Saturday 11 December 2021

दुसऱ्या वर्षपूर्ती च्या निमित्ताने ....

आज ११ डिसेंबर २०२१ , अर्थात "निवडक उद्यमि"चे दुसरे वर्ष संपले. त्यानिमित्ताने हे अगदी मुक्त विचारमंथन. काहीही न योजून केलेले. कोणताही ठराविक परिणाम न अपेक्षिता केलेले. त्यातून माझे कच्चे-पक्के दुवे देखील उघडे पडतील कदाचित. पण म्हटलं ना ... कोणताही "अमुक एक परिणाम न अपेक्षिता केलेले" ...!

खरं तर निऊ सुरु करताना बिझनेस नेट्वर्किंग मधले व्यावसायिक मेम्बर्सच डोळ्यासमोर होते. त्यांचं ( त्यात मीही आलोच ) ते थोडसं उथळ वागणं, कधी कधी अती स्वार्थी होत आपल्यापुरता विचार करणं तर कधी अधिकार-लालसेपोटी अंध होणं, कधी गटबाजी तर कधी प्रांतवादी होणं वगैरे अनेक कंगोरे लक्षात आले, येत राहतात.

वाटत राहतं ... "ये तो धंदा नहीं है boss". जास्त खोल जाऊन, अधिक प्रगल्भ विचार करत राहून एक दीर्घ पल्ल्याची उपाय-योजना करता येईल का काही ! हाच विचार करता करता अनेक व्यक्तींशी संबंध येत गेला, आणि मग अचानक पणे एक गोष्ट लक्षात आली... की अरे... शिकायला काहीच लागणार नाही ! एक यु ट्यूब Video भी काफी है यार !

एकलव्य चा जन्म !

ह्या वर्षातली माझ्यासाठी खूपच मोठी उपलब्धी म्हणता येईल ही. म्हणजे आपण प्रत्येक मीटिंग ला निवडून निवडून Video आणतो, त्यातले जे Speaker असतात, ते होतात आपले द्रोणाचार्य ! हा सगळा मामला अगदी विनामुल्य ! कित्ती भारी. ना तो speaker शोध , ना त्याला आवश्यक असा प्रेक्षक गोळा करा ना अजून काही ! मला तर हे खूप म्हणजे खूपच भारी वाटतं.

कारण मला मुळात उगाचच  Crowd नकोच आहे. ग्रुप ची निष्कारण संख्या वाढविणे, मग ते पीच करत राहणे, मग त्या physical मिटींगा, फोलच आहे असं मला वाटू लागलंय आता. त्यापेक्षा ज्यांना वाटतं त्यांनी भेटावं खुश्शाल !

फेसबुक live आहेच कि शिवाय !

फेसबुक ने इतकी मस्त सोय करून ठेवलीये, कुणालाही पाहता येतं ! ग्रुप जॉईन व्हायचं बंधन नाही ! किती मस्त आहे. ज्यांना हवं ते येतात आत, बाकीचे बांधावर ! 

येते काही महिने तरी हाच राहील आपला परिपाठ 

म्हणजे एक सत्र एकलव्य , एक सत्र ओळखी आणि बाकी गप्पा असंच ठेवू schedule मिटींग्स चं. आता ग्रुप पोस्ट सुद्धा बदलाव्या म्हणतो ! पाहूया. 

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.