तर काही दिसतंच नाहीत. का ? तर म्हणे Violation of Policy ! नवख्याला सांगा हो 😊, मला नको. यांचे AI गंडत राहतात. असंच घडलंय माझं whatsapp बाबत. असंच घडलेलं 2011 मध्ये गुगल ने अचानक माझं adsense account कायमचं डिसेबल केलं. 

शिकण्यासारखं ....

१. हे गुगल, whatsapp ह्यांना hack नाही व्हायचं
२. माझा धंदा हे माझं काम, कर्म, हे गुगल कसं ठरवेल ?
३. ह्यांच्यासाठी कंटेंट लिहू नका, लिहून घेऊ नका ( SEO वगैरे करीत असाल तर )
४. इंटरनेट = गुगल नाहीये. Search मध्ये आपण सर्वप्रथम येणं हे महत्त्वाचं नाहीये,तर जे आलेत त्यांच्यासाठी मी काय चांगलं देऊ शकतो/शकते हे जास्त महत्वाचं 

Monday 24 January 2022

समोरासमोर शिकण्याचं महत्त्व


ही एक पोस्ट मला आली काल, शिवाय मला एक मित्र काल परवा म्हणाला ... की मी अनेक कोर्सेस ना signup करून ठेवलंय, अनेक नेटप्रसिद्ध व्यक्ती LMS स्वरूपात असे कोर्सेस तयार करत असतात, ज्यात "कधीही डाउनलोड करा" हा एक मोठा हुक असतो. वरची इमेज हेच दर्शवते.

चॉईस शिकणाऱ्याचा आहे 

तो शिकविणारा काहीही करेना का तिकडे, शिकणाऱ्या ने ठरवायला हवं की मला कसं शिकायचं आहे ते. हे त्या प्रश्नावर सुद्धा अवलंबून असतं, म्हणजे अगदी फक्त प्रोसिजर बघायची आहे,तर हे direct डाउनलोड ठीक आहे,पण जर त्या मागची मनोभूमिका समजून घ्यायची असेल तर मात्र तुम्हाला समोरासमोर शिकणेच श्रेयस्कर.

माझे होम स्टडी कोर्सेस जास्त महाग आहेत :😊

पहिली गोष्ट : समोरासमोर शिकणे म्हणजे physically च समोर असावं असे नाही. झूम वर सुद्धा हे शक्य आहे. उलट जास्त छान होतं, हा माझा अनुभव आहे.

माझ्याकडे कुणी होम स्टडी कोर्सेस मागतात, जे live पेक्षा जास्त किमतीचे आहेत. माझी मनोभूमिका अशी :-

माझा अनुभव हा समोरासमोर शिकण्यातूनच सर्वोत्कृष्ट deliver होऊ शकतो. त्यामूळे त्यालाच मी सर्वात जास्त महत्त्व देतो. ज्याला हे करायचं आहे तो बरोब्बर वेळ देतो. ज्याला होम स्टडी हवंय, त्याला त्याच्या वेळेनुसार हवंय,त्याला हवं तेवढाच हवंय, म्हणजे त्याच्याकडे कदाचित असा वेळ किंवा वेळ देण्याची तयारी नसेल, म्हणून त्याने जास्त किंमत मोजावी. असा होम स्टडी कोर्स न देणं हा सुद्धा पर्याय होऊ शकेल, पण काहीच न घेणे ह्यापेक्षा निदान होम स्टडी तरी करतोय, हेही नसे थोडके !

Scaling up हा approach मला इथे मान्य नाही

लोकांना आपले विचार हवे असतात,त्यांच्या प्रश्नांना आपली प्रत्यक्ष, व्यक्तिगत उत्तरे हवी असतात. ती देणे हे माझं काम, स्वधर्म. ही न देता येणे, म्हणजे पुन्हा ह्या मूळ तत्त्वापासून फारकत.म्हणजे पुन्हा misalignment. 

ह्या होम स्टडी, किंवा direct download प्रकरणात ही नाही देता येत. म्हणायला कंटेंट मिळतो,पण उपयोग शून्य. हीच परिस्थिती एकाच वर्गात 50 मुले बसविणे ह्यामुळे उद्भवते. समोरासमोर असली तरीही. 




Sunday 23 January 2022

21 तारखेची निउ मीटिंग

मागे निवडक मध्ये franchising च्या उथळपणा विषयी चर्चा झालीच होती. कोणीही उठतय आणि franchise देतंय हे तर अगदी वरचेवर दिसतं. अनेकवेळा ह्याचा सखोल न विचार केलेला असतो, ना अभ्यास. व्यावसायिक बांधिलकी तर फारच लांबचा विषय राहिला. ह्याच पार्श्वभूमीवर खांडसरी चहा च्या सुनील गोसावी ह्यांच्याशी चर्चा झाली.

पाठोपाठ मकरंद पारखी ह्यांनी एखादा छोटासाच मिळालेला कनेक्ट एक मोठया ऑर्डर मध्ये कसा रूपांतरित केला त्याविषयी उलगडून सांगितलं

नंतर उपस्थित लोकांनी आपली ओळख करून दिली - घेतली, संपुर्ण सेशन Live होता फेबु च्या कृपेने :

https://www.facebook.com/saumitramg/videos/1108086523259956/

एसटी महामंडळाला असे पंधरा वीस अण्णा दुराई द्या ...

