Tuesday 7 December 2021

कठीण काळाचे आभार !

कोविड आणि पाठोपाठ ओमिक्रोन ह्या दोन राहू-केतूंनी सर्व मानव जातीला अगदी त्राही भगवान करून सोडले आहे जणू. जो-तो हल्ली समस्येत आकंठ बुडालेला आहे. आजूबाजूला चर्चा सुद्धा "टिकणे" ह्याविषयाचीच चाललेली दिसते , ऐकू येते. व्यवसायांची बऱ्या पैकी वाताहत झालेली दिसत आहे, आणि जो-तो आधी माझं भागू देत, मग जगाचं बघू  ह्या अगदी अस्तित्त्वाच्या लढ्यात गुंगलेला दिसतोय. यातून जाणवलेल्या काही गोष्टी ज्या पुढची दिशा ठरवायला मदत करतील :-

जुनी गृहीतके बाद करूयात 


कोविड पूर्वी जर आपलं एकच एक model असेल, तर ते सोडायला लागेल, विविध, Customized Models तयार करावी लागतील. उदा. एकाच कंपनीला supply, एकाच प्रकारच्या business segment ला supply करणे; शाळा-college मध्ये परत पूर्वीसारखी खोगीर भरती, एकाच प्रकारचे ट्रेनिंग कोर्सेस, फक्त "अमुकच" करेन असा तोरा, हे सगळं जर तुम्ही "जरा कोविड संपू दे" ह्या आशेवर रहात असाल , तर कठीण आहे.

कारण मुळात जगाला कळून चुकलं आहे, की अनंत प्रकारे त्यांच्या प्रश्नाला जगभरातून उत्तरे मिळू शकतात. इंटरनेट ह्या महान माहितीसागराचा पुरवठा आपल्या घरात आहे, आणि प्रत्येक जण ह्या कोविड च्या नाका बंदीमुळे त्याला उत्तम ओळखू लागलाय. त्यामुळे आपण देतो ते लय भारी आणि कोण नाही आपल्याशिवाय हा विचार असेल, तर तो फेकून द्या. कल्पक व्हावं लागेल.

कल्पकता ही काही दैवी देणगी नव्हे !


कल्पक = Artist ही एक चुकीची समजूत आहे. वर समजून घेतलेले एक नव-सत्य मान्य केलं कि कोणालाही याची उत्तरे सापडतील. एकाच ट्रेनिंग ऐवजी भाग पाडून कमी किंमतीची काही छोटी छोटी ट्रेनिंग, किंवा केक सारख्या उत्पादना ला प्रसंगारूप सजवून वेगवेगळी models करणे, भाजी घरपोच देता देता त्यासोबत इतर नवीन काही सप्लाय करणे, एखाद्या मोठ्या कंपनीला सप्लाय करता करता एखादे B2C model उभे करणे, असे अनेक प्रकार सुचणे, करणे हा देखील कल्पकतेचा भागच आहे.

Quantity Based विचारसरणी ला छेद 


Data ह्या प्रकाराला अ-वास्तव  अति महत्त्व दिलं जातंय. तो मुकेश अंबानी म्हणतो म्हणे "Data हे नावं खनिज तेल आहे" म्हणून आपणही निर्बुद्ध होवून त्याच्या मागे लागणं चूक आहे. तो का म्हणतो, ते सोडून देवू. मला तर जगायला माझं काम आणि त्याच्याशी माझं असलेलं सखोल नातं हेच कामाला येईल. मग Data कुठे गंडवतो ? Data गंडवत नाही, Data म्हणजे सर्वस्व ह्या मध्यवर्ती कल्पनेला धरून व्यवसाय उभा राहिला तर गंडलो समजा

कालच एका whatsapp chat वर मला एकाच प्रकारे सतत मेसेज करणाऱ्या एकाला मी हेच सांगत होतो, कि तू चुकीच्या व्यक्तीला Target करण्यात तुझा (म्हणजे मालकाचा 😇) वेळ, पैसा (म्हणजे मालकाचा 😇) आणि उर्जा (म्हणजे कंपनीची ) वाया दवडत आहेस. हे होतं, कारण निर्बुद्ध पणे data विकत घेतला जातो, एकदा विकत घेतला कि तो "वसूल" केला पाहिजे म्हणून कर्मचारी ठेवले जातात आणि त्यांना CRM सारखी softwares लावून पुन्हा निर्बुद्ध follow अप केला जातो. 

CRM Softwares वाईट आहेत का ? नाही. पण मुळातच software म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणावरचा Quantity based approach.त्यामुळे आलंच बाकी सगळं मागोमाग. अशीच परिस्थिती सर्व सोशल मिडिया टूल्स ची सुद्धा. असो.

तरीही आपल्याकरिता रस्ता असतोच !


आपण एक ठरवायचं : निर्बुद्ध पणे स्वीकारणार नाही. आधी तर मूल्याधारित विचारसरणी विकसित करेन. ही मूल्य मग माझ्या कामाला जोडेन, आणि मग सतत सतर्क राहीन.

