" आपण मराठी ५००० फुटाच्या factory पासून सुरुवात करतात आणि म्हणतात ... बघू या कसे चालते ते आणि मग ....."
अनुप वैद्यांच्या ५०,००० स्क्वेअर फुटांच्या factory मध्ये त्यांच्या केबिन मध्ये बसून आम्ही गप्पांना सुरुवात केली. मी अगदी सगळे detail सांगणार नाही, कारण हा काही मुलाखती घेणारा Youtube Channel नाही. तरी त्यांचा पसारा लक्षात यावा आणि काय घेता येईल ते घ्यावे ह्यासाठी ह्या पोस्ट रुपी हा खटाटोप.
आधी जरा खालील फोटो पाहून घ्या.( मी काही प्रो नव्हे )
उल्लेखनीय ....
- Tefabo Products नावाने त्यांचे एक Fabrication unit आहे. २०१८ साली सरळ ३५,००० फुटाच्या शेड मधून हे त्यांनी सुरु केले. हातात कोणतीही Order नव्हती. होता तो दांडगा अनुभव, लौकिक ( क्षेत्रातला ) आणि दूरदृष्टी.
- वैद्य सरांनी फक्त ठरवले की पवन उर्जा क्षेत्रात लागणारे Fabrication करायचे २०३० पर्यंत आणि उत्तुंग भरारी घ्यायची. ( त्यांच्या शब्दांत Exponential Growth ) आत्मविश्वास हा खूप घासून घासून गुळगुळीत झालेला शब्द वाटला इतका अनुप सरांकडे ठाम पणा आहे.
- कधी कधी येणारे कठीण प्रसंग लीलया हाताळणाऱ्या वैद्य सरांकडे Cash Flow चे उत्तम ज्ञान आहे.
- Capex कमी हे त्यांचे जणू सूत्रच आहे. त्यामुळे निष्कारण अवजड यंत्रसामुग्री मध्ये पैसा गुंतवून ठेवण्या ऐवजी ते माणसांत गुंतवितात.
- सुरुवातीला महिन्याला ४ ते ५ लाख रु इतका लहानसा Turnover पासून सुरु झालेली Tefabo आता ७० कोटी ना पोचली आहे, पुढील वर्षी १०० कोट असणार हे अनुप सरांचे ठरलेलेच आहे.
ह्यातून काही प्रेरक वाटले, तर नक्की प्रतिक्रिया रूपाने येवू द्यात !
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.