नाना पाटील यांनी नुकतीच एक पोस्ट फॉरवर्ड केली मला, चेन्नई मधल्या अण्णा दुराई नामक एका hitech रिक्षावल्याबद्दल. ग्राहकांना विविध सेवा पुरविणारा हा हायटेक अण्णा खूप प्रसिद्ध झालाय,त्याने ted talk वगैरे पण दिलाय !

कुणाला हवा असेल तर त्याचा video पाहता येईल ह्या लिंक वरून :- https://youtu.be/qC4tctog_Os

पण मग चेन्नईत इतर रिक्षावाले का बरं इतकं लुटतात ?

पहिलं तर हा अण्णा प्रवासी मंडळींकडून किती पैसे घेतो ह्याचा काही तपास नाहीये, तो म्हणतो की इतर जे घेतात,  तितकंच मी घेतो. चेन्नईत इतर जे घेतात,ते डेंजर आहे. एक तर मीटर चा विषयच नाही, शिवाय मनाला येईल ते भाडं ठोकतात. म्हणजे या दोन भिन्न गोष्टी मानव्यात, की अण्णा चं innovation आणि चेन्नई मध्ये असलेली इतर परिस्थिती. 

पण या अण्णा ला जर आपल्या एसटी महामंडळाचा CEO केला तर तो संजीवनी ठरू शकेल का ?

नीती ...नेता ... नैतिकता

आपण कसं जगायचं हा आपलाच प्रश्न आहे. जगण्यात किक मात्र हवी, ह्याला खुमारी म्हणता येईल. कशानी आणायची हा आपापला प्रश्न.

अमली पदार्थ ? की मद्यपान ?
देवदेव की संपत्ती प्राशन ?
अतिरिक्त सत्ता की भाई गिरी ?
उद्योग व्यवसाय की समाजकारण ?

Choice कोणताही असला तरी निर्णय घ्यावाच लागेल, नेतृत्त्व करायलाच लागेल. इथे आली नीती, आणि तो पाळणारा .... नेता !

अर्थात हे न करता दुसराही मार्ग आहे जगण्याचा : दुसरा जसं नेतो,तसं जात राहणे.

हेही कमी किमतीचं नाहीच. जितका हापूस आंबा आवश्यक, उपयुक्त,तितकीच कोथिंबीर !

स्वतः चीच पाठ थोपटली .....


22 तारखेला joy ला 12 वर्षे पूर्ण झाली. ह्यात जगाचं जाऊद्या, पण स्वतः चंच जास्त कौतुक वाटतंय.

माझ्या 2010 च्या life चा आढावा घेतला तर "धरसोड" किंवा "अननुभवी निर्णय" असं घडलं आहे, परिणामी खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकणाऱ्या झाडाला मी उतावळेपणा करून किंवा सणकेत छाटून टाकलेलं आहे. ज्या मूळे ते उद्योगझाड़ कायमचं मरून गेलं.

आणि आता त्याच वेळी टिकून राहिलेली झाडं एकतर स्टेडिलि वाढत तरी आहेत किंवा बहरली तरी आहेत.

सूत्र : सातत्य

मिलिंदने केलेल्या भाष्यात एक मला summarize करणारी गोष्ट काय आहे ? तर ती म्हणजे :-

तिरचंचल, भ्रमर, फिरस्ता 

मित्र म्हणून छान वाटणारी ही विशेषणे एक व्यावसायिक म्हणून मात्र छान नव्हेत. तीच खोडण्याचा हा एक गेली 12 व येति अनेक वर्षे अविरत होत असलेला मनापासून प्रयत्न आहे.

नवं पुस्तक वाचतोय ...Contextual Selling


ह्या पुस्तकाचे लेखक स्वतः मला भेटले एका नेटवर्क meeting मध्ये, आणि High Ticket Items विकायच्या काही खास युक्त्या त्यांनी ह्यात share केलेल्या आहेत अजून 70 -80 पानेच झालीत वाचून. यथावकाश सांगेनच एकंदरीत.

वाचताना आलेली एक अनुभूती

प्रत amazon वरून वेळेत आली,पण त्यात किंचित गडबड होती. पण मी त्याकडे जरा दुर्लक्षच केलं. पुस्तकात काय लिहिलंय हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे ना !

आणखी एक गोष्ट म्हणजे माझी judgemental व्हायची सवय : 

हे तर काय : जुनेच फंडे आहेत
ह्या गोष्टी पूर्वीच वाचल्या आहेत

असे remarks मन देऊ लागले. इथे मे सावध झालो आणि एकदम मनोभूमिका बदलून टाकली :

अत्यंत अनोळखी व्यक्तीचे जातिवंत, अस्सल अनुभव आहेत,  छान वाटेल वाचायला

मला ह्यातून काही मोजक्या जरी नवीन युक्त्या मिळाल्या, तर मला त्या वापरता येतील ना ! त्यासाठी मी सदर पुस्तक मागवलंय.

शिवाय एक नवीन व्यावसायिक व्यक्ती परिचयाची होईल !

