Sunday, 23 January 2022

स्वतः चीच पाठ थोपटली .....


22 तारखेला joy ला 12 वर्षे पूर्ण झाली. ह्यात जगाचं जाऊद्या, पण स्वतः चंच जास्त कौतुक वाटतंय.

माझ्या 2010 च्या life चा आढावा घेतला तर "धरसोड" किंवा "अननुभवी निर्णय" असं घडलं आहे, परिणामी खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकणाऱ्या झाडाला मी उतावळेपणा करून किंवा सणकेत छाटून टाकलेलं आहे. ज्या मूळे ते उद्योगझाड़ कायमचं मरून गेलं.

आणि आता त्याच वेळी टिकून राहिलेली झाडं एकतर स्टेडिलि वाढत तरी आहेत किंवा बहरली तरी आहेत.

सूत्र : सातत्य

मिलिंदने केलेल्या भाष्यात एक मला summarize करणारी गोष्ट काय आहे ? तर ती म्हणजे :-

तिरचंचल, भ्रमर, फिरस्ता 

मित्र म्हणून छान वाटणारी ही विशेषणे एक व्यावसायिक म्हणून मात्र छान नव्हेत. तीच खोडण्याचा हा एक गेली 12 व येति अनेक वर्षे अविरत होत असलेला मनापासून प्रयत्न आहे.

2 comments:

  1. भ्रमर नाही पण मधमाशी नक्की आहे... मधमाशी ही परागीभवन करुन इतर अनेक फुलं फळं तयार करायला मदत करते. आपण अनेक उद्योजक तयार करत आहात... ते कार्य महत्त्वाचे आहे

    ReplyDelete

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.