१. सरकारने अचानक बदललेले सौर ऊर्जा धोरण. ह्याबद्दल ऑलरेडी दोन लेख झालेत.
२. अमेरिकेने अचानक लादलेले अतिरिक्त आयात शुल्क.
ह्या घटना बघितल्या तर त्या त्या उद्योगांवर होणारे निकटचे तसेच दूरगामी परिणाम लक्षात येतील. अनेक उद्योग कदाचित बंद देखील पडू शकतील.
करार मदार : सावधपणे घेऊयात !
"डोळस" पणे हा शब्द अधिक संयुक्तिक आहे. ट्रम्प महाराज तिकडे आयात शुल्क वाढवत असतानाच ब्रिटन व भारत करार झालाय. आपल्या देशाच्या नेतृत्वाला भारतीयांना नव्या संधी उपलब्ध करून देणे भागच आहे. त्यामुळे अमेरिकेची बाजारपेठ जर का लांब पल्ल्यासाठी अशीच अनिश्चित राहिली तर निदान इतर देश तरी बांधून ठेवायलाच हवेत. ब्रिटन ने देखील ही अगतिकता ओळखून आपल्या scotch बाटल्यांवरील भारतातील आयात शुल्क ५० टक्क्यांनी कमी करून घेतले आहे. ब्रिटन च्या scotch निर्यातीपैकी ९० टक्के निर्यात भारताला होते. त्यामुळे त्यांना ह्या कराराचा जास्त फायदा होणार आहे.
तरीही समांतर पणे विचार करता अनेक वस्तू जसे की चामडी वस्तू, रसायने, पादत्राणे, रत्ने , दागिने, कापड आणि कोळंबी तसेच सेवा ह्यांवर ब्रिटन शून्य टक्के आयात कर लावेल. ही सुद्धा एक उत्तम संधी आहे. कारण नेमक्या ह्याच वस्तूंना अमेरिकेच्या धोरणाने फटका बसला आहे.
ह्यामुळेच डोळस हा शब्द वापरला. असो. तरीही, लवकरात लवकर आवश्यकता आहे, ती एक "गुंतवणूकदार" होण्याची.
म्हणजे करायचं इतकंच, की स्वत:च्या व्यवसायासोबत थोडी थोडी गुंतवणूक इतर व्यवसायातही करायची, जे कदाचित भरभराटीला येतील.एक पूर्वीचा लेखांक पहा
कारण स्वतःचा उद्योग अनिश्चित असला तरीही स्वतःचे आर्थिक स्रोत तर शाबूत ठेवावेच लागतील !
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.