अचानक माझ्यात बदल घडून आला, आणि मी प्रत्येक पान न पान छान detail मध्ये वाचू लागलो आहे आता. आणि हे रंजक देखील होऊ लागलं आहे आता.


Thursday 20 January 2022

Tools जरा तारतम्यानेच वापरायला हवीत


नुकतंच माझा व्हाट्सअप्प नंबर बॅन झाला होता, म्हणजे पुन्हा त्या नंबरवरून whatsapp वापरता येणार नाही. मी तो recover केला कारण हाच तो नंबर ज्याच्या वरून मी व्हाट्सअप्प वापरत असतो.

माझा बिझनेस अकाउंट आहे,त्यामुळे चला, हा काढून व्यक्तीगत म्हणजे messenger app टाकून बघितलं तरी नाहीच झालं. शेवटी युट्युब चा आधार घेतला आणि revover केला.

पण शपथेवर सांगतो मी panic वगैरे अजिबात झालो नाही. इतर कुणी होऊ शकतं. मी झालो नाही ह्याचं कारण असं, की मी अनेक वर्षे म्हणजे जवळपास सुरुवातीपासूनच "धंदा करतो", अनेक वेळा माझे धंदे बुडालेले आहेत , पुन्हा recover झालेत,पुन्हा बुडलेत, पुन्हा दुसरेच काही मी सुरू केलेले आहे. त्यामुळे ह्याचं इतकं काही वाटत नाही, खरंच. थोडंस वाईट वाटतं, पुढच्या योजना जरा फसल्या सारख्या वाटतात म्हणून, पण हे असंच असतं. शिकलो ते बहुमूल्य आहे :

१. Tools ही उपयुक्त असतात, आपलं काम खूप प्रमाणावर सोप्पं , हलकं करतात, तरी ती तारतम्यानेच, गरजे पुरतीच वापरावी. नाहीतर भलतेच घडेल. मी लहान असताना मला माझ्या बहिणीने विदेशी कात्री आणून दिली होती, तिने खूप छान पेपर कटिंग व्हायचं, मला नाद लागला, आणि मी घरातल्या चांगल्या चांगल्या पुस्तकांतील चित्र चक्क कापली, आणि दादांना म्हणजे वडिलांना दाखवली, परिणाम तुम्हाला कळलाच असेल.

२. मी जरा जास्तच मेसेजेस पाठवू लागलो होतो. साहजिकच हा मेसेज न आवडणारे, नकोसे वाटणारे लोकही काही असतीलच की ! "संख्या" वर भर दिल्याने असं झालंय. ह्यापेक्षा कमी परंतु योग्य audience निवडला,त्यावर जास्त लक्ष देऊन काम करायला हवं

३. क्षणभर धरून चालू,की लोकांना न आवडणारं काही नाहीये मेसेज मध्ये. पण मग हे मेसेज लोकांना पसंत तरी पडत आहेत हे whatsapp ला कळायला हवं, ह्याकरता आपल्या मेसेजलाच reply मिळायला हवेत, ह्याकरिता संपर्क सेतू ( whatsapp software ) मध्ये खास chatbots ची सोय आहे. आता मी त्यावर फोकस करेन.

४. Whatsapp मेसेजेस करण्यासाठी काही मला पैसे मिळत नाहीत. माझा धंदा हा नाही. लोकांना Online मार्केटिंग द्वारे व्यवसाय वाढी करता मदत करणे हा माझा धंदा आहे. मदत करणे हा माझा धर्म आहे. त्यात उपयुक्त पडणारे एक अवजार tool म्हणून व्हाट्सअप्प मार्केटिंग. ते जरी का बंद पडले, तर दुसरा एखादा पर्याय उभा राहिलच! 
# ( update 13.2.22 : राहिला )

हे account recover कसा करायचा वगैरे माहिती प्रोसिजरल स्वरूपाची आहे,नेटवर कुठेही मिळेल. बाकी काही बोलायचं असेल तर comment जरूर करावी .

Wednesday 19 January 2022

Physical Meetings चा अनाठायी अट्टाहास ...

" मी Physical मीटिंग ला माझं प्रेझेन्टेशन घेईन "

असं मला बरेच members सांगतात तेव्हा मला हल्ली कपाळावर हात मारून घ्यावं असं वाटतं. आता एकतर असं काहीच राहिलेलं नाहीये आता : डिजिटल- physical वगैरे. शिवाय डिजिटली कुठेही प्रेझेन्टेशन देता येत हा दुसरा मुद्दा.

मुळात आता यापुढे बऱ्याच meetings डिजीटलीच होतील 

कोविड मुळे का होईना,लोकांना ह्याची सोय लक्षात येऊ लागली आहे. कुणालाही कधीही प्रवास न करता भेटता यावं यासारखं सुख नाही कोणतं ! कामाच्या भेटी तर डिजीटलीच कराव्यात. आपण एकमेकांना ओळखत असू किंवा नसू, कामच जर का बोलत असेल,तर बेटर ना !

