- छापून येणाऱ्या बातम्यांतील आणि प्रत्यक्ष असणाऱ्या आर्थिक आकड्यातील तफावत
- शेवटच्या तिमाहीत कंपन्या आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी करत असलेली धावाधाव.
पब्लिक लिमिटेड कंपन्यांना हे अहवाल प्रत्येक तिमाहीला सादर करावे लागतातच. त्याबद्दल फार नको बोलायला, परंतु ह्या निमित्ताने आपण लघु, तसेच अति लघु किंवा वैयक्तिक व्यावसायिक मंडळी आपल्या व्यवसायाचे परखड परीक्षण करतो का , आणि ते केल्यास काय फायदे होतात ह्याचे एक उदाहरण :-
मी स्वत: भारतीय युवा शक्ती ट्रस्ट ह्या संस्थेसोबत एक Mentor ह्या नात्याने अनेक वर्षे कार्यरत आहे. काम हेच : नवीन उद्योजक मंडळींना, ज्याना कर्ज वितरीत झाले आहे त्यांना साधारण दोन वर्षे मदत करत राहणे. त्यांचा व्यवसाय सुस्थितीत आणणे, अडचणी असल्यास मदत करणे.
एका वस्त्र उद्योजकाची कहाणी :-
ह्याचे एक दुकान आहे ते सिंहगड कॉलेज च्या परिसरात. सुरुवातीला जम बसेस्तोवर काही अडचणी होत्या, ज्या वाहत्या गल्ल्यामुळे तसेच दिलेल्या गेलेल्या रोकड कर्जामुळे ( CC ). त्यात त्याने सतत विचारणा होत असल्याने पादत्राणे तसेच चष्मा goggles ह्याचेही एक छोटे दालन बाजूला सुरु केले.
नियमित, परखड परीक्षणाचा फायदा
सुरुवातीस दर महिन्यातून एकदा , व नंतर दर तीन महिन्यांतून एकदा आम्ही नफा-तोटा पत्रक तसेच ताळेबंद पाहत राहिलो. तो सुरवातीला तयार नव्हता तरीही आकड्यांच्या संकेतानुसार त्याने त्याच्या आवडीचा परंतु व्यवसाय संमती देत नसलेला निर्णय घेतला, आणखीही सोबत काही निर्णय घेतले ते असे :-
- पादत्राणे दालन बंद केले
- "प्रत्येक मागणी आपल्याला पुरवता यायलाच हवी" हा दुराग्रह काढून टाकला. ह्या मुळे XXL प्रकारचे फक्त २०-२५ शर्टस विकले जात, परंतु साठा मात्र त्याच्या १० पट करावा लागे. हा पडून राहणारा Asset ताळेबंदात सतत दिसायचा, त्यामुळे मालमत्ता कमी होत होती.
- हाच अर्थ प्रवाह मागणी सतत असणाऱ्या वस्त्रांकडे वळवला.
- आणि हीच कृती पुढे दोन तिमाही कायम ठेवली.
परिणाम स्वरूप :-
- नफ्यात भरभक्कम वाढ, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ तसेच बोनस देता आला.
- वेळ बराच शिक्कल राहिला, ह्यातून नवीन अजून एक दुकान काढले, असेच, पण वेगळ्या भागात ( ह्याबद्दल आम्ही पूर्वी चर्चा केलेली होती ).
- नवीन सामान विक्रीस नाही ठेवलेले, आहे त्यातील उप प्रवर्गातील वस्त्रे ठेवली, गरजेप्रमाणे साठा कमी जास्त केला.
- मुद्दा १ आणि २ मुळे आधीचाच एक कर्मचारी आता मूळ दुकान पूर्णपणे चालवितो, तर हा स्वत: आता नव्या दुकानी बसतो, ते चालवितो. ( नया धंदा , पुराना आदमी )
- हेही दुकान आता जेमतेम ६ महिन्यांतच Cash Flow + ve झालेले आहे.
ह्यामुळेच निवडक उद्यमी च्या त्रैमासिक बैठकींत आम्ही आता एकमेकांच्या उद्योगाचे परखड परीक्षण करत असतो.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.