Friday, 22 August 2025

उत्तम कार्यक्रम कसा असावा...


तारीख २१ ला  महाराष्ट्र bottled water असोसिएशन तर्फे Fssai चे एक प्रशिक्षण ठेवण्यात आलेले होते. त्याबद्दल थोडे ...

मला आधी थोडी शंका होती. कारण असोसिएशन, शिवाय कार्यक्रम विनामूल्य, बालेवाडी संकुलात. एकंदरीत हा जास्त सत्कार सोहळा आणि कमी प्रशिक्षण असा अनुभव असेल ह्याची तयारी ठेवून मी गेलो होतो. अनेक संस्थांचे वार्षिक कार्यक्रम म्हणजे एक निव्वळ टाईमपास असतो नाहीतर. एक लेख ह्या संदर्भात लिहीलाय,वाचा जमल्यास.

परंतु अत्यंत चूक ठरला माझा समज. सत्कार होते, परंतु अगदीच मोजके आणि आवश्यक. प्रायोजकांचे.हे व्हायला हवेतच. ज्यांच्यामुळे हा उत्कृष्ट असा कार्यक्रम अनुभवला. तीन सत्रे तीही अत्यंत परिपूर्ण अशी. Fssai तर्फे त्यांचे प्रमुख अधिकारी मुंबईहून खास आलेले होते. त्यांनी भरपूर ( पुण्याच्या भयंकर ट्रॅफिक मध्येही ) वेळ दिला, अगदी नीट सर्व बदललेले नियम समजावून सांगितले.

उपस्थित मंडळींना ह्याची गरज होतीच,आणि मोठ्या संख्येने संस्थेला प्रतिसाद मिळाला.

चोख व्यवस्था होतीच, त्यात आयोजक मंडळींची आस्था अधिक जाणवली, की प्रत्येक सहभागीला सारे काही व्यवस्थित मिळावे. प्रशिक्षण. 

हे सारे विशेष नमूद करण्याचं कारण असं की हल्ली अनेक संघटनांचे कार्यक्रम अटेंड करतो,त्यात स्वतः चा उदो उदो हा मुख्य अजेंडा असतो. 

नाही म्हणायला काल हे होतं पण ते एकमेकांविषयी वाटणारे प्रेम जास्त होते, उदो उदो कुठेही नव्हता.

शिवाय प्रायोजकांकडून मिळालेली सर्व रक्कम ह्या कार्यक्रमावरच खर्च झाली असणार. कारण जवळपास ५०० तरी लोक असावेत. सर्वांची नाश्त्यासकट जेवण व हाय टी पर्यंत सर्व व्यवस्था, उपस्थितांना प्रशिक्षण विनामूल्य देऊ करणे ही खूप मोठी बाब आहे. ह्यात असोसिएशन स्वतःची तिजोरी लठ्ठ करू पहात नाहीये, हे विशेष.

महाराष्ट्र bottled water असोसिएशन ह्यांचे ह्याबद्दल त्रिवार अभिनंदन.

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.