तुम तुम्हारे जग्गु पे,  मै मेरे, बात खतम ना ! नो physical भेटाभेटी फालमफोक. प्रचंड वेळ सेव्हर. शिवाय नोट्स घेता येणे, white बोर्ड, रेकॉर्ड करता येणे, स्क्रीन sharing, एक ना दोन, अनेक सुविधा !

भंकस करायची आहे, साथ मे चाय वाय पीनेका है तरच प्रत्यक्ष भेटा, आदरवाईज झूम मीटिंग येहिच वाईज !

जितकं लवकर आपण हा pattern स्वीकारू तितकं उत्तम 

लक्षात घ्या, उत्तमोत्तम लेखक,कवी, शास्त्रज्ञ, गणितज्ञ वगैरे सर्व लोक आपल्याला आत्तापर्यंत virtually च भेटलेत. पुलं असोत की शिवाजी महाराज, आपल्याला कल्पनेतच भेटलेत म्हणजेच प्रत्यक्ष नव्हे. तरी आपण त्यांच्या कडून प्रेरित झालोच ना ? हसलोच ना ? अशाच या झूम meetings, उगा अट्टाहास करू नका अन स्वीकारून टाका वास्तव. सोप्पं होऊन जातंय बघा समदं !

आकडे बोलतात ....

मी अनेक डिजिटल मीटिंगस अटेंड करत असतो. त्यात मिळणारे परिणाम, वाचणारा खर्च हा अमेझिंग आहे. एका physcical meeting ला साधारणपणे ₹ 600 ते ₹ 700 इतका खर्च येतो, त्यात हॉल चं भाडं, त्यातल्या "छान वाटावं" म्हणून असलेल्या सुविधा, प्रोजेक्टर आणि पाठोपाठ असलेला ब्रेकफास्ट ह्या फक्त त्या हॉटेल ला श्रीमंत करणाऱ्या गोष्टी आहेत, आपल्याला नाही. तुलनेत झूम मीटिंग ला अत्यल्प खर्च येतो. अगदी 10 ₹ वगैरे. शिवाय जगात कुठेही,कुठूनही, घरातून किंवा ऑफिस मधून न हलता, पेट्रोल पाणी न जाळता, वेळ न खर्च करता, होणारा हा अत्यंत सुलभ प्रकार आहे. कोणताही खरा बिझनेसमन हा अनाठायी होणारा खर्च वाचवायला पाहिल, तर ते अगदीच योग्य आहे !


Sunday 16 January 2022

व्यावसायिक मानसिकता हा मोठा ठेवा !

माझ्या माहितीत दोन मराठी ठळक उदाहरणे आहेत 

एक उदाहरण एका आजन्म झटलेल्या सो कॉल्ड अयशस्वी उद्योजक व्यक्तीचं, ज्याच्या दोन्ही मुलांनी जाऊन पुढे बऱ्यापैकी मोठे व्यवसाय उभारले, 100 ते 200 माणसे काम करतात इतके.

दुसरं उदाहरण एका बऱ्यापैकी यशस्वी अशा उद्योजक व्यक्तीचे, ज्याच्या मुलाने बँकेची नोकरी मिळताच सदर उद्योग वडिलांच्या पश्चात गुंडाळून टाकला.

ह्या पार्श्वभूमीवर 3vees च्या वर्षा, वृन्दा आणि विस्मया ह्या 3 मुलींचं धैर्य अतुलनीय आहे. फक्त विशीतल्या असलेल्या ह्या 3 केरळी मुली आता महिना 25 लाख कमवत आहेत,हेही फक्त 2च वर्षांत.

घरात आधीच उद्योग असल्याने एक अच्छा बिझनेस बनाना पडता है हे कल्चर रुजलेलं दिसून येतंय त्यांच्या व्यवसाय मांडणीतून. 

ही पोस्ट पहा आणि मते कळवा 

प्रशिक्षण : ट्रेनिंग हाच उपाय ....

नोकरदार ते उद्योजक हा एक मोठा मानसिक बदल आहे. ह्याकरिताच saturday क्लब तसेच निवडक उद्यमी हे platforms उपयुक्त ठरू शकतात. बघत बघत, नैसर्गिकरित्या तर माणूस शिकतोच, पण ह्याला जर का प्रशिक्षणाची जोड देता आली,तर जास्त चांगलं होईल असं वाटू लागलं आहे.

कारणीभूत झालेल्या घटना :

ज्या saturday क्लब चा मी सदस्य आहे , तिथे होत असलेली नवीन chapter संख्येतील वाढ, तेव्हाच अस्तित्त्वात असलेल्या chapters मधील वाढत्या समस्या.

नवीन पदे घ्यायला, भार स्वीकारायला members तयार न होणे. त्यांना ह्यातली संधी न दिसणे.

काही members, ज्यांनी नेटवर्किंग चे बेसिक्स अवलंबिले, त्यांना मिळालेलं दैदिप्यमान यश, त्यांचा नियमितपणा व काटेकोरपणा.

काही chapters, जे प्रत्यक्ष झडझडून काम करतात, ज्यांचे results बोलतात, की सर्व members साठी आम्ही काम करतोय, फक्त झगमगाट नव्हे. मालाड chapter ची ही Done Deals ची excel sheet बरेच काही सांगून जाते : 

किती धंदा झाला आहे एकूण ह्यापेक्षा किती मेंबर्स चा धंदा झालेला आहे हे पाहिलं तर लक्षात येतं की हे सगळं करायला किती शिस्तबद्ध प्रयत्न हे लोक करत आहेत.

