Saturday, 20 July 2024

Wiring बदलण्याचा राजमार्ग !



शिव राज्याभिषेकाच्या तस्वीरीत काही गुजराथी व्यापारी दिसतात. गुजरातेतल्या लोकांशी अगदी युरोपातील अनेक व्यापाऱ्यांशी कित्येक वर्षे व्यापारी संबंध होते. सुरत हे अत्यंत मोठी व्यापारी पेठ होती-आहे. 

हे आवर्जून सांगायचं कारण म्हणजे भिडे सर , म्हणजे Saturday Club चे संस्थापक, ह्यांनी हे वेळीच ओळखलं आणि गुजराथी मंडळींची ही व्यावसायिक वृत्ती मराठी माणसांत उतरवायची असा चंग बांधला, आणि ही वृत्ती निर्माण होण्यासाठी मराठी माणसाचं "वायरिंग" बदलायचा एक Crash उपक्रम तयार केला, तो म्हणजे Saturday Club !

वर्षानुवर्षे नोकरी पेशात मुरलेल्या मराठी माणसांत हा व्यवसाय हळूहळू परंतु निश्चित स्वरुपात भिनायला लागतो तो काही विशेष गोष्टी त्याच्या नकळत त्याच्या सुप्त मनात कोरल्या गेल्याने !

हा बदल ( किंवा कोणताही ) घडायला प्रमुख लागतो, तो "विश्वास" आणि शिवाय अजून दोन गोष्टी : त्या म्हणजे तंत्र-कौशल्य आणि सराव. Saturday Club च्या सतत एका ठराविक दिनक्रमाने होत राहणाऱ्या व्यावसायिक मिटींग्स मुळे ; तसेच त्यात share केल्या जाणाऱ्या सभासदांच्या यशोगाथांमुळे हे साध्य होते, होत राहते.

हळू हळू हे वायरिंग बदलत जाते आणि घडतो एक पक्का व्यावसायिक !

आज Saturday Club हा एक समाज आहे , ज्यातून अनेक चळवळी निर्माण होत आहेत, एक "श्रीमंत" मराठी माणूस निर्माण करण्याकरिता. 

एकदा वायरिंग बदललं कि नवीन पिढी देखील व्यवासायाकडेच आकृष्ट होते आणि एक नवा समाज घडू लागतो !

अशा एका द्रष्ट्या युगपुरुषाला आज गुरुपौर्णिमेच्या खास वंदन !

1 comment:

  1. खरंच आहे. 3 महिन्यापूर्वी मी भीत भीत जॉईन झालो काय आणी आता saturday club म्हणजे काय आहे आणी त्याची व्याप्ती किती खोलवर आणी विशाल होत जाणार आहे हे कळायला सुरवात झाली आहे.

    ReplyDelete

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.