पोकळ "Passion" उपयोगी नाही 


Passion ची सुद्धा खूपच उथळ रूपे आपल्या समोर आणली जातात. कुठेतरी अवकाश सफरीला निघालेला तो बेझोस किंवा ४५० कोटींचा बंगला बांधणारा अंबानी, किंवा अजून काही. त्यामुळे कुणालाही "तुझं स्वप्न काय" असं विचारलं, की माझं Chartered Helicopter असेल, किंवा माझ्या factory मध्ये १००० कर्मचारी असतील, किंवा हल्लीची style म्हणजे : "म्हणे मी २०२४ पर्यंत १००० उद्योजक घडवेन" ! सगळं फोल, पोकळ, उथळ. एक वेळ येते कि तुमच्याकडे जगातलं सर्वस्व असतं तरीही करमत नाही, कारण ह्या ह्या Passion ला कुठेही लोकांची खरी गरज जोडलेली नसते. तुझ्या helicopter शी किंवा factory शी किंवा संकल्पाशी फक्त तुझा संबंध आहे रे बाबा, तू कोण उद्योजक घडवणार ? तू फक्त दुकान लावलंस. 

कालच "शहा" नामक एका व्यक्तीला मी भेटलो. वय असेल ७० ते ७५. व्यवसाय ? Stamp-Vendor. आमच्या saturday क्लबच्या उरुळी कांचन च्या मीटिंग ला हे गृहस्थ आले होते. पिढीजात व्यावसायिक, पण ना कुठे माज, ना दिखावा. त्यांना ते Give-Ask काहीही कळलं नसावं. ओळख देताना म्हणाले " मी Stamp विकतो, कधीही या, २४ तासात कधीही". त्यांच्या दुकानात गेल्यावर कळतं कि ते अगदी सत्य आहे. "उरुळी कांचन मधलं सर्वात छोटं दुकान असेल माझं" असं म्हणणाऱ्या शहा ह्यांच्या पूर्ण इमारत मालकीची आहे आणि ती पूर्णपणे भाड्याने दिलेली आहे. म्हणजे बिझनेस किंवा आर्थिक साक्षरते बद्दल बोलायला नको. मुद्दा : लोकांच्या खऱ्या गरजेशी नातं हवं , Passion सापडेल आपोआप.

विचार करावा लागेल 


होय, आणि तो आपला आपणच करायचा आहे. बाहेरून काय करायला लागेल ? तर प्रथम मान्य करावं लागेल, कि जुन्या संकल्पना कदाचित चालतील किंवा नाही, पण नव नवीन models मात्र नक्कीच उभी करावी लागतील. दुसरं म्हणजे हा विचार करायला मोकळा वेळ स्वत: सोबत द्यायला लागेल. Multi Tasking कमी करावं लागेल, आणि जे जे करतो त्यात एकरूप होऊन करावं लागेल. आपलं काम हे आपलं आयुष्य संपन्न करायला आहे, बँकेत पैसे ठेवून त्यावर उर्वरीत आयुष्य काढू म्हटलं तर नाही चालणार. ते पैसे असतील तरी ठीक, नसतील तरीही ठीक. थोडी लाचारता (हे सुद्धा मनाचे खेळ) वगैरे येईल; पण काम करता यायलाच हवे, आणि कोणतेही. कारण ते उपयुक्त तर ठरायला हवं ना !

आभार : कठीण काळा, तुझेच फक्त !


"पैसाच शेवटी कामाला येतो" हे गृहीतक मनात धरलं असेल, तर ते खरंच काढून टाका. पैशाच्या विरुद्ध आहे ही विचारसरणी असाही चुकीचा अर्थ घेवू नका. आपण करीत असलेली विविध प्रकारची काम आपल्याला मरेपर्यंत साथ देतील का , म्हणजेच करता येतील ना ? हा प्रश्न ह्याच काळाने आपल्याला विचारायला भाग पाडलेल आहे. 

2 comments:

  1. फारच सुंदर लेख. अगदी चपखल उदाहरणे

    ReplyDelete
  2. तुमच्या एवढेच सुंदर विचार,
    True caller विषयी copy paste करण्यात खालचा मजकूर आला, नंतर वाटलं आलंय तर राहूदे, आपला आशिर्वाद सुद्धा...

    Great more Earning,
    *I am Raaj Jagtap from Pune PropGuru llp*
    we are rera register property advisors tied up with 80 Builders & 300+ Projects  around Pune & Mumbai.
    We deals in all kind of Residential, commercial & Agriculture Properties.
    We have some Bank Properties where you Can save upto 20% while you are buying it.
    Connect me to property buyers & Sellers, Investors looking to invest in properties with best ROI.

    Raaj Jagtap
    your own Property Advisor

    😍 *RAAJ JAGTAP*
    💡Pune *PROP GURU*
    📲 *+918080988889*
    +918080188881
    🏛 +918080388883
    🪀https://wa.me/918080988889
    📧
    raaj@punepropguru.com

    https://www.facebook.com/punepropguru
    💳 Biz Card https://card.linkconnect.in/pune-prop-guru-llp
    🌐 Www.punepropguru.com

    ◼ FB Page /punepropguru
    ◼Tweeter /punepropguru
    ◼ YouTube /punepropguru
    ◼ LinkedIn /punepropguru

    ReplyDelete

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.