हे जर scale up केलं,की झालं ना ! ह्याकरता फार काही करायला नको, ह्यांच्या methods follow करायच्या. म्हणजेच Documentation तयार करून members व भविष्यातील लीडर्स ना प्रशिक्षित करणे.

Saturday 15 January 2022

मेंटरिंग करणे हे स्वतः साठी आहे !


BYST च्या निमित्ताने बऱ्याच तरुण तरुण उद्योजकांना मेंटरिंग करण्याची संधी मिळते. मुळात मेंटरिंग हा शब्द आहे फक्त. यात त्या नव उद्योजका च्या फक्त आधी मी उद्योग केलेला आहे, इतकंच सत्य आहे. आधीची गाडी पकडण्यासारखं. त्यामुळे फक्त सांगायची भूमिका असायला हविये, आणि शिकणाऱ्या ची पण, हे स्वतः ला सतत सांगायला लागतं. नाहीतर कुठून तो "आगाऊपणा" अंगात घुसेल सांगता येत नाही☺️

राजपाल ह्यांचं मेंटरिंग 

मालाड chapter ला प्रेसेंटशन ला आधी माझी ओळख करून द्यायची होती,त्याकरता एक blank sheet मला पाठवला गेला,जो मी तसा निरिच्छ पणे भरून दिला. रात्री श्री राजपाल ह्यांचा मला फोन ( माझी ओळख करून देणारे ) आला, आणि साधारणपणे 20 ते 25 मिनिटे ह्या व्यक्तीने माझा ताबा घेतला, अगदी बापा प्रमाणे. माझ्या प्रत्येक उत्तराला प्रतिप्रश्न करत, मागे न हटता त्यांनी माझे अक्षरशः उद्बोधन केले, ह्याला म्हणायचं मेंटर. आणि ह्यात त्यांचा स्वतः चा तसूभरही फायदा नसताना. सगळा फायदा माझाच. अशा काही व्यक्ती असतात, ज्या विनाकारण इतरांचं मेंटरिंग करत असतात, त्यांना प्रणाम !

CCD Revamp : थोडा अधिक अभ्यास ...

ही ती news, जिने खणायला भाग पाडलं

Whatsapp सोडाच, पण पेपर मध्येही येणाऱ्या news म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं खरंखुरं वास्तव चित्रण वगैरे फक्त आदर्शात असतं. ये कलियुग है बॉस, इधर बिकता है,वही टिकता है, और वोही बिकेगा, जो दिखेगा !

हां, असं नका समजू की मालविका हेगडे ह्यांनी ही paid news केलीये म्हणून. पण हल्ली ना उगाच कोवळं ऊन जरी पडलं ना तरी वाटतं कुणीतरी पाडलंय म्हणून ! 

आत्तापर्यंत काय सापडलं ?

ताळेबंद वगैरे पाहून दिसलं की त्यांनी बरेच Non Primary Assets म्हणजे कंपनीच्या कामकाजात तसे न फरक पडणार assets विकून टाकले वगैरे. कर्ज कमी झालेले दिसत आहे. हे कार्यपद्धती सुधारणे मुळे नव्हे. तरीही ठीकच की ! त्यात राजकीय भाग तसेच काही बड्या प्रस्थांचे पैसे अडकून पडलेत,ते खुल्ले करायचेत असा एक सूर निघाला.असेलही.

आपला काय loop holes शोधण्याचा धंदा नाय बॉ ! आम्ही फक्त प्रेरणा व जोडीला शहाणपण शोधत राहतो !

असं (सर्व प्रकारचं)  शहाणपण दाखवून हेगडे बाईंनी तर पडून राहिलेला माल विका असा विचार केला,तरी ते स्वागतार्हच की हो 


एक रेफरल की कीमत तुम क्या जानो ठाकूर


फक्त आडनाव वाकडे असलेला हा सरळ व सरधोपट उद्योजक. स्वतः च्या कष्टातून उभारलेला उद्योग. स्वतः पुरता न थांबता, त्याने दुसऱ्या एका मेम्बर ला एक रेफरल देऊ केला ज्याचं रूपांतरण 3 कोटी च्या order मध्ये झालं. हे कसं घडलं ह्याची कथा निउ च्या संक्रांत meeting मध्ये share केली गेली. ही मीटिंग facebook live झाली.

121s ना चालना ....

ह्या स्टोरी मुळे 121 करणे किती महत्त्वाचं आहे , हे अधोरेखित झालं. शिवाय योग्य पार्टनर्स पिक करणं हे देखील किती महत्त्वाचं आहे, हे सुद्धा !


Wednesday 12 January 2022

माझ्या हाती विनाश माझा कारण मी ...

