Sunday 26 December 2021

प्रत्येकाचा "segment" निराळा .....

आजच घडलेले 2 प्रसंग :-

प्रसंग १ : आमच्या बिझनेस नेट्वर्किंग क्लब मधील एक चर्चा 

" खूपच कच्चे आहेत यार आपले मेम्बर्स "

" असं कसं , इतकं कसं कळत नाही यार ! "

" अमुक-अमुक सारखं व्हायचं तर खूपच पल्ला गाठायला  लागेल "

प्रसंग २ : फोन वरील एक चर्चा, विषय : आंतरराष्ट्रीय प्रदर्शन 


" त्या mahabiz बद्दल काय अनुभव आहे ? "

" काहीच फरक पडत नाही , म्हणजे आपण व्यवसाय मिळवायला म्हणून गेलो, तर काहीच घडत नाही तसं "

" का बरं ? "

" म्हणजे आपल्यात आणि त्यांच्यात इतकं अंतर जाणवतं ! आपली लायकी च नाही त्यांना Match होण्याची ! सर्वच बाबतीत अत्यंत पुढे आहेत ते आपल्या. आपण कुठे कमी आहोत हे कळायला जावं फार तर ! "

ह्यातल्या दोन्ही Highlighted प्रतिक्रिया तपासल्या तर त्यात कुठेतरी कमी पणाची किंवा कुणासारखे तरी होण्याची किंवा आपण तसे नसण्याची खंत किंवा सल प्रामुख्याने दिसते आहे. Milestones असतातच. तरी त्या पासून फक्त प्रेरणा घेवून, तरीही आपला वेगळा प्रवास जाणून, स्वत:ला समजून घेण्याची आणि ते वेगळेपण जपण्याची, कसोशीने जपण्याची नितांत आवश्यकता असते, आहे. 

Segmentation : एक सुटसुटीत तंत्र !


ढिगाने Videos सापडतील ह्या विषयावर इंग्रजी मध्ये youtube वर. मी अगदी सोप्प्या पद्धतीने समजावून द्यायचा प्रयत्न करतो. तर हे कळायला हवं कि मी कोणत्या प्रकारच्या ग्राहक वर्गाशी deal करण्यासाठी Comfortable आहे, कुणाशी मला सहज, ताणरहित संवाद करता येतोय ते. 

ह्याकरता आधी हे समजून घ्यावं लागेल, की जे मी माझं Deliverable म्हणून समोर आणतोय, म्हणजेच जे मी समोरच्याला देवून त्याबदल्यात अर्थार्जन करू इच्छितोय, त्याची खरी उपयुक्तता कोणत्या प्रकारच्या गरजा असलेल्या कोणत्या प्रकारच्या ग्राहकाला आहे. 

चला, एक उदाहरण घेऊ : माझंच !


तर माझं Deliverable काय आहे ? तर डिजिटल मार्केटिंग सल्ला | सेवा | प्रशिक्षण 
का बरं मी हे देतोय ? माझ्या स्वत:च्या अनुभवाचा बेस.

आता यात मी " कोणत्या प्रकारच्या ग्राहक वर्गाशी deal करू" हे कसं ठरवता येईल ? 

मी जेव्हा स्वत: च्या अनुभवाचा बेस  असं म्हणतो, तेव्हा मला बाहेर माझ्या स्वत: सारखेच ग्राहक शोधावे लागतील. म्हणजे माझ्या स्वत: सारखेच प्रश्न पडू शकलेले, शकणारे. म्हणजेच :-

Manufacturing करणारे तेही पोर्टल्स वर जाहिरात करणारे, मशिनरी विकणारे. म्हणजेच हाच 💪 माझा टार्गेट segment झाला. पुन्हा size केवढा ? तर MSME segment. 

एकदा का हे कळलं कि आतली मळमळ बंद व्हायला हवी !


आता मला नको वाटत राहायला कि "अर्रर, मी त्या अमुक सारखं नाही काम करत !" प्रत्येकाचा segment वेगळा आहे. त्यात कमी, लहान, छोटं असं काहीच नाही. सगळे तसे सो called मोठ्ठेच होत राहिले, तर छोट्या गरजा कुणी भागवायच्या ? त्यामुळेच तर सर्व प्रकारचे, सर्व व्यावसायिक नांदत असतात, ह्याच जगात. 



No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.