Friday, 28 August 2026

अफाट मानसिक शक्तीचे प्रदर्शन ....

 


वरचा screenshot आहे तो नुकत्याच पार पडलेल्या भारत वि श्रीलंका कसोटी तील श्रीलंकन दुसऱ्या डावाचा. 

"सहज खिशात घालू" असे समजणाऱ्या, नव्याने "आपणच क्रिकेट चे राजे" ह्या दिमाखात वावरणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या तोंडचे पाणी ह्या तळाच्या ३ फलंदाजांनी अक्षरश: पळवले. दिनुशा चे कौतुक आहेच ; पण स्वत:कडे so called फलंदाजी कौशल्य प्रामुख्याने नसताना फक्त "उभे राहीन" हा विश्वास स्वत:वर ठेवून उत्तम किल्ला लढविणाऱ्या दिनुशा ला साथ देणाऱ्या ह्या वीरांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

हरवत चाललेल्या " Playing for Hours Together & Offering No stroke At All " ह्या वृत्तीचे दर्शन गावस्कर, द्रविड, पुजारा ह्यांच्यानंतर आज घडले. शिवाय मला ती विश्वचषकातील ग्लेन Maxwell ची inning आठवली. त्यात स्वत: उत्तुंग फटके मारू शकत असणाऱ्या Pat Cummins नेही स्वत: च्या नैसर्गिक वृत्ती वर आवर घालून अत्यंत सावध खेळ केला , आणि Australia ला एक अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता.

असंच आपल्या कपिलदेव किरमाणी - १९८३ झिम्बाब्वे सामन्याबद्दल बोलता येईल.

संघ भावना वगैरे तर आहेच; परंतु अंतिम उद्दिष्ट काय आहे आणि त्यासाठी टिच्चून उभे राहायचे आहे. फक्त उभे राहायचे आहे, काहीही इतर न करता हे खूप महत्त्वाचे. ही वृत्ती T-20 च्या जमान्यात, हे फार महत्त्वाचे. 

एक उद्योजक म्हणून, माणूस म्हणून देखील हा अप्रतिक्रिया युक्त स्तब्ध पणा अंगी बाणवणे हे महत्त्वाचे !



No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.