मी एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालवतो. एजन्सी म्हणजे एजंट हे उघडंच आलं. आणि एजंट म्हणजे इकडचा माल तिकडे करणारा , स्वत: काहीही न करता नुसता "माल" खाणारा , फुक्कट कमिशन खाणारा अशा अनेक समजुती असतात. ह्याला सध्या तरी इलाज नाही. जमेल तसे लोकांना इस्टेट एजंट, कार एजंट, भाज्यांचे दलाल, रेल्वे बुकिंग एजंट ह्यांना respect करा आणि त्यांचाही व्यवसाय ते अनेक वर्षे जपत आहेत, हे समजून मानाने, चांगल्या भावनेने त्यांना पैसे द्या, असं शिक्षित करणे हे काम मी नेमाने करतो. 

माझ्यासाठी एक असते "पार्टी" म्हणजे ग्राहक व एक असतो vendor म्हणजे ते ते काम करणारी व्यक्ती किंवा संस्था. कामे मिळण्यासाठी मी जे प्रयत्न करतो, ते सगळे मार्केटिंग, पब्लिक रिलेशन्स, सेल्स, वगैरे domain च्या खाली येतात. ह्यातून कामे मिळतात व प्रोजेक्ट पूर्ण केले जातात. 

ह्यामध्ये active follow up हि एक मोठी प्रक्रिया असते. ज्यात प्रत्यक्ष कोटेशन देणे, प्रोजेक्ट ची strategy तयार करणे, त्यानुसार pricing देणे वगैरे अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. शिवाय कामे सुरु झाल्यावरही त्रयस्थाप्रमाणे सदर प्रोजेक्ट चे काम त्याच्या उद्दिष्टा प्रती जात आहे किंवा नाही हे पाहणे, त्यात सुधारणा सुचवीत राहून त्या अंमलात आणणे ह्याकरिता मासिक बैठका होतात, ज्यात ग्राहक-vendor व मी स्वत: involve असतो. वारंवार, परत परत ही प्रक्रिया होत असल्याने ग्राहकांना प्रत्यक्ष काम करणारे कोण हे कळून येतं आणि त्याच वेळी Vendors ना देखील थेट ग्राहक कोण हे कळू शकतो.

इथेच घोळ होतो 

ह्या दोन्ही घटकांना वाटू शकतं मध्येच कि, मग एजन्सी ची काय गरज ? नवीनच नव्हे तर आश्चर्यकारक रित्या अगदी मुरलेले व्यावसायिक सुद्धा असा उथळ विचार करताना आढळतात. पैसे प्रत्येकाला वाचवायचे आहेत, आणि फक्त हाच उद्देश असतो, दोन्ही घटकांचा. ह्यात एजन्सी चं वरवर नुकसान झालेलं दिसतं. पण त्रयस्थासारखे ह्या प्रकल्पाकडे पाहणे, आणि ROI ग्राहकाला मिळवून देण्याकरिता एजन्सी ला बायपास करून चालणार नाही हे दोन्ही घटकांना समजावून सांगावं लागेल, ते सुद्धा कामे initiate होण्यापूर्वीच !

ग्राहकाला त्याचा व्यवसाय कळतो, Digital Marketing नव्हे, आणि Vendor ला त्याचं काम फक्त कळतं, ग्राहकाने  काय रणनीती राबवावी हे नव्हे. कारण एजन्सी हेच काम करत असते, शिवाय ग्राहकाशी व्यवस्थित Rapport ठेवल्यामुळे ग्राहकाच्या खाचा-खुचा त्यांना उत्तम ठाऊक असतात. हे दोघानाही जशी वेळ पडेल, तसे समजावून सांगायलाच हवं. vendor ला जास्त. जर ग्राहकाला योग्य परिणाम मिळाले नाहीत, तर लाजेखातर ग्राहक आपल्या सोडून दुसऱ्या कुणाकडे जायची शक्यता असते. ह्यात ना vendor कडे काम राहिलं, ना एजन्सीकडे ! शिवाय कामाची रास्त किंमत मिळणे, हे सुद्धा एजन्सी योग्य पद्धतीने करू शकते.

हे नाही केलं तर सतत अस्थिरता राहील 

Vendor Development म्हणजे हेच तर करणे. हेच मी करत नव्हतो पूर्वी. माझ्या मशिनरी व्यवसायात असेच थेट ग्राहक यायचे, त्याना माझे सप्लायर परस्पर पटवायचे, आणि मला नंतर कळलं कि वैफल्य ! असा प्रवास अनेक वर्षे सुरु होता. त्यात स्वत:चं युनिट चालू करणे ( जी माझी अजिबात आवड नव्हती ) हे नको ते काम मी केलं आणि अनेक वर्षे गेली. दू;ख नाही त्याचं, कारण त्यानेच शिकवलंय हे सगळं. पण हे जर आताही मी केलं नाही तर "माझ्या विनाशाला मीच कारणीभूत" असेन हे नक्की.

माझ्याकडे सध्या Band Width शिल्लक नाहीये !

कधी कधी असं कुणी म्हटलेलं ऐकायला येतं आपल्याला. मी सुद्धा ही फ्रेज अधून मधून वापरत असतो. पण कुणी विचारलं तर नक्की सांगता येत नव्हतं मला, कि म्हणजे नक्की काय. पण अगदी काल-परवाच मला हे "उमगलं" आणि म्हटलं ...लगेच पोस्ट करावं.

