मागे एका *पोस्ट द्वारे मी Automation Tools च्या अतिवापराने होणारे दुष्परिणाम ह्याबद्दल बोललो होतो. वारंवार अनुभव येऊन सुद्धा आपण ह्यांना कधी हुक होऊ हे सांगता नाही येत.
आता काय; सगळे whatsapp वरच असतात ना ! अशा उथळ विचाराचा आधार घेऊन मी **संपर्क-सेतू नामक नवीन tool द्वारे whatsapp newsletter तयार केले आणि माझ्या जुन्या-फिन्या, संपर्कात असणाऱ्या/नसणाऱ्या मंडळींना सुद्धा ते पाठवायला सुरुवात केली आणि परिणामी माझा नंबर whatsapp ने लागोपाठ दोन दिवस, दोनदा ban केलेला होता. ह्यामुळे सुरु झाला माझा उलटा प्रवास, कि हे का होत असेल ?
हे realize झालं ...
- सगळे whatsapp वर असतात (हे कुणी सांगितलं मुळात ?) .... हे सगळे मला नक्की हवेत का ?
- सगळ्यांना माझा कंटेंट का बरं आवडावा ?
- कित्येक मंडळींच्या मी विस्मरणात सुद्धा गेलो असेन !
- Whatsapp मध्ये खूप लिंक्स टाकायच्या नाहीत
- Whatsapp मध्ये फक्त block असतं ; unsubscribe नाही, इथूनच लोक report करतात
- ** संपर्क सेतू मधील chat-bot हे उपयुक्त आहे ते वापरायचं
- ***न्यूज लेटर हा सशक्त पर्याय होऊ शकेल
- इमेल हे कदाचित कमी वापरलं जात असेल, किंवा स्पॅम मधून वगैरे शोधावं लागत असेल; हे फक्त तीच मंडळी करतील, ज्यांना खराखुरा रस आहे !
- न्यूज लेटर चा subscribe form असेल, जो मी फक्त relevant ग्रुप्स तसेच whatsapp status ला ठेवेन त्यातल्या त्यात !
==================================
Footnotes
* https://nupune.blogspot.com/2022/01/tools.html
** Joy Web ही संपर्क-सेतू ची channel partner आहे. लिंक क्लिक करून काही purchase केल्यास joy ला अर्थार्जन होते. ह्या आधी किंवा नंतरही सल्ल्यासाठी स्वागत.
*** http://eepurl.com/hTptNT
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.