जसे जसे गुंतवणूक क्षेत्रात अधिकाधिक शिकतोय,
तसे तसे अधिकाधिक Amazing अशा Terms ची ओळख होत आहे. ज्या ज्या Extra Ordinary महत्त्वाच्या भासतील, त्या त्या पोस्ट करेन.
EV/EBITDA हे असेच एक गुणोत्तर.
तसं गुगल च्या मदतीने उत्तर काढायला अगदी सोप्पं आहे. आणि परीक्षेत पास व्हायला किंवा Coach अथवा Trainer म्हणून प्रभाव पाडायला. पण समजावून घ्यायला , आणि आपल्या डोक्यात घुसवून वापरायला मज्जा येते जास्त. मुळात हे गुणोत्तर का वापरावे ? पाहुया ...
EV म्हणजे Enterprise Value
सूत्र नंतर देतो. आधी विचार करून पाहू :-
एखादा उद्योग विकत घ्यायचा झाला , तर आपण त्याची किंमत रास्त आहे की नाही हे कसे बरे ठरवू ?
- त्याला दिलेली किंमत ( गुंतवणूक ) किती आहे ?
- ती दिली तर त्यातून मिळू शकणारा परतावा हा किती टक्के असेल ?
- तो ( परतावा ) केव्हा सुरु होईल ? ( साधारण पणे वर्ष अखेरीनंतर तरी व्हावा ! )
- तो जो काही परतावा अपेक्षित आहे; तो निदान ४ ते ५ वर्षांत तरी गुंतवलेली रक्कम परत काढून देईल काय ? ( म्हणजे साधारण २० टक्के वार्षिक ? )
- का आणि नक्की कसे हे होईल सर्व ? ( म्हणजे कोणत्या पद्धतीने सदर उद्योग चालविला जातो ? )
ह्या प्रश्नांची उत्तरे सापडली तर मग पुढचे पाउल टाकता येईल. ह्यासाठी हे गुणोत्तर खूप उपयोगी ठरते.
तर EV ( ENTERPRISE VALUE ) अर्थात उद्योगाचे "मोल" कसे काढले जाते ?
तर कंपनीच्या भांडवलापैकी जे भांडवल मार्केट मधून आलेले असेल, ते एकूण Market Capitalization म्हणून गणले जाते.
हे काढणे अगदीच सोप्पे आहे ☺ :-
👉त्या कंपनीच्या शेअर ची आजची किंमत x एकूण मार्केट मध्ये असलेले शेअर्स.
ही जी संख्या येते त्याला भावनिक मोल जास्त आहे. कारण शेअर ची किंमत हाच मुळात भावनिक आकडा आहे. तर फक्त ही किंमत पाहून तर ठरवता येणार नाही ना , कि कंपनी विकत घ्यायची कि नाही. तर ह्या संख्येतून आज असलेली देणी घेणी ह्यांचा हिशोब केला जातो ( कर्जे + रोख ). नंतर उरते ती Enterprise Value.
✵आता सूत्र पाहू :-
EV = Market Cap + ( Total Debt - Cash ).
एक उदाहरण म्हणून :-👇
समजा एखाद्या कंपनीची परिस्थिती अशी आहे:
✸ह्या संख्येतून सध्या असलेली लगेच द्यायची आणि लांब पल्ल्याचीही - कर्जे ही अधिक केली जातात. हा आकडा समजा आहे १५० कोटी. तर किंमत पुन्हा बदलली : र. ११५०
✸ह्याच वेळी कंपनीची अशी विविध येणी आहेत जी लगेच रोख मिळू शकतात, शिवाय बँकेत असलेली रोकड शिल्लक ही समजा ५० कोटी असेल, तर ती वजा केली जातात कारण ही द्यायची गरज नाही ना.
किंमत पुन्हा बदलली : र. ११५० - रु ५० कोटी = रु ११०० कोटी.
याचा साधा अर्थ काय?
समजा तुम्हाला ही संपूर्ण कंपनी विकत घ्यायची आहे.
कंपनीचे सर्व शेअर्स विकत घेण्यासाठी ₹1,000 कोटी लागतील.
पण कंपनीवर ₹150 कोटींचे कर्ज आहे.
कंपनीकडे ₹50 कोटी रोख आहेत.
म्हणून कंपनीचे आर्थिकदृष्ट्या समायोजित मूल्य ₹1,100 कोटी होते.
----------------------------
Market Cap आपल्याला सांगते की बाजार कंपनीच्या इक्विटीला किती मूल्य देतो.
Enterprise Value आपल्याला कंपनीच्या व्यवसायाचे कर्ज आणि उपलब्ध रोख लक्षात घेऊन किती मूल्यांकन होते हे सांगतो.
------------------
आता EBITDA समजून घेवू :-
शार्क Tank सारख्या दूरचित्रवाणी वरील कार्यक्रमांत वारंवार वापरला जाणाऱ्या ह्या शब्दाचा अर्थ काय, आणि हा घटक सारखा वापरला जातो, त्या अर्थी ह्याचे महत्त्व जरा काकणभर जास्तच असणार, नाही का !
नफा हा विविध स्तरावर गणला जातो. आपण अगदी सामान्यपणे वापरत असलेले नफ्या ला समांतर असे शब्द म्हणजे :-
Gross Profit तसेच Net Profit.
परंतु कसलेले गुंतवणुकदार हे मात्र ह्या दोन्हींचा विचार तसा दुय्यम करतात. त्यांच्या लेखी सर्वात महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे : कार्य चालन अर्थात Operational किंवा Operating नफा अर्थात Profit.
वरील दोन्ही प्रतिमा वरून स्पष्ट होतं कि EBITDA म्हणजे काय ते. मुख्य विषयापासून फार भरकटायला नको, म्हणून मी जरा पुढचा भाग घेतो.
तर EV/EBITDA हे गुणोत्तर म्हणजे ....
टिकून राहायचं की विकून टाकायचं ....
- गुंतवणूक टिकवून ठेवायची
- काढून घ्यायची
- टप्प्याटप्प्याने वाढवत न्यायची
- की कमी करत जायची

