सर्च इंजिन म्हणजे काय ? तर लोकांच्या मनात असलेल्या शोध मोहिमेत त्यांना मदत करणारे. वरकरणी दिसताना असंच भासतं कि हे एक उत्तम सर्च इंजिन आहे. निदान ज्या प्रकारे त्यावर माहिती टाकलेली दिसते, त्यावरून तरी. पण प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केलीत, की अत्यंत चीड येवू लागते.
तुम्हाला हवं ते निवांत पाहण्याची, त्यातून शिस्तीत, आरामात काहीच निवडण्याची सोय नाही. सारखे सारखे pop ups टाकून हैराण मात्र करत असतात.
थोड्या फार फरकाने just dial ह्याची सुद्धा वेगळी कथा नाही.
कसे असायला हवे ?
आपण गुगल वर एखादा व्यवसाय शोधात असतो, त्यात त्या त्या व्यवसायानुरूप साधारणपणे सर्व मानक दिलेले असतात. त्यावरून आपल्याला सहजपणे निवडता येतं.
👉हे ह्या websites वर नाही. हे सोपे का होऊ नये ?
ग्राहकाला चटकन काही सप्लायर बाजूला वेगळे काढून ठेवता यायला हवे, त्यांना संपर्क साधणे सहज हवे. हे काहीही नाही. तर India Mart त्यांच्या लिस्टिंग करणाऱ्यांत चढा ओढ लावते , आणि लाभार्थींचा व्यवसाय वर ढकलते.
⛔हे नसायला हवे. तुमचा मूळ उद्देश ( स्व धर्म ) हा लोकांना लोकांचे शोध पटकन मिळवून देणे हा असायला हवा आणि पर्यायाने तो platform देखील ✔
स्वधर्म म्हणजे व्यावहारिक नाही असे अजिबात नाही
जेव्हा BNI सारखी एखादी संस्था Selling, किंवा lead generation wing स्थापन करण्यासाठी नाही म्हणते, तेव्हा स्वधर्म च पाळत असते. टेल्को म्हणजे आताची टाटा मोटर्स इंडिका V2 चे दोषकारक बम्पर स्वखर्चाने बदलून देते, ती स्वधर्म च पाळत असते.
ह्या रूपकाने एखाद्या माशिनेरी शोधणाऱ्या व्यक्तीला त्याच्या त्याच्या मापदंडा अनुसार मशिनरी चे जास्तीत जास्त पुरवठादार कमीत कमी वेळात समोर आणून देणे हा indiamart सारख्या website चा स्वधर्म का असू शकत नाही ?
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.