Band Width म्हणजे फक्त वेळ नव्हे, किंवा कौशल्य सुद्धा नव्हे किंवा क्षमता सुद्धा नव्हे. तर माझ्या मते एखाद्या विषयाकडे, संपूर्ण विषयाकडे Focussed Attention देण्याची क्षमता किंवा जागा

कोणताही नवा छोटा-मोठा प्रोजेक्ट घेऊन तो पूर्णत्वाला न्यायचा असेल तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो, शिवाय सोबत उर्जा कारणी लागते व सोबत पैसेही खर्च होतात. उर्जा हा अपोआप जाणारा प्रकार आहे, तर पैसे देणे ह्यात विशेष वेगळे परिश्रम करावे लागत नाहीत. वेळ द्यावा लागणे हा देखील तसा परावलंबी निर्णयच म्हणावा लागेल. कारण आपण निर्णय काय घेतला आहे, कि कुठे Attention द्यायचं ह्यावरून बाकीच्या ३ बाबी कामाला लागतात. 

Monday 10 January 2022

येऊ घातलेली संधी... की भीती ?

कोरोना ने जग झपाट्याने बदलत चाललंय, मार्केट सुद्धा बदलत चाललंय, Education ही एक उत्तम niche आहे टार्गेट करायलाआणि त्यातही Child Online learning ही तर खासच. टाटा सारखा उद्योग समूह सुदधा ह्यात उतरलाय आता.

सोबत काळजीसुद्धा

हीच लहानसहान मुलं, तरुण जेव्हा ह्याच तंत्रज्ञानाद्वारे समाजविघातक कामे करू लागतात, तेव्हा मात्र खरंच हे सगळं शाप आहे की वरदान, हा प्रश्न पडतो. "बुलीबाई" किंवा "सुलीडिल्स" ह्या दोन apps भयंकर आहेत. सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय असणाऱ्या, वेगळ्या मतांच्या महिलांची छायाचित्रे आंतरजालावर टाकणे हे ह्या apps चं काम. सायबर पोलिसांच्या शोधा अंती कळून आलंय, की ह्या apps ची निर्मिती करणारी मंडळी कोवळे तरुण आहेत, त्यात काही मुली सुद्धा आहेत.

सोयीस्कर दुर्लक्ष ?

ह्या गुन्हेगारांचा तपास करताना अशी अडचण येत राहते,की ह्या आंतर जालांचे मालकी हक्क सांगणाऱ्या बड्या आयटी कंपन्याही सहकार्य करत नाहीत. मुळातच तांत्रिक दृष्ट्या अति प्रगत कर्मचारी ताफा बाळगणाऱ्या ह्या कंपन्यांना आपली किमान नैतिक जबाबदारीचंही भान नसावं ? की धंदा पाहून सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं ?

इथेच values म्हणजे मूल्यांचा प्रश्न उपस्थित होतो. कंपनी प्रवर्तकाने मुळात काय value मूल्य धरून कंपनी उभी केलेली आहे, कर्मचाऱ्याने कोणते मूल्य स्वीकारून सदर काम स्वीकारले आहे हे अगदी पायास्वरूप महत्त्वाचे ठरते.

 उत्तम विचारांचा वारसाच देऊ शकतो

पालक म्हणून उत्तम विचार करायला प्रेरित करणे, चांगले विचार करायला शिकविणे, " मला काय करायचंय, मला पगार मिळतोय ना !" किंवा "क्लायंट ने काम दिलंय, आपल्याला काय" असं तोकडं समर्थन न देणे ह्यासाठी लहान वयातच स्वतः विचारपूर्वक कृती करावी लागेल. मूल्य, जगणं, सामाजिक भान समजावून द्यावं लागेल. 24 x 7 फक्त  "धंदो"  चा विचार करून चालणार नाही. 

बघा काय वाटतंय !



Saturday 8 January 2022

चावरा प्रेषित


साधारण सात एक महिन्यांपूर्वी आमच्या घरी आभू ने अचानक एक मांजरीचं पिल्लू आणलं, आता ही आमच्या घरातली मिंचकू झाली आहे.

अपरिमित आनंद दिलाय तिने. घरातली छोटी छोटी भांडणं आणि सोबत पाली सुद्धा गायब झाल्या आहेत. तिला काही झालं की सगळ्यांचा जीव कावरा बावरा होतो. माणूस म्हणून असणाऱ्या सर्व संवेदना तिने जागृत केल्यात. तिचे दात शिवशिवत असतात हल्ली त्यामुळे न खुपसता ती आम्हाला चावी चावी कलते. 

मनातलं कळतं की काय !

इतर वेळी आपल्याला खिजगणतीतही न मोजणारी ही व्यक्ती आपल्याला बरं नसलं, मनस्थिती ठीक नसली, तर कधी पोटावर येऊन झोपते, तर कधी पांघरुणात. सकाळी तिचं म्याव म्याव करत मागणं सुद्धा किती नाजूक,संयत ! किती शिकावं आणि किती नाही.

आम्ही खरंच समजतो,की परमेश्वराने तिला आमच्याकडे पाठवलं आहे! एक प्रेषित .....

