वेळ घालवायचा असेल, छान बीन वाटत असेल, गवाक्ष खरेदी ( window shopping ) करायचे असेल, किंवा चक्क एसी ची हवा खायची असेल तर जावे खुशाल पण उगीच जुने विश्वास कवटाळून मी तरी नाही बसत.
ऐवजी, हल्ली नीट पुस्तके निवडून घ्यायला शिकलोय. सोबत ती वाचताना, अभ्यासपूर्ण असतील, तर काही विशेष गोष्टी सुद्धा अंगीकारल्या आहेत आता. तर पहिलं:- पुस्तके निवडताना :-
त्याच्या reviews वर जाणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण आधी पहा की किती reviews आहेत. निदान ( विषयानुसार ) १०० किंवा २०० तरी हवेत. जसे पुस्तक जास्त खपू लागते, तसे reviews वाढू लागतात. चांगल्या सोबत वाईट सुद्धा.
तर दुसरे म्हणजे अमेझॉन बऱ्याच वेळा आधी वाईट अभिप्राय दर्शवते. आपण लेटेस्ट प्रमाणे क्रमवारी लावून पाहू शकतो. तर वाईट कशाला म्हटले आहे, ते बऱ्याच वेळा पुस्तकाच्या वापराशी संबंधित नसूही शकेल. उदा मी काही पुस्तके वाचत असतो खास करून finance ह्या क्षेत्रात. मी त्या मानाने नवखा आहे,त्यामुळे जी पुस्तके मी खूप भारी म्हणालो आहे ती एखाद्या पारंगत व्यक्तीला खूप बेसिक वाटू शकतात. हे नीट पाहा.बऱ्याचदा कमी पाने आहेत, वगैरे लिहिलेले असते. ह्यालाही विशेष अर्थ नाही. मुळात अगदी ४.० च्या खाली स्कोअर असलेली पुस्तके आधी नकाच निवडू.
पुस्तक वाचताना, मी स्वतः सोबत जेमिनी चा खूप आधार घेतो. अगदी शाळकरी मुलाप्रमाणे परत परत उत्तर नीट मिळेपर्यंत विचारणा करत राहतो. हे अत्यंत उपयुक्त ठरते.सोबत स्टुडिओ वर असेन तर चक्क प्रिंट्स काढतो, file करून ठेवतो.
एक नव्हे तर असंख्य बुकमार्क वापरतो. पुस्तक वाचताना उपयोगी पडतात. काही विशेष पानांवर असलेला संदर्भ फक्त त्याच्या index वरून समजत नाही. तर तो माझ्या अभ्यास वहीत चक्क त्याचा पान क्रमांक टाकून मला त्यातून कोणता प्रश्न उत्तरीत झाला किंवा नवीन काय समजलं हे माझ्या भाषेत, बऱ्याच दा मराठीत ( पुस्तक इंग्रजी असेल तरीही ) लिहितो. हे कुठेही पोस्ट करण्यासाठी नाही तर मलाच कुठे चटकन संदर्भ लागला तर खूप उपयुक्त पडते.
उत्तम माहिती, पुस्तके निवडण्यासाठी जेमिनी हा विचारच केला नव्हता, धन्यवाद . Bookmark चा concept फक्त कळला नाही, सांगितला तर बरे होईल
ReplyDeleteसर, पुस्तके वाचताना जेमिनी असा विचार आहे.
Deleteबुकमार्क एकच असा प्रघात आहे. पण बऱ्याच वेळा पुस्तक, खास करून सदर्भ पुस्तके वाचत असताना, एखाद्या पानावरचा मजकूर पुन्हा पुन्हा, बऱ्याच वेळा वापरावा लागतो, उपयोगात येत असतो. अशा वेळी चालू पानावर एक आणि त्या पानावर देखील एक असे एकाहून अधिक बुकमार्क वापरले तर छान उपयोगी पडतात.
अनेक बुकमार्क वापरायची आयडीया आवडली.
ReplyDeleteआणा मग अंमलात !
Deleteमाझ्या अनुभवाप्रमाणे मासिकात किंवा वर्तमानपत्रात पुस्तकाचा आलेला रिव्ह्यू ही माहिती असते. पण तो एकांगी असतो म्हणजे पुस्तका च्या खपासाठी कुणीतरी लिहिलेले असे मला वाटते. क्वचितच पुस्तकाच्या लिमिटेशन्स त्यात सांगितलेल्या असतात त्यामुळे इतर ठिकाणचे रिव्ह्यूज आणि इतरांना विचारूनच पुस्तक वाचायला सुरुवात करावी असे मला वाटते
ReplyDeleteमलाही असेच वाटायचे. आणि मी अशी पुस्तके घेण्याच्या विरोधात असायचो. पण आता जरा वेगळा विचार करतो. जरी एखाद्या पुस्तकाचे प्रमोशन म्हणूनही असले ( सर्व तशी नसतात हा अनुभव आहे ) तरीही निदान अर्ध्या पेक्षा जास्त वेळा चांगलीच पुस्तके विकत घेतली गेली आहेत, हे कुणीतरी हे काम करून ठेवले म्हणून. असतात मर्यादाही दिलेल्या.
Deleteलेखात मी म्हणलेले अभिप्राय ( Reviews ) हे माझ्या amazon वरील एका पुस्तका बद्दल विविध वाचकांनी मांडलेल्या प्रतिक्रियांविषयी आहेत.