विशेष हे , की त्यांनी सर्व ढाचा, ज्या पारंपरिक पद्धतीने कंपन्या चालवल्या जातात, त्या त्रिशंकू व्यवस्थापनाला तोडून मोडून, कंपनी ही "मनुष्य" केंद्री केली. आणि प्रचंड यशस्वी करून दाखविली.
भारताप्रमाणे ब्राझील मध्येही ट्रॅफिक, गर्दी इत्यादी समस्या आहेतच. त्यात लवचिक वेळा, स्वतः च स्वतः चे उत्पन्न ठरवणे, आपले ऑडिट आपल्या कनिष्ठ मंडळींकडून करून घेणे, कर्मचारी मंडळीना नफ्यात भागीदार करून घेणे, ह्यामुळे त्यांना अपेक्षित तो परिणाम त्यांना लाभला :- सकाळी अत्यंत प्रेरित होऊन कामाला आतुर असलेला कर्मचारी वर्ग.
तरीही सर्व काही लोकशाही पद्धतीने व्हायलाच हवे असा त्यांचा दुराग्रह नाही. काही युनिट्स अगदी लष्करी खाक्याने देखील चालत आहेत त्यांची. कारण मुळात "माणूस" समजून घेतलेला आहे.
निरुपयोगी मेट्रिक्स काढून टाकणं, मशीन असेम्ब्ली करिता पट्टे नसणे, अनावश्यक कागदपत्रे टाळून एक पानी टाचणे, तसेच कर्मचाऱ्यांची ठोकळबाज उतरंड काढून टाकून नवी लहानशी कंट्रोल युनिट्स तसेच मला सर्वात भारी वाटलेली म्हणजे अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना त्यांनी राबविलेली उपग्रह उद्योग उपक्रम व्यवस्था. अर्थात कर्मचाऱ्यांना कंपनीचे भाग सप्लाय करण्याकरिता मदत, शिक्षण , तसेच संपूर्ण सहकार्य. अचंबित करणारे आहे सर्व.
काही वाक्यं मला खूप वेगळी वाटली ती खाली देत आहे :-
- मिनिटा मिनिटाचा हिशोब ठेवणाऱ्या ला जीवनाची संकीर्णता समजूच शकणार नाही
- जेव्हा मी काहीच करत नसतो तेव्हा मी अतिशय कार्यकुशल असतो
- जे निर्णयाचे परिणाम भोगणार आहेत त्यांच्यावर निर्णय सोडणे
- तपशिलाचा चिखल
- माहिती गोळा करायचा हव्यास
- जेव्हा मी अर्धा दिवस, घरून काम करायचं ठरवलं तेव्हा सर्वांना वाटलं की मालकाचा मुलगा, आराम मिळावा म्हणून बहाणा करत असेल. त्यांची ही शंका दूर करण्याचे जाणीव पूर्वक प्रयत्न मी केले नाहीत.
- माझी गरज आहे अशी परिस्थिती निर्माण होणं ही लाज आणणारी गोष्ट आहे
आणि अशी अनंत वाक्ये.
केळकरांनी देखील अगदी छान मराठीत वाक्ये वापरून अनुवाद करण्याचा यत्न केलाय.
इतर अनेक अनेक अनुवादित साहित्या प्रमाणे ह्यातही मूळ इंग्रजी आहे ते प्रसंगी फोड करून, विलग करून आणि सोपे करून न सांगितल्याने अर्थ समजायला खूप अवघड जातं.
पण ते अगदीच माफ. कारण असे पुस्तक मराठीत आणणे ही कल्पना सुचणे, ते प्रत्यक्षात करणे ह्या सर्वकारिता केळकर : आपले आभार.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.