Wednesday, 11 December 2024

आपण उद्योजक आहात ना ? ही वाट वेगळीच असते, आहे !

उद्योजक म्हणजे काय ? तर नोकरी करून दुसऱ्याच्या उद्योगासाठी आपली क्रयशक्ती आणि व्यवधान फक्त मासिक मानधानाकरिता न 🚫देणारी व्यक्ती. 

💪हा निर्णयच असतो, काल परत्त्वे तो निश्चया कडे झुकू लागतो. धार वाढत जाते. कधी अगदी हट्टी पणा कडे जाते. 

कधी कधी आपण म्हणतो.... "कि अरे इतका कशाला त्रास करून घ्यायचा ? इतकं का कुटुंबाला दावणीला लावायचं ?, धरायची एखादी नोकरी, कमीपणा काय त्यात ?"

पण तरीही तो/ती ते सोडत नाही. ह्यातून कदाचित तो उद्योग सावरतो, आणि एक आदर्श म्हणून उभा राहतो. ज्यातून हे नक्की शिकता येतं ... कि जिद्दीला पेटून ह्याने/हिने हे तडीस नेलं.

आणि जरी नाही सावरलं तरीही ती वाट निश्चित वेगळी होती, जी एखाद्या धनाढ्य बहुराष्ट्रीय उद्योग समूहाच्या प्रमुखपदी असणाऱ्या व्यक्तीच्या प्रवासापेक्षाही अधिक रोमांचक असते, ह्यात वादच नाही. म्हणूनच मला सुंदर पिचाई पेक्षा श्रीनिवास ठाणेदार जास्त भावतो !

उद्योजकता सांभाळायला Guts नक्कीच लागतात boss !

आज निवडक उद्यमी चा वाढदिवस ! 

अशा असंख्य उद्योजकांना सलाम, ज्यांनी आपल्या कडील सर्वस्व पणाला लावलं , उद्योग नाही सावरला😢.

👏👏तरीही तुम्ही आदर्श आहातच ! कारण तुम्ही ती वाट चालायचं धैर्य दाखवलंत आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला ह्या वाटेतील धोके दाखवत राहता , जेणे करून पुढचा वाटसरू त्याची वाट यशस्वी रित्या चालेल !

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.