Saturday, 21 March 2026

गुगल सर्च कन्सोल : एक दुर्लक्षित उपयुक्तता

काही वर्षे माझी अशी समजूत झाली होती ( आणि ती काही अंशी खरी सुद्धा होती ) , की आता महत्त्व ( फक्त ) व्हिडीयोज ना द्यावे. कारण सुमारे २०१३ पासून माझ्या web वरची माझी खरी मालमत्ता ( म्हणजे माझी website ) तर तयार आहेच; शिवाय ती बऱ्या पैकी पहिल्या पानावरचे स्थान राखून सुद्धा आहेच. 

परिणाम स्वरूप २०१९ नंतर ( जवळ जवळ ७ वर्षे ) मी website साठी काही कंटेंट लिहिला नाही, शिवाय त्याकडे काही लक्ष देखील पुरवले नाही. 

विचार इतकाच : की व्यवसायात काही बदल झालेला नाहीये, की त्याच्या स्वरुपात, पद्धतीत. आणि जे काही विचार मांडायचे आहेत, ते तर Youtube द्वारे सुरूच आहेत की.

गेल्या काही महिन्यांतला बदल 

गेल्या ( खरे तर वर्षभर ) सहा महिन्यांत , आणि जास्त करून जानेवारी पासून एक विचित्र अनुभव येत आहे, की मला ट्रेनिंग करिता येणारी मंडळी अगदी गंभीर रित्या कमी झालेली आहेत. 

प्रत्येक तिमाही ला आढावा घेण्याच्या पद्धतीचा खूप मोठा फायदा 

गेले दोन वर्षे आम्ही प्रत्येक तिमाही ला बसून परिस्थिती चे मूल्यमापन करतो, शिवाय पुढच्या तीन महिन्या मध्ये अगदी काही झाले तरी कार्य पद्धतीत मोठ्ठे बदल करत नाही. उलट सखोल विचार करणे, मूळ तत्वांना धक्का न लावणे ह्या गोष्टी कसोशीने पाळतो. ह्यामुळे "नक्की काय होत असेल" ह्याचा नीट विचार करता आला. नाहीतर उथळ विचारांना बळी पडून मोठे नुकसान होऊ शकते. 

काय आढळले ?

आम्ही विचार करत होतो, तसा बाह्य परिस्थितीचा विशेष फटका बसलेला नाहीये
तर लोकांच्या माहिती शोधण्याच्या पद्धतीत घडून आलेला बदल ह्याचं आहे हा फटका. 
तरुण मुळे, तसेच ज्यांना ठावूक आहे अशी सर्व मंडळी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्रास वापर करतात.
जी मंडळी पारंपारिक गुगल सर्च वापरतात, त्यानाही प्रथम कृत्रिम बुधीमत्तेचाच पर्याय दिसतो. 

फरक कसा पडला आहे ?

आता Chat GPT किंवा Gemini मुळे मंडळी व्यक्तिगत प्रश्न विचारतात. 

ही नवी सर्च इंजिने त्यांचे व्यक्तिगत मुद्देसूद, आस्थेने अमर्यादित, उलट सुलट शंका निरसन करतात. ही उत्तरे ही इंजिने इंटरनेट वरूनच शोधतात. ही सर्वात सुयोग्य उत्तरे सर्वात जलद देण्याची कटीबद्धता गुगल अर्थातच राखून आहे. माझ्या पाहण्यात आले, की गेल्या ६ आणि खर करून ३ महिन्यापासून गुगल आता फार जुना ( माझा बराचसा ) आशय दाखवत नाही. आणि दुसरा तितका तुल्यबळ आशय उपलब्ध नसेल, तर दाखवेलही काही काळ ( हेही माझ्या बाबतीत झालंय ). आणि जरी समोर माझ्या वेबसाईट वरील मजकूर दाखवला तरीही काही अशा अटकळी आहेत, की ज्या द्वारे आपल्याला कळू शकते की लोक आपली website उघडूनच पाहत नाहीयेत

तर गुगल कडे ही माहिती जात राहते आणि हा क्लिक थ्रू रेशो ( CTR ) सातत्याने कमी कमी होत चालला असेल, तर गुगल किंवा इतर AI इंजिने अनुमान बांधतात, की आता ह्या links लोकांना देत राहण्यात अर्थ नाही.

हे कसं दुरुस्त करायचं  ?

मी इथे जेमिनी च्या मदतीनेच हे केले. म्हणजे "काय करू" ची अगदी Step By Step मदत घेत आहे. तर आधी काय होतंय हे पहायचं : ते गुगल सर्च कन्सोल च्या मदतीने. हे एक अतिशय कमी ठावूक असलेलं अत्यंत उपयुक्त , विनामुंय असं हत्यार आहे. ज्याद्वारे आपल्या Website वर काय सुरु आहे हे समजते. खूप सखोल शोधा अंती मला अनेक गोष्टींसोबत एक प्रमुख गोष्ट सापडली, ती म्हणजे माझी पेजेस महिनोंमहिने mobile वर झटपट लोड होत नाहीयेत. त्यामुळे बघा काय फरक पडलाय :-👇

२०२५ वि. २०२६

इम्प्रेशन मध्ये किंचित वाढच आहे, परंतु क्लिक्स मध्ये मात्र लक्षणीय घट आहे, आणि ती वाढतच चालली आहे ( होती ). आता ह्यावर काम सुरु केलेले आहे. आणि थोडी थोडी परिस्थिती सुधारत चाललेली आहे.  





No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.