Sunday, 30 August 2026

आपण कसे हळूहळू अदृश्यपणे अप्रिय होत जावू शकतो .....

घटना १ :-

एका हॉटेल मध्ये मी Agoda ह्या website वरून बुकिंग केले. काही कारणास्तव मला रद्द करावे लागले. नियमाप्रमाणे २४ तासांच्या आत मी ते रद्द केले, तर मला संपूर्ण refund मिळायला हवा होता. जो Agoda ने " सदर हॉटेल ने तो देण्यास नकार दिला आहे , त्यामुळे मिळणार नाही " हा stand घेतला. मी त्यांना केस कळविली. अजून तरी काही पुढे घडलेले नाहीये. 

सर्वात जास्त प्रभावी परिणाम : मी ( ग्राहक ) ह्यापुढे agoda चा विचार करताना "असेच एक" म्हणून करणे हा आहे. 
असंच पूर्वी एकदा Treeebo बाबत घडलं होतं. त्यांच्या तर माणसाने फोन वगैरे केला होता, पण परिणाम शून्य.

तात्पर्य : जास्त लोकांपर्यंत पोचायला डिजिटल मार्केटिंग चा वापर जरूर करा , परंतु प्रतिक्रिया मात्र जरूर पहा आणि आवश्यक तिथे स्वत: हस्तक्षेप करून ग्राहकाला खूष समाधानी तरी ठेवा. 
------

घटना २ :-

आमचे निवडक चे सदस्य श्री वाकडे हे स्वत: MASMA च्या कृती समितीवर कार्यरत आहेत. आणि आपला अधिकार वापरून त्यांनी एका संस्थेला त्यांच्या २ प्रदर्शनांत निशुल्क stall देवू केला होता. आता त्या संस्थेच्या प्रदर्शनात त्यांनी अशीच विनंती सदर संस्थेला केली असता, त्यांनी त्वरित ही विनंती गोड शब्दांत धुडकावून लावली.

तात्पर्य : काहीच नाही. असा प्रकार सदर संस्थेबद्दल आणि त्या व्यक्ती बाबत वाकडे पुन्हा करणार नाहीत हे नक्की.

मला वाटतं की कधी ग्राहकाला अपेक्षित असणारी फेड आपण करू शकू किंवा नाही. परंतु एक आस्थापूर्वक concern ठेवणे आणि तसाच संवाद ठेवून त्यांच्याशी नीट "सु"संवाद ठेवायला हरकत नाही.

आपण अप्रिय होण्यापासून तरी लांब राहूच शकू, काय ?


No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.