Monday 24 January 2022

समोरासमोर शिकण्याचं महत्त्व


ही एक पोस्ट मला आली काल, शिवाय मला एक मित्र काल परवा म्हणाला ... की मी अनेक कोर्सेस ना signup करून ठेवलंय, अनेक नेटप्रसिद्ध व्यक्ती LMS स्वरूपात असे कोर्सेस तयार करत असतात, ज्यात "कधीही डाउनलोड करा" हा एक मोठा हुक असतो. वरची इमेज हेच दर्शवते.

चॉईस शिकणाऱ्याचा आहे 

तो शिकविणारा काहीही करेना का तिकडे, शिकणाऱ्या ने ठरवायला हवं की मला कसं शिकायचं आहे ते. हे त्या प्रश्नावर सुद्धा अवलंबून असतं, म्हणजे अगदी फक्त प्रोसिजर बघायची आहे,तर हे direct डाउनलोड ठीक आहे,पण जर त्या मागची मनोभूमिका समजून घ्यायची असेल तर मात्र तुम्हाला समोरासमोर शिकणेच श्रेयस्कर.

माझे होम स्टडी कोर्सेस जास्त महाग आहेत :😊

पहिली गोष्ट : समोरासमोर शिकणे म्हणजे physically च समोर असावं असे नाही. झूम वर सुद्धा हे शक्य आहे. उलट जास्त छान होतं, हा माझा अनुभव आहे.

माझ्याकडे कुणी होम स्टडी कोर्सेस मागतात, जे live पेक्षा जास्त किमतीचे आहेत. माझी मनोभूमिका अशी :-

माझा अनुभव हा समोरासमोर शिकण्यातूनच सर्वोत्कृष्ट deliver होऊ शकतो. त्यामूळे त्यालाच मी सर्वात जास्त महत्त्व देतो. ज्याला हे करायचं आहे तो बरोब्बर वेळ देतो. ज्याला होम स्टडी हवंय, त्याला त्याच्या वेळेनुसार हवंय,त्याला हवं तेवढाच हवंय, म्हणजे त्याच्याकडे कदाचित असा वेळ किंवा वेळ देण्याची तयारी नसेल, म्हणून त्याने जास्त किंमत मोजावी. असा होम स्टडी कोर्स न देणं हा सुद्धा पर्याय होऊ शकेल, पण काहीच न घेणे ह्यापेक्षा निदान होम स्टडी तरी करतोय, हेही नसे थोडके !

Scaling up हा approach मला इथे मान्य नाही

लोकांना आपले विचार हवे असतात,त्यांच्या प्रश्नांना आपली प्रत्यक्ष, व्यक्तिगत उत्तरे हवी असतात. ती देणे हे माझं काम, स्वधर्म. ही न देता येणे, म्हणजे पुन्हा ह्या मूळ तत्त्वापासून फारकत.म्हणजे पुन्हा misalignment. 

ह्या होम स्टडी, किंवा direct download प्रकरणात ही नाही देता येत. म्हणायला कंटेंट मिळतो,पण उपयोग शून्य. हीच परिस्थिती एकाच वर्गात 50 मुले बसविणे ह्यामुळे उद्भवते. समोरासमोर असली तरीही. 




No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.