Tuesday, 26 August 2025

स्वधर्माचे महत्त्व

सरकारने पैसे लावून ऑनलाईन गेमिंग व्यवसायावर बंदी आणली आहे. परिणामस्वरूपी ७० हजार डॉलर ची dream eleven नामशेष व्हायच्या मार्गावर आहे. बायजू तसेच सहारा इंडिया ह्यांसारख्या कंपन्यांनी प्रत्यक्ष उत्पादने भक्कम करण्या ऐवजी अल्पावधीत लोकप्रिय होत चाललेल्या टी 20 क्रिकेट करिता BCCI ला प्रायोजक राहून मोठा ग्राहकवर्ग ओढला. मुळात ह्या कंपनीचे व्यवसाय प्रारूप काय तर ग्राहकाला नादाला लावणे. हे कधीतरी गोत्यात येणारच होते. आले. इतकेच. 

थोड्याफार फरकाने युट्यूबर किंवा इंस्टाग्राम वरून कंटेंट क्रिएटर्स हा जो एक नव उद्योग म्हणून उदयास येतोय, त्याचीही वेगळी कथा नाही. आपले मूळ काम काय, आणि आपण काय प्रकारचं साहित्य निर्माण करत आहोत ह्याचं भान ह्या मंडळींना कधीच अस्वस्थ करत नाही. कारण त्यातून मिळणाऱ्या ( किंवा भासमान ) आर्थलाभाला दिलेले निव्वळ महत्त्व. माझ्या समोर दोन उदाहरणे आहेत :- 

एक आमचा कुटुंबाचा मित्र ज्याचे कला शाखेतील सर्वोच्च विद्यालयात शिक्षण झाले आहे, आणि त्याला त्यात खूप उत्कृष्ट असे प्रावीण्य लाभले आहे. ज्याने हा मार्ग स्वीकारला आहे,आणि तो आज खूपच जास्त पैसे मिळवीत आहे,आणि राहिलही. तो जो काही आशय पोस्ट करत असतो,त्याचा आणि त्याच्या मूळ प्रावीण्य असलेल्या विषयाशी काहीच संबंध सापडत नाही. बर जो आशय तो पोस्ट करतो,त्यानेही प्रेक्षक वर्गाच्या आयुष्यात काही गुणात्मक बदल घडत असेल असे वाटत नाही.

दुसरे उदाहरण माझे स्वतः चेच. अनेक वर्षे माझ्या water बिझनेस बद्दल मी व्हिडिओज करत आहे. Youtube वर पोस्ट देखील करत आहे. बऱ्यापैकी subscriber आहेत. सोबत इंस्टाग्राम वर सुद्धा मी हल्ली हल्लीच काही कंटेंट पोस्ट केला आहे. काही पाण्याविषयक मूलभूत संकल्पना समजावून सांगण्यासाठी. अचानक एका व्हिडिओ ला प्रमाणाबाहेर लोकप्रियता मिळाली. ह्याचे कारण काहीच नाहीये. तर ह्याच्या नादाला लागून मी व्यावसायिक आणि अधिक असेच व्हिडिओ तयार करणे, दर आठवड्याला दोन व्हिडीओ टाकणं वगैरे म्हणजे परत मूळ उद्देशापासून फारकत. मुळात आठवड्याला दोन असे काही असायला तर हवं. त्यामुळे ह्या नादाला मी फार लागत नाहीये.

फरक आहे तो स्वधर्म निवडायचा

स्वधर्म म्हणजे सहज धर्म. माझे व्यावसायिक काम काय ? तर लोकांनी व्यवसायात, (त्यात water business हा एक), येणाऱ्या विविध आव्हानांना तोंड देताना सतत आर्थिक फलकाकडे लक्ष ठेवून मार्गक्रमण करावे ह्या करिता नियमित काळाने त्यांच्यासोबत केलेले त्रयस्थ अवलोकन व सुधारणा. 

माझ्या स्वतः बाबतच मी हे करत आलोय, हे माझे qualification. हा सहज होणारा धर्म. स्वधर्म. 

ह्याचे स्मरण, भान ठेवले तर माझ्याकडून इतर कृती होणारच नाही. ती मिळणाऱ्या संपत्ती किंवा लोकमान्यते पेक्षाही जास्त महत्त्वाची आहे, कारण हे काम मी अगदी शारीरिक दृष्ट्या पूर्ण हतबल होई पर्यंत निश्चित, सहज करू शकतो.

तर व्यापक प्रमाणावर पाहता तर ह्या कंपनीचे उच्च उद्दिष्ट नाही की ज्या कामाबद्दल काहीही अभिमान असावा. त्यामुळे स्वधर्माचा पत्ताच नाही. स्पिरिचुअल नाही आहे हे प्रतिपादन. इसमें समझदारी भी हैं 

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.