वायफळ चर्चा ? नव्हे : कंटेंट चे उगमस्थान !👍

कालपासून मराठी कनेक्ट च्या टेलिग्राम ग्रुप वर एक चर्चा रंगली होती :- 

"लोक छोट्या व्यावसायिकांना पैसे द्यायला कुरकूर करतात"

"सध्या स्पर्धा फार आहे,टिकून राहणं मुश्किल"

"वेगळेपण हवं वगैरे ..."

हे वेगळेपण प्रथम समजून घ्यायचं आणि मग ते लोकांपर्यंत पोचवायचं हा खरा कंटेंट

मग तो किती हजार , लाख वगैरे पर्यंत जाईल, हा प्रश्नच नाही आपला. आपण समोर आलेल्या प्रत्येक प्रसंगातून फक्त आपलं offering अजून कसं ग्राहकाभिमुख करता येईल, किंवा त्याची वैशिष्ट्ये कशी अजून उलगडून सांगता येतील, ती सुद्धा एखाद्या मर्यादित audience लाच फक्त

ते स्वतः हुन आपल्याला जगाकडे नेतील यथावकाश.🙋💗 आपण फक्त एक उत्तम वेचक असायला हवं बस्स

ह्याच ग्रुप वर चर्चा सुरू असताना मध्येच एक "हुरड्या" ची पोस्ट आली, आणि मला समजून आलं, की आपल्याला जरी वाटत असेल ना, की " हे काय; सगळ्यांना ठाऊक असेलच की, इतकं काय त्यात !" तर ते तसं नसू शकतं. मला वाटत होतं की हुरडा? माहीत असेलच की ! पण तसं नव्हतं ना ! अनेक जण अनभिज्ञ होते, आपली मऱ्हाटी मंडळीच.

ही चर्चा बघा ..


@xxxxxxxekar thanks for making this winter Beauty available in bnglr😋😋😋

xxxxxikar MC:
This is hurada

xxxxxtale:
Hurda... Ponk

xxxxxxxikar MC:
Tender jowar grains

xxxxekar Bangalore xxxale:
This is Hurda/Tender Jowar, a winter delicacy from Maharashtra and Gujarat. 

It's is roasted and eaten or some people make recipes like Vada.

It's is very healthy food with high fibre content

अधोरेखित केलेले शब्द, वाक्य, वाक्यप्रयोग नीट पाहू. जर हुरडा हा पदार्थ ( वेगळा म्हणून ) आपण निवडला असेल, तर फक्त ही चर्चा नीट निरीक्षण करून त्याचे किती कंटेंट variations तयार करता येतील हे दिसून येईल.
  1. winter Beauty
  2. This is hurada
  3. Hurda... Ponk
  4. Tender jowar grains
  5. Hurda/Tender Jowar
  6. winter delicacy from Maharashtra and Gujarat. 
  7. roasted and eaten
  8. some people make recipes like Vada.
  9. very healthy food with high fibre content
मला नाही वाटत की ह्याच्यावरून पोस्ट्स तयार करणं तितकं अवघड असावं !

तुमचं काय मत ? कमेंट्स मध्ये सांगा जरूर

Wednesday 5 January 2022

Quality Time वगैरे

बरेच फंडे मारतात यावर, माझ्या मते तर हे इतकं काही नसतंच ! अगदी लहान सहान गोष्टींतून मस्त खुष राहता येतं, हाच तर quality time !

स्वतः पाणी पुरी खाणें-खिलवणे हा एक अत्यंत कमी वेळात mood बदलवून टाकणारा प्रकार आहे हा आपला मॅनेजमेंट फंडा हाय !

गमावलेली संधी की अजून काही ?


हे फोटो घेतलेत आपल्या सदाशिव पेठेतील प्रसिद्ध पूना बोर्डिंग च्या बाहेरच्या veranda मधून. बाहेरच्या भिंतीवर ही अशी random पोस्टर्स लावली होती, ती पाहून मनात आलेले विचार 

हे जाहिराती का घेत नाहीत ?
मस्त modernize का करत नाहीत ?
पुढे कोण सांभाळणार ?
कदाचित आटोपशीर ठेवायचा असेल कारभार

तुमच्या मनात काय येतंय ? 

जरूर पोस्ट करा प्रतिक्रिया द्वारे !

"चहा" बद्दल थोडं ...


ब्रँडेड चहा : एक concept घेऊन केलाय तयार जसा की खांडसरी. इथे शक्यतो एकाच प्रकारचा चहा मिळतो, ही मंडळी franchise विकतात

टपरीवर चा चहा : इथे customised चहा मिळू शकतो, म्हणजे हवा तसा ... कारण ब्रँड फिंड नो भानगड at all, ग्राहक खुश !


Tea on Wheels म्हणा किंवा cloud tea किचन म्हणा : जवळपास ची कार्यालये किंवा दुकाने हे ह्यांचे टार्गेट. Door Delivery.

*Value proposition* समजून घ्यायला मदत होते ह्याची. 

नजरेस आलेलं एक पोस्टर


ह्या एकाच पोस्टर मध्ये अनेक गोष्टी आहेत, काय वाटतं तुम्हाला ?

हे करणं योग्य आहे, की एकच बिझनेस ?