Sunday, 15 December 2024

समांतर गुंतवणूक हवीच

आजच दोन वेगवेगळ्या व्यावसायिकांना भेटलो. दोघेही ३५ च्या घरातले. दोघांना हल्ली मी सर्व नव उद्योजकांना जो प्रश्न करतो तो केला.

"कुठे गुंतवणूक करताय का ?" म्हणजे shares, mutual funds वगैरे.

एकाचं उत्तर आलं होकारार्थी. त्याला निदान हा विषय व्यवस्थित ठावूक असेल, नसेल, परंतु SIP करतोय. हे ही नसे थोडके.

दुसऱ्याला विचारलं, तर त्याला या विषयातलं काहीच ज्ञान नाही असं लक्षात आलं. फार नवल नाही. मलाही कुठे होते ? मी युक्तिवाद करत राहायचो, माझ्याच धंद्यात गुंतवले तर सर्वोत्कृष्ट नाही का, वगैरे.

हा माझा धंदा मी कितीही प्रामाणिकपणें करत असलो, कितीही कुशलतेने करत असलो, तरीही त्यात धोका हा असतोच. कधी तात्पुरता, तर कधी कायम स्वरुपी. कारण सरकारी नियम बदलत राहतात. नव्या व्यवस्था येतात, वगैरे.

असे काही घडले, की, एकदम संकट उभे राहते, आणि असेल नसेल ते सर्व देशोधडीला लागते. व्यक्तिगत आयुष्यात आपण कायम "विम्या" चे उदाहरण बघतो. मग संपूर्ण धंदाच जर अडचणीत आला तर काय करायचं ? ह्याला कोणता विमा ? नाही, म्हणजे नसावा.

आपली गुंतवणूक विभागून करा :-


एका कसलेल्या गुंतवणूकदारा प्रमाणे विचार करायचा झाला; तर ( हे काय नवीनच ! 😆 ) आपली गुंतवणूक आपण विभागून करायला हवी, परिणाम स्वरूप, त्यातील जोखीम विभागली जाते. म्हणजेच आपल्या सोबत काही इतर उद्योगांत देखील आपण गुंतवणूक करायला हवी. 

असे उद्योग कुठे शोधायचे ?


ह्याच करिता तर शेअर मार्केट चा जन्म झालाय ! 🙏हा जुगार म्हणून अजिबात संबोधू नये. हो, त्यात अशा रोज खरेदी-विक्री करण्याच्या संधी आहेत, जे आपल्याला नक्की मोहात पाडू शकतात; तरी त्यांपासून दूर राहून आपला अंत:स्थ हेतू साध्य करणे हे उद्दिष्ट ठेवले तर आपल्याला एक निश्चित स्वरुपात फायदा होवूच शकेल. 

सोप्पा मार्ग म्हणजे, Mutual Fund मार्फत गुंतवणूक करायची. आपल्या सारख्याच अनेक लोकाना, ज्यांना कुठे ही गुंतवणूक करू ? हे समजत नसते; त्यांच्या साठी हा उत्तम पर्याय आहे. आपण सर्वांनी मिळून एक तज्ज्ञ व्यक्ती नेमली, व त्याला आपल्या फायद्यातील काही भाग दिला, तसेच व्यवस्थापन शुल्क दिले, असा विचार केला तर ?

हेच काम हे mutual fund सल्लागार मंडळी करतात. अशा काही कंपन्या आहेत जे शेअर बाजारात पैसे गुंतवतात. म्हणजे त्यांचे कामच हे, कि शेअर बाजारात हुशारीने गुंतवणूक करून पैसे मिळवायचे आणि त्यांच्या स्वत: कडील भाग धारकांना हे वाटायचे. तर ह्या कंपन्यांत आपण पैसे गुंतवा. हे प्रमाणात जरा कमी धोकादायक आहे. जोखीम तर सगळीकडेच आहे. तुलनेत इथे विभागते, आणि जास्त सुरक्षित आहे. शिवाय परतावा ( ५ पेक्षा अधिक वर्षांचा केल्यास ) १५ टक्के हून अधिक मिळतो.

किती गुंतवायला हवेत ?


ठरवावे लागेल. तरीही एखादा प्रकल्प सुरु करायचा ठरवला, तर एकरकमी काही रक्कम बाजूला करता ना, उदाहरणार्थ २ लाख, ५ लाख वगैरे.... तर ही रक्कम प्रथम एखाद्या सल्लागारास विचारून Liquid Fund मध्ये टाका, म्हणजे लागेल तेव्हा त्यातून रक्कम काढता येईल. हे बँकेतील Current Account पेक्षा कधीही उत्तम. कारण Current account तुम्हाला शून्य व्याज देते, ह्या Liquid Fund वर मात्र महागाई दराच्या ( सध्या ६ टक्के आहे ) २ टक्के हमखास अधिक दराने उत्पन्न मिळते, तेही जितके दिवस वापरू तितके दिवस.

ही पोस्ट Mutual Fund बद्दल नाही, मी त्यातील तज्ज्ञ देखील नाही. तत्त्व लक्षात घ्या : 

  • आपला व्यवसाय ही सुद्धा आपली एक गुंतवणूक च आहे हा एक त्रयस्थ दृष्टीकोन विकसित व्हायला हवा. 
  • त्याने आपल्याला "पैसे" द्यायलाच हवेत. नसेल देत, तर ती कमी करा, विखरा. 
  • म्हणजे व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम व्हायचा नाही.

ह्याबद्दल काही साहित्य जरूर सुचवू शकेन :-


१. विवेकाधारित विचारसरणी ह्याकरिता REBT हे तंत्र प्रचलित आहे. उद्योजक म्हणून ह्याचा कसा वापर करायचा ? ह्याकरिता कि मो फडके ह्यांचे "उद्योजकांचे अंतरंग" हे उत्कृष्ट पुस्तक आहे. 





















२. गुंतवणूक कशी करावी ह्याकरिता लर्न टू अर्न हा एक अनुवाद अत्यंत सुरेख आहे. संदर्भ जरी अमेरिकन अर्थव्यवस्थेचे असले, तरी तत्त्वे शाश्वत आहेत. गरज पडेल तेथे अनुवादकाने भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार जरूर घेतलेला आहे. 




















३. म्युच्युअल फंड - गुंतवणुकीचा गुरुमंत्र ह्या पुस्तकातून अगदी थेट, सोप्या स्वरूपात, म्युच्युअल फंड ह्या गोंधळात टाकणाऱ्या विषयातील सर्व धूसरता दूर होईल ही खात्री आहे. 




















वरील सर्व पुस्तके online मिळतीलच. न मिळाल्यास मला विनंती करा : २, ३ चे लेखक माझ्या व्यतिगत परिचयातील आहेत.

हे सोडून आमचे निवडक मधील काही podcasts तुम्हाला नक्की उपयुक्त ठरूच शकतील :-


१. लिक्विड फंड चा खरं सुज्ञ उपयोग :- https://youtu.be/HVARK78jj-8

२. accounting ह्या विषयाचे अनन्य साधारण महत्त्व :- https://youtu.be/JraLnlq4WdM

३. समांतर पणे गुंतवणूक कशी शतगुणित होऊ शकते ? : https://youtu.be/c3CsAdbkNgM

शिवाय ह्याच blog वरील काही विशेष पोस्ट्स तुम्हाला "अर्थ साक्षरता" ह्या विशेष मथळ्याखाली वाचायला मिळतील.


No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.